हे पाणी आणिले मी माड भरुनी घोटभर जाऊ पिउनी.......
- सोनबा येलवे.
एक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....!
एक वेदनामय दुपार.....आणि सोनबा येलवे.....!
1939-1946 च्या काळात पनवेलच्या नाक्यावर घडून गेलेली ही वेदनामय, दारुण घटना.... हा काळ पाहिला तर स्वातंत्र्याच्या संघर्षाचा काळ. त्याचबरोबर महामानवाच्या मानवमुक्तीच्या संघर्षाचा काळसुद्धा होता.
खरे पाहता अॅड. गडकरी आणि डॉ. आंबेडकर मुंबईहून पुण्याला निघतात. चवदार भजी पनवेलच्या नाक्यावर मिळतात. त्या भज्यांची खासियत गडकरी बाबासाहेबांना मोटारीत सांगतात. भजी खाणे हा बाबासाहेबांचा वीकपॉइंट.
या नेमक्या पनवेलच्या नाक्यावर सगळ्या हॉटेल मालकांना लागणारी लाकडे फोडून देणारा सोनबा. निरक्षर, मेहनती. त्याचे स्वप्न होते, एकदा तरी बाबासाहेबांचे दर्शन होईल? त्यांचे भाषण ऐकता येईल? माझ्या हातात कुºहाड असताना आपल्या लेकराच्या हाती लेखणी येईल? बारा वर्षांपूर्वीचा पाण्यासाठीचा महाडचा संघर्ष त्याच्या लक्षात असतो.
गडकरी आणि बाबासाहेबांच्या मोटारगाडीत विविध विषयांवर गप्पा रंगत असताना पनवेलचा नाका येतो. धुरळा उडवत मोटारगाडी पनवेलच्या नाक्यावर उभी राहते आणि गडकरी गाडीतून उतरून समोरच्या हॉटेलातून पाण्याचा एक ग्लास बाबासाहेबांच्या हाती देतात. भजी आणि चहाची ऑर्डर देतात. माझ्या संगाती डॉ. आंबेडकर आहेत. आपल्या भज्यांची तारीफ त्यांना ऐकवली आहे. तेव्हा लागलीच समोरच्या गाडीत त्यांना ती पाठवा.
‘भजी काय, गटारातले पाणीसुद्धा मिळणार नाही. माझे हॉटेल बाटवता आहात? चालते व्हा.’ हे शब्द बाबासाहेबांच्या कानावर पडतात. गडकरी हॉटेलमालकाची कॉलर पकडतात. वातावरण गंभीर होते. पाण्याचा ग्लास बाबासाहेबांच्या हातून खाली पडतो त्याचबरोबर बाबासाहेबांच्या डोळ्यांतून अश्रू घळाघळा वाहू लागतात. उगाच या स्पृश्य मालकाच्या हॉटेलात आणले, याची जाणीव गडकरींना होते. अशी एक विलक्षण कथा.
बाबासाहेबांना कधी एकदा बघेन, या आशेवर जगणारा सोनबा तिथे नाक्यावर उभा असतो. मोटारगाडीजवळ जातो तर अपमानित झालेले बाबासाहेब त्याला बघवत नाहीत. मोटारीजवळ जाऊन बाबासाहेबांना विनंती करतो. ‘बाबासायब मी माझ्या घरातनं मडक्यात पानी आनतो... थांबा वाईच...’ पळत जाऊन धावत येतो, पण तेवढ्या अवधीत बाबासाहेबांची गाडी निघून जाते. अनाडी सोनबा पाण्याचा घडा घेऊन येतो. त्याला कळत नाही बाबासाहेब पुण्याला गेले की मुंबईला गेले आणि निष्ठावंत सोनबा पाण्याचा घडा घेऊन पनवेलच्या नाक्यावर बाबासाहेबांना पाणी देण्यासाठी थांबतो. किती वर्षे? सतत सात वर्षे. उद्या... परवा... पनवेलच्या नाक्यावर येतील, अशी भाबडी आशा नव्हे तर स्वप्न बघतो. पण स्वप्ने कधी साकार होतात का? अशाच या विलक्षण कहाणीचा शेवट जो व्हायचा तोच होतो. 1946च्या काळात उपाशी, आजारी सोनबा घड्याप्रमाणे कलंडतो. आणि या जगातून निघून जातो.
विश्वामध्ये असे अनेक महापुरुष जन्माला आले, त्यांचे कार्य संपल्यावर या जगातून गेले. त्यांच्या जाण्यानंतर त्यांचे अनुयायी, कार्यकर्ते किती हळहळले? किती रडले ? किती उपाशी राहिले ?
संदर्भ - दिव्य मराठी......!
संपादन - अँड. राज जाधव...!!!
धम्मप्रचार-प्रसारक / ब्लोग माहिती प्रसारक - अँड. यतिन जाधव.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा