शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

● मुक्ती कोन पथे?

● मुक्ती कोन पथे?

लेखक -
डॉ.बाबासाहेब आंबेडकर

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●◆•

(दिनांक ३१ मे १९३६, अखिल मुंबई इलाखा महार परिषद, रमाबाई नगर, नायगांव, मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले ऐतिहासिक भाषण)

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●◆•

मुंबई इलाखा महार परिषदेचे अधिवेशन ता. ३० मे १९३६ रोजी हैद्राबाद संस्थानातील प्रख्यात पुढारी श्री. बी. एस. व्यंकटराव यांचे अध्यक्षते खाली मोठ्या थाटाने सुरू झाले. या परिषदेंसाठी ५० हजारावर लोक प्रशस्तपपो बसू शकतील असा प्रचंड शोभिवंत मंडप दादर नायगांव नाक्यावरील विस्तीर्ण मैदानावर उभारण्यात आला होता. या विस्तीर्ण मंडपास महाट दरवाजा, नाशिक दरवाजा व रमाबाई आंबेडकर दरवाजा असे तान विशाल दरवाजे करण्यात आले होते व मंडपास 'रमाबाई नगर' असे नाव देण्यात आले होते. मंडपाचे आंत खालीलप्रमाणे उद्बोधक वाक्ये असलेल्या पाट्या लाटकवण्यात होत्या. :-

माणुसकी प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा. संघटना करावयाची असेल तर धर्मातर करा. सामर्थ्य संपादन करावयाचे असेल तर धर्मातर करा. समता प्राप्त करावयाची असेल तर धर्मातर करा. स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा. संसार सुखाचा करावयाचे असेल तर धर्मातर करा. जो धर्मं तुमच्या माणुसकीला काही किंमत देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? जी धर्म तुम्हाला देवळात जाऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुम्हाला पाणी मिळू देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुम्हाला शिक्षण घेऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुमच्या नोकरीच्या आड येतो त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुमची पदोपदी मानहानी करतो त्या धर्मात तुम्ही का राहता? ज्या धर्मात माणसाशी माणुसकीने वागण्याची मनाई आहे तो धर्मं नसून शिरजोरीची सजावट आहे. ज्या धर्मात मायाकाची माणुसकी ओळखणे अधर्म मानता जातो, तो धर्मं नसून रोग आहे. ज्या अति अमंगल पशूचा स्पर्श झाला असताना चालतो पण माणसाला स्पर्श चालत नाही तो धर्म नसून वेडगळपणा आहे. जो धर्म एका वर्गाने विद्या शिकू नये, धनसंचय करू नये. शस्त्रधारण करू नये असे सांगतो तो धर्म नसून माणसाच्या जीवनाचे विडंबन आहे. जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित रहा, निर्थनांना निर्धन रहा, अशी शिकवण देतो तो धर्म नसून ती शिक्षा आहे. वाचेने सर्व भूती एक ईश्वर म्हणणारे आणि कृतीने माणसाला पशूतुल्य लेखणारे लोक दांभिक आहेत. त्यांचा संग करु नका. मुंग्यांना साखर घालणारे आणि माणसांना पाण्यावाचून मारणारे लोक दांभिक आहेत. त्यांचा संग करु नका.

आजवरी होती तुझे सत्तेखाली ।।
तोवरी केली बिटंबना ।।

व्यासपीठावर पाचशे वर मंडळी सहज बसू शकतील इतके ते विस्तृत होते. मंडपावर समतेचे झंडे फडकत होते. सर्व श्रोतृसमुदायास भाषणे ऐकण्यास सापडावीत म्हणून मायक्रोफोन लावण्यात आले होते.

सुभेदार विश्राम सवादकर हे आपल्या समता सैनिक दलाच्या ५०० सैनिकासह मंडपात व्यवस्था ठेवण्यात सज्ज होते. या दलाचा बॅड व पुण्याच्या मिलीटरी पेन्शनरचा बँड श्री. बाबुराव पवारांनी पुण्याहून परिषदेसाठी मुदाम आणला होता.

अधिवेशनचा वेळ सायंकाळी ७ ची होती परंतू ४ वाजल्या पासूनच प्रतिनिधीच्या व प्रेक्षकांच्या सुमारे ३०/३५ हजार लोकांच्या समृहाने मंडप गच्व भरून गेला होता. या परिषदेसाठी प्रत्येक जिल्हातील महार पुढारी आपआपल्या जिल्हातील लोकांसह हजर होते. सातारा  जिल्हातून में. बलवंत सखाराम सावंत, पिराजी संभाजी खरात, आर. एन. नलावडे, गणेश हरी खरात, नाशिक जिल्ह्यातून श्री. भाऊराव गायकवाड, अमृता रणखांबे, श्री. दाणी, टि. एस. काळे, पुंजाजी जाधव, कुलाबा जिल्हातून बाबुराव भाताणकर, गणप तबुवा जाधव, कुडवलकर, गोविंदराव घरघरकर, पुण्याहून मधाळे, सुभेदार घाटगे, भोसले, बाबुराव पवार नानासाहेव वाघमारे, नाथा महाराज (भंगी), शांताराम उपशाम, कर्नाटकाातून बळवंतराव वराळे, ए. के. माळगे, मारुतीराव जोतीराव रावण, सोलापुरहून एन. टि बंदसोडे, जिवाप्पा एदाळे, उद्धव धोंडो शिवशरण, बापूजी सर्वगौड, केरू रामचंद्र जाधव, माघाडे, हैद्राबाद संस्थानचे ग. नी. गायकवाड, कांबळे, पवार, अहमद नगरचे पी. जी. रोहम, सुयवंशी, शंकरराव साळवी, ठाणे जिल्हाचे शिवराम गोपाळ जाधव, बी. व्ही. दोंदे, भाऊ हरी पंडित दामोदर हरी वसईकर, बी. डी. खंडे, पूर्व खानदेशातील पुढारी दौलतरावजी जाधव त्रिंबक सेनू भालेराव, काळू विठु तायडे, लक्ष्मण पा. भेंढे, नथुरावजी लोखंडे, जगनाथ खंडोजी बडगे. काळोजी तायडे, मोतीराम रावजी लोखंडे, भिकन गणुजी भैरुगे, शिवा रघुनाथ भास्कर, धर्माजी अहुजा वारभुवन, पश्चिम खानदेशातून पुंडलिक तुकाराम बोराळे, व्ही. टी. जाधव, महादेव गणेश ऐदाळे, सदाशीव लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मणराव गज़भिव, किसनराव वाघमारे, पाटोळे, मुंवईचे शिवतरकर मास्तर, साळवी बोरघरकर वनमाळी, सोलंखी, वाळींज़कर, शंकरराव वडवलकर, ज़नावाई मोरे, सोनूबाई सयाजी डावरे, भागिरथीबाई तांबे, अनुसयाबाईं व्हावळ, राजुबाई लक्ष्मणराव गायकवाड, मिसेस सवादकर, बी. एस. सावंत, पी. एल. लोखंडे, पोलादकर सुभ्यांचे बी. टी. तांबे, रत्नागिरीचे मुसाडकर बुवा, मोहिते मास्तर राजाराम भोळे, अर्जुनराव साळवी, जी. ओ. सी. जंजिरा संस्थानचे महादेव खैरे, भोर संस्थानचे गायकवाड, भालेराव सांगली संस्थानचे कांबळे, भोरे जत संस्थानचे ऐदाळे, अकलकोटचे जाधव, जव्हार संस्थानचे पवार, गायकवाड, जमखिंडाचे वाघचोर, खैरमौडे, आँध संस्थानचे घाटगे, इंदूरहून नगिना नाईक, महूहून श्री. लोखंडे, करडक, निळे, प्रसिद्ध कीर्तनकार दिगंबर नागनाथ कांबळे, रघू सया डुबल, वसंतराव भातणकर, आर. एच. अडांगळे, जी. एस. दारोळे, दादा पगारे मास्तर, रोकडे, संभाजी तुकाराम गायकवाड, चांगदेव नारायण मोहिते, बाबाजी शिंदे, रामचंद्र वाघचौरे, सोनु सजनाजी संदिरकर, वैगेरे मुंबई इलाख्यात सर्व जिल्हातून व संस्थानातृन पुढारी मंडळी आपआपल्या जिल्हातील लोकांसह परिषदेत हजर होते. शिवाय परिषदेस देवदत्त नारायण टिळक, देवराव नाईक, डि. व्ही. प्रधान, डॉ. मिसेस चंपु्ताई प्रधान, दत्तोपंत देशपांडे, बाबूजी कवळी, असयीकर वकील, वेदक वकिल, वा. कद्रेकर, एम. के. कर्णिक, आँडव्होकेट, पाध्ये पी. जी. काणेकर, वापुसाहेब सहस्त्रबुद्धे, अनंत हरी गद्रेे, बॅ. समर्थ, भास्करराव जाधवराव, कमलाकान्त चित्रे, अनंतराव चित्रे, गोपीनाथ प्रधान, शांताराम पोतनीस, सुरेन्द्रनाथ टिपणीस, वगैरे मंडळी व शिख समाजातील सरदार सरदारे ईंश्वर सिंग, दरबार सिंग, केहर सिंग, अमर सिंग वैगेरे शिख पुढारी मंडळी आपल्या शिख बांधवासह हजर होती.

परिषदेस सायंकाळी ६.३० ला अध्यक्ष व्यंकटराव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे समता सैनिक दलाची गार्ड ऑफ आँनरची सलामी घेत परिषदेच्या मंडपात आले. येत असताना त्यांच्या नावाचा प्रचंड जयघोष ने स्थानापन्न होईपर्यंत हात होता. सुरुवातीस स्वागत पद्यगायन झाले व पुढे स्वागताध्यक्ष रेवजाबुवा उर्फ दादासाहेब डोळस यांचे भाषण झाले.

स्वागताध्यक्ष दादासाहेब डोळस यांच भाषण झाल्यावर पुण्याचे पुढारी श्री. राजाराम भोळे यांनी अध्यक्षांना अध्यक्ष स्थान स्वीकारण्याची विनंती केली. त्यास नाशिकचे पुढारी श्री भाऊराव गायकवाड यांनी व श्री. चांगदेव मोहिते आणि सुभेदार घाटगे यांनी अनुमोदन दिल्यावर अध्यक्ष स्थानापन्न झाले. नंतर श्री. संभाजीराव्र गायकवाड यांना त्यांना पुष्पहार अर्पण केले. नंतर ठिक ठिकाणचे शुभसंदेश परिषदचे चिटणीस श्री. दिवाकर पगारे यांनी वाचले. त्यात श्री. रावजी देंगे, रावमाहेब पापण्णा ब सरदार केरसिंग यांचे कडून आलेले संदेश प्रमुख असून त्या सर्वात धर्मांतराचे घोषणेस पाठिंबा व प्रोत्साहन देण्यात आले होते.

नियोजित अध्यक्ष आ व्यंकटराव हे भाषण करण्यास उठताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट व डॉ. बाबासाहेब आंबेडकर व व्यंकटराव यांच्या नावाचा वातावरण दुमदुमून टाकणाऱ्या गगनभेदी गर्जनेत जयजयकार झाला. हा जयजयकार थांबल्यावर अध्यक्ष व्यंकटराव यांना हिंदीत भाषण केले.

• परिषदेमध्ये प्राप्त झालेले ठराव

ठराव १ ला - 
(अ) मुंबई इलाख्यातील महार जातीचा हा परिषद पूर्ण विचारांती असे जाहीर करते कि महार जातीला समाजात समता, स्वातंत्र्य मिळविण्यासाठी धर्मांतर करणे हा एकच न्याय आहे. हा परिषद आमच एकमेव परमपूज्य पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निश्चयपूर्वक असे जाहीर आश्वासन देते की महार समाज सामुदायिक रित्या धर्मांतर करण्यास तयार आहे.

(ब) पूर्वतयारी म्हणून महार जातीने यापुढे हिंदू देवतांची पूजा अर्चा करू नये. हिंदूंचे सण, व्रत वैकत्ये, उपाषणे वैगेरे पाळू नयेत व हिंदूंच्या कोणत्याही उत्सवात भाग घेऊ नयेत. तिर्थाटने, वैगेरे करू नयेत. अशी या परिविक्षा महार जातीला सूचना आहे.

हा ठराव नाशिकचे सुप्रसिद्ध पुढारी श्री. भाऊराव कृष्णराव गायकवाड यांनी मांडला तर या ठरावाला धारवाडचे श्रा. एस. एस. वराळे यांना अनुमोदन दिले आणि त्यानीं त्यानुसार आपले विचार प्रकट केले. या ठरावाला पाठिबा दर्शविताना अहमद नगरचे श्री. पी. जे. रोहम, जनाबाई मोरे, कु. राजुबाई गायकवाड, सौ. सोनुबाई डावरे, कु. भागिरथीबाई तांबे कुलाब्याचे प्रमुख पुढारी श्री. विश्राम गंगाराम सवादकर यांची भाषणे झाली

दि. ३१ में १९३६ रोजी अखिल मुंबई इलाखा महार परिषदेला संबोधित करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील भाषण केले.

• डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण

सदगृहस्थ, 
बांधवांनो आणि भगिनींनो,

ही परिषद मी केलेल्या धर्मांतराच्या घोषणेचा विचार करण्याकरिता मुद्दाम बोलावण्यात आलेली आहे, हे तुम्हास कळून चूकले आहेच धर्मांतराचा विषय हा माझ्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा आहे, इतकेच नव्हे तर तुमचे पुढील सर्व भवितव्य माझ्या दृष्टीने त्याच्यावर अबलंबून असल्याकारणाने तो बिषय मला अत्यंत महत्वाचा वाटतो. हे महत्त्व तुम्हा सर्वाना पटले आहे असे म्हणण्यास हरकत वाटत नाही. असे नसते तर आज एवढ्या मोठ्या समुदायाने तुम्ही येथे जमला नसता आणि म्हणून तुम्ही सर्वजण जे या ठिकाणी जमला आहात ते पाहून मला अतिशय आनंद वाटतो.

धर्मांतराची घोषणा केल्यापासून अनेक ठिकाणी लहान - मोठ्या प्रमाणावर सभा भरवून आपल्या लोकांनी या बिषयावरील आपली मते व्यक्त केलेली सर्वाच्या कानी आलेले आहे. परंतु सर्वाना एक ठिकाणी जमवून विचारविनिमय करून धर्मांतराच्या प्रश्नाचा निर्णयात्मक चर्चा करण्याचा संधी आज पर्यंत आपल्याला प्राप्त झालेला नव्हती. तशा संघाची तुमच्यापेक्षा मला अत्यंत जरूरी होती. धर्मांतराची मोहीम सफ़ल होण्याकरिता पूर्वतयाराची फारच आवश्यकता आहे. हि गोष्ट तुम्ही सर्वाना कबूल करावी लागेल. धर्मांतर हा काही पोरखेळ नव्हे. धर्मांतर मौजेचा बिषय नव्हे. हा माणसाच्या जीविताच्या सफल्याचा प्रश्न आहे. जहाजातून एका बंदराकडून दुसऱ्या बंदराला नेण्याकरिता नावाड्याला जेवढी पूर्वतयारी करावी लागते. तेवढीच पूर्वतयारी धर्मांतराकरीता करावी लागणार आहे. त्याशिवाय हा तीर सोडून पैलतीर गाठणे शक्य होणार नाही. परंतु नावेत किती उतारू येतात याचा अंदाज समजल्या खेराज नावाडा सामान सुमान जमविण्याच्या प्रयत्नास लागत नाही. त्याप्रमाणे माझी ही स्थिती आहे. किती लोक धर्मांतर करावयास तयार आहेत याचा कयास लागल्याशिवाय मला धर्मांतराची पूर्वतयारी करण्याच्या उद्योगाला लागणे शक्य नाही. परंतु आपल्या लोकांची कोठे तरी परिषद झाल्या शिवाय लोकमताचा कयास घेण्याची संधी मला प्राप्त होणार नाही, असे जेव्हा मी मुंबईंच्या कार्यकत्यां लाकांस सांगितले तेव्हा त्यांना खर्चाची अगर परिश्रमाची सबब पुढे न करता परिषद भरविण्याची ज़बाबदारी आपल्या अंगावर मोठ्या खुशीने घेतली. ती जबाबदारी पार पाडण्याकरीता त्यांना किती कष्ट सोसावे लागले याची हकीकत आपले परमपूज्य पुढारी व स्वागत मंडळाचे अध्यक्ष राजमान्य राज़श्री रेवजी दगडुजी डोळस यांनी आपल्या भाषणात सविस्तरपणे सांगितली आहे. इतक्या खस्ता खाऊन त्यांनी माझ्याकरिता हा जो सभेचा घाट घडवून आणला त्याकरता मी परिषदेच्या स्वागत मंडळींचा अत्यंत ऋणी आहे.

• नुसत्या महारांचीच परिषद कां?

माझी धर्मांतराची घोषणा जर सर्व अस्पृश्या करिता आहे तर मग सर्व अस्पृश्यांची सभा का बोलाविली नाही? नुसत्या महारांचाच सभा का बोलावण्यात आली असा आक्षेप काही लोक घेण्याचा संभव आहे. ज्या प्रश्नांची चर्चा करण्याकरिता हि सभा बोलावण्यात आली आहे त्या प्रश्नाचा खल करण्यापूवीं या आक्षेपाला उत्तर देणे मला अनावश्यक वाटते. महारांचीच सभा का बोलाविली व सर्व अस्पृश्यांची सभा का बोलाविली नाही, याला अनेक कारणे आहेत.

पहिले कारण असे कि या परिषदेत कसल्या ही प्रकारच्या मागण्या मागावयाच्या नाहीत किंवा हिंदू लोकांपासून काही सामाजिक हक्क मागावयाचे नाहीत. आपल्या जीविताचे काय करावयाचे, आपल्या आयुष्यक्रमाची रूपरेखा कशा ठरवावयाची एवढाच प्रश्न या परिषदे पुढे आहे. तो प्रश्न ज्या त्या जातीने स्वतंत्र विचार करून सोडविणे बरे. ज्या कारणांकरिता सर्व अस्पृश्य लोकाची सभा एकत्रित करण्याची मला आवश्यकता वाटली नाहीं त्यापैकी हे एक कारण आहे.

नुसत्या महारांचीव परिषद भरविण्याचे दुसरे ही एक कारण आहे. धर्मांतराची घोषणा केल्या पासून आज़ जवळ जवळ दहा महिण्याचां अवधी लोटलेला आहे. या अवधीत लोक जामृतीचे काम पुष्कळसे झाले आहे. आता लोकमत अज़माविण्याचा वेळ आली आहे, असे मला वाटते. हे एक साधे आणि सोपे साधन आहे. अशी माझी समजूत आहे. धर्मांतराचा प्रश्न कृतीत उतरविण्या करीता जो प्रयत्न करणे आवश्यक आहे तो प्रयत्न करण्यापूर्वीं खरे लोकमत काय आहे याची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि माझी अशी समजूत आहे का, जाती जातीची सभा करून आजमविलेल्या लोकमताबद्दल जशी खात्री देता येईल तशी खात्री सर्वसाधारण अस्पृश्यांची सभा भरवृन अजमाविलेल्या लोकमताबद्दल देता येणार नाही. कारण सर्व अस्पृश्यांची परिषद असे नाव देऊन ज़रा सभा बोलाविली तरी ती सर्व अस्पृश्यांची प्रातिनिधिक स्वरूपाची सभा होऊ नये व लोकमताची खात्री करून घेता यावी म्हणूनच नुसत्या महार लोकांचा सभा भरविण्यात आलेली आहे. या सभेत इतर जातीचा समावेश न केल्यामुळे त्यांचे काही नुकसान होऊ शकत नाही. त्यांना धर्मांतर करावयाचे नसेल तर त्यांचा या सभेत समावेश न केल्यामुळे त्यांना वाईट वाटण्याचे काही कारण नाही. त्यांना धर्मातर करावयाचे असेल तर या सभेत त्यांचा समावेश करण्यात आला नव्हता म्हणुन त्यांच्या धर्मातरास कसली ही आडकाठी येऊ शकणार नाही. ज़शी महार लोकांची सभा भरविण्यात आलेली आहे तशीच अस्मृश्यांतील इतर जातीना आपापल्या जातीच्या सभा भरवून या विषया संबंधाने अपले लोकमत व्यक्त करण्याची संधी मोकळी आहे, व तशा सभा त्यांनी कराव्या अशी मी त्यांना सुचना करतो. व त्या कामी त्यांना माझ्याकडून जी मदत होण्यासारखी असेल ती भी अवश्य करीन. येथवर झाली ती केवल प्रस्तावना झाली. आता मी आजच्या सभेच्या मुख्य विषयाकडे वळतो.

धर्मातराचा विषय जितका महत्वाचा आहे तितकाच तो गहन ही आहे. साध्या माणसाच्या बुद्धीला त्याचे आकलन होणे कठीण आहे. तसेच साध्या माणसाला धर्मातरासारख्या विषयक समजूत करून देणे है काम काही सोपे दिसत नाही. तथापि तुम्हा सर्वाची समजूत पटल्याशिवाय धर्मातर कृतीत उतरविणे कठीण आहे. याची जाणीव मला पूर्णपणे आहे आणि म्हणून जितक्या सुलभ रीतीने या बिषयाची मांडणी मला करता येईल तितक्या सुलभ रीतीने मी ती करणार आहे.

• धर्मांतराची ऐहिक कारणे

धर्मांतराच्या विषयावर दोन दृष्टीने विचार केला पाहिजे; तसाच तात्विक दृष्टीने विचार केला पाहिजे. परंतु कोणत्याही दृष्टीने धर्मांतराचा विचार करू लागलो तरी प्रथमतः अस्पृश्यता हि काय बाब आहे, तिचे खरे स्वरूप काय, याचा पुरता समज करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय माझ्या धर्मांतराच्या घोषणेचा तुम्हाला कळणे शक्य होणार नाही. अस्पृश्यता हि काय बाब आहे, तिचे खरे स्वरूप काय, याचा तुम्हास आठवण करून देणे आवश्यक वाटते. सरकारी शाळेत मुले घालण्याचा हक्क सांगितल्यामुळे, विहिरीचे पाणी भरण्याचा हक्क सांगितल्यामुळे, वरात घोड्यावर नेण्याचा हक्क सांगितल्यामुळे स्पृश्य हिंदूंनी मारहाण केल्याची उदाहरणे नेहमीच घडत असल्यामुळे जी सर्वांच्या डोळ्यापुढे नेहमी असतात. परंतु मारहाण करण्याची दुसरी अशी अनेक कारणे आहेत कि ज्याचा उल्लेख केला असता हिंदुस्थानच्या बाहेरील लोकांना तरी त्याचा विस्मय वाटेल. उंची पोशाख घातल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल. पाणी आणण्या करिता तांब्या पितळेची भांडी वापरल्यामुळे केल्याचे उदाहरण देता येईल. जानवे घातल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल. मेलेली गुरे न ओढल्यामुळे व मेलेल्या गुरांचे मांस न खाल्ल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण देता येईल. पायात बूट व मोजे घालून गावातून गेल्यामुळे, भेटलेल्या स्पृश्य हिंदुस जोहार न घातल्यामुळे, शौचास जाताना ताब्यात पाणी नेल्यामुळे छळ झाल्यामुळे उदाहरण देता येईल. पंचाच्या पंक्तीत चपाती वाटल्यामुळे मारहाण केल्याचे उदाहरण घडले आहे. वरील प्रकारचे जोरजुलूम  झाल्याची व तुम्हाला अमानुष तऱ्हेने वागविल्याची अनेक प्रकरणे ऐकिवात असतील, व तुमच्या पैकी काहींना तर त्याचा प्रत्येक्ष अनुभवही असेल, मारहाण करता येण्यासारखे नसेल तेथे बहिष्काराच्या शास्त्राचा तुमच्या विरुद्ध कसा उपयोग करण्यात येतो हेही तुम्हास अवगत आहेच. मोलमजुरी मिळू घ्यायची नाही; रानातून गुरांना जाऊ द्यायचे नाही; माणसाला गावात येऊ द्यायचे नाही वैगेरे सर्व प्रकारची बंदी करून स्पृश्य हिंदू लोकांनी तुमच्या लोकास जेरीस आणल्याची आठवण तुम्हा पैकी पुष्कळांना असेल. परंतु हे असे का घडते, याच्या मुळाशी काय आहे, हि गोष्ट माझ्या मते तुमच्या पैकी फारच थोड्या लोकांना कळत असेल. ती समजून घेणे माझ्या मते अत्यंत आवश्यक आहे.

• हि वर्ग कलहाची बाब आहे

वर जी कलहाची उदाहरणे दिली आहेत तिच्याशी व्यक्तीच्या गुणागुणाचा काही संबंध नाही. स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन्ही समाजातील तो कलह आहे. एका माणसावर होत असलेल्या आगळीकीचा हा प्रश्न नव्हे, एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर चालविलेल्या अन्यायाचा हा प्रश्न आहे. हा वर्ग कलह सामाजिक दर्जा संबंधीचा कलह आहे. या कलहाची जी वर उदाहरणे दिली आहेत त्यावरून जी एक बाब उघडपणे सिद्ध होत आहे ती हि कि तुम्ही वरच्या वर्गाशी वागताना बरोबरीच्या नात्याने वागण्याचा आग्रह धरता म्हणूनच हा कलह उपस्थित होतो. तसे जर नसेल तर चपतीचे जेवण घातल्यामुळे, जानवी घातल्यामुळे, तांब्या पितळेच्या भांड्यात पाणी आणल्यामुळे, घोड्यावरून वरात नेल्यामुळे तो वरच्या वर्गाचे कोणाचे नुकसान करीत नाही. आपल्याच पदराला खार लावतो. असे असता वरच्या वर्गाला त्याच्या करणीचा रोष का वाटावा? या रोषांचे कारण एकच आहे व ते हेच कि अशी समतेची वागवणूक त्यांच्या मानहाणीला कारणीभूत होते. तुम्ही खालचे आहात, अपवित्र आहात. खालच्या पायरीनेच तुम्ही राहिलेत तर ते तुम्हाला सुखाने राहू देतील पायरी सोड़ली तर कलहाला सुरुवात होते, ही गोष्ट निर्विवाद आहे. वरील उदाहरणांवरून आणखी एक गोष्ट सिद्ध हाते ती हि कि अस्पृश्यता हा नैमित्तिक नसून नित्याची आहे. हि गोष्ट स्पष्ट भाषेत सांगावयाची म्हणजे हा स्पृश्य अस्पृश्य यामधील कलह नित्याचा आहे व तो त्रिकालाबाधित असा राहणार आहे. कारण ज्या धर्मामुळे तुम्हाला खालची पायरी देण्यात आलेली आहे तो धर्म वरच्या वर्गाच्या म्हणण्या प्रमाणे सनातन आहे. त्याच्यात कोणत्याही प्रकारचा कालमानानुसार फेरबदल होऊ शकत नाही. तुम्ही आज जसे खालचे आहात तसे तुम्ही नेहमी खालचे राहिले पाहिजे, याचाच अर्थ असा का स्पृश्य व अस्पृश्य यांचे मधील हा कलह कायमचा राहणार आहे. या कलहातून तुमचा निभाव कसा लागणार हा मुख्य प्रश्न आहे व त्या प्रश्नाचा विचार केल्या शिवाय तुम्हाला गत्यंतर नाही असे माझे मत आहे. तुमच्या पैकी ज्यांना हिंदूं लोक वागवतील त्याप्रमाणे वागावयाचे असेल, त्यांचा सेवा धर्म पत्करून जगावयाचे असेल, त्या लोकांना या प्रश्नाचा विचार करण्याचे काहीच प्रयोजन नाही. परंतु त्यांना स्वाभिमानाचे जिणे आवश्यक वाटते, त्यांना समतेचे जिणे आवश्यक वाटते, त्यांना ह्या प्रश्नाचा विचार केल्या खेरीज गत्यंतर नाही. कोणत्या तन्हेने या कलहात आपला बचाव करता येईल याचा विचार करणे त्यांना आवश्यक आहे. या कलहातून आपला बचाव कसा होईल? या प्रश्नाचा विचार करणे मला तरी मोठेसे कठीण वाटत नाही, येथे जमलेल्या तुम्हा सर्व लोकांना एक गोष्ट कबूल करावी लागेल, व ती हि कि कोणत्याही कलहात ज्याच्या हाती सामर्थ्य असते त्याज्याच हाती जय असतो. ज्याला सामर्थ्य नाही त्यात यशाची आशा बाळगावयास नको. हि गोष्ट सर्वाच्या अनुभवाने सिद्ध झालेली आहे. तिच्या समर्थनार्थ पुरावा देण्याचे कारण नाही.

• प्रथम सामर्थ्य मिळवा

याच्या पुढील प्रश्न जो तुम्ही विचारात घेणे आवश्यक आहे तो हा की या कलहातून सुटका करून घेण्यास तुमच्या पदरी पुरेसे सामर्थ्य आहे काय? मनुष्यमात्राला तीन प्रकारचे सामर्थ्य अवगत असते. एक मनुष्यबल, दुसरे द्रव्यबल आणि तिसरे मानसिक बल. या बलांपेकी कोणते बल तुम्हाला उपलब्ध आहे असे तुम्हाला वाटते? मनुष्य बलाच्या दृष्टीने तुम्ही अल्पसंख्यक आहात, हि गोष्ट तर उघडच आहे. मुंबई इलाख्यात अस्पृश्य वर्गाची लोकसंख्या एक अष्टमांश एवढाच आहे. ती ही संघटित नाही. आपसातील जातीभेदामुळे तिच्यात संघशक्तीचा पूर्ण अभाव आहे. संघटित नाही ती नाहीच; पण एकत्रित ही नाही. ती खेडोपाडी बिखुरली गेलेली आहे. अशा कारणामुळे असलेल्या अल्पसल्प संख्येचा देखील प्रसंग ग्रस्त झालेल्या अस्पृश्य वर्गाच्या वस्तीस कोणत्याही प्रकारचा उपयोग होऊ शकत नाही. द्रव्य बलाच्या दृष्टीने पाहिले तर तुमची तीच गत आहे. तुमचा जवळ थोडे बहुत मनुष्यबल आहे असे म्हटले असता चालेल पण तुमच्या जवळ द्रव्य बळ मुळीच नाही हि गोष्ट निर्विवाद आहे. तुम्हाला व्यापार नाहीं उदीम नाही, नोकरी नाही आणि शतीही नाही. वरच्या वर्गाचे लोक जो घासकुटका देतील त्याच्यावर आज तुमची उपजीविका आहे. तुम्हाला अन्न नाही. तुम्हाला वस्त्र नाहीं तुमच्या जवळ द्रव्यबल ते काय असणार? अन्याय झाला तर कोर्टातून दाद मागण्या इतकी अवकाद आज तुमच्यात नाही. तुमच्यातील हजारो लोक कोर्टाचा खर्च सोसण्याची ऐपत नसल्यामुळे हिंदुकडून होणारा त्रास, विडंबना व जोरजुलूम अगदी मुकाट्यामे सोशीत आहेत. मानसिक बळाची तर याहीपेक्षा अधिक उणीव आहे. शेकडो वर्ष त्यांना केलेला विटंबना, छि - थू निमूटपणे सोसल्यामुळे उलट बोलण्याची सवय, प्रतिकाराची हिंमत नाहीशी झाली आहे. तुमच्यातील आत्मविश्वास, उत्साह व महत्वाकांक्षा यांचा बिमोड झाला आहे. तुमच्यात सर्व लोक हताश, दीनवाणे व निस्तेज झालेले आहेत. निराशेचे व नामद्रुमकींचे वातावरण सर्वत्र पसरले आहे. आपण काही करू शकू, अशा प्रकारचा विचार देखील कोणाच्या ध्यानी मना येऊ शकत नाही.

• तुमचाच छळ का होतो?

