बुधवार, २७ मे, २०२०

● तू जपलेल्या, माझ्या कळ्यांना (कविता)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

         ● तू जपलेल्या, माझ्या कळ्यांना
                  कवी - विलास काळे

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
डॉ. बाबासाहेबांच्या मन कल्पित, अथांग अश्रूंनी
   गीत काव्यातून माता रमाई आईस.वाहिलेली
     आगळी, वेगळी भावपूर्ण आदरांजली !!!
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
   
रामू ह्या जीवनी, ना साथी होता आलं,
विद्यापती झालो, पण ना पती होता आलं ।
त्या ज्ञान सागराला, जेव्हा गहिवर फुटला,
तयापुढं महासागर, हा उथळ वाटला ।
तू जपलेल्या, माझ्या कळ्यांना,
मीच मारले गं, तुझ्या बाळांना ।।धृ।।
    
       गेला रमेश, गेली इंदू, गेला गंगाधर,
       राजरत्न होता आपल्या काठीचा आधार ।
       एवढा मोठा आघात, रामू, कसा आता साहू,
       धाई धाई रडतोय साहेब रामूला धरुनी ।
       तू गं जपलेल्या, माझ्या कळ्यांना,
       मीच मारले गं, तुझ्या बाळांना ।।१।।
    
आरोपी मी तुझा, तुझ्या कुंकवाचा सरताज,
तुझ्या न्यायालयात उभा तुझा पतिराज ।
दे सजा रामू मला, जी हवी आहे तुला,
तुझ्या न्यायालयात, नको माफी देऊ मला ।
तू जपलेल्या, माझ्या कळ्यांना,
मीच मारले गं, तुझ्या बाळांना ।।२।।
    
      परदेशी शिकण्या गेलो तुला एकटीच सोडूनी,
      घर साभांळीले तू माझे लाकडे, शेन, गौऱ्या विकुनी ।
      समाज हित सुधारण्या तुझे विसरून गेलो सुख.
      तुझ्या पदरी लादले मी, हे नव कोटीच दुःख ।
      तू जपलेल्या, माझ्या कळ्यांना,
      मीच मारले गं, तुझ्या बाळांना ।।३।।
    
नका दोष देऊ साहेब, माझा सुखी राहो धनी.
नव कोटीचा राजा माझा, मी राजाची गं राणी ।
जयासाठी झिझलो, ते देतील उदया ग्वाही,
तुम्हा म्हणतील सारे बाबा, मला माता रमाई ।
विलासपरी बाळं कित्येक, रडतील माझ्यासाठी, 
धन्य जगी मी माता, माझी बाळं कोट्यान कोटी ।।४।।

◆◆◆

कवी -
आयु. विलास काळे, पुणे
(कवी, गजलकार एवं आंबेडकरी विचारवंत)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

◆ प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

◆ फेसबुक पेजवर एकदा नक्की भेट द्या.

• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

  ◆ YATIN JADHAV : 9967065953 ◆

सादर कोणत्याही सत्कार, उत्सव, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम किंवा परिषद अन्य कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम असल्यास आम्हाला कळवावे. आपण आम्हाला ऐतिहासिक, प्रबोधनात्मक, मार्गदर्शक माहिती तसेच आपण स्वतः लिहलेले विविध लेख, कविता किंवा आरोग्य विषयक माहिती, वैज्ञानिक माहिती, अन्य कोणतीही माहिती तसेच आपण राहत असलेल्या ठिकाणी घडलेल्या बातम्या किंवा घडामोडी, झालेले कार्यक्रम त्याचे छायाचित्रे (फोटो) किंवा विडिओ आम्हाला पाठवू शकता. आपण पाठवलेल्या कोणत्याही प्रकारच्या माहितीला प्रसिद्धी दिली जाईल. (यतिन जाधव : ९९६७०६५९५३) फक्त वरील दिलेल्या क्रमांकावर व्हाट्सएप मेसेज द्वारे संपर्क करा.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

◆ BSNET NEW & OLD HELPLINE ◆
    7718962406 or 7738971042
 (Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group (म्हणजे समूहात) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

           राजू साबळे : ९८२३३८९५२५     
      कोणत्याही अधिक माहितीसाठी वरील  
         क्रमांकावर फोन वरून संपर्क करा.