रविवार, ३० एप्रिल, २०१७

● डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कामगार संदर्भांत कार्य : त्यांचा होणारा नफा - तोटा

● डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कामगार संदर्भांत कार्य : त्यांचा होणारा नफा - तोटा

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक, राजकीय, घटना निर्मिती इत्यादी संबधीचे कार्य हे असामान्य आहेच, पण ह्या कार्या बरोबरच कामगारांच्या उत्कर्षासाठी केलेले कायदे व कामगार वर्गाच्या संबधीचे इतर ही कार्य उल्लेखनिय व महत्वपूर्ण आहे. बाबासाहेबांच्या या अफाट कार्या संबंधी भारतीय कामगार व कामगार संघटनांना अजुनही पुरेशी जाणीव झालेली नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे.

◆ कामगारांसाठी बाबासाहेबांनी दिलेले योगदान
खालील प्रमाणे आहे :-

• डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १५ ऑगस्ट १९३६ ला त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. ते अध्यक्ष होते. पक्षाचा जाहीरनामा 'टाइम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी दैनिकात पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आला होता. या जाहीरनाम्यात ध्येय - धोरणे अतिशय सूक्ष्म पद्धतीने विचार करून ठरविली होती.

• पक्षाचे धोरण स्वष्ट करण्यासाठी दलित वर्ग कर्मचारी परिषद १२,१३ फेब्रुवारी १९३८ ला मनमाड येथे झाली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले होते, 'ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत.'

• १७ मार्च १९३८ मुंबईच्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या सर्वधारण सभेत डॉ. आंबेडकर म्हणाले - 'गरिबांच्या पक्ष गरिबांनी चालविला पाहिजे.' हा निर्लेप आशावाद क्षित‌िजा पलीकडचा होता यात शंका नाही. सामाजिक अन्याय, अत्याचारा विरूद्ध, आर्थिक विषमते विरूद्ध कामगारांनी लढा दिला पाहिजे तेव्हाच कामगार संघटनेच्या बळावर प्रश्न सुटतील. तसेच 'परावलंबी असण्यापेक्षा स्वावलंबी व्हा' असा संदेश डॉ. आंबेडकरांनी दिला होता.

• १५ सप्टेंबर १९३८ च्या ट्रेड डिस्प्युट बिलाच्या संदर्भात कौन्सिल मध्ये डॉ. आंबेडकरांनी कामगाराचा अधिकार आणि मालकाने लादलेली बंधने याचा कडाडून विरोध केला. डॉ. आंबेडकरांच्या मताशी सहमती दर्शवून जमनादास मेथाने डिस्प्युट बिलाचा विरोध केला होता. याच पार्श्वभूमीवर ७ नोव्हेंबर १९३८ला स्वतंत्र मजूर पक्ष आणि गिरणी कामगारांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्धार केला होता. जमनादास मेथा यांच्या अध्यक्षते खाली श्रीपाद डांगे, परुळेकर, मिरजकर इत्यादी कामगार नेत्यांनी व डॉ. आंबेडकरांनी संप यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला होता. हा संप अयशस्वी व्हावा यासाठी गिरणी मालकाने पोलिस बळाचा वापर केला. त्यात ७२ कामगार जखमी झाले. ३५ कामगारांना अटक झाली. पण संप यशस्वी झाला. कामगार संघटनांचा विजय झाला. स्वतंत्र मजूर पक्ष बळकट झाला. या कामगारांच्या लढ्यामुळे मालक, भांडवलदार वर्गात प्रचंड खळबळ माजली होती.

• शेतकऱ्यांसाठी किमान वेतन दर असावेत अशी मागणी विधि मंडळात केली.

• १९३७ साली कोकणातील बहुजन कामगारांचे शोषण थांबविण्या संबंधी खोती पध्दत नष्ट करण्यासंबंधी बिल मांडले.

• १९३८ साली कोकणातील ‘औद्योगिक कलह
विधेयकानुसार’ कामगारांचा संप करण्याचा
अधिकार हिरावुन घेतला गेला. पण बाबासाहेबांनी या बिलावर भाषण करतांना संप हा दिवाणी अपराध आहे, फौजदारी गुन्हा नव्हे असे मत दिले व पुढे कामगारांना संप करण्याचा कायदेशिर अधिकार मिळवून दिला.

