मंगळवार, १६ मे, २०१७

● साध्या शब्दात कळू दे (कविता)

● साध्या शब्दात कळू दे

शारदपुत्रा हो रे,
कवी तू वामना सारखा ।
साध्या शब्दात कळू दे,
जगाला ज्ञानसूर्य भिम सारखा ।।धृ।।

अवजड शब्दांची उगाच,
कशाला ओवी रचावी ।
अर्थ कुणा ही न गवसावा,
न कुणा ती पचावी ।
भीम विचाराचे प्रतिबिंद,
दे तू आरशा सारखा ।।१।।

शब्द शब्द अर्थ बदलती,
फसविण्या सारे ।
भक्षक देखील अगणित,
येथे सांभाळूनी रहा रे ।
अडाणी अश्या अंधाऱ्या रात्री,
हो मशाली सारखा ।।२।।

अर्थपूर्ण हे तुझे,
कवीपण जगाला दिसू दे ।
तुझीच कविता ओठात,
साऱ्यांच्या कायमची बसू दे ।
मार्ग दाखवित जा,
जीवनभर आश्वघोषा सारखा ।।३।।

नया पर्याय म्हणती,
ज्याला ते बुद्धाकडून शिकावे ।
ज्याला जसे समजती,
त्याला त्या भाषेत सांगावे ।
धम्म सारथी कल्याण मित्र,
हो गौतमा सारखा ।।४।।

कवी -
कबीर शाक्य
(प्रसिद्ध रॉकस्टार : धम्म विंग बँड)

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETIndia

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePakharu

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJadhav789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.