▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
● भिमा कोरेगाव येथे लढाईत शाहिद
होणाऱ्या सैनिकांनीच लावला
सांचीच्या स्तुपाचा शोध
लेख - रवींद्र सावंत
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
भीमा कोरेगाव इतिहासातील महत्वाचा भाग असून याच बरोबर एक महत्वाचा इतिहास जो जगा पुढे आजवर आला नाही. त्याचे महत्वाचे कारण आम्हाला हि त्याचा इतिहास माहिती नाही. मध्य प्रदेशात असणारे हे सांची स्तूप आणि महाराष्ट्रात असणाऱ्या भीमा कोरेगाव विजय स्तंभ काय कनेक्शन आहे? तर भिमा कोरेगावच्या लढाई मध्ये ब्रिटीश सैनिकाच्या फौजेत असणारी महार सैन्याची तुकडी यात मराठा सैन्याची हि तुकडी आहेत. एक लक्षात घ्या केवळ महारच नाही तर मराठा देखील पेशवाईच्या विरोधात उभा होता. ब्रिटीशांच्या बाजूने ज्यांनी छत्रपतींचे राज्य लयास नेले, अश्या पेशव्यांच्या विरोधात उभे होते महार - मराठा! म्हणूनच हा विजय स्तंभ केवळ महार सैन्यांचा च नसून मराठा सैन्यांचा देखील आहे आणि त्यात महत्वाची बाब अशी कि सर्वांची नावे हि "नाक" नावनेच आहेत. त्यामुळे त्यातले महार - मराठा कोण? हे कोणालाच ओळखता आजवर आलेलेल नाहीत.
ह्याच कोरेगावची लढाई १८१७ च्या शेवटच्या रात्री अवघ्या ७५० सैन्याच्या साथीने २८ हजार सैन्यांशी झाली यात ५०० महार - मराठा सैनिक होते. त्यांनी जीवाची बाजी लावत विजय संपादन केला. काहीनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्यांच्या नावाने हा विजय स्तंभ आहे. पण त्याच बरोबर क्रांतीकारक घटना हि आहे कि - या कोरेगाव च्या सैनिकांच्या लढाईत कुमक म्हणून पाठवली असणारी एक सैन्याची तुकडी ग्वाल्हेरच्या छावणीत मेजर हेनरी टेलर याच्या अधिपत्याखाली असणारी सैनिकाची पलटण पुन्हा ग्वाल्हेरकडे पाठवण्यात आली. तेव्हा हि पलटण भोपाळपासून त्गोड्या अंतरावर असणारे भिलसा या ठिकाणी थांबली होती. त्यावेळी त्या पलटण मधील अधिकारी शिकारीसाठी दुपारचे जंगलात गेले असताना मुख्य मार्गावर बाजूला शेजारी झाडा झुडपांनी वेढलेल्या टेकडीवर गेले असताना त्यांच्या भोवती अनेक कृत्रिम छोट्या - छोट्या टेकड्या नजरेस आल्या त्यातील काही टेकड्या ह्या गोलाकार असून सुंदर आहेत असे जाणवले. त्यामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्या पैकी कॅप्टन एडवर्ड फेल आणि लेफ्टनंट जॉन बागनोल्ड आणि निशाण जी जॉर्ज रोबुक यांनी या ठिकाणी उत्खनन झाले पाहिजे. यासाठी पुन्हा या ठिकाणी येण्याचा निर्णय घेतला.
दोन कनिष्ट अधिकाऱ्यांनी या अवशेषांचे रेखाचित्र काढले आणि एडवर्ड फेल यांनी एक अहवाल तयार केला. तो कलकत्ता जर्नलच्या जुलै १८१९ च्या अंकात प्रकाशित झाला. या अहवालात त्यांनी लिहिले होते कि - एका अलग पडलेल्या टेकडीवर सपाट माथ्यावर अर्धगोल घुमटकार आकारात पडलेले दगडात बांधलेले टप्या टप्प्याने बांधलेले सिमेंचे अजिबात वापर न करता पूर्ण ठोस असे स्मारक बांधलेले आहे. १२ फुट उंच आणि ७ फुट रुंद आस्व वर्तुळाकार ५५४ फुट परीघ असलेले स्मारक बांधलेले आहे. या स्तुपा भोवती भग्नावस्थेत पडलेले तोरणे आणि कठड्यावरील नक्षीचे हि वर्णन त्यांनी अहवालात केले होते. शिल्पाचा अर्थ न लागल्याने एका दीर्घ कालीन प्राचीन इतिहासाला उलगडा करणऱ्या स्थळ जैनांचे कि बौद्धांचे याबाबत निश्चिती नव्हती. कलकत्त्यातील रॉयल आशियाटिक सोसायटीच्या एच. एच. विल्सन यांनी दुर्लक्ष केल होते. नंतरच्या काळात जॉन प्रिन्सेप अलेक्झांडर कनिघहम आणि जॉन मार्शल यांनी लक्ष घालून सांचीचा शोध लावला.
सांचीचे संरक्षण आणि पुर्नबांधणी करण्यासाठी साधन सामुग्री नेण्यासाठी एक छोटी रेल्वे लाईन खालच्या मोठ्या लोह मार्गावरून टाकण्यात आली. सांची वरील जातक कथा, बुद्ध जीवन कथा दान दात्यांचे शिलालेख आणि तर सामग्री वरून सम्राट अशोकाच्या काळापासून इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून ते गुप्तोतर काळापर्यंत म्हणेज इसवी सनाच्या पाचव्या शतकापर्यंत आहे आणि बौद्ध धम्माचा इतिहासावर एक प्रकाश पडला. पेशवाई बुडवणाऱ्या कोरेगावातील लढाई मधील हे यश, हे विषमतेचे राजवट नष्ट करणे हे होते आणि दुसरी यश सांचीच्या शोधातून उलघडत जाणारा बौद्ध धम्माचा समतावादी परंपरेचा शोध हे होते. बाबासाहेब यांच्या अभ्यासात हे आले नसावे का? तर नक्कीच आलेले आहे त्यामुळे बाबासाहेब हा अनोखा संगम साधतात. ते १ जानेवारीला कोरेगाव या ठिकाणी जावून विजय स्तंभाला मान वंदना देतात. जणू हेच सांगत असतात कि - आजच्या दिवशी एक बौद्ध धम्माच्या महत्वाचा परंपरेचा शोध लागला आहे. सांची चा महास्तूप आजच्या दिवशी याच लढाईसाठी पाठवलेल्या सैनिकांनी शोधून काढला. हे इतिहासात मात्र लपवून ठेवलेले आहे. आपण जगा पुढे जाताना हे मात्र उजेडात आणले पाहिजे. त्यामुळे कोरेगावच्या विजय स्तंभाला मानवंदना देणाऱ्या बौद्ध बांधवाना हा हि इतिहास माहिती असणे आवश्यक आहे.
जोवर तुम्हाला तुमचा इतिहस कळणार नाही. तोवर तुम्हाला त्याचे महत्व कळणार नाही का? बाबासाहेब यांनी १९५६ ला बुद्धच्या ओटीत टाकले. याचा विचार करा १९२७ ला कोरेगावला जाणाऱ्या बाबासाहेब यांना या बौद्ध संस्कृतीचा चांगला परिचय झाला होता. कोरेगावच्या लढाईसाठी पाठवलेली कुमक म्हणून जी पलटण पाठवली. तिने सांचीच्या स्तुपाचा शोध घेणे आणि भीमा कोरेगावला त्याच लढाई मध्ये लढाई विजय होणे. एक योगायोग समजावा असा आहे. त्यामुळे भीमा कोरेगावला विजय स्तंभाला मान वंदना देण्यासाठी येणाऱ्या लोकांनी हा इतिहास अभ्यासावा वाचवा आणि बौद्ध धम्माच्या इतिहासाची ओळख असणाऱ्या बौद्ध लेण्याकडे वळावे. कारण इथूनच बौद्ध धम्माची पाळेमुळे शोधण्यास सुरुवात झाली आहे. चला तर आपला वारसा जतन करण्यासाठी पुढे येऊ या.
सूचना-
कृपया लेण्या संदर्भात माहिती करिता किंवा ब्राम्ही लिपी शिकण्या करिता Ancinet Buddhist Caves Preservation & Research चे प्रमुख "रवींद्र सावंत : ८१०४१२०३७६" आणि "मुकेश जाधव :९७३०१२९२६६" यांच्या सतत संपर्कात राहावे.
◆◆◆
आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
रवींद्र उर्फ भीमरत्न सावंत (लेणी संवर्धक)
"बौद्ध लेणी संशोधन एवं संवर्धन संघटना"
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
• YATIN JADHAV : 9967065953
• RAMESH BHOSALE : 9773338144
• BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.
धन्यवाद ।
v
उत्तर द्याहटवाNilesh gautam Sukhadeve
उत्तर द्याहटवाMo.7350034900
Add me