वस्तुस्थितीचे मी हे केलेले वर्णन जर खरे असेल तर त्यापासून निघणारा सिद्धांत तुम्हा सर्वाना कबूल करावा लागेल. व तो हा की तुम्ही तुमच्या सामर्थ्यावर अवलंबून, राहाल तर तुम्हाला या जुलुमाचा प्रतिकार करता यावयाचा नाहीं तुमच्यात सामर्थ्य नसल्यामुळे तुमव्यावर जोरजुलूम होतो याबद्दल मला काडीचा ही संशय नाहीं या इलाख्यात तुम्हीच अल्पसंख्यक आहात अशातला काही भाग नव्हे. तुमच्या प्रमाणे मुसलमान देखील अल्पसंख्यक आहेत ज्याप्रमाणे महारमांगांचा दोन चार घरे गावात असतात त्याचप्रमाणे मुसलमानांची ही एक - दोनच घरे गावात असतात. त्या मुसलमानांच्या वाटेस कोणीही जात नाहीं परंतु तुमच्यावर मात्र सारखा जुलूम चाललेला असतो. याचे कारण काय? दोन मुसलमानांची घरे असून त्यांच्या वाटेला गाव जात नाही. तुमची दहा घरे असून ही गाव तुमचा छळ करतो. असे का होते? हा प्रश्न अत्यंत महल्वाचा आहे. त्याची खोज तुम्ही चांगल्यां रीतीने केली पाहिजे. माझा मते या प्रश्नाचे एकच उत्तर देता येईल व ते हे कि त्या दोन मुसलमानांच्या घरांच्यासाठी साऱ्या हिंदुस्थानातील मुसलमान समाजाची शक्ती व सामर्थ्य उभे आहे, याची जाणीव हिंदू लोकांना असल्यामुळे त्यां दोन मुसलमान घरांच्या वाटेस जाण्याची कोणाही हिंदूची सहसा छाती होत नाही. त्या दोन घरांच्या वाटेस गेले असताना पंजाब पासून के मद्रास पर्यत मुसलमान समाज आपली शक्ती वेचून त्यांचे संरक्षण करील. अशी खात्री असल्यामुळे ती दोन मुसलमानांची घरे निर्भयपणे आपला व्यवहार करीत असतात. तुमच्या बाबतीत हिंदू लोकांची खात्री असते की, तुम्हाला कोणीही मदत करणार नाहीं व अधिकाऱ्यांची मदत होणार नाही. मामलेदार व पोलीस हे त्यांचेच असल्यामुळे स्पृश्य अस्पृश्यांच्या वादात ते जातीला जागतात कर्तव्याला जागत नाहीत, याची त्यांना खात्री असते. या तुमच्या असहाय स्थितीमुळेच तुमच्याशी हिंदू लोक जुलुमाची व अन्यायाची वागप्पूक करतात. येथ वर मी जे विवेचन केले आहे त्यावरून दोन गोष्टी सिद्ध होत आहेत. त्यापैकी पहिली गोष्ट ही की सामर्थ्य असल्या शिवाय तुम्हाला या जुलुमाचा प्रतिकार करता येणे शक्य होणार नाही. दुसरी प्रतिकाराला अवश्य असलेले सामर्थ्य आज़ तुमच्या पदरी नाही. या दोन गोष्टी सिद्ध झाल्या बरोबर तिसरी एक गोष्ट आपोआपच सिद्ध होते आणि ती हि की हे अवश्य असलेले सामर्थ्य तुम्हाला कोठून तरी बाहेरून मिलविले पाहिजे. हे सामर्थ्य तुम्हाला कसे मिळविता येईल, हाच खरोखरी महत्वाचा प्रश्न आहे, आणि त्याचा तुम्ही निर्विकल्प मनाने विचार केला पाहिजे.

• बाहेरून सामर्थ्य आणले पाहिजे

या देशातील जातीभेद व धर्मभेद यांचा लोकांच्या मनावर व नीतिमत्तेवर एक विलक्षण परिणाम घडून आलेला मला तरी दिसून-येतो. या देशात दुख, दारिद्र आणि क्लेश यांच्या करिता कोणाला ही खेद वाटत नाही; व वाटलाच तर त्याच्या निवारणाकरिता कोणी प्रयत्न करीत नाही. आपल्या धर्म बांधवांवर किंवा जाति बांधवांवर जा दुखाचा, दारिद्राचा अच्छा जुलुमाचा प्रसंग ओढवला तर त्याच्या निवारणा करिता मात्र लोक सहाय्य करतात. हा नीतिमतेचा दृष्टी किती ही विकृत असली तरी ती जारी आहे, हे कोणी ही विसरून चालता कामा नये. ज्या गावामध्ये अस्पृश्य लोकांवर हिंदू कडून जुलूम होतो त्या गावात इतर धर्माचे लोक नसतात अशातला काही भाग नाहीं अस्पृश्यांवर होत असलेला जुलूम अन्यायकारक आहे ही गोष्ट त्यांना पटत नाही असेही नव्हे. होतो हा अन्याय होतो असे वाटत असून ही ते त्यांच्या सहाय्यास धावून जात नाहीत. याचे कारणे काय? तुम्ही आम्हाला का मदत करीत नाही असा ज़र प्रश्न तुम्ही त्यांना केलात तर तुमच्या वादात आम्हास पडण्याचे कारण काय? तुम्ही आमच्या धर्माचे असता तर आम्ही तुम्हाला सहाय्य केल असते, हे असे उत्तर ते तुम्हाला देतील. यावरून एक गोष्ट तुमच्या ध्यानात येऊ शकेल कि कोणत्याही अन्य समाजाचा ऋणानुबंध तुम्ही जोडल्या शिवाय कोणत्याही अन्य धर्मात तुम्ही सामील झाल्या शिवाय तुम्हाला बाहरचे सामर्थ्य मिळू शकत नाही. याचाच स्पष्ट अर्थ असा आहे की तुम्ही धर्मातर करून कोणत्या तरी अन्य समाजात अंतर्भूत झाले पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला त्या समाजाचे सामर्थ्य प्राप्त होऊ शकणार नाही आणि जोपर्यत तुमच्या पदरी सामर्थ्य नाही तोपर्यंत तुम्हाला व तुमच्या भावी पिढीला आजच्या दिनवाण्या स्थिती मध्ये दिवस काढावे लागणार आहेत.

• धर्मांतराची अध्यात्मिक कारणे

येथपर्यंत ऐहिक कल्याणाकरिता धर्मांतराची आवश्यकता काय आहे याचे दिग्दर्शन केले आहे आता अध्यात्मिक कारणाकरिता धर्मांतराची कशी आवश्यकता आहे या विषयीचे माझे विचार तुमच्या समोर मी मांडीत आहे. प्रथमत: धर्म कशाकरिता असतो? त्याचा आवश्यकता काय? हे जाणून घेतले पाहिजे. धर्मांतराच्या अनेक व्याख्या अनेक लोकांना केलेल्या तुम्हाला सापडतील. पण त्या सर्वांमध्ये अर्थपूर्ण व सर्वाना पटण्यासारखी अशी एकच व्याख्या आहे. 'ज्याने सर्व प्रजेचे धारण होते तोच धर्म. हीच ती खरा धर्माची व्याख्या होय. ही धर्माची व्याख्या मी केलेली नसती तरी हि व्याख्या सनातनी हिंदूचे अग्रगण्य लोकमान्य टिलक यांनीच दिलेली आहे. तेंव्हा धर्माच्या व्याख्येबद्दल मखलाशी केल्याचा आरोप माझ्यावर कोणी करू शकणार नाहीं ही व्याख्या जरी मी केलेली नसती तरी मी ती वादाकरिता मान्य केलेली आहे अशातला भाग नाही, मला ती कबूल आहे. समाजाच्या धारणेकरिता घातलेली बंधने म्हणजे धर्म, हीच माझी देखील धर्माची कल्पना आहे. ही व्याख्या वास्तविक दृष्टया अथवा तात्विक दृष्टया योग्य अशी दिसली तरी समाजाच्या धारणेकरिता समाजाची बंधने कशा प्रकारची असावीत या प्रश्नांची या व्याख्येवरून काहीच बोध होऊ शकत नाही; अथवा उलगडा ही होऊ शकत नाही. समाजाच्या योग्य धारणेकरिता समाजाची बंधने कशी असावीत हा प्रश्न शिल्लक राहतोच. व हा प्रश्न धर्माच्या व्याख्येपेक्षा फार महत्वाचा आहे. कारण धर्म कोणता हे व्याख्येवरून अवलंबून नसून बांधण्याच्या हेतूवर व स्वरुपावर अबलंबून आहे.

ज्या बंधनांना समाजातील सर्व प्रजेची धारणा होऊ शकते ती बंधने कशी असावीत, म्हणजे खऱ्या धर्माचे स्वरूप कसे असावे, याचा विचार करताना समाज आणि व्यक्ती यांचा तात्विक दृष्टया संबंध काय व कसा असावा हा प्रश्न साहजिकपणेच उदभवतो. या प्रश्ना संबंधीने आधुनिक समाजशास्त्र व त्यांनी तीन प्रकारची मते प्रतिपादन केलेली आहेत. काहीँच्या मते व्यक्तिमात्राला सुख प्राप्ती व्हावी हाच समाज संघटनेचा अंतिम हेतू आहे. काहींच्या मते व्यक्तिमात्राला त्याच्या अंगभूत गुणांचा व शक्तीचा विकास करता येऊन त्याला पूर्णावस्थेस पोहोचविण्यास मदत व्हावी हाच समाज संधटनेचा अंतिम हेतू असला पाहिजे. व काहीच्या मते समाज संघटनेचा मुख्य हेतू व्यक्तीची उन्नत्ती किंवा व्यक्तीचे सौख्य हा नसून आदर्शभूत समाज तयार करणे हाच होय. हिंदुस्थानी कल्पना या तीन ही कल्पनाहून अगदी निराळी आहे. हिंदु धर्मात व्यक्तीला काही स्थान नाही. हिंदु धर्मात रचना वर्गाच्या कल्पनेवर केलेला आहे. एकाने दुसऱ्याशी कसे वागावे याची शिकवण हिंदु धर्मात नाही. एका वर्गाने दुसन्या वर्गाशी कसे वागावे याची बंधने हिंदु धर्मात आहेत. ज्या अर्थात व्यक्तीला प्राधान्य नाही तो धर्म मला स्वत:ला मान्य नाही. व्यक्तीच्या जीवनाला समाजाचा जरी आवश्यकता असली तरी समाजाचा धारणा हे धर्माचे अंतिम ध्येय होऊ शकत नाही. व्यक्तीचा विकास हे धर्माचे खरे ध्येय आहे असे मी समजतो. एक घटक असला तरी त्याचा आणि समाजाचा संबंध; शरीर आणि अवयव, गाडा आणि त्याच चाक याचा जसा संबंध आहे तसा नव्हे असे मी समजतो.

• समाज आणि व्यक्ती

ज्याप्रमाणे थेंब समुद्राच्या पाण्यात टाकला असताना त्याचा लोप होतो तसा माणसाला तो केवल समाजात राहिला म्हणून त्याचा लेप होऊ शकत नाही. त्याचे जीवन स्वतंत्र असते. त्याचा जन्म समाजाच्या सेवेकरिता नसून आत्मोन्नती करिता आहे. ह्या प्रकार कारणामुळे सुधारलेल्या राष्ट्रात एका माणसाला दुसऱ्या माणसाशी आपला गुलाम करून जाता येत नाही, ज्या धर्मात व्यक्तीला प्राधान्य नाही तो धर्म मला मान्य होऊ शकत नाही. तमेच ज्या धर्मात एका वर्गाने विद्या शिकावा दुसन्या वर्गाने शस्त्र धरावे, तिसन्याने व्यापार करावा व चौथ्याने नुसती सेवा करावी, असे आहे तो धर्म मला मान्य नाही. विद्या दरेकाला हवी. शस्त्राचा दरेकाला जरुरी आहे. पैसा सर्वाना पाहिजे. हि गोष्ट जो धर्म विसरतो व जो एकाला सज्ञान करण्याकरित्ता बाकीच्यांना अज्ञानात ठेवतो तो धर्म नसून लोकांना बौद्धिक गुलामगिरात ठेवण्याचा कावा आहे. जो धर्म काहींना धन संपादनाचा मार्ग मोकळा ठेवतो व बाकीच्यांना आपल्या जीविकेकरिता दुसऱ्यावर अबलंबून राहाण्याचा अनुज्ञा देतो तो धर्म नसून ती स्वार्थ परायणता आहे. हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य हे असे आहे. त्याविषयी माझे मत काय आहे हे मी स्पष्टपणे मांडिले आहे. हा हिंदू धर्म तुम्हाला हिताचा आहे की काय याचा तुम्ही विचार करा. व्यक्तीच्या आत्मोन्नतीला पोषक असे वातावरण उत्पन्न करणे ही धर्माची मूलभूत कल्पना आहे. हे जर मान्य केले तर हिंदू धर्माने तुमची आत्मोन्नती कधीही होऊ शकणार नाही. व्यक्तीच्या विकासाला तीन गोष्टींचा अनावश्यकता को, सहानुभूती, समता आणि स्वातंव्य. हिंदू धर्मातील या तिन्ही गोष्टी पैकी एक तरी बाब तुमच्या करिता उपलब्ध आहे असे तुम्हाला म्हणता येईल काय?

• हिंदू धर्मात तुम्हाला सहानुभूती आहें काय?

सहानुभूतीच्या दृष्टीने पाहिले तर सर्वत्र शून्यच आहे, असे म्हणावे लागेल. कोठे ही तुम्ही गेलात तरी तुमच्याकडे आपुलकीच्या भावनेने कोणी ही पाहाणार नाही, याचा अनुभव तुम्हाला चांगलाच आहे. आपुलकीचा भावना नाहीच नाही, परंतु हिंदू लोकांकडून तुम्हाला परक्या पेक्षा परके लेखण्यात येते. एकाच गावात राहणारे स्पृश्य आणि अस्पृश्य यांचा परस्पर संबंध कसा हे जर पाहू लागले तर पुजारी शेजारी राहणार दोघे भाऊ असे कोणाला ही म्हणता येणार नाहीं छावणी दिलेले हे दान परस्पर विरोधी सैन्याचे तल आहेत असेच म्हणावे लागेल. जितके मुसलमान लोक हिंदूंना जवळचे वाटतात, त्यांच्याशी जेवढा त्यांचा स्नेहभाव असतो त्याच्या शत्तांशाने देखील तुमच्याशी हिंदूंचा नसतो. हिंदू मुसलमान हे लोकल बोर्डात, कायदे कौन्सिलात व्यापारात एकमेकांना सहाय्यभूत होऊन वागतात; पण तुमच्याशी तसे सहानुभूताने हिंदू लोकांना वागल्याचे एखादे तरी उदाहरण दाखवून देता येईल काय? उलटपेक्षा त्यांचा तुमच्या विरुद्ध नेहमीचा कटाक्ष असतो, ही गोष्ट मात्र खरा आहे. हिंदूच्या मनात तुमच्या विरुद्ध असलेल्या कटाक्षाचा परिणाम कित्ता विधातक झाला आहे हे तुमच्या पैकी ज्या कोणाला दाद मागण्या करिता कोर्टात जाण्याचा प्रसंग आलेला आहे तो आपल्या अनुपवाने सांगू शकेल. कोर्ट आपल्याला न्याय देईंल, पोलीस आपल्याला मदत करील असा तुम्हापैकी कोणा एकाला तरी विश्वास वाटतो का? व तो जर वाटत नाही तर तशा वृत्ती होण्यास काय कारण आहे? माझा मते अशा अविश्वासाच कारण एकच आहे व ते हेच की हिंदू लोकांमध्ये तुमच्या बद्दल कोणत्याही प्रकारचा सहानुभूती नसल्या कारणाने ते आपल्या अधिकार सदुपयोग करतील अशी आशा तुम्हाला वाटत नाही. हे जर खरे आहे तर शत्रुत्वाने भरलेल्या या वातावरणात राहून तुमचा काय उपयोग होणार आहे?

• हिंदू समाजात तुमच्या करिता समता आहे काय?

हा प्रश्न खरोखरीच विचारावयासच नको. अस्पृश्यता हा मूर्तिमंत असमानताच आहे. एवढी मोठी असमानतेची जागती ज्योत कोठेच दिसावयाचा नाही. अस्पृश्यतेपेक्षा जास्त उग्र स्वरुपाची असमानता जगाच्या इतिहासात अन्य कोठेच सापडणार नाही. कमी अधिक भावामुळे एकाने आपली मुलगी दुसऱ्याच्या मुलाला न देणे, कमी अधिक भावामुळे एकाने दुसऱ्याच्या बरोबर सहभोजन न करणे अशा प्रकारचे असमानतेचे निदर्शक वर्तन आपणास पाहावयास सापडले. परंतु एका माणसाला दुसऱ्या माणसाने न शिवण्या इतका पतित लेखण्याची प्रथा हिंदू धर्मा खेरीज आणि हिंदू समाजाखेरीज अन्यत्र कोठे तरी सापडेल काय? ज्याच्या स्पर्शाने पाणी बाटते, ज्याच्या स्पर्शान देव बाटतो, तो प्राणी मानवाच्या कोटीत गणला गेला आहे असे कोणी तरी म्हणेल काय? अस्पृश्य माणसाकडे पाहण्याची दृष्टी आणि रक्तपितीने भरलेल्या माणसाकडे पाहण्याची दृष्टी यात काय फरक आहे? रक्तपिती भरलेल्या माणसाबद्दल लोकांच्या मनात किळस जरी असला तरी त्याच्याबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती तरी असते! परंतु तुमच्या बद्दत्न सहानुभूती तर नसतेच पण किळस मात्र असतो. रक्तपिती भरलेल्या माणसापेक्षा देखील तुमची स्थिती हीन आहे. अजून हि खेडेगावात एखादा स्पृश्य माणूस उपास सोडीत असताना जर महाराचा शब्द त्याच्या कानावर पडला तर तो अन्न ग्रहण करीत नाही एवढा कलंक तुमच्या शरीराला, एवढा कलंक तुमच्या शब्दाला आहे! अस्पृश्यता हिंदु धर्मा वरील कलंक आहे असे काही लोक म्हणत आहेत. पण त्या बतवाणीत खर म्हटले असता काही अर्थ नाही हिंदू धर्म कलंकित आहे असे एक ही हिंदू मानीत नाही. तुम्ही कलंकित आहात अपवित्र आहात असे मात्र बहुजन हिंदू समाज मानतो. हि दशा तुम्हाला का प्राप्त झाली हे तुम्ही हिंदु धर्मात राहिंल्यामुळे ही दशा तुम्हाला प्राप्त झाली आहे असे मला वाटते. तुमच्यातील जे मुसलमान झाले त्यांना हिंदू अस्पृश्य मानात नाहीत व असमान लेखीत नाहीत. तुमच्यातील जे खिस्ती झाले त्यांना हिंदू अस्पृश्य मानात नाहीत व असमान लेखीत नाहीत. नुकताच त्रावणकोर येथे घडलेला प्रकार विचारात घेण्यासारखा आहे. तेथील थिया जातीतील अस्पृश्य लोकांस रस्त्यावरून चालण्याची मनाई आहे. परवाच त्यांच्या पैकी काही जणांनी शीख धर्म स्वीकारला, हे तुम्हास माहित असेलच. अस्पृश्य असताना ज्या लोकांस त्या रस्त्यावरून चालता येत नव्हते त्याच लोकांना शीख धर्म स्विकारल्या बरोबर त्यांच्या वरची बंदी उडवली गेली. या सर्व गोष्टीवरून एक गोष्ट सिद्ध होत आहे की तुमच्या अस्पृश्यतेला व तुमच्या असमानतेला जर काही कारण असेल तर ते तुमचा आणि हिंदु धर्माचा असलेला लागाबांधा हे होय.

या असमानतेच्या अन्यायात सांत्वन करण्याच्या हेतूने काही स्पृश्य लोक अस्पृश्यांना सांगतात की तुम्ही शिक्षण घ्या, म्हणजे तुम्हाला शिवू! तुम्ही स्वच्छ राहा म्हणजे तुम्हाला शिवू! आणि समानतेने वागवू! खरे म्हटले असता, अडानि महाराची दरिद्री महाराची आणि अस्वच्छ महाराची जी गत होते तीच गत शिकलेल्या महारांची, पैसैवाल्या महारांची आणि स्वच्छ राहणाऱ्या महारांची होते. हे तुम्हा आम्हा सर्वाना अनुभवाने माहीत आहे पण तो प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी जर शिक्षण घेतल्याशिवाय, हाती पैसा असल्या शिवाय, अंगावर पोशाख असल्या शिवाय, मान मान्यता मिळणार नाही तर साध्या महाराने काय करावे? ज्याला शिक्षण प्राप्त होऊ शकत नाही, ज्याला पैसा मिळू शकत नाहीं आणि ज्याला निटनेटका पोशाख करता येत नाही त्या महाराला समानता कशी मिळणार? खिस्ती धर्मात, मुसलमान धर्मात जी समानतेची शिकवण देण्यात आली आहे तिचा संबंध विद्या, धन, पोशाख, पराक्रम अशा बाह्य वस्तूंशी मुळीच नाही माणसाचे मनुष्यत्व हीच महत्वाची गोष्ट आहे असे दोन्ही धर्म मानतात्त व ते मनुष्यत्व सर्वाना आदरणीय असणे पाहिजे. कोणी कोणाचा अपमान करू नये व कोणी कोणाला असमान मानू नये असे ते धर्म शिकवतात. हिंदु धर्मात या शिकवणीचा पूर्ण अभाव आहे. ज्या धर्मात मनुष्याच्या मनुष्यत्वाला व त्याच्या माणुसकीला काही किमत नाही तो धर्म काय कामाचा? आणि त्याला कवटाळून धरून राहाण्यात काय हासिल आहे? याला उत्तर म्हणून काही हिंदू लोक उपनिषदाची साक्ष देतात त्यात ईश्वर सर्वत्र भरता आहे, असे तत्त्व आहे म्हणून बढाई मिरवतात. विज्ञान आणि धर्म या दोन गोष्टी अदा निरनिराळ्या आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे कि धर्माची शिकवण आहे याचा विचार केला पाहिजे. सर्वाभूती एक ईश्वर हा विज्ञानाचा सिद्धांत आहे. धर्माच्या तत्वांचा वागणुकीशी संबंध असतो, विज्ञानाचा नसतो. सर्वाभूती एक ईश्वर हा धर्माची शिकवण नाहीं हवं विज्ञानाचे तत्त्व आहे हि गोष्ट, हिंदू लोक त्याप्रमाणे वागत नाहीत ह्या माझा म्हणायाचा पुरावाच आहे. उलटपक्षी हिंदू लोकांचा असा आग्रहच असेल का सर्वाभूती एक परमेश्वर आहे. हि गोष्ट तत्त्वज्ञानाचा सिद्धांत नसून त्यांच्या धर्माचा पाया आहे आणि म्हणून त्यांचा धर्म श्रेष्ठ आहे. तर त्यांना एंवढेच उत्तर पुरे आहे की त्यांच्या इतके नीच लोक जगामध्ये दसरे कोणीच नसतील मुखाने सर्वाभूती ईश्वर असा जप करणाऱ्या आणि कृतीने भूतमात्राची विडंबना करणाऱ्या लोकांचा 'मुख मेँ राम बगल में छुरी' 'बोलणे महानुभावाचे पण करणी कसाबाची' अशा दुष्ट लोकातच समावेश करावा लागेल. सर्वाभूती एक ईश्वर मानणारे आणि आने माणसाला पशुतुल्य लेखणारे लोक दांभिक आहेत, त्यांचा संग करू नका. मुग्यांना साखर घालणारे व माणसांना पाण्यावाचून मारणारे लोक दांभिक आहेत त्यांचा संग करू नका! त्यांच्या संगामुळे तुमच्यावर काय परिणाम झाला आहे? तुमचा इज्जत नाहीशी झाली, तुमचा मान सम्मान नाहीसा झाला. खरे म्हटले असता हिंदू समाजातच तुम्हाला मान सन्मान नाही, हे म्हणणे वस्तुस्थितीच्या मानाने अपुरे पडते. तुम्हाला हिंदू लोकच हलके मानतात असे नव्हे तर मुसलमान व खिस्ती लोक देखील तुम्हाला हलके लेखतात. खरे म्हटल असता मुसलमान धर्मात, खिस्ती धर्मात श्रेष्ठ कनिष्ठ, उच्च नीच असा भेदभाव जागृत करणारा शिकवण नाही असे असताना देखील हे लोक तुम्हाला कमी लेखतात. त्याचे कारण काय हे ह्याचे कारण एकच. हिंदू लोक तुम्हाला नीच लेखतात म्हणूनच तुम्हाला मुसलमान व खिस्ती लोक नीच लेखतात. अस्पृश्याना जर आम्ही समान लेखले तर हिंदू लोक आपल्याला अस्पृश्याच्या इलकेच खालचे लेखतात. या भीतीमुळे मुसलमान ब खिस्ती लोक तुमच्याशी हिंदू प्रमाणेच अस्पृश्यता पाळतात. आम्ही हिंदू समाजात हिन गणले गेलो आहोत. हलकेच नव्हें तर हिंदूच्या असमानतेच्या वर्तणुकीमुळे आम्हा सर्व हिंदुस्थान देशामध्ये सर्वांपेक्षा हिन गणले गेलो आहोत हा अपमानकारक परिस्थिती टाळण्याकरिता हा कलंक धुवून काढण्याकरिता नरदेहाचे चीज करण्याकरिता, ज़र काणता एखादा उपाय असेल तर तो एकच आहे व तो म्हणजे हिंदु धर्माचा व हिंदु समाजाचा त्याग करणे हाच होय.

• हिंदु धर्मात तुम्हाला स्वातंत्र्य आहे काय?

दरेक नागरिकाला जेवढे कायद्याने व्यवसाय स्वातंत्र्य आहे, तेवढे व्यवसाय स्वातंत्र्य तुम्हाला ही आहे, दरेक नागरिकाला कायद्याने जितके व्यक्ति स्वातंत्र्य आहे. तेवढे व्यक्ति स्वातंत्र्य लुम्हाला ही आहे. असे काही लोक म्हणतील परंतु या म्हणण्यात खरोखर काही अर्थ आहे काय? तो याचा खोल विचार तुम्ही करायला पाहिजे. ज्याला ज़न्म जात धंद्या शिवाय दुसरा कोणताही धंदा समाज करू देत नाही, त्या माणसाला तुला व्यवसाय स्वातंत्र्य आहे असे सांगण्यात काय हासिल आहे? ज्याला संपत्ती मिळविण्याचे कोणत्याही प्रकारचे द्वार खुले नाही त्याला तुझ्या संपत्तीला कोणीही हात लावू शकणार नाही, तुझा संपत्ती उपभोगण्यास तू स्वतंत्र आहेस हे असे सांगण्यात काय सत्य आहे? ज़न्म जात अपवित्रतेमुळे ज्याचा नोकरीत प्रवेश होऊ शकत नाही, ज्याच्या हाताखाली नोकरी करण्याचा इतर लोकांना अपमान वाटतो अशा माणसात कोणत्याही नोकरीवर हक्क सांगण्याचे तुला स्वातंत्र्य आहे, असे सांगणे म्हणजे त्याची थट्टा करणे आहे. कायद्याने षुष्कळ हक्क दिले असतील पण समाज त्यांचा उपयोग करू देईल तरच ते खरे हक्क आहेत, असे म्हणता येईल. अस्पृश्यांनी चांगला पोशाख घालून हिंडावे, असा हक्क कायद्याने दिला आहे. पण हिंदू समाज तसे कपडे वापरू देत नाही, तर त्या हक्काचा काय उपयोग? अस्पृश्याना तांब्या पितळेच्या भांड्यात पाणी आणावे असा हक्क कायद्याने दिला आहे, पण हिंदू समाज अस्पृश्याना धातूची भांडी वापरु देत नाहीत तर त्या हक्काचा काय उपयोग? अस्पृश्यांनी आपल्या घरावर कौल घालावी असा हक्क कायद्याने दिला आहे, पण हिंदू समाज त्यास कौल घालू देत नाही तर त्या हक्काचा काय उपयोग? अशी पुष्कळ उदाहरणे देता येतील. परंतु सारांश हा कि समाज उपभोगू देईल तर आपला हक्क असे म्हणता येईल. ज्या हक्काला स्रमाजाचा आड काठी आहे, हरकत आहे तो हक्क कायद्याने जरी दिला असला तरी त्याचा काही उपयोग नाहीं अस्पृश्य लोकांना कायदेशीर स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याची जास्त जरुरी आहे. सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यत्त तुम्हाला प्राप्त झाले नाही तोपर्यंत तुम्हाला कायद्याने किती ही स्वातंत्र्य दिले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तुम्हाला शारीरिक स्वातंत्र्य आहे असे काही लोक सांगतील. तुम्हाला कायद्याची मनाई नसेल तिकडे जाता येते कायद्याचा मनाई नसेल त्या प्रकारे बोलता येते हे खरे परंतु या स्वातंत्र्याचा काय उपयोग आहे? मनुष्यमात्राला जसे शरीर आहे तसेच मन ही आहे. जितकी शारारिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे तितकाच मानसिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे. नुसत्या शरीरिक स्वातंत्र्याला काही उपयोग नाहीं महत्व आहे ते मानसिक स्वातंत्र्याला आहे. खरे म्हटले असता शरीर स्वातंत्र्य कशा करिता असते? ज्याला त्याला मनसोक्त व्यवहार करता यावा एवढ्याच करता आहे. केद्याच्या पायातील बेड्या काडून त्याला मोकळे करण्याचा मतलब काय? हेतू एवढाच की त्याने बाह्य जगात मोकळ्या मनाने वावरून आपल्या अंगी असलेल्या कर्तबगारीचा पूर्ण फायदा घ्यावा म्हणून. परंतु ज्या माणसाचे मन स्वतंत्र नाही त्याला असल्या बाह्यात्कारी स्वातंत्र्याचा काय उपयोग? मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून गुलाम आहे, ज्याचे मन स्वातंत्र्य नाहीं तो जरी तो कैदी नसला तरी तो तुरुंगात आहे. ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जिवंत असून मेला आहे. मनाचे स्वातंत्र्य हा जिवंतपणाची साक्ष आहे. परंतु मानसिक स्वातंत्र्य कोणाला आहे असे म्हणता येईल? जो आपली बुद्धी जागृत ठेवून आपले हक्क काय, आपले अधिकार काय व आपले कर्तव्य काय याचा जाणीव करून घेतो त्याला मी स्वातंत्र्य म्हणतो. जो परिस्थितीचा दास झाला नाही जो परिस्थितीला आपल्या कह्यात आणण्यास सिद्ध असतो, तो माणूस स्वतंत्र आहे, असे मी म्हणतो. जो रूढीच्या स्वाधीन झाला नाही, जो गतानुगतिक बनला नाही, ज्याच्या विचारांचा ज्योत विझली नाहीं तो स्वतंत्र आहे, असे मी म्हणतो. जो पराधीन झाला नाहीं, जो दुसऱ्याच्या शिकवणीने वागत नाही, जो कार्य कारणभाव ध्यानात घेतल्या शिवाय कशावर विश्वास ठेवत नाही, जो आपल्या हक्कांचा अपहार केला असताना त्याच्या रक्षणार्थ दक्ष असतो. जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही, दुसऱ्याच्या हातचे बाहुले न होण्या इतकी बुद्धी, स्वाभिमान ज्याला आहे, तोच माणूस स्वातंत्र्य आहे, असे मी समज़तो. जो आपल्या आयुष्याचे ध्येय व आपल्या आयुष्याचा व्यय दुसऱ्याने घालून दिलेल्या आज्ञेप्रमाणे ठरवित नाही, जो आपल्या बुद्धीनुसार आपल्या आयुष्याचे ध्येय काय असावे व आपले आयुष्य कोणत्या कार्यात व कशा रीतीने व्यतीत करावे हे आपले आपण ठरवितो. सारांश जो सर्वस्व स्वाधीन आहे, तो माणूस स्वतंत्र आहे, असे मी समजतो.

या दृष्टीने पाहिले आता तुम्ही स्वतंत्र आहात का? तुमचे आयुष्य व तुमच्या आयुष्याचे ध्येय तुमच्या स्वाधीन आहे का? माझ्या मते तुम्हाला स्वातंत्र्य तर नाहीच पण तुम्ही दास आहात, सेवक आहात, इतकेच नव्हे तर, तुमच्या दास्यत्वाला सिमा उरली नाही? हिंदु धर्मात कोणालाही विचार स्वातंत्र्य असू शकत नाही. जो जो मनुष्य हिंदु धर्मात राहिल त्या त्या माणसाला अपना विचार स्वातंत्र्याला तिलांजली दिल्या शिवाय गत्यंतर नाही. वागताना त्याने वेदाप्रमाणे वागले पाहिजे. वेदात तशी आज्ञा नसेल तर स्मृतातील आज्ञेप्रमाणे वागले पाहिजे स्मृतीत तशी आज्ञा नसेल तर महाजनांच्या पावलावर पाऊल ठेवून वागले पाहिजे. हिंदु धर्मात बुद्धीला विचाराला प्राधान्य तर नाहीच नाही पण बाब देखील नाही. हिंदूंनी कोणाची तरी गुलामगिरी केलीच पाहिजे. वेदाची गुलामगिरी केली पाहिजे स्मृतीचा कास धरली पाहिजे. अगर महाज़नांचे अनुकरण केले पाहिजे. विचार शक्तीचा त्याने मुळीच उपयोग करता कामा नये. जोपर्यंत तुम्ही हिंदु धर्मात आहात तोपर्यंत तुम्हाला विचार स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकत नाही. यावर कोणी असे म्हणतील कि हिंदू धर्माने तुमचेच मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेतले असे नव्हे तर हिंदु धर्माला प्रमाण मानणाऱ्या सर्व जातीचे मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेतलेले आहे. हिंदु धर्मामुळे सर्वच बौद्धिक गुलामगिरीत सापडले आहेत हे खरे, पण त्यामुळे ते समदुखी आहेत असे कोणी समजू नये. कारण या बौद्धिक गुलामगिरीच दुष्परिणाम सर्वाना भोगावे लागत नाहीत. स्पृश्य वर्गाच्या ऐहिक सुखावर या बौद्धिक गुलामगिराचा कोणत्याही प्रकारचा अनिष्ट परिणाम होऊ शकत नाही. ते जरी वेदांचे गुलाम झाले, स्मृतीचे दास असले, महाजनांचे गतानुगतिक बनले तरी हिंदू समाजाच्या व्यवहारात त्यांना वेदांना, स्मृतानी व महाज़नांना उच्च पद दिलेले आहे, दुसऱ्यावर हुकमत गाज़विण्या करिता त्यांना अधिकार दिलेला आहे. सारा हिंदू धर्म वरिष्ट वर्गाच्या हिंदूंनी वरिष्ट वर्गाच्या हिंदूंच्या संवर्धनाकरिता रचलेला आहे, ही गोष्ट अगदी निर्विवाद आहे. ज्याला ते धर्म म्हणतात त्या धर्मात तुम्हाला गुलामांची भूमिका दिलेली आहै. इतकेच नव्हे तर या गुलामगिरीतून तुमची सुटका होऊ नये. अश्या प्रकारची व्ययस्था हीं त्या धर्मात केलेली आहे, म्हणून हिंदु धर्मातील ह्या गुलामगिरीतून सुटका करून घ्यायघी तुम्हाला जितकी जरुरी आहे तितकी हिंदूंऩा नाही. अश्या रीतीने विचार केला असता. हा हिंदु धर्म तुम्हाला दोन्ही तान्हेने मारक झाला आहे. या धर्माने तुमचे मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेऊन तुम्हाला गुलाम केले आहे; व याच धर्माने तुम्हाला व्यवहारात गुलामगिरीच्या दशेत आणून टाकले आहे. तुम्हाला जर स्वातंत्र्य हवे असेल तर तुम्हाला धर्मांतरच केले पाहिजे.

• अस्पृश्यातील संघटन आणि धर्मांतर

अस्पृश्यता निवारणाची जी आज चळवळ चालू आहे त्या चळवळीवर अशी टीका करण्यात येते कि अस्पृश्य वर्गात ज्या निरनिराळ्या जातीचा समावेश झालेला आहे, त्या जातीत ही परस्परांतील व्यवहारामध्ये जातीभेद पाळण्यात येतो नव्हे अस्पृश्यता पाळण्यात येते. महार मांग एकमेकांच्या हातचे खात नाहीत. दोघेही मुंग्यासारख्या जातीला शिवत नाहीत व त्यांच्याशी अस्पृश्यता पाळतात. परस्पर जातीभेद अस्पृश्यता पाळणाऱ्या लोकांना वरच्या जातीकडून तुम्ही जातीभेद मोडा, अस्पृश्यता मानू नका, असे म्हणण्याचा काय अधिकार आहे? असा प्रश्न नेहमी विचारण्यात येतो. तुम्ही आपसातील जातीभेद व अस्पृश्यता नाहीशी करा मग आमच्याकडे दाद मागाण्यास या, असा साळसूदपणाचा सल्ला त्यांना देण्यात येत असतो. या टिकेच्या मुळाशी असलेल्या कधेत सत्य आहे, हे आपल्यापैकी सर्वाना कबूल करावे लागेल. पण त्या टिकेत केलेला आरोप मात्र खोटा आहे. अस्पृश्य वर्गात समाविष्ट झालेले लोग जाताभेद पाळतात व काही अस्पृश्यता पाळतात, या गोष्टीचा इंकार करता येणे शक्य नाही, या मोष्टी मान्य करणे प्राप्त असले तरी या अपराधाला तें कारणीभूत आहेत असे म्हणणे निखालस खोटे आहे, जातीभेदाचा व अस्पृश्यतेचा उगम अस्पृश्य लोकांपासून झालेला नाही. जातीभेदाचा व अस्पृश्यतेचा उगम वरिष्ट वर्गीय हिंदूंच्या हातून झालेला आहे, जातीभेदाचा व अस्पृश्यतेचा उगम वर अस्पृश्य लोकांपासून झालेला नाही, जातीभेदाचा व अस्पृश्यतेचा पायंडा त्यांनी घातलेला आहे. जातीभेद व अस्पृश्यता पाळण्याचा धडा वरिष्ट वर्गीयांनी दिलेला आहे. ही गोष्ट जर सत्य असेल तर जाताभेदाच्या व अस्पृश्यतेच्या रुढीची जबाबदारी स्पृश्य वर्गावरच पडते, अस्पृश्य वर्गावर ती पडू शकत नाही अस्पृश्य वगचि लोक जातीभेद व अस्पृश्यता पाळतात वरच्या वर्गातील लोकांनी दिलेला धडा गिरवीत आहेत. तो धडा जर खोटा आहे तर त्याचे पाप ज्यांनी तो धडा दिला त्याच्यावरच येऊन पडते. त्यांनी गिरवीला त्याच्यावर येऊन पडू शकत नाही. हे उत्तर जरी समर्थक असले तरी या उत्तराने माझे स्वत:चे समाधान होऊ शकत नाहीं. ज्या कारणामुळे अस्पृश्यता व जातीभेद हा आपल्या मध्ये शिरला त्या कारणाला आपण जरी जबाबदार नसतो तथापि आपल्या मध्ये जो जातीभेद व जी अस्पृश्यता नांदत आहे तिचा धिक्कार न करणे, ती आहे तशीच चालू देणे आपल्याला इष्ट नाही. अस्पृश्यतेचा व जातीभेदाचा शिरकाव करण्यास जरी आपण जवाबदार नसलो तरी ती घालवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. हा जबाबदारी आपण सर्वाना ओळखली आहे. याबद्दल मला समाधान वाटते. माझी खात्री आहे कि महार जातीत असा कोणीही पुढारी नाही कि जातीभेद पाळावा असे तो म्हणतो. तुलनाच करावयाची झाली तर तो पुढाऱ्यांमध्येच केली पाहिजे. महारातील शिकला सावरलेला वर्ग घेतला आणि ब्राहाणातील शिकला सावरलेला वर्ग ज़री घेतला व दोघांची तुलना केली तर अस्पृश्य वर्गातील सुशिक्षित वर्ग जातीभेद मोडायला जास्त अनुकूल आहे. हि गोष्ट कोणास ही कबूल करावी लागेलं. इतकेच नव्हे तर ती गोष्ट कृतीने हि सिद्ध करून देता येईंल. महारातील सुशिक्षित वर्ग या सुधारायला अनुकूल आहे हे सिद्ध करून देता येईंल. आज़ महारांमध्ये असा एकही मनुष्य सापडायचा नाही कि जो महार मांगात रोटी व्यवहार व्हावा याच्या विरुद्ध असेल. आपल्यातील जातीभेद मोडण्याचा आवश्यकता तुम्ही ओळखता या गोष्टीबद्दल मला मोठ समाधान वाटते व मी तुमचे अभिवादन करू इच्छितो. परंतु अस्पृश्यांतील जातीभेद मोडण्याचा प्रयत्न कसा यशस्वी करता येईल याचा तुम्ही विचार केला आहे काय? सहभोजने केल्याने किंवा क्वचित प्रसंगा सहविवाह केल्याने जातीभेद मोडू शकत नाहीत. जातीभेद हि एक मानसिक स्थिती आहे. एक मानसिक व्यथा आहे. हि मानसिक व्यथा जडण्याचे कारण हिंदु धर्माची शिकवण हि आहे. आपण जातीभेद पाळतो, अस्पृश्यता पाळतो याचे मुख्य कारण ज्या हिंदु धर्मात आपण आहोत तो धर्म तसे करावयास सांगतो म्हणून. वस्तू कडू असेल तर ती गोड करता येईल. खारट असेल तर तुरट असेल तर तिची रूची बदलता येईल पण विषाचे अमृत करता येणार नाही. हिंदु धर्मात राहून जातीभेद नष्ट करू असे म्हणतो म्हणजे बिषाचे अमृत करू असेच म्हणण्यासारखे आहे.

अर्थात ज्या धर्मात माणसाची घाण माणसाने मानली पाहिजे अशी शिकवण देण्यात येत आहे ल्या धमा धर्मात त आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत जातीभेद नाहीसा होणार नाही. आपल्या मनातील जातीभेद ब अस्पृश्यता नाहीशी करावयाची असल्यास त्यांना धर्मांतर करणे हा एकच रामबाण उपाय आहे.

• नामांतर आणि धर्मातर

येथपर्यत धर्मातराचा कारणमीमांसा तुमच्यापुढे मी मांडली आहे. हि कारणमीमांसा तुम्हाला विचार प्रवर्तक होईल अशा मला आशा आहे. हि कारणमीमांसा ज्यांना खोल आणि गहन अशा वाटत असेल त्यांना या विषयाचा सहज समज पडावा म्हणून मी काही साधे बालबोध विचार तुमच्या पुढे मांडणार आहे. या धर्मांतराच्या प्रश्नात नवे असे काय आहे? खरे म्हटले असता हिंदूंचा आणि तुमचा सामाजिक संबंध काय आहे? जितके मुसलमान लोक हिंदूपासून भिन्न आहेत तितकेच तुम्ही हि  हिंदूपासून भिन्न आहात. खिस्ती समाज हिंदूपासून जितका भिन्न आहे तितकेच तुम्हीही हिंदूपासून भिन्न आहात. ख्रिस्ती व मुसलमान यांच्याशी जसा हिंदूंचा रोटी बेटी व्यवहार होत नाही, तसा तुमच्याशी हि होत नाही. तुमचा आणि हिंदूंचा समाज हे आता सुद्धा निरनिराळे, वेगवेगळे दोन समाज आहेत. धर्मातर केल्याने एका समाजाचे दोन तुकडे करण्यात आले, असे कोणालाही म्हणता यावयाचे नाही व कोणालाही तसे वाटावयाचे नाही. आज़ जर तुम्ही निराळे आहात तसेच धर्मातर केल्यामुळे निराळे होणार आहात. धर्मातराने नवे असे काही होणार नाही हे जर खरे आहे तर धर्मातराचा बाऊ कोणाला कां वाटावा हे मला समजत नाही. दुसरे असे की धर्मातराचे महत्त्व तुम्हाला जरी पटले नसले तरी नामांतराचे महत्त्व तुम्हा सर्वाना पटले आहे ही गोष्ट निर्विवाद आहे. तुमच्यापैकी कोणालाही तुझी जात काय म्हणून विचारले तर तो चोखामेळा हरिजन वेगैर सांगतो. पण महार हे नाव सांगत नाही. नामांतर करण्याचा जरुरी पडल्या शिवाय कोणीही नामांतर करणार नाही. अशा प्रकारचे नामांतर करण्याचे कारण अगदी सोपे आहे. अपरिचित अशा माणसाला अस्पृश्य कोण व स्पृश्य कोण हे सांगता येणार नाही आणि म्हणून जोपर्यंत जात कळली नाही तोपर्यंत स्पृश्य हिंदूंच्या मनात कोणत्याही प्रकारचा दूषित भावना उत्पन्न होत नाही. प्रवासात अपरिचित अस्पृश्य व स्पृश्य बंधुभावाने वागत असलेले दिसतात. एकमेकांपासून विडीपान घेतात. फळफळावळ घेतात. परंतु त्याच माणसास ज्याच्याशी आपण व्यवहार करतो त्याचा जात कळली व त्याची जात अस्पृश्य आहे असे समजले की त्याच्या मनात तिरस्कार उत्पन्न होते, त्याला तिडीक येते; व आपल्याला फसवले म्हणून त्याला क्रोध येऊन प्रवासात ज़डलेल्या मैत्रीचे पर्यवसान शिवीगाळीत व मारामारीत होते हा अनुभव पुष्कळांना असेल, अशी माझी खात्री आहे. हा असा प्रकार कां होतो, तें तुम्हा सर्वास अवंगतआहे. तुम्हाला जी ही जातीवाचक नावे प्राप्त झालेली आहेत त्या नावांना इतका दुर्गधी लागलेली आहे कि त्यांचा उच्चार केला असताना देखील स्पृश्य लोकांना मळमळून येते. आणि म्हणूनच तुम्ही स्वत:ला महार न म्हणता, चोखामेळा म्हणुन लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करता, परंतु त्याने लोक फसत नाहीत याचा ही तुम्हाला अनुभव आहेच. कारण चोखामेळा म्हटले काय किंवा हरिजन म्हटले काय जे समजावयाचे ते समज़तातच. तुम्हाला नामांतराची आवश्यकता भासते हे तुमच्या वर्तणुकीनेच तुम्ही सिद्ध केले आहे. मला तुम्हाला एवढेच विचारावयाचे आहे की नामांतर करणे हे जर तुम्हाला अवश्य वाटते तर मग तुम्हाला धर्मांतर करण्यास काय हरकत असावी तो धर्मांतर हे एका दृष्टीने नामांतरच आहे. धर्मांतराने होणारे नामांतर हे तुम्हाला जास्त फायदेशीर पडेल. मुसलमान म्हणवून घेणे, खिस्ती म्हणवून घेणे, बौद्ध म्हणवून घेणे, शीख म्हणवून घेणे हे धर्मांतर आहेच पण नामांतर ही आहे, ते खरे नामांतर आहे. या नामांतराला दुर्गधी नाही. हे नामांतर आमूलाग्र आहे त्याचा शोध कोणी करू शकणार नाही. परंतु चोखामेळा, हरिजन या जुन्या नावाची घाण लागल्या शिवाय राहणार नाही. जोपर्यत तुम्ही हिंदु धर्मात राहाल तोपर्यंत तुम्हाला या नामांतरापासून काही अर्थ नाही. नव्या नावाला नामांतर करावेच लागेल. कारण नुसते हिंदू म्हणवून चालणार नाही. हिंदू हा कोणी मनुष्य प्राणी आहे असे कोणीच ओळखीत नाही. महार अमे सांगून भागणार नाहीं कारण त्या नावाचा उच्चार केल्या बरोबर कोणी जवळ येणार नाही. असल्या मधल्या स्थितीत घोटाळत राहण्यापेक्षा आज़ हे नाव, उद्या ते नाव, असे नामांतर करीत बसण्यापेक्षा धर्मांतर करून कायमचे नामांतर तुम्ही कां करू नये, असा तुम्हाला माझा प्रश्न आहे.

• विरोधकांची भूमिका

धर्मांतराची चळवळ सुरू झाल्यापासून अनेक लोकांना त्या चळवळीच्या विरुद्ध अनेक आक्षेप घेतलेले आहेत. त्या आक्षेपात किती सत्य आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. काही हिंदू लोक धार्मिंकपणाचा मोठा आव आणून तुम्हाला अरे सांगत आहेत की "धर्म हा काही उगभोगाची वस्तू नव्हे. ज्याप्रमाणे आपण आज एक कोट घालतो, दुसऱ्या दिवशी दुसरा घालतो त्याचप्रमाणे धर्मात फेरबदल करता येणार नाही. हिंदु धर्माला झुगारून देऊन तुम्ही परधर्मात जाता तर जे तुमचे पूर्वज इतके दिवस या हिंदु धर्मात राहिले ते मूर्ख होते कि काय?" हे असा प्रश्न काही शहाण्यांनी उपस्थित केला आहे. माझ्या दृष्टीने या आक्षेपात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. केवल पूर्वजांचा धर्म म्हणूनच त्याला चिटकून राहावे हे म्हणणे एखाद्या मूर्खाला शोभू शकेल. कोणीही शहाणा माणूस अशा प्रकारची भूमिका घेऊ शकणार नाही. केवळ पूर्वजांचा धर्म म्हणून धर्मांतर करू नये, असे म्हणण्याऱ्या लोकांनी इतिहास वाचला नसेल असेच म्हणणे प्राप्त आहे. पूर्वीचा आर्याचा धर्म, ज्याला वैदिक धर्म म्हणतात, त्यात गोमांस भक्षण करणे, दारु पिणे, स्वैर वर्तन करणे या तीन गोष्टीत मुख्यतः धर्म साठविला होता. तो धर्म हजारों वर्ष हिंदुस्थानातील लोकांनी पाळला व अजून हि काही ब्राह्मण लोकांना त्या धर्माकडे जाण्याची हुक्की येते. केवळ पूर्वजांचाच धर्म पाळायचा तर वैदिक धर्म सोडून हिंदुस्थानातील लोकांनी बौद्ध धर्म का नाकारला? तो वैदिक धर्म त्यांनी का नाकारला? या धर्मात आमचे पूर्वज राहिले हि गोष्ट खरी आहे. परंतु ते लोक स्वसंतोषाने स्वखुशीने राहिले असे मात्र माझ्याने म्हणवत नाही. या देशात अनेक कालपावेतो चातुर्वर्णयाची संख्या अव्याहत चालु होती या चातुर्वर्णयात ब्राह्मणांनी विद्या शिकवी, क्षत्रियांनी लडाई करावी, वैश्यांनी पैसा मिळवावा व शूद्रानी सेवा करावी असा नियमबद्ध आयुष्यक्रम बांधलेला होता. या आयुष्यक्रमात शूद्र लोकांजवळ विद्या नव्हती, धन नव्हते आणि अन्न वस्त्र नव्हते. अशा विपत्र व निशस्त्र स्थितीत ज्या तुमच्या पूर्वजांना राहावे लागले त्यांना हा धर्म स्वसंतोषाने स्वीकारला असे कोणीही शहाण्या माणसास म्हणता येणार नाही. या तुमच्या पूर्वजांना या धर्मा विरुद्ध बंड करणे शक्य झाले असते काय? याचा विचार अवश्य करणे प्राप्त आहे. त्यांना बंड करता आले असते व त त्यांना केले नसते तर हा धर्म त्यांना स्वसंतोषाने पत्करला असे म्हणता आले असते. परंतु खरी वस्तुस्थिती पाहिली असताना त्यांचा निरुपाय झाल्यामुळेच या धर्मात त्यांना राहावे लागले, हा गोष्ट निर्विवाद आहे. या दृष्टीने पाहिले असताना हा हिंदू धर्म आमच्या पूर्वजांचा धर्म नसून, तो त्यांच्यावर जबरदस्तीने लादलेली एक गुलामगिरी आहै. त्या गुलामगिरीतून आपली सुटका करून घेण्याची साधने त्यांना उपलब्ध नव्हती म्हणून त्यांना त्या गुलामगिरी विरुद्ध बंड करता आले नाही व गुलामगिरीतच राहावे लागले. याबद्दल त्यांना कोणी दूषण देणार नाही. कोणी झाली तरी त्याची किवच करील. परंतु हल्लीच्या पिढीवर तशा प्रकारची जबरदस्ती कोणालाही करता येणार नाही. त्यांना सर्व बाबतीत स्वातंत्र्य आहे. त्या स्वातंत्र्याचा उपयोग करून जर त्यांनी आपली स्वत:ची सुटका करून घेतली नाही तर त्यांच्या सारखेच नाच, त्यांच्या सारखे अधर्म व त्यांच्या सारखे परोपजीवी दुसरे कोणीच नाहीत, असे मोठ्या कष्टाने म्हणावे लागेल.

• माणूस आणि पशूतील फरक

केवल पूर्वजांचा म्हणूनच त्याला चिटकून राहावे, हे म्हणणे मूर्खाला शोभू शकते. कोणीही शहाणा मनुष्य अशा प्रकारची भूमिका घेऊ शकणार नाही. ज्या परिस्थितीत मनुष्य सापडला त्याच परिस्थितीत त्याने आज़न्म राहावे, हे सांगणे पशूना शोभेल माणसांना शोभू शकणार नाही. माणसात व पशूत  कोणत्या प्रकारची तफावत असेल तर ती हीच की पशु आपली प्रगती करून घेऊ शकत नाही. माणूस अपली प्रगती करून घेऊ शकतो स्थित्यंतर केल्या शिवाय प्रगती होऊ शकत नाही धर्मातर हे एक प्रकारचे स्थित्यंतर आहे आणि जर धर्मातर केल्या शिवाय प्रगती होत नसेल तर धर्मातर करणे आवश्यक आहे. केवळ वडिलांचा धर्म ही बाब प्रगती प्रिय माणसाच्या आड येऊ शकत नाहीं

धर्मातराच्या विरुद्ध आणखी ही एक मुद्दा सांगण्यात येतो. तो असा की, "धर्मातर हा एक प्रकारचा पळपुटेपणा आहे. आज हिंदुतील अनेक लोक हिंदु धर्माची सुधारणा करण्या करिता सिद्ध आहेत. त्यांच्या सहाय्याने जातीभेद व अस्पृश्यता नाहीशी करता येण्या सारखी आहे. अशा समयी धर्मातर करणे सर्वस्वी अयोग्य आहे. असे काहीचे म्हणणे आहे. हिंदूतील समाज सुधारकांबद्दल कोणाचे काय मत असेल ते असो. माझ्या मनात त्यांच्या बद्दल अत्यंत तिटकारा आहे. मला त्यांचा चांगला अनुभव आहे आणि या अर्धवट लोकांचा मला अगदी विट आला आहे. ज्या लोकांना आपल्या जातीत राहावयाचे आहे, आपल्या जातीत मरावयाचे आहे. आपल्या जातीत लग्न करावयाचे आहे, त्या लोकांना "आपण जातीभेद मोडणार आहोत" अली खोटी वल्गना करावी व त्या वल्गनेवर अस्पृश्य लोकांनी विश्वास ठेवला नाही, म्हणून संतप्त व्हावे, हि गोष्ट मोठी आश्चर्याची आहे. या लोकांच्या वल्गना ऐकल्या म्हणजे अमेरिकेताल निग्रो लोकांच्या सुटकेकरिता ज्या गोऱ्या अमेरिकन लोकांना प्रयत्न केला, त्याची मला आठवण होते. एकेकाळी अमेरिकेतील निग्रो लोकांची स्थिती हिंदुस्थानातील अस्पृश्य वर्गा प्रमाणेच होती. त्यांची गुलामगिरी कायद्याने प्रस्थापित केलेली होती. तुमची गुलामगिरी धर्माने प्रस्थापित कलेली आहे. एवढाच काय तो फरक आहे. या निग्रोंचा त्या गुलामगिरीतून सुटका करण्याकरिता अमेरिकेतील काही सुधारक प्रयत्न करीत होते. पण हिंदू समाज सुधारणकांची आणि निग्रोची सुटका करणाऱ्या अमेरिकेतील गोऱ्या सुधारकांची तुलना करता येईल काय? काळ्या शिद्दी लोकांनी गुलामगिरीतून सुटका व्हावा म्हणून आपल्याच रक्त मांसाच्या गोऱ्यांशी अमेरिकन सुधारणा वाद्यांनी तुंबळ युद्ध केले. त्यांना गुलामगिरीत ठेवावे असे म्हणणाऱ्या असंख्य गोऱ्या लोकांचे प्राण घेतले व आपल्या पैकी असंख्य लोकांच्या प्राणाची आहुती दिली. त्या प्रसंगाचे वर्णन इतिहासातून वाचले आणि आमच्या समाज सुधारकांचे चित्र डोळ्यांपुढे ठेवले म्हणजे 'कहा राजा कहा पोतराजा' असेच म्हणणे भाग पडते. सुधारक म्हणून म्हणविणाऱ्या हिंदुस्थानातील अस्पृश्यांच्या कैवाऱ्यांस असे विचारणे प्राप्त आहे की अमेरिकेतील गोऱ्या लोकांनी निग्रोच्या सुटकेकरिता जी आपआपसात यादवी केली तशी यादवी करण्यास तुम्ही सिद्ध आहात का? व सिद्ध नसाल तर सुधारणेच्या व्यर्थ वग्लना करण्यात काय हासिल आहे? हिंदू मधले फार मोठ्यातले मोठे अस्पृश्यतेंच्या उन्नतीकरिता झटणारे म्हटले म्हणजे महात्मा गांधी त्यांची मजल किती लांब जाऊ शकते? इंग्रज़ सरकार विरुद्ध नि:शस्त्र प्रतिकाराचा लढा लढविणारे महात्मा गांधी अस्पृश्य वर्गावर जुलूम करणाऱ्या हिंदूंच मन देखील दुखवावयाला तयार नाहीत. त्यांच्या विरुद्ध सत्याग्रह करावयाला तयार नाहीं. इतकेच नव्हे तर त्यांच्या विरुद्ध कायदेशीर इलाज करावयाला देखील तयार नाहीत. या सुधारकांचा काय उपयोग आहे, मला कळत नाही.

• खरे चूकते अस्पृश्यांचेच

काही जण अस्पृश्यांच्या सभेत मोठ्या तावातावाने अस्पृश्यांना शिव्या देतील; काही जण अस्पृश्यांच्या सभेत येऊन मोठ्या आढ्यतेने अस्पृश्यांना सांगतील की बाबांनो, तुम्ही स्वच्छ राहा, शिक्षण घ्या तुमच्या पायावर उभे राहा वगैरे. खरे म्हटले असता कोण आरोपी असेल तर तो स्पृश्य वर्ग, कोणाचे चुकत असेल तर ते स्पृश्य वर्गाचे. पण त्या स्पृश्य वर्गाच्या सभा करून त्यांची कान उघडणी करतील तर हराम आहे. हिंदु धर्मातच राहून तुम्ही आपला लढा चालू ठेवा, तुम्ही आम्ही मिळून तो यशस्वी करू असे सांगणाऱ्या सुधारकांना दोन गोष्टीची आठवण करून देणे अनावश्यक वाटते. गेल्या महायुद्धात एका अमेरिकन व इंग्लिश माणसामध्ये लडाई संबंधाने झालेला संवाद माझ्या वाचनात आलेला आहे. तो उदबोधक असल्या कारणाने त्याचा याप्रसंगी उल्लेख करणे उचित वाटते. संवाादाचा बिषय लढाई कोठपर्यत चालू ठेवावयाची या संबंधाने होता. त्या अमेरिकन गृहस्थाच्या प्रश्नाला उत्तर देताना इंग्रज़ माणसाने मोठ्या तोराने सांगितले कि शेवटचा फ़्रेंच माणूस ठार होईपर्यत आम्ही हि लडाई लढू, हिंदू समाजातील सुधारक जेव्हा असे म्हणतात की, अस्पृश्यतेचा लढा हि आम्ही शेवटपर्यंत लढू. तेव्हा शेवटचा अस्पृश्य ठार होईपर्यत आम्हा लढू, असाच त्याचा अर्थ मी तरी निदान करतो. दुसऱ्याचे शीर तळहातावर घेऊन युद्धाला निघणाऱ्या योद्धयापासून विजयश्रीचा आशा धरणे कितपत रास्त आहे, हे ठरविणे तुम्हाला काही अवघड जाऊ नये. आमच्या लढ्यात जर आम्हीच मरणार आहोत तर मग भलत्याच ठिकाणी लढा करण्यात काय हासिल आहे? हिंदु समाजाची सुधारणा करणे हे आपले ध्येय नाही, हे आमचे कार्य नाही. आमचे स्वातंत्र्य मिळविणे हे आमचे ध्येय आहे. या पलीकडे आम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्तव्य नाही. धर्मातर करून जर आम्हाला आमचे स्वातंत्र्य मिळू शकते तर आम्ही हिंदू समाजाच्या सुधारणेचा लढा काय म्हणून आमच्या अंगावर घ्यावा? व त्या लढ्यात आमच्या सामर्थ्याची, शक्तीची व द्रव्याची आहुती काय म्हणून द्यावी? हिंदू समाजाची सुधारणा करणे हा अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीचा मुख्य हेतू आहे असा कोणीही आपला गैरसमज करून घेऊ नये. अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीचा मुख्य हेतू अस्पृश्यांना सामाजिक स्वातंत्र्य मिळवून देणे हाच आहे आणि ते स्वातंत्र्य धर्मांतर शिवाय प्राप्त होणार नाही. हे हि तितकेच खरे आहे. अस्पृश्यांना समतेची आवश्यकता आहे, हि गोष्ट मला मान्य आहे व समतेची प्राप्ती हा खरोखरीच त्याच्या चळवळीचा हेतू आहे. परंतु हि समता प्राप्त करून घेण्याकरिता त्यांनी हिंदु धर्मातच राहिले पाहिजे, नाहीतर समता प्राप्त व्हावयाची नाही, असे कोणालाही म्हणता येणार नाही. समता प्राप्त करून घेण्याचे दोन मार्ग मला दिसतात. हिंदु धर्मात राहून समता मिळवावयाला किंवा धर्मातर करून समता मिळवावयाची. हिंदु धर्मात राहून समता प्राप्त करायची झाल्यास नुसती शिवाशिव जाऊन कार्यभाग होणार नाही. रोटी व्यवहार व बेटी व्यवहार घडला तरच समानता प्राप्त होऊ शकेल. याचाच अर्ध असा कि चातुर्वर्णयाचा बिमोड झाला पाहिजे व ब्राह्मण धर्माचा विध्वंस झाला पाहिजे. ही गोष्ट शक्य आहे काय? व ही जर शक्य नसेल तर हिंदु धर्मात राहून समतेच्या वागवणुकीची अपेक्षा करणे शहाणपणाचे होईल काय? व या प्रयत्नात तुम्हाला यश येईल काय? त्या मानाने धर्मांतराचा मार्ग किती तरी सोपा आहे. हिंदु समाज़ मुसलमान समाजाला समतेने वागवितो. हिंदु समाज़ ख्रिस्ती समाजाला समतेने वागवितो अर्थात धर्मांतराने सहजगत्या सामाजिक समता प्राप्त होऊ शकते. जर खरे आहे तर मग धर्मांतरा सारख्या साध्या सोप्या मार्गाचा तुम्ही अवलंब का करू नये? माझ्या मते धर्मांतराचा मार्ग हा जसा अस्पृश्य लोकांना तसाच हिंदुना ही सुखाचा होणार आहे. हिंदु धर्मात राहाल तोपर्यंत तूम्हाला त्यांच्याशी शिवाशिवी करिता, पाण्या करिता, रोटी करिता, बेटी करिता भांडण करावे लागेल. व जोपर्यंत हे भांडण चालु राहील तोपर्यंत तुमच्यात आणि त्यांच्यात बखेडा माजेल व तुम्ही एकमेकांचे वैरी होऊन राहाल. धर्मांतर केले तर भांडणाचे सर्व मूळ नाहीसे होईल. तुम्हाला त्याच्या देवळावर हक्क  सांगण्याचा काही अधिकार राहणार नाही व जरुरी हि राहणार नाही. सहभोजन करा, सहविवाह करा वगैरे सामाजिक हक्काकरिता भांडण्याचे काही कारण उरणार नाही आणि हे भांडण जर मिटले तर उभयतांमध्ये प्रेम वाढून सलोखा उत्पन्न होईल. आज मुसलमान व खिस्ती समाजाचा व हिंदू समाजाचा परस्पर स्थिती काय आहे हे पाहा. तुमच्या प्रमाणे हिंदू लोक मुसलमानांना अगर खिस्ती लोकांना आपल्या देवळात घेत नाहीत. तुमच्या प्रमाणे त्यांच्याशी रोटी व्यवहार करीत नाहीत. बेटी व्यवहार करीत नाहीत, असे असताना त्यांच्यात आणि हिंदू मध्ये जो आज सलोखा आहे तो तुमच्यात आणि हिंदुत नाही हा जो फरक आहे त्याचे मुख्य कारण हेच की, तुम्ही हिंदु धर्मात राहिल्यामुळे हिंदू समाजाशी सामाजिक ब धार्मिक हक्कांकरिता तुम्हाला भांडावे लागते. परंतु ते हिंदु धर्मातून बाहेर गेल्यामुळे त्यांना हिंदू लोकांशी धार्मिक व सामाजिक हक्कांकरिता लढा चालविण्याचे कारण पडत नाही. दुसरे असे कि हिंदू समाजात त्यांना कोणत्याही प्रकारचे सामाजिक हक्क नसले, म्हणजे त्याच्याशी रोटी व्यवहार होत नसला व बेटी व्यवहार होत नसला तरी हिंदू समाजात त्यांना असमानतेने वागवत नाही. धर्मातराने ज़र समता प्राप्त होऊ शकते. धर्मातराने ज़र हिंदू आणि अस्पृश्य यांच्या मथ्ये सलोखा उत्पन्न होऊ शकतो तर तो समतेचा साधा आणि सूखकर मार्ग अस्पृश्य लोकांनी का स्वीकारू नये? अशा रितीने पाहिले असताना हा धर्मातराचा मार्ग खऱ्या स्वातंत्र्याप्रत नेणारा आहे व त्यापासून खरी समता प्राप्त होणार आहे. धर्मातराचा मार्ग हा पळपुटेपणाचा मार्ग नाही, तो एक शहाणपणाचा मार्ग आहे.

धर्मातराच्या आड आणखी एक बाब उपस्थित करण्यात येते. जातिभेदाला त्रासून धर्मातर करण्यात काही अर्थ नाही. असा युक्तिवाद काही हिंदू लोक करतात. कोठे हि गेलात तर तेथे जातीभेद आहेतच. ख्रिस्तात गेलात तरी त्याच्यात हि जातीभेद आहेत असे हिंदू लोक सांगतात. दुदैवाने हि गोष्ट कबूल करणे प्राप्त आहे कि हिंदुस्तानातील अन्य धर्मीय समाजामध्ये सुद्धा जातीभेदाचा शिरकाव झाला आहे. पण या पापाचे धनी हिंदू लोकच आहेत. मूळात हा रोग त्यांच्यातून उद्भवलेला आहे. त्यांचा संसर्ग मग इतर लोकांना झाला आहे ही त्यांच्या दृष्टीने नाईलाजाची गोष्ट आहे. ख्रिस्ती व मुसलमान यांच्या मध्ये जरी जातीभेद असला तरी तो जातीभेद हिंदूतील जातिभेदासारखा आहे. असे म्हणणे कोतेपणाचे लक्षण आहे असे म्हणावे लागेल. हिंदू जातीतील जातीभेद व मुसलमान व ख्रिस्ती यांच्यातील जातीभेद या दोघांमध्ये मोठे अंतर आहे, पहिल्या प्रथम हि गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे कि मुसलमान व ख्रिस्ती यांच्या मध्ये जरी जातीभेद असला तरी तो जातीभेद समाजाचे प्रमुख अंग असे कोणालाही म्हणता येणार नाही. "तू कोण?" याला "मी मुसलमान आहे", "मी ख्रिस्ती आहे" एवढे उत्तर दिले असताना त्या उत्तरावरून सर्वांचे समाधान होते. "तुझी जात काय?"असे विचारण्याची कोणास ही आवश्यकता भासत नाही. परंतु कोणीही हिंदूला "तू कोण?" असा प्रश्न विचारला असताना "मी हिंदू" अरे उत्तर दिले तर तेवढ्याने कोणाचे ही समाधान होऊ शकत नाही. "तुझी जात काय?" असा प्रश्न विचारण्यात येतो व त्यांचे उत्तर दिल्या शिवाय कोणालाही त्याच्या स्थितीचा उमज पडत नाही यावरून हिंदू समाजातील जातीयता कसे प्राधान्य देण्यात आले आहे व मुसलमान व ख्रिस्ती समाजात तिला कसे गौणपद प्राप्त झाले आहे. हा मुद्दा आपोआप सिद्ध होऊ शकतो. याशिवाय हिंदूतील व इतरांमधील जातीभेद यामध्ये आणखी ही एक महत्वाचा फरक आहे. हिंदूतील जातीभेदाच्या मुळाशी हिंदूचा धर्म आहे. मुसलमान व ख्रिस्ती यांच्यातील जातीभेदाच्या मुळाशी त्याच्या धर्माचे अधिष्ठान नाही. हिंदूंनी 'जातीभेद मोडू' असे म्हटलं असता त्यांचा धर्म त्यांच्या आड येईल. परंतू ख्रिस्ती व मुसलमान लोकांनी आपल्यातील जातीभेद मोडण्याचा उपक्रम आरंभिला तर त्यांचा धर्म त्यांच्या विरुद्ध येऊ शकणार नाही. हिदूंना धर्मनाश केल्या शिवाय जार्ती विध्वंसन करता येणार नाहीं मुसलमान व ख्रिस्ती लोकांना जातिनाशन करण्याकरिता धर्मनाशन करण्याचे काही कारण नाहा. जातिनाशनाच्या क्रमात त्यांचा धर्म त्यांच्या आड येणार नाही. इतकेच नव्हे तर त्यांच्या धर्माचा अशा कार्याला पार मोठा पाठिंबा मिळू शकेल. जातीभेद सर्वत्रच आहे, असे जरी कबूल केले तरी हिंदु धर्मातच राहा, असा निष्कर्ष त्यापासून निघू शकत नाही, जातीभेद हि गोष्ट ज़र अनिष्ट असेल तर ज्या समाजात गेले असताना जातीभेदाची तीव्रता विशेष नाही किंवा ज्या समाजात गेले असताना जातीभेद लवकर, सहन व सुलभपणे मोडता येईल त्या समाजात जा, हाच खरा तर्क शुद्ध सिंद्धांत आहे असे मानावे लागेल.

"नुसत्या धर्मातराने काय होणार? तुम्ही आपली आर्थिक स्थिती, शैक्षणिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करा." असे काही हिंदू लोक सांगत आहेत. या प्रश्नाने आपल्या पैकी काही लोक संभ्रमून जाण्याचा संभव आहे आणि म्हणून त्या प्रश्नाचा विचार करणे मला आवश्यक वाटते. प्रथमतः प्रश्न असा का तुमचा आर्थिक व शैक्षणिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न कोण करणार आहे? तुम्ही किंवा तुम्हाला असा उपदेश करतात ते? हिंदू लोक तुम्हाला असा उपदेश करतात ते बोलण्या पलीकडे तुमच्या करिता काही करतील असे मला वाटत नाही व करण्याची त्यांची तयारी ही मला दिसत नाही. उलट जो तो हिंदू आपापल्या जाती पुरती दृष्टी ठेवून आपापल्या जातीचा आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता झटत आहे. ब्राह्मण लोक ब्राह्मण बायकांकरिता सुतिकागृहे, ब्राह्मण मुलांकरिता स्कॉलर शिप, ब्राह्मण बेकारांना नोकऱ्या मिलवून देण्याची सोय, यामध्ये गुंतले आहेत. सारस्वत तसेच करित आहेत. जो तो आपापल्याकरिता व ज्याला कोणी नाही त्याचा वाली परमेश्वर, अशी स्थिती आहे. तुमची उन्नती तुम्हीच करावयाची दुसरा कोणी तुम्हाला मदत करणार नाही अशी जर खरी स्थिती आहे तर या लोकांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्यात काय हासिल आहे? नुसती दिशाभूल करून कालक्षेप करण्या पलीकडे यांचा दुसरा काही हेतू दिसत नाही. तुमची स्थिती तुम्हीच सुधारावयाची, असेच जर या हिंदू लोकांचे म्हणणे असेल तर त्यांच्या तर्कटांकडे लक्ष देण्याचे कोणाला काही कारण नाही व उपदेश करण्याचा त्यांना कोणाला काही अथिकार हि नाही. तथापि एवढेच सांगून हा प्रश्न सोडून देण्याचा माझा विचार नाही त्याचे खंडण करणे मला आवश्यक आहे.

• नुसत्या धर्मांतराने काय होणार?

असे जे हिंदू लोक विचारतात त्यांच्या विचार शून्यतेचे मला मोठे आश्चर्य वाटते. हिंदुस्थानातील शीख, मुसलमान व ख्रिस्ती हे पूर्वाश्रमीचे हिंदूच होते व तेही बरेचसे शूद्र व अस्पृश्य होते. ज्या हिंदू लोकांनी हिंदू धर्म सोडून शीख धर्म स्वीकारला, ज्या हिंदू लोकांनी हिंदू धर्म सोडून ख्रिस्ती धर्म स्वीकारला त्यांचा काहीच अभ्युदय झाला नाही, असे या टिकाकारांना म्हणावयाचे आहे काय? व हे म्हणणे जर सत्य नसेल, धर्मांतराने त्यांचा उत्कर्ष झाला आहे हे जर कबूल करणे प्राप्त असेल तर मग धर्मांतराने अस्पृश्यांचे काहीच कल्याण होणार नाही असे म्हणणे किती अन्यायार्थ होईल याचा त्यांना अवश्य विचार करावा. धर्मांतराने काही होणार नाही या म्हणण्याचा गर्भित अर्थ धर्म हा अगदी कुचकामाची वस्तू आहे, असाच निघु शकतो. धर्म हा कुचकामाची वस्तू आहे, तिच्यापासून काही लाभ नाही, हानी नाही असे त्यांचे म्हणणे आहे, त्यांनी अस्पृश्यांनी हिंदू धर्मातच राहिलं पाहिजे असाच आग्रह का धरावा मला समजत नाही, त्यांना धर्मात काही अर्थ नाही असे वाटते तर कोणता धर्म सोडला आणि कोणता घेतला याबद्दल अशा लोकांनी वितंडवाद का करावा? नुसत्या धर्मांतराने काय होणार असे जे हिंदू लोक विचारतात त्यांना नुसत्या स्वराज्यापासून काय होणार, असे हिंदुस्थानातील लोकांना देखील विरारता येईल. प्रथम आर्थिक व शैक्षणिक प्रगती होणे आवश्यक आहे. हे ज़र खरे आहे तर नुसत्या स्वराज्याचा काय उपयाग? आणि नुसत्या स्वराज्यापासून जर देशाचा काही फायदा होत असेल तर धर्मांतरापासून अस्पृश्यांचा फायदा झालाच पाहिजे. खोल विचारांती सर्वास मान्य करावे लागेल जी जितकी स्वराज्याचा आवश्यकता हिंदुस्थानाला आहे तितकेच धर्मांतराची आवश्यकता अस्पृश्यांना आहे. धर्मांतर आणि स्वराज्य या दोघांचा अंतिम हेतू म्हणजे स्वातंत्र्य प्राप्ती आणि स्वातंत्र्य हे जर मनुष्य मात्राच्या जीवनाला आवश्यक अशी वस्तू आहे तर ज्या धर्मांतरापासून अस्पृश्यांना स्वतंत्र जीवन प्राप्त होऊ शकते ते धर्मांतर निरर्थक आहे, असे कोणालाही म्हणता येणार नाही.

• आधी उन्नती की आधी धर्मातर

या ठिकाणी आधी आर्थिक उन्नती की आधी धर्मातर या प्रश्नाचा ही विचार करणे मला आवश्यक वाटते. उन्नती आधी झाली पाहिजे असे म्हणणाऱ्या लोकांचे मत मला ग्राह्य होऊ शकत नाती आधी धर्मातर मग आर्थिक उन्नती किंवा आधी आर्थिक उन्नती मग धर्मातर हा वाद आधी राजकीय उन्नती कि आधी सामाजिक उन्नती या वादासारखा शुष्क आहे. समाजाच्या उन्नतीला अनेक साधनांची आवश्यकता असते व ता सर्वच साधने आपापल्या परी आवश्यक असतात. त्यात अमुक एकाचा उपयोग प्रथम करावयाचा व दुसऱ्याचा उपयोग नंतर व्यवस्था असा अनुक्रम नेहमीच ठेवता येणार नाहीं परंतु तसा अनुक्रम ठेवावा असाच जो आग्रह असेल तर आधी धर्मातर किंवा आधी आर्थिक उन्नती या प्रश्नाचे उत्तर आधी धर्मातर असेच या म्हणेन. जोपर्यत अस्पृश्यतेचा कलंक तुमच्यावर बसला आहे तोपर्यत तुमचा आर्थिक उन्नती कशी होऊ शकणार हेच मला समजत नाही. दुकानदारी करण्याच्या हेतूने तुम्हापैकी कोणी जर एखादे दुकान घातले व दुकानदार अस्पृश्य आहे असे कळले तर त्याच्यापामून कोणी तुम्हापैकी ही माल घेणार नाही. नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने जर तुम्हा पैकी कोणी एकाने नोकरीकरिता अर्ज केला व अर्जदार अस्पृश्य आहे असे समज़ले तर त्याला नोकरा मिळणार नाही. कोणाची शेती विकावयाची झाली व तुम्हा पैकी कोणी ती खरेदी करण्याचा विचार केला व मागणी करणारा अस्पृश्य आहे म्हणून समजले तर तुम्हाला ती जमीन कोणी विकणार नाही. आर्थिक उन्नतीचा कोणताही मार्ग तुम्ही स्विकारला तरी अस्पृश्यतेंमुळे कोणताही मार्गास तुम्हाला यश प्राप्ती होणार नाही. अस्पृश्यता हि एक तुमच्या उन्नतीच्या मार्गात कायमची धोड आहे. ता सरकविल्या शिवाय तुमचा मार्ग सुकर होऊ शकत नाही व धर्मांतर केल्या शिवाय हा धोड नाहिशी व्हायची नाही. तुमच्यातील काही तरुण लोक आज़ शिक्षणाच्या मागे लागले आहेत आणि या शिक्षणाकरिता जिकडून पेसा मिळेल तिकडून पैसा मिळविण्याचा हे प्रयत्न करीत आहेत. या पेशाच्या लालचिमुळे कित्येकच्या मनात आहोत तेथेचं, अस्पृश्यच राहून उन्नती करून घेण्याकडे प्रवृत्ती दिसून येते. परतुं आशा तरुणांना मी असा एक प्रश्न विचारू इच्छितो कि शिक्षण घेतल्या नंतर तुम्हाला तुमच्या शिक्षणानुरूप नोकरी मिळण्याचा मार्ग जो खुला झाला नाही तर तुम्ही शिक्षण घेऊन काय करणार आहात? आपल्यातील शिकलेल्यां पैकी पुष्कळसे लोक बेकार आहेत त्याचे कारण काय? माझ्या मते या बेकाराचे कारण पुष्कळ अंशानी अस्पृश्यता हेच आहे. अस्पृश्यतेमुळेच तुमच्या गुणांचे चीज होऊ शकत नाहीं अस्पृश्यतेमुळेच तुमच्या लायकीचे लाज होऊ शकत नाही. अस्पृश्यतेमुळेच तुम्हाला लष्करातून कडून टाकण्यात आले. अस्पृश्यतेमुळेच तुम्हाला पोलिसात घेत नाहीत. अस्पृश्यतेमुळेच तुम्ही पट्टेवाल्यांच्या जागा मिळवू शकत नाही. अस्पृश्यतेमुळेच तुम्ही कोना जागेला चढू शकत नाही. अस्पृश्यता हा एक प्रकारचा शाप आहे त्यापासून तुम्ही दग्ध झाला आहात व तुमच्या गुणांची राख रांगोळी झाली आहे. अशा स्थितीत तुम्ही गुण संपादन ते काय करणार? व केले तरी त्याचा काय उपयोग होणार? तुमच्या गुणांचे काही चीज़ व्हावे, तुमच्या शिक्षणाचा काही उपयोग व्हावा. तुमच्या आर्थिक उन्नतीची द्वारे खुली व्हावीत अशी तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आधी अस्पृश्यता घालविला पहिजे म्हणजेच धर्मांतर केले पाहिजे.

• धर्मांतर विरुद्ध काही शंका

येथवर धर्मांतर विरोधकांनी जा कारणे पुढे केलेला आहेत त्या कारणांचा विचार केला आहे. आता धर्मांतर विषयी सहानुभूती असणाऱ्या काही लोकांनी ज्या शंका प्रदर्शित केलेल्या आहेत त्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न मी करीत आहे. पहिल्या प्रथम आमच्या महारकी वतनाचे काय होईल, असा बऱ्याचशा महार लोकांना बाऊ वाटत आहे, असे माझ्या कानी आले आहे. वरिष्ठ जातीतील धर्मांतर विरुद्ध लोकांना तुम्ही धर्मांतर केले तर तुमच्या महारक्या जातील, अशी भीती गावोगावी महार लोकांना घातल्याचे माझ्या कानी आले आहे. महारक्या गेला तर मला स्वत:ला कोणत्याही प्रकारचा खेद वाटणार नाही हि गोष्ट तुम्हा सर्वाना माहित आहे. महारांना अघोगतीस नेणारी ज़र दलाली एखादी बाब असेल तर ती महारकी होय. हे माझे मत गेल्या दहा वर्षापासून लोकांपुढे मी मांडीत आलो आले आणि ज्या दिवशी या महारकीच्या बेडीतून तुमचा सुटका होईल ल्या दिवशी तुमच्या उद्धाराचा मार्ग मोकळा झाला असे मी समजेन. परंतु ज्या कोणाला महारकी हवी असेल त्या लोकांना मी एवढेच आश्वासन देऊ शकतो कि धर्मांतरामुळे महारकी वतनाला कोणत्याही प्रकारचा धोका पोहचू शकत नाही. या बाबतीत सन १८५० खालच्या कायद्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे. त्या कायद्याच्या कलमाप्रमाणे कोणाही माणसाच्या केवल त्याने धर्मांतर केले तेवढयाच कारणामुळे वारसाच्या अगर मालमत्तेच्या कोणत्याही अधिकारास बाध येऊ शकत नाही. ज्यांना कायद्याचा आधार पुरेसा वाटत नसेल त्यांना नगर जिल्ह्यातील परिस्थिती विचारात घ्यावी. नगर जिल्ह्यातील पुष्कळ महार ख्रिस्ती झाले आहेत व काही ठिकाणी तर एकाच घरात काही माणसे ख्रिस्ती आहेत व काही महारच राहिले आहेत. तथापि जे ख्रिस्ती झाले आहेत त्यांचा वतना वरचा हक्क नाहीसा झाला नाहीं याचा दाखला नगरचे महार तुम्ही सर्वाना देऊ शकतील. तेव्हा धर्मातरापासून महारकी वतनाला धोका येणार आहे, अशी भीती कोणीही बालगू नये.

दुसरी शंका राज़कीय हक्कासंबंधी आहे. धर्मांतर केले तर आमच्या राजकीय हवकांचे काय होईल अशी ही शंका पुष्कल लोकांकडून प्रदर्शित करण्यात येते. अस्पृश्य वर्गाला मुळालेल्या राजकीय हवकांचे महत्व मी ओळखीत नाही असे कोणालाही म्हणता येणार नाहीं, हे राजकिय हक्क मिळण्याकरिता जेवढी दगदग व देवता पराकाष्ठा मी केली तेवढा दगदग व तेवढी पराकाष्ठा इतर कोणीही केलेली नाहीं तथापि राजकीय हक्कावरच सर्वस्व भर देणे योग्य होणार नाहीं, असे मला वाटते. जे राजकिय हक्क दिले आहेत ते काही यावश्चंद्र दिवाकरौ अशा अटीवर दिलेले नाहीत. ते कधी ना कधी संपुष्टात येतील. इंग्रज सरकारने जो निवाडा दिला होता त्या निवाड्यात आपणाला दिलेल्या राजकीय हक्कांची कालमर्यादा विस वर्षाचा उरविलेली होती. पुढे करारात तशा प्रकारचा काल मर्यादा निश्चित केलेली नसली तरी त्यातील मुदत अमर्याद आहे, असे कोणालाही म्हणता येणार नाहीं ज्यांचा राजकीय हक्कांवर भर आहे त्यांना हे राजकीय हक्क गेल्यावर मग काय होईल याचा विचार अवश्य करावा. ज्या दिवशी हे राजकीय हक्क जातील त्या दिवशी आपल्याला आपल्या सामाजिक सामर्थ्यावर अवलंबन राहावे लागेल. ते सामर्थ आपल्या अंगी नाही, हे मी वर सांगितलेच आहे. ते सामर्थ धर्मांतर केल्या शिवाय आपल्याला प्राप्त होऊ शकणार नाही. हे हि या वर सिद्ध करून दिले आहे.

कोणत्याही माणसाने जवळचा विचार करून भागणार नाही. तात्पुरत्या लाभाला लाभाला जाऊन शाश्वत हित कोणत्या गोष्टीत आहे याचा विचार न करणे हे अंती दुखदायक होणार आहे. अशा परिस्थितीत कायमचा लाभ कोणत्या गोष्टीत साठविलेला आहे, याचा विचार सर्वानी अवश्य करावयास पाहिजे. माझ्या मते शाश्वत हिताच्या दृष्टीने पाहिले असताना धर्मांतराचा उपाय हाच खरा उपाय आहे त्याकरिता राजकीय हक्कांचा जरी आहुती देण्याचा प्रसंग आला तरी त्याला कोणीही भीक घालू नये. धर्मातराने राजकीय हक्कांस धोका नाहीं परंतु धर्मातर केले असता आपल्या राजकीय हक्काला का धोका बसवा, हेच मला समजत नाही. तुमचे जे राजकीय हक्क आहेत ते तुम्ही कोठे ही गेला असता तुमच्या बरोबर येतील. याविषयी मला कोणत्याही प्रकारची शंका वाटत नाही. तुम्ही मुसलमान झालात तर तुमचे हक्क मुसलमान म्हणुन तुम्हाला मिळतील. तुम्ही शीख झालात तर तुमचे हक्क मुसलमान म्हणुन तुम्हाला मिळतील. राजकीय हक्क हे लोकसंख्येवर अवलंबृन आहेत. ज्या समाजाची लोकसंख्या वाढेल त्या समाजाचे राजकीय हक्क हि वाढतील. आम्ही हिंदू समाजातून निघून गेलो तर आपल्या पंधरा जागा राहिलेल्या हिंदूंच्या वाट्यास जातील असा काणीही आपला भ्रम करून घेऊ नये. आणि मुसलमान झालो तर आमच्या पंधरा जागा मुसलमान लोकांना ज्या हल्ली जागा प्राप्त झाल्या आहेत त्यांच्यात भरीला पडतील, आम्ही खिस्ती झालो तर आमच्या जागा खिस्ती समाजाला ज्या जागा मिळाल्या आहेत त्यांच्या पूर्णता जातील. एकूण आमचे राजकीय हक्क आम्ही जिकडे जाऊ तिकडे जातील. तेव्हा या बाबतीत भिण्याचे असे काहीच कारण नाहीं उलटपक्षी आपण जर धर्मांतर केले नाही व हिंदु धर्मातच राहिलो तर आपले हक्क राहतील काय, याचा विचार तुम्ही अवश्य केला पाहिजे. समजा हिंदू लोकांना अस्पृश्यता मानू नये व मानल्यास तो गुन्हा आहे, असा एक कायदा पास केला व तसा कायदा पास केल्यांनंतर तुम्हाला असा प्रश्न विचारला कि तुमची अस्पृश्यता आम्ही कायद्याने काढून टाकली आहे. आता तुम्ही अस्पृश्य राहिला नाहीत. फार तर तुम्ही गरीब व दरिद्री आहात. तुमच्या प्रमाणे इतर जातीत हि दरिद्री आहेत. परंतु अशा दरिद्री जातीना आम्ही स्वतंत्र राजकीय हक्क दिलेले नाहीत. मग तुम्हाला का द्यावेत? या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर द्याल याचा तुम्हा पूर्णपणे विचार करावयास पाहिजे. मुसलमान लोकांना खिस्ती लोकांना याचे उत्तर सहज देता येण्यासारखे आहे. आमचा समाज दरिद्री आहे, अज्ञानी आहे, मागासलेला आहे. म्हणून आम्हास स्वतंत्र राजकीय हक्क देण्यात आले आहेत असे नसून, आमचा धर्म निराळा आहे आमचा समाज निराळा आहे आणि जोपर्यंत आमचा धर्म निराळा आहे तोपर्यंत राजकीय हक्काचा वाटा आम्हास मिळाला पाहिजे, असे समर्थक उत्तर ते देऊ शकतील. तुमचा समाज निराळा, तुमचा धर्म निराळा म्हणून तुम्हाला राजकीय हक्क मिळाले पाहिजे, अशा प्रकारची भूमिका जोपर्यंत तुम्ही हिंदु धर्मात आहात व हिंदू समाजात आहात तोपर्यंत तुम्हाला घेता येणार नाही. ज्या दिवशी तुम्ही धर्मांतर करून हिंदू समाजापासून स्वतंत्र व्हाल त्या दिवशी हि भूमिका तुम्हाला घेता येईल. तोपर्यंत घेता येणार नाहीं आणि जोपर्यत अशा स्वतंत्र भूमिकेवर राहून तुमच्या राजकीय हक्काची मागणी तुम्ही करू शकत नाही. तोपर्यत तुमचे राजकीय हक्क शाश्वत आहेत. त्यास धोका नाहीं, असे समजून चालणे अत्यंत अज्ञान पणाचे लक्षण आहे असे मला वाटते. या दृष्टीने पाहिले असताना धर्मांतर राजकीय हक्कांना विरोधी नसून राजकीय हक्कांचे संवर्धन करण्याचा तो एक मार्ग आहे असेच म्हटले पाहिजे. तुम्ही हिंदु धर्मात राहिले तर तुमचे राजकीय हक्क जातील. तुम्हाला राजकीय हक्क बुडू द्यावयाचे नसतील तर धर्मांतर करा. धर्मांतराने ते कायम राहणार आहेत.

• समारोप

मी माझा निश्चित करून टाकलेला आहे. मी धर्मांतर करणार हे निश्चित आहे. माझे धर्मातर कोणत्याही प्रकारच्या ऐहिक लाभाकरिता नाही. अशी कोणतीही गोष्ट नाहीं कि अस्पृश्य राहून मला ती प्राप्त करून घेता येणार नाही. माझ्या धर्मातराच्या मुळाशी आध्यात्मिक भावनेशिवाय दुसरी कसलीही भावना नाही. हिंदू धर्म माझ्या बुद्धांला पटु शकत नाही. हिंदू धर्म माझ्या स्वाभिमानाला रुचू शकत नाही. तुम्हाला मात्र अध्यात्मिक तसेच ऐहिक लाभाकरिता देखील धर्मांतर करणे आवश्यक आहे. काही लोक ऐहिक लाभाकरिता धर्मांतर करण्याच्या कल्पनेस हसतात व तिचा उपहास करतात. अशा लोकांना मूर्ख म्हणण्यास कोणत्याही प्रकारचा संकोच मला वाटत नाही. मेल्यावरती आत्म्याचे काय होईल? हे सांगणारा धर्म श्रीमंताच्या उपयोगाचा असेल. फावल्या वेळी अशा धर्माचा विचार करून मनोरंजन त्यांना करता येईल. जिवंतपणी त्यांनी सौंख्य भोगले त्यांना आपण मेल्यानंतर आपणास सुख कसे मिळेल याचा विचार ज्यात प्रामुख्याने केला असेल तोच धर्म असे वाटणे अगदी साहजिक आहे पण त्यांचा अमुक एका धर्मात राहिल्यामुळे राख रांगोळी झाली आहे. जे अन्न वस्राला मौताज झाले आहेत. त्यांचा माणुसकी नाहीशी झाला आहे. त्या लोकांनी धर्माचा ऐहिक दृष्टया विचार करू नये तर काय डोळे मिटून आकाशाकडे पाहात राहावे? या गर्भ श्रीमंत रिकाम टेकड्याच्या वेदांताचा गोर गरिबाला काय उपयोग?

• धर्म माणसाकरिता आहे

मी तर तुम्हाला असे स्पष्ट सांगू इच्छितो कि माणूस धर्माकरिता नाहीं धर्म माणसाकरिता आहे. माणुसकी प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा. संघटना करावयाची असेल तर धर्मातर करा. सामर्थ्य संपादन करावयाचे असेल तर धर्मातर करा. समता प्राप्त करावयाची असेल तर धर्मातर करा. स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यावयाची असेल तर धर्मांतर करा. संसार सुखाचा करावयाचे असेल तर धर्मातर करा. जो धर्मं तुमच्या माणुसकीला काही किंमत देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? जी धर्म तुम्हाला देवळात जाऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुम्हाला पाणी मिळू देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुम्हाला शिक्षण घेऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुमच्या नोकरीच्या आड येतो त्या धर्मात तुम्ही का राहता? जो धर्म तुमची पदोपदी मानहानी करतो त्या धर्मात तुम्ही का राहता? ज्या धर्मात माणसाशी माणुसकीने वागण्याची मनाई आहे तो धर्मं नसून शिरजोरीची सजावट आहे. ज्या धर्मात मायाकाची माणुसकी ओळखणे अधर्म मानता जातो, तो धर्मं नसून रोग आहे. ज्या अति अमंगल पशूचा स्पर्श झाला असताना चालतो पण माणसाला स्पर्श चालत नाही तो धर्म नसून वेडगळपणा आहे. जो धर्म एका वर्गाने विद्या शिकू नये, धन संचय करू नये. शस्त्र धारण करू नये असे सांगतो तो धर्म नसून माणसाच्या जीवनाचे विडंबन आहे. जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित रहा, निर्थनांना निर्धन रहा, अशी शिकवण देतो तो धर्म नसून ती शिक्षा आहे. 

धर्मातराच्या बाबतीत जे जे काही प्रश्न उदभवतात त्या त्या प्रश्नांचा मा यधामती उहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रश्नावरील माझे विवेचन कदाचित पाल्हाळीक झाले असेल; परंतु या विषयाचा सांगोपांग विचार करण्याचे मी पूवींपासून ठरविले होतें. धर्मातराच्या बाबतीत विरोधकांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांना उत्तर देणे आवश्यक होते. धर्मातराच्या घोषणेची सार्थकता पटल्या शिवाय कोणीही धर्मातर करू नये, असे माझे मत आहे आणि त्यामुळे कोणाची ही वृत्ती साशंक राहु नये व कोणात्याही मनात किंतू राहू नये, एवढ्याकरिता इतक्या सविस्तरपणे या प्रश्नाचा विचार मला करावा लागला आहे. माझे विचार तुम्हाला कितपत पटतील हे मी काही सांगू शकत नाही. परंतु तुम्ही ते पूर्णपणे ध्यानात घ्याल अशी मला आशा आहे. रुचेल ते बोलावे अशा रीतीने लोकप्रियता मिळविणे हे व्यावहारिक माणसाला शोभते पण ते पुढाऱ्याला शोभणार नाही, असे माझे मत आहे. लोकांचे बरे कशात आहे व वाईट कशात आहे हे सांगणे माझे कर्तव्य कर्म आहे. ते तुम्हाला रुचले नाही तरी ते सांगणे मला भाग आहे. माझे कर्तव्य कर्म मी केले आहे. आता या प्रश्नाचा निर्णय करणे हे कर्तव्य कर्म तुमचे आहे. धर्मातराच्या प्रश्नाचे या मुद्दाम दोन विभाग केले आहेत. हिंदु धर्माचा त्याग करावयाचा कि हिंदु धर्मात राहावयावें, हा त्याचा एक भाग आहे, त्याग करावयास झाल्यास कोणत्या धर्याचा स्विकार करावयाचा किंवा नवीन धर्माची उभारणी करावयाची हि प्रश्नाचा दुसरा विभाग आहे. मला फक्त आज पहिल्या प्रश्नावरच तुमचा काय निर्णय आहे. ते जाणून घ्यावंयाचे आहे. पहिल्या प्रश्नाचा निर्णय झाल्या शिवाय दुसऱ्या प्रश्नाचा विचार करावयास झाल्यास त्या बाबतीत तयारी करण्यात काही अर्थ नाही. तेंव्हा पहिल्या प्रश्नावर काही करावयाचे आहे ते ठारवा. तुम्हाला ते ठरविण्या करिता दुसरी संधी मला देता येणार नाही. आज या सभेत जे तुम्ही ठरवाल त्याप्रमाणे मग पुढचा कार्यक्रम मी ठरवीन. तुम्ही ज़र धर्मांतराच्या विरुद्ध निर्णय केला तर प्रश्नच मिटला. माझ्या स्वत: करता जे मला करावयावे असेल ते मग मी करीन. तुम्ही धर्मांतराच्या तफेंचा निर्णय जर केला तर त्या बरोबरच तुम्ही सर्वांनी संघटीत रुपाने धर्मातर करण्याचे आश्वासन दिले पहिजे, धर्मातराचा निश्चय झाला तर वाटेल त्याने वाटेल त्या धर्मात जावे. अशा प्रकारची फाटाफूट तुम्ही जर करणार असाल तर मी तुमच्या धर्मांतराच्या कार्यात पडणार नाही. तुम्ही माझ्या बरोबर यावे अशी माझी इच्छा आहे. ज्या धर्मात आपण जाऊ त्या धर्मात आपल्या उन्नती प्रित्यर्थ जे काही कष्ट व परिश्रम करावे लागतात. ते परिश्रम करण्यास माझी तयारी आहे. परंतु मी सांगतो म्हणून धर्मातर केले पाहिजे, या भावनेला वश होऊन काही करू नका. तुमच्या बुद्धीला जर पटेल तर त्याला होकार द्या. माझ्या बरोबर न येण्याचा निश्चय तुम्ही केलात तरी त्याबद्दल ही मला काही दुख होणार नाही. उलट माझ्यावरची जबाबदारी गेली म्हणुन मला आनंद वाटेल. हा निर्वाणीचा प्रसंग आहे. हे तुम्ही ध्यानात ठेवालच. तुमच्या भावी पिढीची भवितव्यता तुम्ही ठरवाल त्याप्रमाणे ठरणार नाही. तुम्ही आज स्वतंत्र होण्याचा निश्चय ज़र केला तर भावी पिढी स्वतंत्र होईल. तुम्हा आज़ पराधीन राहण्याचा निक्षय केला तर भावी पिढी सुद्धा पराधीन राहील, म्हणून तुमची जवाबदारी अत्यंत कठीण आहे.

याप्रसंगी तुम्हाला काय सांगावे याचा विचार करीत असताना भगवान बुद्धाने आपल्या भिक्षु संघास मरण्यापूर्वीं जो उपदेश केला व ज्याचा 'महापरिनिर्वाण सुत्तात" उल्लेख केलेला आहे, त्याची मला आठवण होते. एकदा भगवान नु्कतेच दुखण्यातून उठल्यामुळे विहाराच्या छायेत पसरलेल्या आसनावर बसले असताना त्यांचा शिष्य आयुषमान आनंद भगवंताकडे येऊन त्यास अभिवादन करुन एक बाजूस बसला आणि म्हणाला : "भगवंतास मी सुखात असताना पाहिले आहे व आजारी असताना असताना पाहिले आहे. भगवंताच्या आजराने माझे शरीर शिशासारखे जड झाले आहे. मला दिशाभ्रम झाला आहे. मला धर्मही सुचत नाहीं परंतु त्यातल्या त्यात मला एवढे समाधान वाटते की, थिक्षु संघा विषयी काही तरी सांगितल्या शिवाय भगवंताचे परिनिर्वाण व्हायचे नाही." भगवान बुद्धांना उत्तर दिले कि, "आनंदा, भिक्षु संघास मजपासून काय हवे आहे? आनंदा मी आत बाहेर काही न ठेवता धर्मोपदेश केला आहे. त्यात तथागताने आचार्यसूप्ती मुळीच ठेवली नाही. तर मग आनंदा, तुम्ही दिव्या प्रमाणे स्वय प्रकाशित व्हा. पृथ्वी प्रमाणे परप्रकाशित राहु नका. स्वत: वरच विश्वास ठेवा, दुसऱ्या कोणाच्या अंकित होऊ नका. सत्याला धरून राहा! सत्याचाच आश्रय करा. व दुसऱ्या कोणाला शरण जाऊ नका." मी देखील बुद्धाच्याच शब्दाचा आश्रय करून तुम्हाला असा निरोप देतो कि तुम्ही आपले आधार व्हा. स्वतःच्या बुद्धीला शरण जा. दुसऱ्या कोणाचाही उपदेश ऐकू नका. दुसऱ्या कोणालाही वश होऊ नका. सत्याचा आधार घ्या. सत्यास शरण जा. दुसऱ्या कोणासही शरण जाऊ नका. हा भगवान बुद्धाचा उपदेश तुम्ही या प्रसंगी ध्यानात ठेवाल तर माझी खात्री आहे कि तुमचा निर्णय चुकीचा होणार नाही.

•◆●■ समाप्त ■●◆•

लेखक -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

1 टिप्पणी: