मंगळवार, २७ मार्च, २०१८

● महामानवांची जयंती 'आकाश कंदिल' मध्ये सीमित करू नका.

● एक आवाहन : महामानवांची जयंती 'आकाश कंदिल' मध्ये सीमित करू नका.

लेख -
राजेश सावंत

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

मित्र हो,
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध यांची जयंती काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच डॉ. बाबासाहेब, बुद्ध यांची चित्र असलेले कंदील जयंती दिवसात घरोघरी लावा, असा संदेश दिला जात आहे.

बुद्धिवादी हो,
महामानवाच्या जयंत्या हा विचारांचा जलोष असावा. कृतिशील कामाचा परिपाठ असावा. संवादाचा शिडकावा असावा. प्रबोधनाचा मार्ग असावा. शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विषयाला धरून येणाऱ्या काळात संस्था निर्माण करून नवं विवेकवादी, बुद्धिवादी पिढी बनविण्याचा मानस संकल्प असावा.

खऱ्या अर्थाने महामानवाना अभिप्रेत असलेला सामाज घडविणे हाच मूळ उद्धिष्ट, गाभा असायला हवा. मात्र आपण आज ही बुद्धिस्ट असून देखील हिंदू धर्माची प्रतिक्रांती, अनुकरण करीत असू आणि बुद्धानंतर बुद्ध धम्म वाढविण्याच काम, प्रसार - प्रचार करणाऱ्या महान बौद्ध भंते मोगलायन, सारिपुत्त अश्या अनेक भिक्कूची हत्त्या घडवून आणली. आणि आनंदाने कंदील गोडधोड करून मनुवादी विचाराने दिवाळी साजरी करण्यात आली होती. त्याचीच पुनरावृत्ती आपण करू लागलो तर बुद्धांचा, बाबासाहेबांचा डोळस वैज्ञानिक दृष्टिकोन अवघे जग अवलोकन करीत असताना खरंतर भारतात महामानवांची जन्मभूमी असताना असे नकारात्मक, विचार विरहित गोंडस प्रकारांना थांबवा. आळा घाला.

मित्र हो,
अनुकरण करण्यापेक्षा अवलोकन करा. अनुकरण केल्याने मानवाचा नाश अटळ आहे. मात्र अवलोकन केल्याने उत्कर्ष नक्की आहे. महामानवांच चित्र असलेलं कंदील लावणे, लटकवणे हा त्यांचा नकळत अपमान करीत आहोत, हे लक्षात घ्या. प्रतिक्रांती विचारांची होणं आवश्यक आहे. हिंदूंच्या सणाची नाही. तरी बौद्ध असून दोन दगडावर उभे असणाऱ्या लोकांना मान सन्मान का देत आहोत? यांना फाटा द्या. असे स्पष्ट मत आहे. जो बौद्ध असून कंदील लावेल तर तो नक्कीच पूर्ण बौद्ध नाही. केवळ त्यांन परिवर्तन केले असून त्याच प्रबोधन झालेले नाही. अस समजायला हरकत नाही. आपला तरुण सुज्ञ असून विचारांची परिभाषा जाणतो. त्यांनी अशा लोकांना प्रबोधन करावे.

तरच खऱ्या अर्थाने आपण बुद्ध, बाबासाहेब यांच्या डोळस सकारात्मक महान विचारांना क्षितिजा पलिकडे पोहचविण्याचा निर्धार करून स्वयं प्रकाशीत होता, करता येईल आणि म्हणूनच एक आवाहन आहे, जयंती साजरी करताना हिंदू संस्कृतीच्या दिवाळी प्रमाणे 'आकाश कंदिल' मध्ये महामानवाना सीमित करू नका.

◆◆◆

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
राजेश सावंत (लेखक, कवी एवं युवा मार्गदर्शक)
"आसरा एज्युकेशन आणि सामाजिक संस्था"

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 Or 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

शनिवार, १७ मार्च, २०१८

● खुले केले तू चवदार तळे (कविता)

● खुले केले तू चवदार तळे

कवी -
यतिन जाधव

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

मनुची अंधाधुंदी तू उठीवली बंदी,
साऱ्या जगाचे दिपवले डोळे ,
खुले केले तू चवदार तळे ।।धृ।

माणूस असुनी जाऊ देईना मंदिरी,
दुरून देऊन पाणी फेकून घागरी ।
ज्ञान मंदिराची बंद होती पायरी,
असे मनुवादी दलितांचे वैरी ।
तू रे जन्मा रामजीच्या भीमा,
मनुवाद्याला फासले तू काळे ।।१।।

क्रांती भूमी वरती घेतली तू सभा,
सारा समाज होता पाठीशी उभा ।
सनातनी लोकांच्या ओळखूनी गाभा,
पाणी पिण्याची नाही घेतली मुभा ।
नाही माघ सरला तळ्यात अनुतरला,
तुझे अनुयायी घेउनी सगळे ।।२।।

केली भिम क्रांती देशात मोठी,
मनुस्मृती जाळली मनुची खोटी ।
दिली नवी दृष्टी आम्हा कोटी कोटी,
खाई यतिन आज तूप रोटी ।
तुझी ती पुण्याई आणि नवलाई,
तू झुलविले आकाश निळे ।।३।।

◆◆◆

कवी -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/Y.M.JADHAV123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 Or 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

● जाती अंताची लढाई (कविता)

● जाती अंताची लढाई

कवी -
यतिन जाधव

◆●◆••◆●•◆●◆◆●◆••●◆••◆●◆

जाती जातीची छाटणी,
भीमाने बाग गं ।
बाई मनूच्या लावली,
चित्तेला आग ।।धृ।।

जाती - धर्माच शोषून विष,
त्याने वाचविला सारा देश ।
लाख संकटे झेलून छाती वरती झेलून,
केले मेंढराचे त्याने वाघ गं ।।१।।

नष्ट करण्यासाठी जातीभेद,
चातुवर्णाचा केला हो छेद ।
जात - पात हि तोडून भेदाभेद हे गाडून,
झोपलेल्यांना आणली जाग गं ।।२।।

जात नाही म्हणे ती जात,
तिने केलाय साऱ्याचा घात ।
केली शत्रूवर चढाई जाती अंताची लढाई,
केले गांडूळांचे त्याने नाग गं ।।३।।

भीम क्रांतीच चाखलं तळं,
आलं गांडूना मर्दाचं बळ ।
झाडाझडती झाडून साऱ्या जुल्माला नडून,
न्याय, लडून म्हणे माग गं ।।४।।

◆◆◆

कवी -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/Y.M.JADHAV123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

◆●◆••◆●•◆●◆◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 Or 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

सोमवार, १२ मार्च, २०१८

● बुधभूषण आणि बुद्धा संबधी निर्माण करण्यात येणारे गैरसमज

● बुधभूषण आणि बुद्धा संबधी निर्माण करण्यात येणारे गैरसमज

सूचना - 
"जनहितार्थ माहिती लहान ते वयोवृद्ध लोकांपर्यंत पोहचवणे, जेणे करून लोकांचा अफ़वा वरील विश्वास उडेल आणि लोक डोळस बनतील. ऐतिहासिक माहिती जाणून घ्यायची झाली तर त्याचा सलोख अभ्यास करावा, कृपया फसरवण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये." - यतिन जाधव

लेख -
किशोर चहांदे

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

संभाजी राजाने बुधभूषण ग्रंथ लिहिला आहे. बुधभूषणचा संबंध बुध्दाशी जोडण्यासाठीची एक पोस्ट "व्हाट्सअँप" (WhatsApp) वर सतत फिरत होती. बुधभूषण चा संबंध बुध्दाशी जोडून बहूजनवादी मानसिकता आंबेडकरी समाजात प्रदुषण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होती. म्हणून हा लेख प्रपंच.

बुध म्हणजे शहाणा, विद्वान व भूषण म्हणजे दागीना अर्थात विद्वानांचा दागीना असा अर्थ असलेला 'श्री बुधभूषण' हा छत्रपती संभाजी राजांच्या लेखनीतुन साकारलेला संस्कृत ग्रंथ आहे. डॉ. प्रभाकर ताकवले यांनी मराठीत अनुवाद केले असून ॲड. शैलजा ज्ञानेश्वर मोळक यांनी ग्रंथाचे संपादन केलेले आहे. या ग्रंथाला मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांची प्रस्तावना आहे. ३३५ पानांचा हा ग्रंथ जिजाईने प्रकाशित केला आहे. प्रा. अधिक देशमुख यांचे कडून सन १९२६ साली प्रा. ह. दा. वेलनकर यांनी संपादीत केलेली व भांडारकर संस्थेने प्रकाशित बुधभूषणची प्रत मिळाल्याचे प्रास्तविकात नमूद आहे. बुधभूषण संभाजी राजाने लिहिला नाही इथपासून ते त्यांनी लिहिलेला ग्रंथ वेगळाच असावा, हे सारे श्लोक कुणी तरी घुसडले असावेत. ही प्रत सत्यप्रत नाही. कवी कलशाच्या आहारी गेलेला राजा अशा प्रकारची मते या ग्रंथाच्या संबंधाने आहेत. संभाजी राजाने बुधभूषण हा ग्रंथ वयाच्या चौदाव्या वर्षी लिहायला सुरुवात केली व वयाच्या सतराव्या वर्षी लिहून पूर्ण केला. संस्कृत मध्ये लिहिलेल्या 'श्री बुधभूषण' या ग्रंथात तीन अध्याय, ६५ प्रकरणे व ८८६ श्लोक आहेत.

◆ प्रथम अध्यया मध्ये एकूण 'अ' व 'ब' भाग मिळून एकूण १९४ श्लोक व ४७ प्रकरणे येणे प्रमाणे आहेत -

देवता - वंदन, स्वकुल व स्वकाव्य वर्णन, भवान्या (स्मृती), प्राचीन नामस्कृती, सूर्य, चंद्र, वारा, मेघ, राजहंस, भ्रमर, चातक, कोकीळा, मोर, पोपट, कावळा, बगळा, काजवा, हत्ती, सिंहन्योक्ति, हरिण, वृक्षवृंद व वेली, रोहणाचल, सागर, रत्न, मोती, शंख, नदी, सरोवर, कमळ व मधुमक्षिका, विहिर, कस्तुरी, जल, मिश्रान्योक्ती, कासवी, कुंभ (मातीचा घडा), कापड, हार, मत्स्य, उंट, नगारा, चमेली, लिंब व कावळा, सोने, विष, शंख, साप व श्री शंकर, मध्यंतरात्तरी.

◆ द्वितीय अध्याय मध्ये ६३० श्लोक असून १७ प्रकरणे येणे प्रमाणे आहेत -

राजनिती (राज्यशास्त्र), नृप व नृपलक्षने, राजाचे सहाय्यक, अमात्य (मुख्य प्रधान), राजपुत्र त्यांचे शिक्षण व कर्तव्ये, राजाचे सहाय्यक, कोशनिरुपण, राष्ट्र, दुर्ग निरुपण, दुर्ग संपत्ती, धननाधान्य कोठारांचीही दखल, दुर्गाध्यक्ष (गजप्रशस्ती, गजमहत्ता, हत्तीचे प्रकार, बल - सेना, राजाचे आचरण), गुप्तहेर व त्याची लक्षणे, राजाचे विविध अधिकारी व सेवक वर्ग, (धर्माधिकारी , सेवक लक्षण), मंत्री व त्यांची मंत्रणा, दुतगुण व दुतकारण, राजाची कर्तव्ये, राजाची संकटे (राजा, मंत्री, राष्ट्र, कोश, दुर्ग व बल यावरील संकटे), राजाचे आक्रमण, राजाची सामान्य कर्तव्ये.

तृतीय अध्याया मध्ये एकूण ५९ श्लोक आहेत व प्रकीर्ण निति (मिश्रक निती) हे एकमेव प्रकरण आहे. तिन्ही अध्याय मिळून ६५ प्रकरणे असून श्लोकांची एकूण संख्या ८८६ इतकी असलेल्या 'श्री बुधभूषण' या ग्रंथाचे अंतरंग आहे. बुध्द आणि बुधभूषण मधील बुधचा उच्चार सारखा केल्याने अनेक लोकं बुधभूषणला 'बुध्दभूषण' समजतात. संभाजी राजाने तथागत बुध्दावर बुध्दभूषण हा ग्रंथ लिहिला असे अनेक लोकं ठोकून देतात आणि जे पुस्तक न वाचताच तशी समजूत करून घेतात. त्यांना सत्यता समजवून सांगितली तर बहूजनवादी लोकं आंबेडकरी माणसांना काळ्या पाण्यात पाहातात. अनर्गल भाषेत टिका - टिप्पणी करतात. ग्रंथात असलेल्या ६५ प्रकरणा वरून नुसती नजर जरी फिरवली तरी बुध्द आणि बुधभूषण यात काही एक संबंध नाही हे लक्षात येते. ३३५ पानांच्या, ६५ प्रकरणे व ८८६ श्लोक असलेल्या ग्रंथात केवळ तिन वेळा बुध्दाच्या नावाचा उल्लेख आला आहे. एकदा श्लोकात व दोनदा अनुवादकाने घुसडलेला आहे असे प्रथम दर्शनी जाणवते. बुध्दाच्या नावाचा उल्लेख असलेला श्लोक बघा :

• येन क्षोणिणाले कलावविकले बुध्दावतारं गतं।
गोपालेखिलवर्णधर्मनिचये म्लैच्छैः समासदिते।।
भूयस्तत्परिपालनाय सकलञ्जित्वा सुरव्देषिणः।
स्वे स्वे वर्णपथे चिरेण विहिता विप्रादिवर्णाः क्रमात्।।

अर्थ : 
त्याने पृथ्वीतलावर कली पूर्ण (अशांत) झाल्यावर बुध्दावतार धारण केला. (तथागत गौतम बुध्दाने कलीरुपाने चाललेला अमानवतावादी वैदिकशाहीचा विषमतावादी भ्रष्ट कारभार नेस्तनाबुत केला) नंतर त्यांनी अखिल वर्णा धर्माचा समूह बनवून म्लेंछ धर्माला आश्रय दिलेल्यांनाही त्या छत्रपती शिवाजी राजाने जींकून देवादिकांच्या द्वेष (सुरवर्णीय) करणाऱ्या सगळ्यांना जींकून त्यांच्या परिपालनासाठी आपापल्या वर्णा मध्ये (स्व गुणानुसार ) विप्रादिंना बऱ्याच काळ पर्यंत स्वतः च्या स्वधर्मानुसार विहित कर्माची कामे करविली.

वरील श्लोका मध्ये बुध्दावतार धारण केला असा अवताराच्या रूपात बुध्दाचा उल्लेख आहे. अवतार ही संकल्पना बुध्द नाकारतात त्यामुळे वरील एकमेव श्लोका मध्ये आलेल्या 'बुध्दावतारं' या एका शब्दांवरून बुध्द आणि बुधभूषण यांचा दुरान्वयानेही संबंध जोडता येत नाही. आणखी काही श्लोकांचे उदाहरणे पाहू :

• सुवर्णरंभां दम्भारि (?) मृदुलोरुविराजिताम्। कामेषुधिसुहृज्जंघां जानुयुग्मोपशोभिताम्।।
(प्रथमाध्याय : भवान्या स्तुति/२७)

अर्थ - 
तिच्या मृदुल मांड्या सुवर्ण केळींच्या खुंटांचे गर्व हरण करणाऱ्या आहेत. त्याचप्रमाणे गुडघ्यांच्या जोडीने शोभणारा जंघाप्रदेश हा कामदेवाच्या बाणाप्रमाणे सुहृदवत् आहेत.

• पुरा स्वर्गे सुखेनासन् कामगाः खेचरा गजाः।
मुनिशाद्रता भूमौ ततो जाता वनेचराः।।
(द्वितीय अध्याय : दुर्गाध्यक्ष/१५७)

अर्थ - 
पूर्वी स्वर्गा मध्ये इच्छे प्रमाणे अंतरिक्षात संचार करणारे हत्ती सुखाने राहत होते. ऋषींच्या शापामुळे ते पृथ्वीवर येऊन वनात राहणारे असे उत्पन्न झाले.

• शरतोमरवज्जैश्च गजस्कन्धहता नराः।
क्षणात्स्वर्गं प्रयत्न्येव तस्मात्स्वर्गोपमा गजाः।।
(द्वितीय अध्याय : दुर्गाध्यक्ष/१८४)

अर्थ - 
बाण तोमर, वज्रांनी किंवा युध्दांमध्ये जे मारले जातात ते क्षणात स्वर्गात जातात. म्हणून हत्तींना स्वर्गोपमा दिली जाते.

• व्यूहतत्वविधानज्ञः फल्गुसारविशेषतः।
राज्ञा सेनापतिः कार्यो ब्राह्यणः क्षत्रियोथवा।।
(द्वितीय अध्याय : दुर्गाध्यक्ष/१९०)

अर्थ - 
व्यूहाचे तत्व आणि रचना जाणणारा, विशेष करून आवश्यक व बारीक सारीक आणि धर्म जाणणारा या अशा ब्राम्हण किंवा क्षत्रियास प्राधान्याने राजाने सेनापती करावे.

• अनाहार्येदृशंसस्य (श्व) दृढभक्तिश्च पार्थिवे।
ताम्बुलधारी भवति नारी वाप्यथ तत् गुणाः।।
(द्वितीय अध्यायः राजाचे विविध अधिकारी व सेवक वर्ग/२२५)

अर्थ - 
कमी भोजन करणारी, मवाळ, दीर्घ स्नेह असलेली (राजावर) अशा गुणांनी युक्त अशीच स्त्री विडा देणारी असावी.

• काले प्राप्ते तु मतिमानुत्तिष्ठेत्क्रूरसर्पवत्।
(द्वितीय अध्याय : राजाची कर्तव्ये/२८९)

अर्थ - 
योग्य काळ येताच मात्र बुध्दिमान राजाने सर्पा प्रमाणे उठावे (उठाव करावा.)

• उत्कोचजीविनो द्रव्यहीनान्कृत्वा विवासयेत्।
स दानमानसत्कारैः श्रोतियान्वासयेत्सदा।।
(द्वितीय अध्यायः राजाची सामान्य कर्तव्ये/४०२)

अर्थ - 
लाच लुचपत खोरांना द्रव्यहीन करून निर्वासित ठेवावे. तसेच उच्चविद्या विभूषित ज्ञानदान वेद पाठ करणारांचा दान सन्मानासह सत्कार करून त्यांच्या निवासाची व्यवस्था करावी.

• किंतु यस्मिन्य आचारो व्यवहारः कुलस्थितिः।
तथैव परिपाल्यो सो यथावंशमुपागतः।।
(द्वितीय अध्यायः राजाची सामान्य कर्तव्ये/४०६)

अर्थ - 
परंतु ज्याचा जसा आचार, व्यवहार कुलस्थिति त्याच प्रमाणे त्यांच्याशी वागावे. ज्याप्रमाणे वंश परंपरा स्थिति चालत आली आहे तिचे ही पालन करावे.

• आश्रयी यदि वा वर्णी पूज्यो वाथ गुणि(रु) र्महान्।
नादण्ड्यो नाम राज्ञोस्ति स्वधर्मे बाबतिष्ठति।।
(द्वितीय अध्याय : राजाची सामान्य कर्तव्ये/४४६)

अर्थ - 
आश्रम किंवा चौवर्णांचे काटेकोर पालण करणारा, पूज्य किंवा महान गुणी असणाऱ्यास राजाने शासन करू नये. तसे केल्यास स्वधर्मास कमीपणा येतो.

• एवं धर्मप्रवृत्तस्य राज्ञो दण्डधरस्य च।
यशोस्मिन्प्रथते लोके स्वर्गे वासस्तथाक्षयः।।
(द्वितीय अध्याय : राजाची सामान्य कर्तव्ये/४७०)

अर्थ - 
अशा तऱ्हेचा दण्डधारी राजा, पृथ्वी लोकावर यशस्वी होतो व स्वर्गा मध्ये अक्षय निवास करतो.

• व्दैपायनेन मुनिना मनुना च धर्मा
युध्देषु ये निगदितास्तु तेगः (?)।
स्वर्भ्य(भ्र्व)र्थगोद्विजहिते त्यजतां शरीरं
लोका भवन्तु विपुलाः सुलभं यशश्च।।
(द्वितीय अध्याय : राजाची सामान्य कर्तव्ये/५७०)

अर्थ - 
आचार्य व्यास मुनी, आचार्य मनु यांनी कर्तव्य म्हणून युध्दांमध्ये जे संवादिले आहे ते देवता तुल्य स्वतः च्या सत्वासाठी, गो ब्राह्मणांच्या हितांसाठी आपले शरीर सोडण्यास तयार होतात . त्या लोकांना भूतलावर यश अत्यंत सुलभ (सहजतेने) प्राप्त होते.

वरील श्लोका मध्ये आलेले अवतार, स्वर्ग, देव, वर्ण व्यवस्था, वेद हे सर्व तथागत बुध्दाने नाकारलेले आहे आणि माणूस केंद्रबिंदू मानून अखिल मानवाला दुःख मुक्त करून मानवी कल्याण साधने हेच बुध्दाच्या धम्माचे सुत्र आहे. असे असताना बुधभूषण मधील श्लोका वरून या ग्रंथाचा आणि बुध्दाचा संबंध जोडल्या जाऊ शकत नाही. द्वितीय अध्याय मधील ५६ व्या क्रमांकाच्या श्लोका मध्ये भृगु ऋषीचा उल्लेख आहे. ते भृगु ऋषी तथागत बुध्दा विषयी म्हणतात - "राजपुत्रा, तुझे ध्येय हे खरोखरच शूराचे ध्येय आहे. तू तरुण असलास तरी स्वर्ग आणि मुक्ती यांचा तुलनात्मक संपूर्ण विचार करून तू मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहेस व ध्येयाने प्रेरित झाला आहेस. तू खरोखर शूर आहेस!" याचा अर्थ जर बुधभूषण या ग्रंथाचा आणि बुध्दाचा संबंध असता तर जसा भृगु ऋषीवर एक श्लोक आहे तसा एखादा श्लोक तथागत बुध्दावर ही असता. बुध्दावर श्लोक नाही म्हणून काही संभाजी राजाला दोष देण्याचे येथे प्रयोजन अजिबात नाही. श्री बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ ३५६ वर्षापूर्वी लिहिलेला आहे आणि शिव धर्माची स्थापना १२ जानेवारी २००८ मधील असली तरी पण 'शिव धर्म' हा शब्द प्रयोग सदर ग्रंथात सात वेळा केलेला आहे.

श्री शिव शंकर, श्री पार्वती, श्री भवानी देवी, श्री कृष्ण, गणपती यांच्या बद्दल संभाजी राजाला आत्यंतिक आदर होता. सांगायचे हेच आहे की, बुधभूषण म्हणजे विद्वानांचा दागीना अशा अर्थाचे शिर्षक असलेल्या संभाजी राजाने लिहिलेल्या श्री बुधभूषण या ग्रंथाचा आणि तथागत बुध्दाचा काही एक संबंध येत नाही एवढेच.

◆◆◆

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
किशोर चहांदे (लेखक, कवी, एवं मार्गदर्शक)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 Or 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

गुरुवार, ८ मार्च, २०१८

● बाई सांभाळ गोंदण (कविता)

● बाई सांभाळ गोंदण

कवी -
राहुल साळवे

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

बाई सांभाळ गोंदण,
तुला कावळा शिवेल ।
अश्या खरुजी रुढीचा,
मला होई गं विटाळ ।।धृ।।

जळ भाज तो कसला?,
हा तर निसर्गाचा वसा ।
भस्त्रा मानतो तुला हा,
संस्कृतीचा फुटका आरसा ।।१।।

अशी चौकट कशाला?
तोड़ साऱ्या बेड्या आता ।
दे आभाळा या सूर्य,
नवा तो विवेकाचा ।।२।।

उगा नकोच आता तो,
दाखला इतिहासाचा ।
तूच बदलूनी टाक,
हा खेळ बिन बुडाचा ।।३।।

बाई सांभाळ गोंदण,
तुला कावळा शिवेल ।
अश्या खरुजी रुढीचा,
मला होई गं विटाळ ।।४।।

कवी -
राहुल सिद्धार्थ साळवे
(प्रसिद्ध लेखक, कवी एवं विचारवंत)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 Or 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

शुक्रवार, २ मार्च, २०१८

● रामाला अखेरचा राम - राम ठोकला.

● रामाला अखेरचा राम -  राम ठोकला.

लेख -
यतिन जाधव

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

१५ नोव्हे १९२९ च्या बहिष्कृत भारतात बाबासाहेबानी एक झणझणीत अग्रलेख लिहला. “सर्वच स्पृश्य हिंदुंच्या जनतेचे मत परिवर्तन झाल्या शिवाय मंदिर प्रवेश नसावा. असे जर त्यांचे मत असेल तर अस्पृश्याना अनंत काला पर्यंत थांबावे लागणार. सत्याग्रह करणे अपरिहार्य होऊन बसले आहे. आपण लवकरच मंदिर प्रवेशाची चळवळ हाती घेणार. जो पर्यंत हिंदु म्हणुन या समाजाचा आहोत, तो पर्यंत मंदिर प्रवेश हा आमचा अधिकार आहे व तो आम्ही बाजावुनच दम घेऊ” अशा अर्थाचा अग्रलेखा झडकल्यावर सारे सनातनी पेटुन उठले.

पुण्यातील अस्पृश्यानी चालविलेला पर्वती मंदिर सत्याग्रहाच्या अपयशानी बाबासाहेब बरेच अस्वस्थ झाले. सनातन्यानी अस्पृश्यांवर दगड फेक करुन जखमी केले. राजभोज तर थेट दवाखान्यात पोहचले होते. वार पुण्यात झाला पण जखम तिकडे मुंबईत बाबासाहेबांच्या हृदयात झाली. आता मात्र हि चळवळ बाबासाहेब स्वत: चालविण्याच्या विचारात होते. सनातन्यांचे धार्मिक नाक म्हणजे नाशिक. बाबासाहेबानी या वेळेस यांचा नाकच दाबायचा संकल्प केला. नाशिक म्हणजे सनातन्यांचे अत्यंत महत्वाचे तिर्थस्थान. ईथले सनातनी पराकोटीचे जातियवादी. या लोकांच्याच छाताडावर बसुन बुक्क्या मारण्याचा निर्धार केला. धर्माचा श्वासच कोंडवुन सोडायला एकंदरीत आराखडा आखण्यात आला.

१७ नोव्हे. १९२९ देवळाली येथे सभा घेण्यात आली. ईथे महारांचा एक संघ स्थापण करण्यात आला. संभाजी रोकडे या सभेचे अध्यक्ष होते व भाऊराव गायकवाड (उर्फ दादासाहेब) हे चिटणीस होते. नाशिकच्या सत्याग्रहाची पहिली रुप रेषा ईथे ठरली. सत्याग्रहाची सिद्धता कशी करावी? निधी कसा गोळा करावा? इथ पासुन सत्याग्रहाची एकुन रुप रेषा ईथेच ठरविण्यात आली.

२५ जानेवारी १९३० रोजी त्र्येंबकेश्वरच्या निवृत्तीनाथाच्या यात्रेच्या वेळी एक टोले जंग सभा घेण्यात आली. या सभेत बाबासाहेब स्वत: येणार होते. पण काही कारणास्तव ते येऊ न शकल्याने श्री. अमृतराव रणखांबे यानी अध्यक्ष पद भुषविले. भाऊसाहेब, देवराव नाईक, मिंदे पाटील इत्यादी नेत्यानी तडाखे बंद भाषण केले. या वेळी सत्याग्रहाची एकुन रुप रेषा बाबासाहेबांच्या उपस्थीतीत अधिकृत करुन घ्यावयाची होती. पण ते न आल्याने हजर नेत्यांच्या संमतीने सत्याग्रहाची आखणी करण्यात आली. सत्याग्रहाची नोंदणी, निधींची जमवा जमव पासुन सगळा कार्यक्रम ईथे संमत करुन घेतला. आता मात्र दलित जनतेला हुरूप आला. खेडोपाडयात प्रचाराचे घोडे दौडु लागले. भीम सैनिकानी सगळा प्रांत पिंजुन काढला. नागपूर पासुन बेळगाव पर्यंत जंगी प्रचार चालु झाला. जिकडे तिकडे फक्त याच सत्याग्रहाची चर्चा चालु झाली. लोकांचा भर भरुन प्रतिसाद मिळत होता. अपेक्षेपेक्षा जास्त लोकं सत्याग्रहाला पाठिंबा देऊ लागली.

बाबासाहेबांच्या कार्याला यश आल्या वाचुन राहणार नाही अन हा आमचा नेता आमचा उद्धार करुन दम घेईल याची प्रत्येकाला खात्री वाटु लागली. सत्याग्रहाची माहिती देण्यासाठी खेड्या - पाड्यातुन घेण्यात येणाऱ्या लहान सहान सभाना अलोट गर्दी होत असे. मुलभूत हक्कावर गदा आल्यास चळवळ स्वत: च आकार घेते, फक्त कुणी तरी हाक देणारा हवा, बाबासाहेबांच्या चळवळीला लोकानी दिलेला प्रतिसाद हा बाबासाहेबांच्या अंगभूत गुणांचा, संघटान कौशल्याचा अन कळकळीने चालविलेल्या समाज सेवेची फलश्रूती होती. पण त्याच सोबत अटाकावाच्या विरोधात आकार घेणारा प्रतिकार अत्यंत वेगाने एकवटतो अन त्याचा उद्रेक होतो तेंव्हा साऱ्या तटबंद्या उध्वस्त होतात. भीम सेना म्हणजे अशा साऱ्या तटबंद्या तोडण्यास सज्ज झालेली, आपल्या नेत्याच्या प्रति पराकोटीची निष्ठा बाळगणारी एक अत्यंत बलवान संघटना होती. गावा गावातुन वाहनारे सत्याग्रहाचे वार सनातन्यांच्या अस्वस्थ करु लागले.

१३ फेब्रुवारी १९३० ला सनातन्यांची जाहिर सभा झाली. व्ही. बी. आकूत (वकील) निळकंठ पाटणकर, श्रीधर अणाशास्त्री, व गोपाळ शास्त्री पुराणीक या सनतनी नेत्यांच्या नेतृत्वा खाली हि सभा भरविण्यात आली. दोन्ही शास्त्री बुवानी अस्पृश्यांचा कडाडून विरोध केला. महारानी मंदिरात येणे हे त्याना अजिबात मान्य नव्हते. त्यांच्या पाठिशी सगळा सनातनी वर्ग उभा होता. तरी बाबासाहेबांच्या भीम सैनीकाची ताकत बघुन पोटात गोळा येई म्हणुन त्यानी हि सभा घेतली होती. सरसकट सगळ्याना आपण दोष देतो पण या सभेत एक पुरोगामी ब्राह्मण होता. ज्यानी सगळा विरोध झुगारुन अस्पृश्याना मंदिरात प्रवेश देण्यात यावा, असं स्पष्ट मत नोंदविलं. अस्पृश्याची बाजु लावून धरणारा तो संवर्ण होता. नीळकंठराव पाटणकर. त्यामुळे सभेद गदारोळ झाला. सनातन्यानी या मताचा जोरदार निषेध केला. सभेत हल्ला कल्लोळ उडाला. अन आकूत मात्र तटस्थ राहिले.

◆ काळाराम मंदिराची कहाणी :

१७८२ साली सरदार रंगाराव ओढेकरानी सुमारे तीस लाख रुपये खर्च करुन नाशिकात हे मंदिर बांधुन घेतले. दरवर्षी राम नवमीला या मंदिरातून रथयात्रा निघत असे. मंदिरातील हे रथ स्पृश्य व अस्पृश्य दोघानी मिळून ओढण्याची प्रथा सुरुवाती पासुनच चालत आलेली होती. पुण्यातील पेशवे माधवराव यांच्या मातोश्री गोपीकाबाई या मुळच्या नाशिकच्या. त्यांच्या माहेरचे आडनाव रास्ते. त्यानी या मंदिराला दोन रथ भेट दिले होते. पुढे त्या दोन्ही रथाची देखभाल व इतर खर्च याची जबाबदारी रास्त्यांवरच होती. आज मात्र ईथल्या अस्पृश्यानी थेट मंदिरात प्रवेश मिळावा म्हणुन अत्यग्रह करण्याची भीम गर्जना केली. त्यामुळे राम बाटणार म्हणुन सनातन्यानी दंड थोपटले.

१९३० वर्ष नवीन विचारांचे, प्रतिकाराचे, पराक्रमाचे व दोन जग प्रसिद्ध सत्याग्रहाचे म्हणुन भारताच्या इतिहासात अनंत काळापर्यंत आठवला जाणारं असं हे अप्रतीम वर्ष. २ मार्च १९३० ला बाबासाहेबानी नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह सुरु केला, अन तिकडे १२ मार्च १९३० ला मा. गांधी यानी दांडी यात्रा सुरु केली. गांधीचा लढा राजकीय होता, तर बाबासाहेबांचा सामाजीक होता. गांधीची सगळी समीकरण शेवटी संवर्णाना लाभदायक ठरणारी तर बाबासाहेबांची अस्पृश्याना किमान माणुस म्हणुन स्विकारावे याची. गांधीचा लढा परकीयांशी होता तर बाबासाहेबांचा स्वकीया सारखे दिसणारे पण पराकोटीचं परकियत्व बाळगणाऱ्या ऐत्तद्देशीयांशी होता.

गांधी हे गूढ व्यक्तीमत्व होते. तर बाबासाहेब स्पष्ट वक्ते होते. गांधी हे भारतातील अत्यंत धनाढ्य लोकाना पाठिशी घेऊन चालणारे एक अतीश्रीमंत नेते होते तर बाबासाहेब पै पै साठी मोताज अशा दरिद्री लोकांचे नेते होते. एका साम्य दोन्हीकडे होतं, करोडोची किंमत ओवाळून टाकावा अशी निष्ठावानांची फौज दोघांकडे होती. चळवळीत ईतर सगळ्या गोष्टी दुय्यम ठरतात. सगळ्यात प्रथम क्रमांक लागतो निष्ठावाणांचा अन ईथे दोन्ही कडचे निष्ठावान सर्व ताकत झोकून देण्यास सदैव तय्यार असतं.

भाऊसाहेबांकडे या सत्याग्रहाचे सगळी जबाबदारी होती, ठरल्या प्रमाणे दोन तारखेला एक सभा व मिरवणुक अन ३ मार्च १९३० पासुन प्रत्यक्ष सत्याग्रहास सुरुवात होणार होती. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातुन लोकांनी नाशिकच्या दिशेनी यायला सुरुवात केली. रोज ट्रका भरुन लोक नाशकात उतरु लागली. तिकडे महारवाडयात लोकांच्या राहण्याची चोख व्यवस्था बजावण्यात आली होती. दोन मार्च पर्यंत महार वाडयात एकुण ८००० भीम सैनीक सत्याग्रहात सामिल होण्यासाठी येऊन दाखल झाले. तेंव्हा नाशिकचे जिल्हाधिकारी होते.

आर. डी. गार्डन, यानी मध्य विभागाचे आयुक्त श्री. जे. घोषाळ (रविंद्रनाथ टागोरांचे मेहुणे) याना कळविले की उभं नाशिक घुमसत आहे. सनातनी ऐकायला तयार नाहीत किंवा बाबासाहेब ही सत्याग्रह मागे घ्यायला तयार नाहीत. एकुण परिस्थीत फार स्फोटक होत चालली आहे. १८५७ चा धार्मिक उठाव इंग्रजाना पुरुन उरला होता. त्यामुळे सनातन्यांच्या विरोधात जाण्यास इंग्रज धजावत नव्हते. अस्पृश्याना त्यांची सहानुभूती जरुर होती पण धर्मात ढवळाढवळ करण्याची आता त्यांच्यात हिम्मत नव्हती. अन गार्डन साहेबांचा झुकाव सनातन्यांकडून होता असे वाटायचे. ईकडे बाबासाहेबांच्या अध्यक्षते खाली २ मार्चला सकाळी १० वाजता एक टोले जंग सभा भरविण्यात आली. सत्याग्रह कसा चालु ठेवायचा? कोण कोण नेतृत्व करणार? पहिली आघाडी कोणाची असेल? किती लोकांचे गट असावे? अन सगळ्यात महत्वाचं हे की हा सत्याग्रह अहिंसेच्या मार्गानी करायचा आहे. याची सगळ्याना सुचना देण्यात आले.

मधे जेवणासाठी ब्रेक घेतला व परत तीन वाजता सभा भरली. तो पर्यंत नाशकात आजुन सात - आठ हजार भीम सैनिक येऊन थडकले होते. तीन वाजता १५,००० लोकांची एक मिरवणूक निघाली. सर्व स्त्याग्रही अत्यंत शांत, शिस्तीने व नियमाचे काटेकोर पालन करत अगदी रांगेत पुढे सरकु लागले. “श्री राम जय राम जय जय राम” चा जयघोष चालु होता. सगळ्याच्या मुखात रामाचे नाव अत्यंत आदराने गुणगुणल्या जात होते. हि मिरवणूक जशी मंदिराजवळ येते. तसं मंदिरांच्या पुजाऱ्यानी सगळे दरवाजे धडाधड बंद केले. अस्पृश्यां पासुन रामाचे रक्षण करण्यासाठी सनातनी सज्ज झाले. मिरवणूक गोदावरीच्या घाटाकडे वळली. एक जंगी सभा घेऊन मिरवणूक विसर्जीत करण्यात आली.

आता उदया पासुन म्हणजेच ३ मार्च पासुन सुरु होणार होता सत्याग्रह. प्रत्यक्ष मंदिराला वेढा घालुन मानवी हक्क बजावण्यासाठी भीमसैनीक अहो रात्र मंदिर आवारात लढणार होते. जिल्हाधिकारी गार्डन साहेब २ तारखेला जातीने मंदिर आवारात पुरेपुर पोलिसांची कुमक घेऊन हजर होते. कुठल्याही परिस्थीती परिस्थीती नियंत्रनात ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती. परिस्थीती आटोक्यात ठेवण्यासाठी त्यानी जय्यत तयारी केली होती. नाशिक शरातील कुमक कमी पडणार म्हणुन बाहेरुन जादा कुमक मागविण्यात आली होती. अन पाहता पाहता ३ मार्च उजाडला.

३ मार्च १९३० बाबासाहेबांच्या आदेशानी सत्याग्रहाची सुरुवात झाली. सत्याग्रहांच्या चार तुकड्या पाडण्यात आल्या. प्रत्येक तुकडीत १२५ पुरुष व २५ महिला अशी दिडशे सत्याग्रहाची संख्या होती. ह्या तुकड्या मंदिराच्या चारी दरवाजावर सकाळ पासुन ठाण मांडून बसल्या. पतित पावन दास (उत्तर दरवाजा), कचरु साळवे (पुर्व दरवाजा), पांडूरंग राजभोज (दक्षिण दरवाजा) व शंकरदास नारायण दास (पश्चिम दरवाजा) असे चार खंदे सरदार मंदिराच्या चारी दिशांवर आपापल्या आघाड्या सांभाळत होते. बाबासाहेब अन भाऊराव हे प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या ठिकाणी सारी व्यवस्था पाहात होते. मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते. दरवाजे उघडल्यास सत्याग्रही मंदिरात प्रवेश करणार अन रामाचे दर्शन घेणार असे ठरले. पण आज राम बंदिस्त झाला होता. तो दलितांसाठी कधीच उठुन बाहेर येणार नव्हता, किंवा हा राम सनातन्यांच्या शब्दा बाहेर नव्हता.

तिकडे याच दिवशी रात्री शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यानी संवर्णाची सभा बोलावली. सनातनी आज फार भडकलेले होते. दिवसभर सत्याग्रच चालला होता. महाराना धडा शिकवुन सत्याग्रह फोडून काढण्याची भाषा सनातनी कार्यकर्ते बोलू लागले. काही झाले तरी मंदिर खुले करायचे नाही या अटीवर सगळयांचे एकमत झाले. पाटणकरानी तसे करण्यापेक्षा तडजोड करावी अशी सुचना दिली. त्यांच्या या सुचनेनी कार्यकर्त्यां हुल्लड घातली. सुधारणेस अनुकूल सनातन्यांवर दगड फेक झाली. प्रक्षोभिम धर्म वेड्यानी जोडे फेकुन मारले. शंकराचार्यानी तडजोडीच्या भानगडीत न पडता अलिप्त रहावे अशी धमकी वजा विनंती करण्यात आली. एकंदरी परिस्थीती स्फोटक बनली होती. कधी हि प्रस्फ़ोट होईल अशा तंग वातावरणा मुळे शंकराचार्यानी सभा तहकुब करण्याचे जाहिर करुन शेवटचे काही वाक्य बोलले तेंव्हा ते म्हणतात -

“आज प्रत्यक्ष राम जरी अस्पृश्यांच्या बाजुने आला तर हे रामाला ही फेकून देतील. प्रवेश नाकारतील” असे म्हणुन शंकराचार्यानी हताशपणे आपले भाषण आवर्ते घेतले. सारं सनातन्यांच्या मनासारखं झालं होतं. ८ मार्च १९३० आयुक्ट घोषाळ नाशिकला आले. गार्डन कडुन वारंवार ईथल्या अस्पृश्यांच्या सत्याग्रहा बद्दल तक्रारी गेल्यामुळे आज आयुक्त स्वत: ईथे हजर होते. त्यानी आधी बाबासाहेबांचे मत जाणुन घेतले.

बाबासाहेब म्हणतात - 
“मी माझ्या लोकाना हक्क मिळवुन देण्यासाठी लढा उभारला आहे, वाजवी तडजोड होत असल्यास आम्ही सत्याग्रह तहकूब करायला तयार आहोत” असे घोषाळाना सांगितले. बाबासाहेबांच्या एकंदरीत रवैय्यानी घोषाळ खुष झाले. नंतर त्यानी सनातन्यांशी बोलणी केली. सनातन्यानी मंदिर खाजगी असल्याचा नवीन पिल्लू काढला. मंदिराला दर वर्षी १०००/- रुपये सरकारी अनुदान मिळत असल्याचे लगेल. सिद्ध करुन हा डाव हाणुन पाडण्यात आला. सनातन्यांच्या मुजोरीमुळे काहीच तडजोड होत नाही व घोषाळ साहेब निराशपणे परत जातात. पण परत गेल्यावर त्यानी आपला कावा दाखवला. आयुक्त घोषाळानी हॉटसन साहेबांस एक पत्र लिहले.

“मी आताच नाशिकहुन परतलो. मला आधी वाटत होते त्यापेक्षा हे प्रकरण खूपच गंभीर आहे. देवळाला सरळ सरळ वेढा घालण्यात आला आहे. सकाळी मला तेथे आंबेडकर भेटले. शंभर महार तेथे गीत गात होते. अधून मधून उंच आवाजात युद्ध घोषणा देत होते. तेथे बऱ्याच स्त्रीया ही होत्या. खाकी पोषाक केलेले व हातात काठा घेतलेले लोकं पहारा देत आहेत. सत्याग्रहयांचा वेष खादी व डोक्यावर गांधी टोप्या होत्या. त्या त्याना नुकत्याच देण्यात आल्या होत्या. दर पाच दहा मिनटानी सत्याग्रह्यानी भरलेल्या लॉऱ्या नाशिकात येत होत्या. सत्याग्रहात अडथळा आणणारा कुठला ही हुकूम पाळला जाणार नाही असे आंबेडकरानी सांगितले आहे.

श्री. गार्डन, श्री. रेनाल्डस (पोलिस अधिक्षक) व मी सकाळी जेंव्हा तेथे गेलो तेंव्हा धरणे धरुन बसलेल्या महारां पैकी कोणीच उठून उभे राहिले नाही. त्यापैकी बरेच जण खेड्यातुन आलेले वतनदार महार आहेत. मी त्यांच्याशी बोलत असताना सुद्धा ते उठून उभे राहिले नाहित. परंतू आंबेडकर येता क्षणीच ते उठून आनंदाने उड्या मारु लागले. त्याना सलाम करु लागले. गांधीजी की जय अशा घोषणा दिल्या. सत्याग्रहाची मोहिम कुणालाच आवडली नाही. केवळ ब्राह्मणच नाही तर व इतर सर्व हिंदु या महारांचा व सत्याग्रहाचा विरोध करत आहेत. नाशिक परिसरातील महारांवर तेथील संवर्णानी बहिष्कार घातलेला आहे. अशा परिस्थीतीत उत्तेजण देणे म्हणजे त्यांची खरी सेवा करण्या सारखे नाही. या चळवळीचे स्वरुप धार्मिक असण्यापेक्षा, सामाजीक व राजकीय आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या १४७ व्या कलमानुसार गार्डनने ताबडतोब कारवाई करावी, असे मला वाटते. खेड्यातील वतनदर महारही आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक याना डरत नव्हते.”

मुजरे घेण्याची सवय असलेल्या साहेबांची आगपाखड या पत्रातुन दिसुन येते. गोऱ्या व काळ्या साहेबांना महारांचे वागणे कसे आवडत नव्हते हे घोषाळांच्या पत्रावरुन स्पष्ट दिसते. बाबासाहेबानी मेलेल्या मुर्द्यां मध्ये घातलेल्या स्वाभिमानाच्या फूंकरेचा जीवंत ठेवा. घोषाळांच्या पुढे वाढला होता. सनातनी दास्य झुगारुन देऊन आंबेडकरी रंगाने झडाडुन निघालेली नवचैतन्यानी भरलेली भीमाची पहिली तुकडी बघुन घोषाळाचे नेत्र दीपून गेले होते. बाबासाहेबांच्या मार्गदर्शना खाली तयार होणारी महारांची भावी सेना कशी असेल याचा नांदी आज घोषाळाना नशकात दिसली.

१४७ व्या कलमा खाली महारांवर कारवाई करण्याची घोषाळांची सूचना मुंबई सरकारने फेटाळली. नाशिक सत्याग्रहा बद्दल त्यांच्या पत्रातुन ओझरणारा दूराग्रह अचुक हेरल्यावर वरिष्ठानी घोषाळांवर नाराजी व्यक्त केली व २६ मार्च १९३० रोजी तडका फडकी त्यांची बदली केली. त्यांच्या जागी मध्य विभागाचे आयुक्त ए. डब्ल्यू मॅकाय काम पाहु लागले. यानी सुत्र हाती घेताच मंदिराच्या पुजा-याना बजावले की उत्तर दरवाजाच्या बाजुने एक लहानसा दरवाजा होता जो पुजाऱ्याच्या घरात जात असे. त्या दरवाजातुन पुजाऱ्यानी लोकाना आत सोडल्याची तक्रार आली व तसे न करण्याची ताकिद दिल्या गेली. आता मात्र सर्व सनातनी चवताळून उठले. ईकडे अस्पृश्य ही दंड थोपटुन उभे ठाकले. पुजाऱ्यानी नियम तोडल्यास त्यांच्या खाजगी दरवाज्या जवळ सत्याग्रह करण्याची मागणी होऊ लागली.

९ एप्रिल १९३० राम नवमी. आज रथ यात्रा निघणार अन सत्याग्रही अधिक आक्रमक होत चालले. पोलिसानी दंगल वगैरे होऊ नये, म्हणुन बंदोबस्त वाढविला. एकंदरीत तणाव वाढताना बघुन दोन्ही कडच्या नेत्यानी मिळून एक तात्पुर्ती तडजोड काढली. रथ ठेवण्याच्या जागे पासुन पुर्वेच्या श्री राम मंदिरापर्यंत रथ स्पृश्यानी आणायचा. तिथुन पुढे विमान सर्वस्वी अस्पृश्याने न्यावे अन रथ मात्र स्पृश्य व अस्पृश्यानी मिळून ओढावे. पण शब्दाला जागतील ते स्पृश्य कसले. ऐन वेळी अस्पृश्यांशी धोका केला. वेळेच्या आधीच रथ बाहेर घाई घाईने ओढण्यास सुरुवात केली. अस्पृश्याना चुकवुन रथयात्रा काढण्याचा प्लॅन होता. चरण पादूकाजवळ थांबलेल्या अस्पृश्यांच्या लक्षात येताच त्यानी सर्व शक्ती एक वटुन रथ अडाविला. या वरुन मिरवणूक बाजूला राहिली व मारामारी, दगडफेक झाली. तोवर बाबासाहेब प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी पोहचले.

दगडांचा वर्षाव चालु होता. ईतक्यात पोलिसांचा कडा फोडुन भास्कर कद्रे नावाचा भीम सैनीक मंदिरात घुसला अन रक्ताने माखुन बेशुद्ध पडला. उपस्थीत सर्व सत्याग्रह्याना व स्वत: बाबासाहेबाना ही लहान सहान इजा झाल्या होत्या. सनातन्यानी पुर्ण ताकत झोकून दिली होती. ईकडे गावात महारांची दशा फार वाईट होती. दिसेल त्या महाराला सनातन्यानी झोडपणे सुरु केले. कित्येक गावांमधुन बहिष्कार टाकण्यात आला. जागो जागी महारांचे हाल हाल करण्यात येत होते. या सर्व परिस्थीला पाहुन रामाच पक्ष कोणाता व रावणाचा कोणता हे सांगणे न लागे. अशा प्रकारे हा सत्याग्रह १९३५ पर्यंत चालतो पण शेवट पर्यंत सनातन्यानी आपली सर्व शक्ती पणाला लाऊन महाराना रामाच्या भेटी पासुन रोखुन धरले. शेवटी हताश झालेले अस्पृश्य हे जाणतात की - आता या सत्याग्रहात राम राहिलेला नाही व आपला खरा राम शोधण्यासाठी काळा रामाला एकदाचा राम राम ठोकतात. अनंत काळापासुन तेजो भंग करण्यात आलेल्या या समाजाला आता गोलमेजच्या नविन दिशा खुणावत होत्या.

◆◆◆

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

साभार -
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया",
"दि नॅशनल नेटवर्क बुद्धिस्ट युथ : पुणे ग्रुप"

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/Y.M.JADHAV123

• मातृ संघटनेत सहभागी होण्या करिता
Www.SSDIndia.Org

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 Or 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।