• वरील बिलावर भाष्य करतांना मालकांनी आपले अंदाजपत्रक कामगारांसाठी जाहीर करण्याची मागणी केली.

• १९३८ मध्ये 'सावकारी नियंत्रण' विधेयक तयार केले.

• बिडी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी
बिडी कामगार संघ स्थापन केला.

• २ जुलै १९४२ ला ते व्हॉईसरॉय मंत्री मंडळात
कामगार मंत्री झाले. ह्या कारकिर्दीत त्यांनी
कामगारांसाठी बरेच कायदे निर्माण केले.

• २ सप्टेंबर १९४५ ला कामगार कल्याण योजना
सादर केली. ही योजना लेबर चार्टर म्हणून प्रसिध्द आहे.

• युध्द साहित्य निर्माण करणाऱ्या कारखान्यात
एक ‘सयुक्त कामगार नियामक समिती’ स्थापन
केली.

• सेवा योजन कार्यालय (Employment
Exchange) ची स्थापना केली.

• कामगारांना अगोदर भरपगारी रजा मिळत
नव्हती. १४ एप्रील १९४४ ला बाबासाहेबांनी
भरपगारी रजेचे विधेयक मंजूर केले.

• कामगारांना कमीत कमी वेतन ठरविण्याची तरतूद असलेले बिल मांडले. ह्यातूनच `किमान वेतन कायदा १९४८’ ची निर्मिती झाली.

• औद्योगिक कलह मिटविण्यासाठी समेट घडवून आणणारी यंत्रणा (लवाद यंत्रणा) उभारण्याची तरतूद केली.

• सप्टेंबर १९४३ रोजी भरलेल्या त्रिपक्षीय कामगार परिषदेचे बाबासाहेब अध्यक्ष होते. त्यात त्यानी कामगारांच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, सांस्कृतिक गरजा व आरोग्याचे उपाय तसेच कामगारांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी उपाय यावरील ठराव संमत केले.

• ३१ जानेवारी १९४४ रोजी खाण कामगारांसाठी ‘कोळसा खाण कामगार फंडाची’ स्थापना करणारे विधेयक मांडले.

• ऑगष्ट १९४५ मध्ये औद्योगिक वसाहतीचे नियम व मालकाच्या जबाबदाऱ्या यावर विचार विनिमय करणाऱ्या स्थायी समितीचे अध्यक्ष पद भूषविले. त्यात त्यांनी उद्योगासाठी मौलिक सूचना केल्या.

• ८ एप्रिल १९४६ ला ‘मिका माईन्स लेबर वेल्फेअर फंडाची’ स्थापना करण्या संबंधीचे बिल संमत केले.

• ‘इंडियन्स माईन्स (अमेंडमेंड) ऑर्डिनन्स १९४५’ नुसार स्त्री कामगारांच्या मुलांसाठी पाळणा घराची व्यवस्था करण्याचे व्यवस्थापनावर बंधन घातले.

• डॉ. आंबेडकर ब्रिटिश मंत्री मंडळात मंजूर मंत्री (१९४२ - १९४६) होते. त्यांनी सेवा योजन कार्यालयाची (एम्ल्पॉयमेंट एक्सचेंज) स्थापना केली. त्याकाळी जे अनुभवी नि अर्धाशिक्षित तज्ज्ञ निरनिराळ्या योजनातून तयार होत होते. त्यांना नोकरीसाठी भटकावे लागू नये, त्यांना नोकरी मिळविण्याचे मार्ग मोकळे असले पाहिजे, हा सेवा योजन कार्यालय स्थापण्याचा मुख्य उद्देश होता. भारतीय खाणी मध्ये भारतातील कामगारांना काम करण्यासाठी फारशी संधी दिली जात नसे. इंग्लंड मधून कामगार आयात केले जात. डॉ. आंबेडकरांनी या आयातीवर प्रतिबंध लावला. भारतातील कामगारांना खाणी मध्ये कामावर घेतले जाऊ लागले. अस्पृश्यांना डावलले जायचे. डॉ. आंबेडकरांच्या कायद्यामुळे त्यांनाही खाणीत काम करता येऊ लागले. काही जिगरबाज स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून खाणीत काम करू लागल्यात. ते पाहून डॉ. आंबेडकरांना आश्चर्याचा धक्का बसला. मजूर मंत्री म्हणून खाण महिला आणि कामगारांसाठी कायद्यात विशेष तरतुदी केल्या. `भारतिय खाण कायदा १९४६’ तयार करुन स्त्री कामगारांना खाणीत जमिनीच्या आत मध्ये काम करण्यास व रात्रपाळीस बंदी केली.

• १३ मार्च १९५४ ला कोळसा उत्पादन आणि स्त्री खाण कामगार या दोन्ही बाबींचा विचार मांडून कामगारांचा महागाई भत्ता, नुकसान भरपाई, असमान महागाई भत्त्याला मजूर संघटना जबाबदार, बेकारीच्या काळातील नुकसान भरपाईची पद्धत, कामगाराचा राजीनामा, खाण कामगारांचे वेतन व सवलती, मजूर खात्याचा नोकर वर्ग, कोळशाच्या उत्पादनाचा प्रश्न, स्त्री खाण कामगार आणि महिला परिषद यावर डॉ. आंबेडकरांनी भाष्य केले. ज्याप्रमाणे पुरुष खाण कामगारांबद्दल डॉ. आंबेडकरांनी विचार व्यक्त केले त्याच प्रमाणे स्त्रियांबाबत ही २९ मार्च १९४५ ला विधेयक आणून चर्चा केली. स्त्री कामगारांचे हित जोपासले. प्रसुतीच्या काळात विश्रांतीची तरतूद, रोख मदत इत्यादी तरतुदी केल्या. किमान चार आठवडे प्रसुती भत्ता मिळावा तसेच कामगार गैरहजर असताना त्यांना पगारी सुट्टया मिळाव्यात त्याच बरोबर कायद्याखाली नियम करण्याचा अधिकार आणि खाण कामगारांना शॉवर बॉथची योजना सुद्धा अंमलात आणली होती. युद्ध काळात ही मजुरांना योग्य न्याय मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यातील नोकरीच्या अट शक्तीचा लवाद, मजुराचे प्रश्न व मजूर खाते, स्त्री पक्ष मजूर परिषदेचे महत्त्व, मजुराचे बहुरंगी पुढारी, पगारी सुट्यांचे वर्गीकरण केले. 'दि. माईन्स मॅटरनिटी बेनिफिट ऍक्ट’ नुसार खाणीतील स्त्रीयांना बाळंतपणाची (प्रसूती पूर्वीं व प्रसूती नंतर) रजा देण्याची शिफारस केली.

• 'दि.फॅक्टरी अमेंडमेंट बिल’ संमत करुन कामगारांना १० दिवसाची पगारी रजा आणि बाल कामगारांना १४ दिवसाची पगारी रजा देण्या संबंधी कायद्यात दुरुस्ती केली.

• १९४६ च्या बजेट सेशन मध्ये आठवड्याचे कामाचे तास ५४ वरुन ४८ व दिवसाला १० तास ऎवजी ८ तास करण्याचे बिल मांडले.

• अपघात ग्रस्त कामगारांना मोबदला मिळावा म्हणून ‘कामगार भरपाई कायद्याची’ निर्मिती केली.

• २१ फेब्रुवारी १९४६ साली मध्यवर्ती कायदे मंडळात ‘दि इंडियन्स ट्रेड युनियन्स (अमेंडमेंड) ऍक्ट आणून ट्रेड युनियनला मान्यता देणे व्य्वस्थापनाला सक्तिचे करण्या संबंधीचे विधेयक मांडले.

• १९ एप्रिल १९४६ ला मध्यवर्ती कायदे मंडळात
कमीत कमी मजुरी आणि कामगारांची संख्या किती असावी या संबंधी बिल मांडले व त्याचेच १९ फेब्रुवारी १९४८ ला कायद्यात रुपांतर झाले.

• बाबासाहेबांनी भारतीय घटनेची निर्मिती केली. त्यातील ‘मार्गदर्शक तत्व’ आर्टिकल ३९ (ड) नुसार पगारदार पुरुषा इतकाच पगार त्याच पदावर काम करणाऱ्या स्त्रियांना ही मिळावा अशी घटनात्मक तरतूद केली.

• घटनेच्या कलम ४३ नुसार गर्भवती व बाळंत स्त्रियांसाठी कामाच्या ठिकाणी योग्य व सुरक्षित व्यवस्था ठेवण्याची तरतूद केली.

• कलम ४३ (अ) नुसार शासनाने कामगारांना व्यवस्थापनात सहभागी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी तरतूद केली.

• कलम ४३ नुसार शासनाने कामगारांचे जीवन मान उंचावण्यासाठी सामाजिक व सांस्कृतिक संधी देण्यासाठी प्रयत्न करण्याची तरतूद केली.

• ‘स्टेट्स ऍण्ड मायनॉरिटीज’ या ग्रंथा मध्ये वेठबिगार कामगारांच्या प्रश्नाला हात घालतांना बाबासाहेब ‘वेठबिगार हा गुन्हा आहे’ असे मत मांडले आहे.

• कामगारांचे आथिक जीवन मान उंचावण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीर नाम्यात आर्थिक धोरण स्पष्ट केले. त्यातील आर्टीकल २ सेक्षन २ (४) मध्ये आर्थिक शोषणाच्या विरोधात स्पष्टीकरण केले. त्यात कामगारांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी संपत्तीची जास्तीत जास्त समान वाटणी करण्याबद्दल राज्याने प्रयत्न करावेत अशी सुचना केली.

• शेतीच्या प्रगतीसाठी व शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी लॅंड मॉर्गेज बॅंक, शेतकऱ्यांची पतपेढी, खरेदी विक्री संघ इत्यादी स्थापण करण्या विषयी धोरण व्यक्त केले.

कामगार मित्रांनो,
डॉ बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिले जी एक महान गोष्ट आहे. संविधानात डॉ. बाबासाहेबांनी ज्या कायदेशीर तरतुदी केल्यात त्या संपूर्ण भारतीय समाजासाठी आहेत, त्याचाच हा घेतलेला आढावा. बाबासाहेबांचे वरील बहुमूल्य योगदान पाहतां आज कामगारांची जी सुस्थिती दिसत आहे, त्यात बाबासाहेबांचा निश्चितच सिंहाचा वाटा आहे. म्हणून बाबासाहेब हे सर्व कामगारांचे आदर्श आहेत. ही बाब सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.

आज तर काही कामगारांची स्थिती वाईट आहे. नव्या कामगार धोरणाचा फारसा लाभ नाही. साम्राज्यवाद फोफावत आहे. जागतिकीकरण आले. यांत्रिकीकरण सुरू झाले. त्यामुळे सामान्य माणूस भरडला जात आहे. साम्राज्यवाद, नव वसाहतवाद, सांस्कृतिक दहशतवाद, बहुराष्ट्रीय कंपन्या इत्यादीमुळे माणसाच्या घामाचा दाम कमी आणि भांडवलदाराला जास्त नफा या दोहोंच्या फरकामुळे गरीब हा दिवसें दिवस गरीब तर श्रीमंत हा अधिकाधिक श्रीमंत होत आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांची घसरण होत आहे. माणसाचे अवमूल्यन होत आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. अशा बुर्ज्वा व्यवस्थे विरुद्ध तसेच शासक समाज व्यवस्थे विरूद्ध आपण प्रतिरोध केला तरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत घडवू शकू. तेव्हाच प्रत्येकाचे जीवन सुंदर होईल. प्रगती करता येईल आणि चळवळ ही पुढे नेता येईल.

●●●

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

साभार -
Buddhism - Ambedkarism Blog

------------------------

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

शुक्रवार, ७ एप्रिल, २०१७

● चळवळी बर्बाद का होतात?

● चळवळी बर्बाद का होतात?

चळवळी बर्बाद का होतात? चळवळ उभे करणारे कधीच या प्रश्नाचा गांभिर्याने विचार करत नसतात. आंबेडकर चळवळ - रिपब्लिकन चळवळ नव्या दमाने उभी व्हावी असे अनेकांना वाटते. मागच्या पन्नास वर्षात अनेक व्यक्ती आले ज्यांनी आंबेडकरी - रिपब्लिकन चळवळी उभारण्यासाठी प्रयत्न केले. पण शोकांतीकाच म्हणावी लागेल की त्यांच्या चळवळी उभ्या राहु शकल्या नाहीत. आज ही अनेक प्रामाणिक लोक प्रामाणिकपणे चळवळ उभी राहावी म्हणून प्रयत्नरत आहेत. पण त्यांच्या प्रयत्नांचे फलीत कायम स्वरुपी असेल काय? माझ्या सारख्याला तरी "नाही" असे च उत्तर द्यावे लागेल. याचे कारण चळवळी निर्माण करता वेळेस त्या बर्बाद होऊ नये म्हणून ब्रर्बाद झालेल्या मागच्या लोकांनी ज्या चुका केल्या आहेत. त्या बर्बादीतुन जी कारणे पुढे आली आहेत. त्या चुकांचा, कारणांचा ही मंडळी विचारच करताना दिसत नाही. म्हणूनच मला असे वाटते की जे बर्बादीच्या कारणांचा, चुकांचा विचार करत नाही आणि त्यातुन काही शिकत नाहीत. त्यांच्या चळवळी काही काळा पुरत्याच मर्यादित असतात.

अनेकांना तसा अनुभव आलेला असेल. चळवळी मुख्यत्या कोणत्या कारणांनी तुटत असतील तर पद, पैसा आणि प्रतिष्ठा यासाठी चळवळीतील व्यक्ती मध्ये होत असलेला झगडा. ही बाब चळवळ चालविण्याऱ्यानी लक्षात ठेवली तर ते चळवळीच्या दृष्टिने बरे होईल. या ठिकाणी मी चळवळ संस्था - संघटना या अर्थाने वापरत आहे. मी एक सामान्य व्यक्ती आहे. चळवळ - संघटन उभे राहावे असे मला सुध्दा इतरांप्रमाणेच वाटते.

• कायम स्वरुपी चळवळ उभी करण्यासाठी महत्वाच्या बाबी :

१) चळवळ ही लोकशाही प्रधान असावी. म्हणजे लोकशाही मार्गाने तीची वाटचाल झाली पाहिजे.

२) नेतृत्व बुध्दीवादी, प्रामाणिक, नैतिक आणि समर्पित असले पाहिजे.

३) चळवळीला बुध्दिवादी नेतृत्वाची आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची आवश्यकता असते.

४) बहुमतानी ठरलेला निर्णय बहुसंख्याकांनी आणि अल्पसंख्यांनी मान्य केला पाहिजे. "मै बोलु वो कायदा" असे नकोच.

५) चळवळीला अधिकृत प्रवक्त्यांची अत्यंत गरज असते. चळवळीत जे शिजेल ते प्रवक्त्याच्या माध्यमातुन जाहिर व्हायला पाहिजे. त्याचेच लालन - पालन अनुसरन कार्यकर्त्यांनी केले पाहिजे.

६) संघटने पेक्षा कोणताही पदाधिकारी, नेता, कार्यकर्ता मोठा नाही हे मान्य केले पाहिजे.

७) चळवळीचे ध्येय आणि कार्य प्रणाली स्पष्ट असली पाहिजे.

८) नेता, पदाधीकारी, कार्यकर्ते यानी आपले मतभेद संघटनेच्या अखत्यारीत राहुनच सोडवावे. त्यांना सार्वजनिक करता कामा नये.

८) नेतृत्वाने चळवळीच्या ध्येय - उद्देश आणि बहुमताने ठरलेल्या निर्णया अनुरुपच वागले पाहिजे.

९) संघटनेतील प्रत्येकाने बहुमताने जे ठरलेले असेल त्याला कोणत्याही प्रकारचा जाहिर विरोध करु नये. त्या निर्णयानुरुप त्याने कार्य हे केले पाहिजे.

१०) चळवळ ही व्यक्तिगत विरोधावर उभी असता कामा नये. विरोध हा वैचारिक आधारावरच असला पाहिजे.

११) संघटना ही कोणत्याही विशिष्ट समुहापुरती मर्यादित राहता कामा नये. इतर समुहातील लोक, संघटनातील लोक आपल्या संघटनेच्या प्रवाहात कसे सहभागी होतील. असा सर्व समावेश आणि विशाल दृष्टिकोन जोपासुन कार्यरत असले पाहिजे. हे नेतृत्व, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी आवश्यक आहे.

१२) आर्थिक व्यवहार हा पारदर्शी असला पाहिजे. पैशाचा सदुपयोगच झाला पाहिजे. कोणत्याही एका व्यक्तीच्या हाती पैशाचा व्यवहार असता कामा नये.

१३) कार्यकर्त्यांत उत्साह, चैतन्य निर्माण करण्यासाठी संघटनेने वेळोवेळी कार्यक्रम दिले पाहिजेत. असे झाले नाही तर कार्यकर्ता निरुत्साही बनेल. त्याच्यात संघटने विषयी उदासिनता निर्माण होईल.

१४) संघठनेच्या शाखांवर मुख्य शाखेने लक्ष ठेवले पाहिजे. त्यांना कार्यक्रम पुरविले पाहिजेत. दिशा दि्ग्दर्शन केले पाहिजे. शाखांची सदस्य संख्या वाढत नसेल तर त्या कां वाढत नाही याची विचारपुस झाली पाहिजे आणि मुख्य शाखेकडून त्या बाबतीत योग्य ते मार्गदर्शन केले गेले पाहिजे आणि ज्या शाखांची सदस्य संख्या वाढत असेल त्यांना अधिक उत्साह देणे मुख्य शाखेचे कार्य असावे. लहान मोठ्या शाखांच्या संपर्कात नेहमीच मुख्य शाखेने राहिले पाहिजे. त्यांच्या कडून अर्ध वार्षिक अहवाल मागीतला पाहिजे. या शाखांना मनमर्जी प्रमाणे चालण्यास मनाई असेल. या शाखांनी सुध्दा काही कार्य करण्यापुर्वी मुख्य शाखेशी संपर्क करुन तशी परवानगी घेतली पाहिजे.

१५) संघटनेच्या ध्येयानुरुप कार्यकर्ते तयार करण्यासाठी नियमित कार्यशाळा राबविल्या गेल्या पाहिजेत.

१६) कोणत्याही नवीन कार्यकर्त्याला एकदम पदाधिकारी बनविण्यात येवु नये. त्याला कमीत कमी ६ महिने ते १ वर्ष पर्यंत हितचिंतक कार्यकर्ता म्हणून कार्य करु द्यावे. त्यानंतरच त्याच्या निष्ठेला घेवुन त्याला पदाधिकारी बनण्यास मान्यता द्यावी.

१८) संघटना चालविण्यासाठी कार्याचे विभाजन केले जावे. जसे काही जनांनी विध्यार्थ्यांच्या हिताचे कार्य करावे. काहींनी शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य करावे. काहींनी बेरोजगारांच्या हिताचे कार्य करावे. काही लोकांनी झोपडपट्टी वासियांच्या हिताचे कार्य करावे. काहींनी मजदुरांच्या हितासाठी कार्य करावे. इत्यादी. या सर्वांसाठी सह संघटना असाव्यात. मात्र त्या सर्वांची नाळ मुख्य संघटनेशी जोडलेली असावी. मुख्य संघटनेत या प्रत्येक सह संघटनांचे प्रतिनिधी असावे आणि मुख्य संघटनेच्याच मार्गदर्शना खाली या सह संघटनांनी कार्य केले पाहिजे.

१९) संघटनेच्या नेतृत्वाने, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी स्वत:च्या प्रतिष्ठे पेक्षा संघटनेच्याच प्रतिष्ठेसाठी झटले पाहिजे.

२०) नैतिकता, शिस्त, समर्पित भावना, ध्येयनिष्ठा यांनी कार्यकर्ता मुख्यता पदाधिकारी आणि नेतृत्व परिपुर्ण असले पाहिजे.

अशा काही प्राथमिक बाबी संघटना चालविण्यासाठी आवश्यक असतात. असे मला वाटते. या पेक्षाही अधीक चांगल्या सूचना पुढे येवु शकतील. अहंकार आणि पद, पैसा, प्रतिष्ठा यातुन उत्पन्न होणारे मतभेद चळवळीला जास्त काळ जगु देत नाहीत हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. म्हणूनच चळवळीच्या यशस्वीतेसाठी विनम्र मनाची, सर्वांना घेवुन चाळण्याची मानसिकता, सुसंवाद साधण्याची कला, संघटनेचे कार्यक्रम, कुशल संघटकत्व, मतभेदांचे अंतर्गत निवारण या बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत.

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
तक्षक लोखंडे (एक ज्वलंत आंबेडकरी विचारवंत)

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETIndia

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePakharu

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJadhav789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

● लोकशाही (कविता)

● लोकशाही

लोकशाही असते तिथं,
कुणी गोवऱ्या असतात,
असतात कुणी एरंड ।।धृ।।

पुरण पोळीचा घास दिला,
होळीला कि जातं विझून,
पेटलेलं विस्तवाचं बंड ।।१।।

असाच इथला सणवार प्रत्येक,
करून जातो कुठल्या ना ,
कुठल्या गरीबाची होळी ।।२।।

मेंदू भडकत असतो आणि,
नाही धरत जाळ त्याच्या,
डोक्या वरची मोळी ।।३।।

वाईट वाटतं,
झाडाच्या फांदीला,
हातात तिनंच काठी,
होती दिली गांधीला ।।४।।

तिनं सांगितलं कोण गांधी,
कसला पंचा, कसली काठी,
कोणत्याच राज्यात,
बदलत नसतात गोष्टी ।।५।।
     
कवी -
फ. मू. शिंदे

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETIndia

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePakharu

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJadhav789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

सोमवार, ३ एप्रिल, २०१७

● भिम जयंती आणि उत्सव प्रिय माणूस

● भिम जंयती आणि उत्सव प्रिय माणूस
(भिम जयंती : जागतिक ज्ञान दिन विशेष लेख)

उद्देश -
लहान ते वयोवृद्ध व्यक्ती पर्यंत जनहितार्थ  माहिती प्रसारित करणे, हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य असले पाहिजे.

लेख - 
यतिन जाधव

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

माणसाला मन आहे आणि त्या माणसाच्या मनाची अवस्था डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाणली त्यांचा उद्धार करून स्वभिमान दिला आणि त्या मनाचा विकास व्हावा म्हणून मनाचा विकास करणाऱ्या बुद्धांच्या धम्माचा बोध आम्हाला डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला कारण माणूस हा उत्सव प्रिय आहे.

एप्रिल आणि मे महिन्यात डाँ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भगवान बुद्ध यांची संयुक्त जयंती करण्याची आता प्रथा पडली आहे. याची सुरुवात 14 एप्रिल डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पासून होते. यापूर्वी जयंती साजरी करण्याच्या प्रकारामध्ये, कार्यक्रमांमध्ये सारच काही बरोबर आहे अस ही नसते त्यात चुक आहे असे ही नाही काही उणिवा असतील, काही ठिकाणी काही प्रकारची अतिशयोक्ती असेल परंतू भिम जयंती म्हणजे चैत्यन्यमय आदर्श व त्यांना हवा हवासा वाटणारा महाउत्सव असावा आणि असायला हवा.

घरात गोड धोड बनवून दिवाली, ईद प्रमाणे एकमेंकाना फराळासाठी बोलवावे. शेजारच्या इतर धर्माच्या बांधवांला फराळाचे ताट द्यावे, जमल्यास आपल्या आँफिस मधल्या सहकाऱ्यांसाठी, मालकासाठी देखील फराळ डब्यातून घेऊन जा. १४ एप्रिलच्या दिवशी संघ शक्तीचे चैतन्यमय दिव्य दर्शन घडविणाऱ्या बाबासाहेबांच्या आणि भगवान बुद्धांच्या पवित्र प्रतिमांच्या जंगी मिरवणुकीला प्राधान्य असावे आणि पुढे योग्य वेळा व दिवस ठरवून मनोरंजन, प्रबोधन, कला, क्रिडा, भोजन दान, गुणी जनांचा सन्मान यांचा अंतर्भाव या जयंती उत्सवात करण्याचा यथाशक्ती प्रयत्न व्हावा.

आवहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया

साभार -
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

------------------------

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETIndia

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePakharu

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJadhav789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

रविवार, २ एप्रिल, २०१७

● भिम जयंती - एक कृतीशील गरुडझेप

● भिम जयंती - एक कृतीशील गरुडझेप
(भिम जयंती : जागतिक ज्ञान दिन विशेष लेख)

उद्देश -
लहान ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत जनहितार्थ  माहिती प्रसारित करणे, हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य असले पाहिजे.

लेख - 
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

◆ जयंती करणे म्हणजेच, विचाराची शेती करणे होय. विचारांची मशागत अशी करा कि ती इतरांच्या कायम स्मरणात राहील.

विचार -
यतिन जाधव

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिना निमित्त काही कोटी कोटी मनात विचार पेरायचे आहेत. डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे बहुजनांचे नवीन वर्षाची सुरुवातच आहे.

आपण सर्वानी अति उत्साहात साजरी केली पाहिजे. डाँ. बाबासाहेब आंबेडकर हे कधी ही दिवाली साजरी करत नसत म्हणूनच आपली दिवाली हिच आहे. बाबासाहेबांनी ज्ञान संपत्ती, धन संपत्ती स्वत: साठी वापरली नाही. तसे झाले असते तर दिन दुबल्यांचा उद्धार झालाच नसता. डाँ. बाबासाहेब आंबेडकर नुसतेच आश्वासन देऊन गेले नाही, तर ठिक ठिकाणी शाळा, काँलेज उभारुन "शिक्षित व्हा!" असे आदेश देवू तुम्हाला शिकयला पाठवले. घटना लिहून "संघटित व्हा!" असे आदेश देवू तुम्हाला एकत्रित आणले. चवदार तळ्याची महान क्रांती घडवून अन्याया विरुद्ध संघर्ष करण्यात आवाहन केले. आता पुढील जबाबदारी आपली आहेच. डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्या प्रमाणे सर्वांचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे, असे सर्वाना पटवून दिलेच आहे. आपण फक्त जय जयकार करतो आणि फक्त "जय भिम" बोलून चालणार नाही. ते पटवून देणारे तेच होते. "हिंदू म्हणून जन्मास आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही." हे उद्गार लक्षात ठेवणे आधिक महत्वाचे ठरते.

डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचे काटेकोरपणे पालन केले तर सर्वाचे भाग्य बदलून जाणार आहे, ते निश्चित आहे. आणि हो आणखी एक सांगायचे राहिले तर ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. ते डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु स्थानी आहेत, म्हणून त्याची सुद्धा जयंती करणे अधिक उत्साही ठरेल. तर एवढेच नव्हे तर आपल्या समाजातील एक ही मुलगा - मुलगी शिक्षणापासून वंचित होता कामा नये. याची दक्षता घेणे गरजेचे आहे. ११ आणि १४ एप्रिल रोजी मुलांना शाळेय साहित्य दान द्या. कारण जयंती प्रेरणादायी ठरली पाहिजे. याचे उदाहरण म्हटले की जसे विचार कराल तशी कृती केली पाहिजे. वरील सर्व बाबी लक्षात ठेऊन कार्य करणे म्हणजे डाँ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणे झाले समजा.

आवहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया

साभार -
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

------------------------

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETIndia

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePakharu

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJadhav789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.