रविवार, १७ मार्च, २०१३

एक गोष्ट चवदार तळ्याची.....


एक गोष्ट चवदार तळ्याची.....





वदार तळे सत्यागृह म्हणजे एक जाती अंताची लढाई च म्हणावी लागेल डॉ. ब्ब्साहेब आंबेडकर यांनी स्पृश्याना पाणी पिण्याचा हक्क बाजून द्यावा म्हणून महाड येथे जातीअंताची छाटनी केली होती  ती म्हणजे कुलाबा जिल्हा बहिकृत परिषद. यावर मी आपली कविताची ओळ महामानवाला अर्पण करीत आहे.


शीषक - जातीअंताची लढाई

जातीजातीची छाटणी भीमाने बाग गं
बाई मनूच्या लावली चित्तेला आग !! धृ !!

जातीधर्माच शोषून विष
त्याने वाचविला सारा देश
लाख संकटे झेलून, छातीवरती झेलून
केले मेंढराचे त्याने वाघ गं !! २ !!

नष्ट करण्यासाठी जातीभेद
चातुवर्णाचा केला हो छेद
जातपात हि तोडून, भेदाभेद हे गाडून
झोपलेल्यांना आणली जाग गं !! ३ !!

जात नाही म्हणे ती जात
तिने केलाय साऱ्याचा घात
केली शत्रूवर चढाई, जातीअंताची लढाई 
केले गांडूळांचे त्याने नाग गं !! ४ !!

भीमक्रांतीच चाखलं तळं
आलं गांडूना मर्दाचं बळ
झाडाझडती झाडून साऱ्या जुल्माला नडून
न्याय, लडून म्हणे माग गं !! ४ !!

कवी - यतिन जाधव.


   


पाणी! पाणी म्हणजे जीवन! पाण्याचा रंग कसा? ज्यात मिसळला तसा! दुधात मिसळला दुधासारखा! चहात मिसळला चहासारखा! जीवनाचे सुद्धा तसेच आहे. जो रंग भराल तसच रंग तुमच्या जीवनात येईल, सत्वाचा रंग भरला, तर तर जीवन सात्विक होईल. राजस रंग भराल, तर जीवन राजस होईल. तामस रंग भरला, तर जीवन 'तामसी' होईल.

पाण्याला द्वेष ठाऊक नाही,

!! द्वेषाने नेणेची काई !!

पाण्याला हेवा दावा माहित नाही.
पाण्याला शत्रुत्व माहित नाही.
पाणी रिपुमित्र जाणत नाही.

ज्ञानेश्वारांनी पाण्याचे वर्णन छान केलय -

गाईची तृष्णा हरू !
व्याघ्रा विष होऊनी मारू !
एसे नेणेची गा करु! तोय जैसे !

पाणी गाईची तृष्णा हरण करते आणि दृष्ट क्रूर वाघाची सुद्धा तृष्णा शमन करते, पण जिल्ह्यातल्या महाड गावाचे पाणी, इतर पाण्याहून वेगळे! त्या पाण्याने इतिहास घडविला, क्रांती घडविली.

स्पृश समाजाचे अस्पृश समाजाचे जीवन बेचव व निगोड करून टाकले, या चवदार तळ्याचे पाणी गावातल्या मुसलमानांना पिता येई. किरीस्ताव लोकांना तळ्याचे पाणी त्या तळ्याचे पाणी वापरायला माजव नव्हता. त्या तळ्यात आपल्या चोची बुडवता येत. पशूना त्या ताल्यात्ळ्या प्याण्याला तोंड लावायला हरकत नव्हती.

पण अस्पृशच! हा इतर भटाभिक्षून सारखा हातामासांनी बनलेला माणूसच! पण त्याला या चवदार पाण्यातले घोटभर पाणी घ्यायला सुद्धा बंदी होती. त्याने जर त्या तळ्यातल्या पानाला स्पर्श केला तर पाणी बाटले जाणार होते! भाटले जाणार म्हणजे काय ते गावातल्या स्पृश्यानाच ठाऊक! चवदार तळ्याचे पाणी गंगे सारखे निर्मळ आणि पवित्र पण गावातल्या स्पृश लोकांची मने मलिन जाली होती. 'अशुद्ध' झाली होती,हाच त्याचा अर्थ! मुंबईच्या विधान मंडळात सी के बोले यांनी ४ ऑगस्ट १९२६ रोजी ठराव मंजूर करून घेतला होता कि सार्वजनिक पान्वाद्यावर अस्पृशाना बंदी नसावी. त्याळ्याच्या पाण्याला हात लावायला, माणसाने माणसावर घेतलेली बंदी! पाण्याला बंदी? पाणी म्हणजे निसर्गाने प्रनिमात्राना जीवन जगण्यासाठी दिलेली नैसर्गिक देणगी! आणि त्या देणगीवर बंदी?

असा हा अन्या! असला हा जुलूम !
याविरुद्ध बंड पुकारायला हवे होते.
बंडाचा झेंडा उभारायला हवा होता.
बंडाचे शिंग फुकायला हवे होते.

आणि तो सुदिन उगवला! २० मार्च १९२७

मानवी स्वातंत्रासाठी रणशिंग फुकले गेले! लढ्याला तोंड लागले!

कुलाबा जिल्ह्याचे दक्षिण टोके, म्हणजे महाड तालुका, पश्चिमेला गांधारी नदी आहे. याच नदीमध्ये बंकोत्च्या खाडीचे पाणी घुसते व ते पाणी महाड गावामध्ये जाऊन पोचते. समुद्राला भारती आली कि, हि गांधारी नदी पूर्णपणे खऱ्या पाण्याने तुम्तूब भरलेली असते आणि या मादीचे पाण्यातून, लहान मोठी जहाजे बाणकोटपासून महाडपर्यंत व्यापारी मालाची ने-आन करतात. त्यामूळे मुंबईहून माल भरून निघालेली जहाजे, महाड पर्यंत येतात.

हा परिसर निसर्ग सौदर्याने नटलेला आहे. सभोवार डोंगराच्या रांगा आणि मध्ये महाड गाव. महाड हि एक व्यापारी पेठ समजली जाते.


महाडपासून २० कि.मी. अंतरावर, श्री शिवछत्रपतीचा इतिहास प्रसिद्ध रायगड किल्ला. इथेच  श्री शिवछत्रपतीची समाधी आहे.

महाड गावातले चवदार तले एक मोठे तळे. २०० मीटर लांबीचे आणि १५० मीटर रुंदीचे. तळ्याच्या आतल्या बाजूला एकंदर १५ विहिरी भर उन्हाळ्यात, गावातल्या साऱ्या विहिरीतले पाणी आटतेआणि त्या कोरड्या ठाणठणीत होतात. चवदार तळ्यातले पाणी मात्र, अगदी कडक उन्हाळा पडला व्तरी आटत नसे.

आणि त्या चवदार तळ्याचे पाणी आपल्या तरंगाच्या सहस्त्र हातानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्या हस्त्रवधी अनुयायांना पाचारण करीत होते, ते चवदार पाणी हाक मारीत होते,

" या बाळानो! तुमची मी इतकी वर्ष वाट पाहत आहे, तुमच्या हाताचा मला स्पर्श होऊ द्या. ओजळीने पाणी प्या नी आपली तृष्णा समान करा, तुमची तृष्णा समान झाल्यावाचून मला गती नाही. या हझारोनी या, भिऊ नका, घाबरू नका, कायदा तुमच्या बाजूला आहे. माणुसकी तुम्हाला साथ करणार आहे.पोटभर पाणी प्या नी मला तृतार्थ करा. "

शिबिरातून सत्याग्रही सैनिक बाहेर पडले. चारा-चाराच्या तुकड्या करण्यात आल्या. लष्करी शिस्तीने डावा उजवा पाय टाकीत धीरगंभीर पणे हि सेना महाडच्या चवदार तळ्याकडे कूच करू लागली.

एक महान लढा सुरु होणार, एका नव्या पर्वाला सुरुवात होणार, देशाच्या इतिहासातील एक युगप्रवर्तक घटना आज येथे घटणार होती. भिक्षुकशाही, जातीभेद, सामाजिक गुलाम्गीरुई ह्याविरुद्ध बंडाचा झेंडा तेथे फडकणार होता. एक अभूतपूर्व दृश येथे पाहायला मिळणार होते. आणि या सेनेचा सेनापती कोण?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर !

उत्साह,उल्हास, चैतन्य यांनी सारे वातावरण व्यापलेले, सर्व सत्याग्रहीचे चेहरे प्रफुल्लीत. छाती पुढे काढून, नव्या उन्मादाने त्याची आगेकुच चालू. आल्या प्रसंगाला बेडरपणे तोंड द्यायची त्याची तयार. सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुकीत हि सेना मजल दरमजल करीत निघाली. " स्वतान्त्राचे हक्क, द्या द्या " अशी भिक मागून - झोळी पसरवून मिळत नसतात, वेळ पडलि कि, ते हक्क समाजाकडून हिसकावून ग्यावे लागतात, ओरबाडून घ्यावे लागतात. हीच गोष्ट या लढ्याने सिद्ध केली जाणार आणि हि आपल्या कृतीने सिद्ध करून दाखविणार. डॉ. बाबासाहेब आंबेडकर !

कोकणाच्या शाळेत घेताना, ज्यांना शिवाशिवीचा काद्वाद अनुभाग आला होता, मुंबईच्या कॉलेजात घोटभर पाण्यासाठी ज्यांना हालअपेष्टा भोगाव्या लागल्या होत्या, बडोद्याच्या हॉटेलात ज्याच्या अंगावर लाठ्या-काठ्याचे वळ उठलेले होते आणि असा कडू अनुभवच्या दिव्यातून सुद्धा बाहेर पडून, ज्यांनी परदेशाच्या वर्याकारून तेथील तीन विद्यापीठाच्या  बहुमानाच्या पदव्या मिळविल्या होत्या, ज्यांनी कायदा आणि अर्थशास्त्र या विषयाचे मुंबईच्या कॉलेजात अध्ययन केलेले होते ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर !


तळ्याच्या काडावर उभे राहिले. एकवार निसर्गाच्या जलसंपतीवर आपली नजर टाकली. एकदा आपल्या पाठीशी - अजुबाजुला - सभोवार उभ्या असलेल्या आपल्या अस्पृश बांधवांकडे डोळे भरून पहिले. सामाजिक क्रतीचा क्षण पहिला, भाव्गन सुर्यनारायण, आपल्या सहस्र किरणाची सेना घेऊन पुर्वाकॅलावर उपस्थित झाला, मंद मंद वायूलहरी, त्या क्रांतीच्या क्षणाची वार्ता दूरवर पसरवू लागल्या, तळ्यातील पाण्यावरील तरंग एकमेमांशी कुजबुजत होते.

" अखेर आज आपल्या उद्धाराचा क्षण आला,
ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होते. "

बाबासाहेबांनी आपली पेंट पाण्यात भिजू नये म्हणून दोन्ही पायाची टोके दुमडली, धीरगंभीरपणे तळ्याच्या पायऱ्या ते उतरले, पाणी ओजळीत घेतले नी पिउन टाकले, तेथे असलेल्या प्रचंड समुदायाने आपल्या नेत्याचे अनुकरण केले.सहस्रावधी ओज्ळी, सहस्रावधी मुखाशी गेल्या.


समाधानाचे तेज त्याच्या चेहर्यावर दिसू लागले. इतके दिवस त्या पाण्याला स्पर्श करता आला नव्हता. त्यांना तसे करण्याची कधी हिम्मत झाली नव्हती, आज त्याच्या नेत्याने, त्याच्यामेढे नवी हिमत नवा आत्मविश्वास निर्माण केला.

मानवी हक्क बजावला गेला!
अन्याय निपटून काढण्यात आला!
शेकडो ठरावांनी सुद्धा जे काम झाले नसते,
तेच काम एका कृतीने करून दाखविले!


अस्पृश्यांना समानतेचा संदेश देणारा हाक तो दिवस २० मार्च २९२७!

पण या घटनेमुळे महाड मध्ये जीर्ण मतवादी स्पृश समाजात खळबळ माजली. परंपरेचा आंधळा पुजारी, रुढीची न सोडणारा तो समाज या घटनेमुळे बिथरला. महाड मधील सनातनी हिंदू, भीतीने बावरले, गोंधळले, गडगडले! अस्पृश समाजाला एवढी हिमत होईल  अशी त्याच्या स्वतालाही कल्पना नव्हती. त्याच्या पोटात पोटात भीतीचा गोळा निर्माण झाला. आज हे महार-मांग, चवदार तळे बात्वायला धजले, उद्या हे त्या विरेश्वराच्या देवळात शिरून, देवालासुद्धा वाढवायला निघतील.त्याचा काय नेम? आणि मग धर्म आणि धर्मशास्त्र यांचे पार वाडोळे होईल.

गावातले वातावरण तापले! इतके तापले कि, स्फोट कधी होईल त्याचा काही भरवसा नव्हता. 'अस्पृश देवाचे दर्शन घेऊन, देव सुद्धा बाताव्णार' अशी एकाच आरोळी गावात उडली, हा धर्मावरच घाला, अश्याने धर्म रसातळाला जाईल! अशी स्पृश्यांना भीती पडली.

इतर कुणा पर्धार्मियांनी विरेस्वरच्या मंदिरात शिरून देव बात्विण्याचा प्रयंत्न केला असता, तर कदाचित महाड मधले हे सनातनी, लपून बसले असते. धर्मांतर आलेला ती पर्धार्मियान्चा घाला. परतवायला काही ते हात सरसावून पुढे धावले नसते.

पण स्वधर्मीय आपला देव बात्विणार हि अल्पनच त्यांना सहन होईना, मग काय? देवाला-विरेश्वाराला कोण बाटवू देणार? सनातन्यांनी धोतराचा काचा मारला, सदऱ्याच्या बाह्य वर केल्या. हातात जाडजूड लाठ्याकाठ्या घेतल्या आणि सारे जन अहल्ला करायला निघाले. त्या चवदार तळे बाटविणाऱ्या अस्पृश्यावर हल्ला करायला.

चवदार तळ्याचे पाणी पिउन आलेल्या त्या अस्पृश्यांना उणेपुरे २ ताससुद्धा झाले नसतील. सार्वजन अगदी शांतपणे परिषदेच्या मंडपात परतले होते. आता ते आपापल्या गावी जाण्याची तयारी करायल लागले होते. कुणी गावात काही वस्तू खरेदी करायला गेला होता, कुणी काही खात बसला होता. आणि धर्मरक्षक सनातन्याचा हल्ला, त्याच्या मंडपावर चाल करून आला.

' हर हर महादेव ' की जोरदार गर्जना झाली आणि तडातडा लाठ्यांचा आणि काठ्यांचा आवाज, त्या मंडपात निघायला लागला. नि:शास्त्र निरपराधी गरीबंवार्चा तो हल्ला! असा कोणता भयानक गुन्हा त्या बिचार्या अडाणी अशिक्षित लोकांनी केला कि, ज्याची डोकी सडकून काढली जावी? त्याचे हात पाय तोडले जावे? स्रीपुरुष, मुले बाळे, म्हातारे कोतारे एकजात सर्वांच्यावर हा असा भयानक हल्ला!

एव्डेच नव्हे तर ह्या धर्मासाक्षनाचा झेंडा हाती मिरवणाऱ्या नराधमांनी मंडपातील सिज्लेल्या अन्नात माती कालवली, ' अन्न हे पूर्वब्रह्य ' हि त्यांचीच शिकवण ! पण अविचाराने पेटलेल्या आणि अमानुष नाराराक्षसांना ब्राह्याची कुठली आठवण? आणि पूर्वब्राह्याची कसली जाणीव? हंड्याकुंद्याची आदळाआपट-मोडतोड केली. अविवेकी माणसाला सचेतन व अचेतन यातला फरक सुद्धा समजत नाही. गावात बाजारपेठ, रस्तावर जो जो अस्पृश्य सापडला त्याला धर्मापिसातानी मारोस्तव हन्मार केली.काही अस्पृश्यांनी तर आपला जीव बचावण्यासाठी, मुसलमानाच्या घराचा अस्त्राय घ्यायला कमी केली नाही.

या धर्ममार्तडाची, या धर्माविरांची विवेकबुद्धी त्यांना सोडून गेली होती. त्याचे डोके त्याच्या खाद्यावर राहिलेले नव्हते. त्याच्या ओक्याचे खोके बनले होते कि मडके, ते त्यांनाच ठाऊक!

या प्रसंगावरच बहिणाबाई चौधरीनी या काव्यापक्ती लिहल्या असाव्या.

" मन जहरी जहरी!
  अरे इंचू साप बरा!
  त्याला उतारे मंतर!
  देवा अस कस मन!
    अस कस रे घडलं? "

परिषदेचा सर मंडप उद्ध्वस्त करू थाक्ण्यात आला. स्वत:ला " स्वस्तिक " म्हणविणाऱ्या समाजाने हा तामसी नव्हे राक्षसी अत्याचार केला. हैवानालासुद्धा शोभणार नाही असा हा अत्याचार!

काही जणांनी हि वार्ता डाक बंगल्यात उतरलेल्या बाबासाहेबांच्या कानावर घातली. त्यांना प्रथम आश्चर्याचा धक्काच बसला. मामलेदार, पोलिस अधिकारी यांनी दुपारी ४ वाजता डाक बंगल्यावर भेट घेतली. बाबासाहेब त्यांना म्हणाले,

" मी माझ्या लोकांना आवरतो, तुम्ही इतरांना काबूत ठेवा. "

बाबासाहेबांनी अंगावर कपडे चढवले आणि ते आपल्या दोन चार अनुयायाबरोबर घटनास्थळाकडे यायला म्हणून डाक बंगल्याबाहेर पडले. स्पृश्य गुंड दबा धरून वाटेतच बसले होते. बाबासाहेब दिसताच त्या गुंद्यांनी त्यांना गराडा गटाला. त्याच्या हातात  लाठ्यांकाठ्यां होत्या. ओरडाओरड करायला लागले, "बोला, देवळात शिरणार काय? देव बाटविनार काय?" एकाच गिल्ला, एकाच हल्लागुल्ला! बाबासाहेब त्यांना शांतपणे म्हणाले, "देवळात प्रवेश करण्याचा आमचा मुळीच इरादा नाही. आम्ही तुमच्या देवळात प्रवेश करणार नाही."


गुंडांची तापलेली डोकी थंड झाली! त्यांना हवे तसे आश्वासन मिळाले.

बाबासाहेब मंडपाच्या ठिकाणी आले. तिथल्या वस्तू स्थितीचे निरीक्षण करायला सुरुवात केली. काही अस्पृश्य मारा उळे घायाळ झाले होते. बेशुद्ध पडले होते. काहीना प्राणांतिक वेदना होत असल्यामुळे, त्याचे हृदयद्रावक कान्हाने, कुढणे त्याच्या कानावर पडत होते. त्याच्या संतापाचा पर चढला. पण त्यांनी त्याच्या मनावर नियंत्रण ठेवले.प्रसंग मोठा बक होता! प्रसंग आणीबाणीचा होता! चुकिचे शब्द तोंडातून निघायला नको होते. बाबासाहेब आपल्या अनुयायांना सांगत होते, शांत राहा, स्वर्थ राहा. आपल्यावर हा खोर अन्याय झाला आहे. त्याची मला पूर्ण जाणीव आहे. या अन्यायाशी आपण कसा कुकाबला करायचा, त्याचा निर्णय मी पूर्ण विचारांनी घेणार आहे. कुणावरही सूड उगवायला जाऊ नका. सूड उगवण्याची भाषा सुद्धा तोंडातून काढू नका. आपला लढा अनत्याचारी आहे. अनत्याचारी मार्गानेच जाऊन आपण आपले मानवी हक्क मिळवणार आहोत. तेव्हा शांत राहा. धर्माचा गजबज करणारे शिकले सावरलेले लोक जरी पासुसारखे जनावारारखे वागले तरी तुम्ही माणसे आहात. माणसेच रहा!

स्पृश्य गुंद्याच्या लाठी-काठी हल्ल्यात, वीस अनुयायी जबर जखमी झाले. काहीची डोकी फुटकी, काहीची हाडे मोडली, बाबासाहेबांनी त्यांना दवाखान्यात पाठवून त्याच्यावर ओषधोपचाराची सोय केली.

बाबासाहेब डाक बंगल्यावर परतले. तेव्हा सुमारे १०० अनुयायी त्याची आतुरतेने वाट पाहत बसले होते. आपल्या नेत्याकडून त्यांना आदेश हवा होता. आपल्या नेत्याकडून इशारा हवा होता. नेत्याचा तसा एखादा शब्द त्यांना जर मिळाला असता तर? तर का? चवदार तले राहिले नसते. तेथे स्पृश्य धर्मपिसाटाच्या अक्ताचे पद वाहिल्याशिवाय राहिले नसते. चवदार तळ्याचे पाणी लालबुंद बनले असते.

हि दंगल केल्याबद्दल पोलिसांनी गावातील आठ धर्मपिसाटाना अटक केली. बाबसाहेब दोन तीन दिवसांनी मुंबईला परतले.

महाडतील धर्ममार्तंडापुढे आता मोठा प्रश्न उभा राहिला.

" अस्पृश्यांनी बाटवलेले चवदार तळे शुद्ध असे काय करून घ्यावे? "

महाड मधील धर्मपिसाट, धर्ममार्तंड, धर्मवीर, आणि जीर्णमतवादी, सनातनी शास्त्री आणि पंडितांनी गावातील विष्णू मंदिरात एक सभा घेतली. सभेत खूप चर्चा झाली. अखेर अस्पृश्यांनी बाट विलेले पाणी शुद्ध करून घेण्याचा शास्त्राधार मिळाला.

गोमुत्राने तळे शुद्ध करण्याचा  शास्त्राधार मिळाला! जनावराच्या मुत्राने चवदार तळ्याचे पाणी शुद्ध करावयाचे! याला शहाणपणा म्हणणारा वेडाच ठरेल! झाले! शुद्धीकरणाला सुरुवात.

२०० मीटर लांब आणि दीडशे मीटर रुंद अशा त्या अवाढव्य चवदार तळ्यात लक्षावधी घागरी पाणी असणार. परंतु शास्त्राधार! त्या लक्षावधी घागरीपैकी अवघ्या एकशे आठ घागरी घरिनी बाहेर खाद्ण्यात आले. सनातनी स्पृश्य मोठ्या हिरीरीनेच, तळ्याचे पाणी घागरी घारीने काढायला आले. गवरी लोक, पोरे, बायामंडळी हि मौज तळ्याच्या काठावर दूर उभी राहून पाहत होती. शुद्धीकरणाचे हे नाटक मोठे प्रेक्षणीय होते. वेदमंत्रांचा उदघोष चालला होता.

उदबत्याचा सुवास दरवळला होता. त्या टाळ्या बाहेर काढलेल्या एकशे आठ घागरी पाण्यात " पंचगव्य " मिसळण्यात आले आणि जोरजोरात चालू असलेल्या वेदघोषातच, ते पंचगव्याने शुद्ध केलेले एकशे आठ घागरी पाणी पुन्हा चवदार तळ्यात ओतण्यात आले.  झाले संपले शुद्धीकारण!

आता त्या तळ्याचे पाणी स्पृश्य समाजाला अगदी " बिनधास्त " पणे वापरता येणार होते. परंतु अस्पृश्यांना मात्र शुद्ध पाणी वापरता येणार नव्हते! त्या पाण्याला स्पर्श केला तर त्यांना धोका पोहोचला असता.

भारतात नवयुग सुरु झाल्याची तुतारीतून निघालेली ती पहिलीच ललकारी ठरली! हिंदू समाजाला जाग आणण्यासाठी पडघमवर टिपरी पडली.

राष्ट्राच्या सामाजिक पुर्नघटनेचा प्रवाह व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवाह याचा संगम झाल्याची ती शुभसूचक निशाणी होती. सामाजिक पुर्नघटनेचे कार्य करतानाच राजकीयट क्षीतिजावर एक नवा दैदीयमार्ग तारा उदय पावण्याची ती सुचिन्हे होती!

महाडच्या चवदार तळ्याचा तो सत्यागृह त्याचे परिणाम फार दूरवर पोचणार होते. हा महाद्चा " चवदार तळे " सत्यागृह कसाय काय आयोजित केला.त्याची पश्वाभूमी घ्यायला हवी.

" चला महाडला " हि रणगर्जना गावागावातल्या महारवाड्यात घोषित झाली. अनेक वर्ष मरगळून पडलेली महार जमात, मर्दुमकी गाजवायला सज्ज झाली.ब्रिटीश सरकारने आपल्याला दिलेल्या सवलती,आपल्याला दिलेले हक्क्सुद्धा, कागदावर उतरले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. असा त्यांना कडू अनुभव आला. अस्पृश्याच्या जुनाट गांजलेल्या बेड्या त्यांनी मोडून तोडून फेकून  द्यायचे ठरविले त्याचे त्य्स्नचे कारण त्यांना मिळालेले असामान्य, अनन्यसाधारण नेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर !

कर्मवीर शिंदे एका पुस्तकला लिहलेल्या आपल्या प्रस्तावनेत म्हणतात -

" ज्या महारमांग बंडूना ब्राह्मण, क्षत्रिय वैगेरे स्वत:ला श्रेष्ठ म्हणवणारे वर्ग आजवर "चांडाळ" व "अस्पृश्य" समजत असे, त्याचे ध्येय व वृत्ती अद्याप इतकी शान व स्वस्तिक कशी राहू शकते हेच मला स्वतला कोडे पडलेले आहे. उलटपक्षी वरिष्ठ म्हणाविरांची सैतानी चढाई पाहून तर आश्चर्य नव्हे, पण अत्यंत उद्वेश होत आहे. "

आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे १९ व २० मार्च रोजी " कुलाबा जिल्हा बहिकृत परिषद " भरविण्याचे ठरविले.त्याचे करा सीताराम केशव बोले यांनी मुंबई विधानमंडळात सन्म करून घेतलेला ठराव. या ठरावाची अंमलबजावणी महाड नगरपालिकेने आपल्या अधिकाराखाली केली आणि महाड तळे  अस्पृश्यासाठी खुले केले. परंतु स्पृश्य समाजाच्या दाबावामुळे, दडपणामुळे आणि भीतीमुळे तेथील अस्पृश्यानि त्या तळ्याचे पाणी नेण्याचा हक्क बजावला नव्हता!


महाडचे सुरक्षा टिपणीस,सुभेदार विश्राम गंगाधर सवादकर, संभाजी तुकाराम गायकवाड, सीताराम गोपाल जाधव, अनंतराव शिंदे, रामचंद्र मोरे इत्यादी पुढाऱ्यानी महाद्ची हि परिषद यशस्वीरित्या पार पडण्यासाठी आपली कंबर कसली. नागपूर, मुंबई, घाट आणि कोकण इथून पाच सहस्त्र बांधव, भाक्र्यान्ची शिदोरी बरोबर घेऊन या परिषदेला उपस्थित राहिले. चवदार तळ्यापासून दोन फर्लागावर बांबू नी झाप यांच्या सहार्याने  एक मंडप उभारला. त्या मंडपात हि परिषद भरली.

परिषदेच्या वापरासाठी ४० रुपये देऊन " पाणी " विकत घ्यावे लागले. कारण स्पृश हिंदू कडून पाणी मिळण्याची शक्यता नव्हती. संभाजी गायकवाड हे परिषदेचे स्वगताध्यक्ष.


बाबासाहेब आपल्या बोधपद भाषणात अस्पृश्य बांधवाना म्हणाले,

" मेलेल्या पशुंचे मांस खाणे बंद करा, आपापसातील उच्चनिच्च भावना टाकून द्या. महारांना गावात इज्जत नाही. मानमरातब नाही. त्याचा स्वाभिमान नास्थ झाला आहे. उष्ठ्या, शिळ्या तुकड्यासाठी माणुसकी विकणे हि गोष्ट मोठ्या शरमेची आहे. वडिलांची " री " ओढणे हा मामंत्र आता सोडायला हवा. सर्वच जुने ते सोने म्हटले तर नवीन सुधारणा कधीच होणार नाही. माझ्यापेक्ष्य मुले कांकणभर सरस असावीत, असे जे आईबाप म्हणत नाहीत त्याच्यात नि पशूच्या जिन्यात काहीच फरक नाही. स्वावलंबन शिकणे, स्वाभिमान धरावा. स्वत्वाची जाणीव ठेवावी, तरच आपला उद्धार होईल. "

परिषदेच्या महत्वाला ठरवला पाठींबा देणारी काही स्पृश्य पुढारयाची भाषणे झाली. सोशल सर्विस लीगचे सहस्त्रबुद्धे, कमलाकांत चित्रे, सुरक्षा दिपणीस यांची जहाल भाषणे झाली.

त्याच रात्री विषय नियामक समितीमध्ये महाड नगरपालिकेच्या चवदार तळ्यासंबंधीच्या घोषणेवर चर्चा झाली आणि ती घोषणा अंमलात आणण्यासाठी, सर्व प्रतिनिधींनी त्या तळ्याचे पाणी प्यावे ठरले.

दुसऱ्या दिवशी दुपारी परिषदेच्या कामाला सुरुवात झाली. काही ठराव संमत झाले. परिषदेचे  काम संपुष्टात आले. इतक्यात  कमलाकांत चित्रे मधेच उठून उभे राहिले आणि खणखणीत आवाजात साऱ्या प्रतिनिधीना  म्हणाले,


" आपण महाड नगरपालिकेचा ठराव अंमलात आणायला जाऊ या. "

ते स्फुतीदायक शब्द कामावर पडताच प्रतिनिधींनी  टाळ्याचा पाचंद कडकडाट केला.

आणि मंडपरुपी त्या शिबिरातून सत्याग्रही सैनिक बाहेर पडले. शिस्तीनं! चारा-चराच्या तुकड्या केल्या. लष्करी शिस्तीने डावा उजवा - डावा उजवाकरीत सेना महडच्या चवदार तळ्याकडे कूच करायला लागली.

आणि चवदार तळ्याचा यशस्वी सत्याग्रह केल्या बद्दल मी यतिन जाधव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आभारी आहे. मी त्याचे कौतुक माझ्या कविते मार्फत करण्यात उत्सुक आहे.



शीषक - खुले केले तू चवदार तळे

मनुची अंधाधुंदी तू उठीवली बंदी
साऱ्या जगाचे दिपवले डोळे
खुले केले तू चवदार तळे !! धृ !!

माणूस असुनी जाऊ देईना मंदिरी
दुरून देऊन पाणी फेकून घागरी
ज्ञान मंदिराची बंद होती पायरी
असे मनुवादी दलितांचे वैरी
तू रे जन्मा रामजीच्या भीमा
मानुवाद्याला फासले तू काळे !! १ !!

क्रांती भूमीवरती घेतली तू सभा
सारा समाज होता पाठीशी उभा
सनातनी लोकांच्या ओळखुनी गाभा
पाणी पिण्याची नाही घेतली मुभा
नाही माघ सरला तळ्यात अनुतरला
तुझे अनुयायी घेउनी सगळे !! २ !!

केली भिमक्रांती देशात मोठी
मनुस्मृती जाळली मनुची खोटी
दिली नवी दृष्टी आम्हा कोटी कोटी
खाई यतिन आज तूप रोटी
तुझी ती पुण्याई आणि नवलाई
तू झुलविले आकाश निळे !! ३ !!

कवी - यतिन जाधव. 






कवी एव संपादक - यतिन जाधव..
http://www.facebook.com/uatinjadhav789456123

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा