मराठी अनुवाद :
● चैत्यभूमी वरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलतोय...
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलतोय... "मी हिंदू धर्मात जन्माला आलो परंतु हिंदू धर्मात मरणार नाही" अशी घोषणा येवले नाशिक या मुक्कामी १९३५ साली करून धर्म वेड्या काल्पनिक दगडांच्या मेंदूत सडलेल्या, जातिभेदाचा उच्छेद मांडणाऱ्या मनुवादी विचाराना लाथाडून रंजल्या गांजल्या उपेक्षित मागासलेल्या समाजाला समतेच्या मार्गावरून चालणारा बौद्धधम्म रक्तरहित क्रांती करून १४ ऑक्टोंबर १९५६ दिला. तो महामार्ग निर्माण करण्यासाठी मी घोषणा केली होती की, "मी सारा भारत बौद्धमय करीन." शेवटचे दोन दिवस बुद्ध आणि धम्म या ग्रंथावर शेवटचा हात डोळे फिरवता फिरवता झोपेतच काळाने अचानक घाला घातला आणि माझे निर्वाण ६ डिसेंबर १९५६ दिल्ली येथे राहत्या घरी झाले. त्यावेळच्या समकालीन समाजातील अनुयायी यांनी दीक्षा दिली, त्या नागपूर ठिकाणी काही तास ठेवून माझे शव विमानाने मुंबईत आणले गेले.
लाखो अनुयायी माझ्या प्रेमापोटी रस्त्याच्या दुतर्फा रांगेमधून ओक्सा बोक्सी रडत होते. अश्रू देखील आवरता आवरत नव्हते. एवढे अतोनात प्रेम करीत राजगृह येथून माझ्या अखेरच्या प्रवासाला सुरुवात झाली. माझ्या शवाला अखेरचा अग्नी देण्यासाठी सुद्धा तत्कालीन महाराष्ट्र सरकारने भूमी पुत्राला भारताच्या अधिनायक, घटनाकाराला जागा देण्याची असमर्थता दाखविली अर्थात नाकारली. अखेर गुहागर तालुक्यातील रत्नागिरी जिल्यातील सुपुत्र माझेच सहकारी मित्र बहुजन समाजातील (भंडारी) नेते सी. के. बोले यांच्या मालकीची जागा क्षणाचा विचार न करता माझ्या अखेरच्या शरीराला जाळण्यासाठी सरण रचण्याची सूचना केली आणि मला अनुयायी यांनी सरणावर चिता रचून माझे पुत्र यशवंत यांनी सर्वांच्या साक्षीने बुद्ध धम्माला अनुसरून अग्नी दिला. मी शांत गाढ निद्रेत आसमंतात विरघळून गेलो. काही दिवसांनी माझ्या आठवणीचा ठेवा म्हणून माझ्या पुत्रांने व समाजातील पुढारी, विचारवंत मंडळीनी माझ्या अस्तीच्या माध्यमांतून "चैत्यभूमी" ची संकल्पना उभी केली. आज जगाच्या, भारताच्या पाटीवर 'चैत्यभूमी' ही माझ्या नावाने अस्तित्वात आहे. मला जावून ५९ वर्ष लोटली. अनेक अनुयायी मला वंदन, अभिवादन करण्यासाठी येतात. त्यातील काही अगदी निस्सीम हृदयातील आतील कोपऱ्यातील ठेवणीतील जागा माझ्यासाठी कोरून ठेवली आहे. भारतातून येतातच तासनतास रांगेत उभे राहून मला नतमस्तक होतात. काही जन येतात ते मात्र स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी येतात. मात्र मी आपल्यास सांगितले होते कि, माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा मी जे काय केले आहे ते पुढे घेऊन जाण्याचा संकल्प करा. परंतु तसे काही करताना होताना दिसत नाही.
मला आता काही अनुयायी 'देव' मानायला लागलेत. माझ्या नावावर आर्थिक प्राप्ती करून स्वतःचा उदरनिर्वाह करायला लागलेत. माझ्या नावाचा गैरवापर करून या बाबासाहेबाला केवळ मागासलेल्या लोकांचा मसीहा म्हणून ओळखू जावू लागले आहे. याला जवाबदार, कारणीभूत कोण? अरे गद्दरानो तुम्हीच? आपण सर्व येता अभिवादन करण्यासाठी ते सुद्धा हसत खेळत बागडत येता? जत्रेच रूप देवून नको ते उद्योग करता? जर माझ्या स्मृति दिनाला जत्रेच स्वरूप आणत असाल तर याद राखा. यापुढे तुमचे पाय चैत्यभूमीवर ठेवूच नका. मी आपला उद्धारकर्ता आहे. असे आपणास उमजून माहित असताना देखील एक निर्वाणाचा, दुखाचा दिवस मौन बाळगून शांत स्वतः च्या पायाकडे अर्थात खाली बघून जावू शकत नाही? कसले आपण भीम सैनिक लाज वाटायला हवी? मला केवळ तुम्ही आपला म्हणूनच कायम सीमित करून टाकलाय. आमचा बाबासाहेब? आमचा आंबेडकर? एकच साहेब बाबासाहेब? काय चाललय काय?
अरे माझ्या लेकारानो,
मी आपला आहेच. परंतु आधी या भारताचा या जगाचा आहे हे जाणून घ्या. ज्या भारताची राज्य घटना लिहिली. या जगाने बुद्धीचा एकमेव महामेरू म्हणून गौरव केला. त्याचा अशा प्रकारे ६ डिसेंबरला अर्थात माझ्या स्मृती दिनाला महाजत्रेच स्वरूप आणता आणि माझ्या नावाला हसण्याची वेळ मनुवादी लोकाकडून आणता. तुम्हाला गायीच्या पाडसा वाणी हंबरणे सुद्धा त्याकाळी कठीण असताना तिथे वाघासारखी डरकाळी फोडण्यासाठी माणसात आणले. पण आज ही ६ डिसेंबरला स्मृति दिनाला डरकाळी काय? मोठ्याने हसताय काय? एका दिवसाला आपल्या तोंडाला आवर घालू शकत नाही? कशाला माझा स्मृती दिवस साजरा करता आहात. या पुढे थांबा. करूच नका.
अरे तुमच्या स्वतःच्या घरी जेंव्हा स्वतःचा आई, बाप मरण पावल्यावर स्मृति दिन साजरा करताना मोठ्याने हसणं, खिदळण लाऊड स्पीकर लावून गाणी लावता काय? जत्रा भरवता काय? नाही ना? मग बौद्ध धम्माच्या रीती रीवाजाने तो विधी पार पाडता? अरे माझ्या स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता तुम्हाला माणसात आणून समानता निर्माण करू दिली. समतेच्या महामार्गावर आणून सोडले. आणि ६ डिसेंबरला माझ्या स्मृती दिनाला ज्यांना मी म्हटले होते एका शाहिराचे गाणं माझ्या दहा भाषणा बरोबर आहे. अस असताना या दिवशी महाराष्ट्रातील सर्वच आघाडीचे शाहीर, गायक शिवाजी पार्कवर स्वत:चे दालन उभे करून मी ज्या सरणावर झोपलो होतो. ती जागा सुद्धा त्या आवाजाने दुभंगली जात आहे. एवढा कर्कश आवाज त्या ठिकाणी होतो याला कोणते स्वरूप म्हणावे? हा आनंदाचा दिवस की दुखाचा दिवस सांगा ना? हि तर जत्राच भरली आहे असच म्हणावे लागेल? त्या दिवशी एखाद्या वैचारिक अनुयायी यान सहज विचारले की हा कोणता दिवस आहे? आपण काय करीत आहात? तर त्याचा द्वेष राग करून अगदी बेफिकीरीन म्हणतोस की, आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करायला आलो म्हणून भोंगा लावून साजरा करीत आहोत? केवढा उद्दामपणा?
अरे अनुयायी हो,
माझी जयंती १४ एप्रिलला असते ६ डिसेंबरला नाही. इतर मनुवादी लोकांना माझ्या स्मृती दिनाला वंदन अभिवादन करायला यायचे असते. मात्र आपणच असे प्रकार करून माझ्या नावाला बाबासाहेब आंबेडकर हे अवघ्या जगाचा असताना केवळ आमचेच 'बाबा' म्हणून जगजाहीर करून मोकळे झाले आहात, केले आहे.
कृपया तुमची मानसिकता बदला अन्यथा मनुवादी जावू द्या हो, परंतु मला शंका आहे. आपलेच काही अनुयायी स्वतःला बौद्ध ब्राम्हण समजणारे सुद्धा माझ्या स्मृती दिनाला येणार नाहीत. विचार करा? हा मांडलेला बाजार, जत्रेच स्वरूप बदलून काही तरी नाविन्य अर्थात मौन बाळगून स्मृती दिन साजरे करायचे असतात. तुम्ही आता मागासलेले नाहीत त्यातून बाहेर काढून तुम्हाला नवीन विचार दिले आहेत. त्याप्रमाणे चाला. वर सांगितल्या प्रमाणे स्वतःच्या आई वडिलांचे मात्र बुद्धाला अनुसरून स्मृती दिन साजरे करता तसाच माझा करा. यापुढे प्रथम माझ्या नावान बाजार मांडणाऱ्या गायक शाहीर ओर्केष्ट्रा मंडळीना ताळ्यावर आणून शांतता प्रस्थापित करा. एवढे दिवस सहन केले आता माझी सहनशीलता संपलेली आहे.
हे थांबवा! माझ्या नावावर आतापर्यंत आणि येणाऱ्या काळात सुद्धा आर्थिक बाजू मजबूत केली आहे. करणार आहात आणि ती कराच. परंतु माझ्या स्मृती दिनाला या सर्व प्रलोभन पासून एक दिवस तरी वंचित रहा? मौन शांत येवून वंदन करून जा? आज पर्यंत स्मृती दिनाला येणारा हा केवळ खालच्या वर्गातील अनुयायी आहे. परंतु येणाऱ्या काळात माझ्या स्मृती दिनाला येणारा अनुयायी हा प्रत्येक वर्गातील असावा. तो येईल त्यासाठी तरुणांनी प्रयत्नशील रहा, शिस्थ बंधन नियम याचे पालन करून शिवाजी पार्कला अर्थात चैत्यभूमीचा परिसर हा शांततामय कसा राहील याचा शोध घ्या.
आज काल काही सरकारी अधिकारी, नेते मंडळी माझ्या स्मृती दिनाला माझ्या स्तुपावर आणि जमलेल्या अथांग जन समुदायावर घिरट्या घालणाऱ्या छोट्या विमानातून पुष्पवृष्टी करीत आहेत. हे अतिशय चुकीचे असून चैत्यभूमिला तीर्थ स्थान निर्माण करण्याचा षडयंत्र राबविले जात आहे. त्यावर उपाय करा आणि त्यावर बंदी आणा. त्याच प्रमाणे मला अभिवादन करण्यासाठी येणारे स्वार्थी नेते अभिवादन सभा नावाखाली हसत खिदळत मनुवादी विचारांच्या लोकांना आणून समोर बसलेल्या अडाणी लोकांना नको ती आश्वासने देत भूलथाप्पा मारून नको ते विचार देवून समाजाला फसविण्याचे धोरण आखत आहेत. अशांना रोखून माझ्या विचाराने चालणारा समाज घडवा. असे निक्षून सांगणारे तरुण घडवा, जागृत, उठाव करणारे तयार व्हा. बदल नक्कीच होईल.
स्मृति दिन हा शिस्तबद्ध पद्धतीने घडविण्यास तुमच्या सारखा समर्थनीय तरुणच हवाच हे सर्व तुमच्याच हातात आहे. रक्त माझेच आहे ते केवळ रक्त वापरा. नसा आपोआप तयार होतील. रक्ताभिसरण झाल्या शिवाय राहणार नाही. अर्थात परिवर्तन झाल्या शिवाय राहणार नाही. प्रथम माझ्या स्मृती दिनाला शाहीर, गायक यांच्या आवाजाला शांत करा. त्यांना शांतपणे स्वत:च्या ध्वनि फितीचे विकण्यास मुभा द्या, प्रवृत्त करा, नेत्यांची भाषणे माझ्या स्मृतीच्या दिवशी नकोच. यासाठी प्रयत्न करा. त्यांना आवाहान करा. एक दिवस मौन बाळगा. अभिवादन केवळ वंदन करून निघून जा. असा सांगणारा तरुण वर्ग निर्माण करा. नक्कीच बुद्धांनी सांगितल्या प्रमाणे शांततेत माझा स्मृति दिन पार पडेल.
स्वतः पासून सुरुवात करा. मी नक्कीच तुमचा पालन उद्धार कर्ता आहे कायमचाच राहीन. माझ्या स्मृती दिनी अर्थात ६ डिसेंबर महापारीनिर्वान दिन महाराष्ट्रातील शाहीर, गायक, नेते मंडळीं, अनुयायी सर्व मोठ्या अभिमानाने अभिवादन करण्यासाठी येत असता मी कायमचा सरणावर निजलेला जगाचा महान बुद्धिवंत प्रकांड पंडित बोधिसत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा मोठ्या बिरुदावल्या नावाच्या समोर आहेत. अस असताना मी सांगितल्या प्रमाणे माझ्या नावाचा गाजावाजा करण्यापेक्षा स्वतःचा आणि समाजाचा उद्धार करण्यासाठी झटा. मला अशा तुमच्या किळसवाण्या प्रकाराने तुमचा तिरस्कार वाटायला लागलाय. माझे महापारीनिर्वान होऊन केवळ माझ्या नावाने गेली ५९ वर्ष अक्षरशा धुडघूस घालून समाज विखुरला गेला आहे.
अनुयायी हो,
या पुढे माझ्या निर्वाण दिनी चैत्यभूमीवर असे प्रकार होत असतील तर येऊच नका. माझ्या नावावर हजारो रुपये कमवायचे असतील, हिंदू धर्माला नाकारणारा मी अशा धर्माचे अनुकरण करून माझ्या महापारीनिर्वानाला जत्रेचे महारूप देत धिंगाणा घालत असाल तर येऊच नका. मी झिजलो झटलो ते तुमच्या उद्धारासाठीच पण माझ्या नावाचा मेल्यानंतर कायमचा उद्धारच करून टाकला आहे. माझ्या नावाने मनुवादी आधीच पिसाळलेला होता. आज माझ्या नावाचा तिरस्कार तुम्ही जास्त करून द्यायला लागले आहात. लक्षात ठेवा. मला तुम्ही सीमित करू नका. मी या देशाचा अवघ्या जगाचा महामानव आहे. अशी माझी ओळख असताना माझ्यावर मर्यादा टाकू नका.
माझ्या महापारीनिर्वानाला येणारा प्रत्येक अनुयायी हा धर्मनिरपेक्ष असला पाहिजे म्हणून आपणास मी जाहीरपणे सांगितले आहे. "मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटचा श्वास असे पर्यंत भारतीय आहे हे आपण विसरायला लावत आहात. मला केवळ बौद्ध धम्मात सीमित करू नका. तुम्हीच म्हणता ना, महामानव, युगपुरुष जन्मतात ते कोणा एका धर्माचे, जातीचे नसतात? मग असे का करीत आहात? मला मान्य आहे मी तुमचा मार्गदाता उद्धारकर्ता आहे, मी बौद्ध धम्म स्वीकारला आहे. त्याच बरोबर तुम्ही ही स्वीकारला आहे. परंतु मी या भारताचा आधी नागरिक आहे अर्थात मी देशाचा भारतरत्न आहे. या जगाचा विश्वरत्न आहे. याचा विसर तुम्हाला होता कामा नये. माझे विचार इतरांना सांगून बुद्धाचा धम्म किती महान आदर्श आहे. हे पटवून द्या तरच सारा भारत बौद्धमय होईल. परिवर्तन झाले की अवघा भारत माझ्या ६ डिसेंबर अर्थात महापारीनिर्वान स्मृती दिनाला नतमस्तक होण्यास येईल. त्याच वेळी चैत्यभूमीला खऱ्या अर्थान महत्व प्राप्त होईल म्हणून सीमेला सीमित करून ठेवण्यापेक्षा सीमेचे उल्लधन केल्या शिवाय त्या जागेला महत्व प्राप्त होणार नाही'!
म्हणजेच बाबासाहेब हे केवळ बौद्ध, उपेक्षित मागासलेल्या समाजाचे नसून ते काश्मीर ते कन्याकुमारी या अन्खंड भारताचे बाबा आहेत. हे जाणवून देण्याची जबाबदारी तरुण हो तुमच्यावर आहे.
आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
राजेश सावंत (लेखक, कवी, युवा मार्गदर्शक)
आसरा एज्युकेशन आणि सामाजिक संस्था
मराठी अनुवाद -
राजेश सावंत (लेखक, कवी, युवा मार्गदर्शक)
आसरा एज्युकेशन आणि सामाजिक संस्था
•◆●■●◆• •◆●■●◆• •◆●■●◆•
English Translate :
● I am Dr. Babasaheb Ambedkar Speaking from CHAITYA BHOOMI...
I am Speaking Dr. Babasaheb Ambedkar... On 14th October 1956 I Resolutely Endorsed My Decision Which I Had Pronounced And Proclaimed at Yewala in 1935 that though I born as Hindu I will not die as Hindu. Yet, I Remember, I Said in My Emphatic Tone That Hindu Religion Dose Not Appeal to My Concise. It dose not Appeal to My Respect. I Therefore, by Discarding Age Long And Profoundly Pervaded Caste Base Inequality in All forms took socially Neglected and Deliberately Downtrodden People to The Esteem Path of Equality and Established a Social Revolution Without Shading a Single Blood drop. In This Mission I took a Vow to Make whole India Buddhist. However, in spite of my deteriorating health I could lay My Hands on "BUDDHA AND HIS DHAMMA" I breathed last on 6 th December 1956, My body was flown to Bombay Via Nagpur by Taking Halt of Few Hours Where Mass Conversion Was Taken Place. In Bombay, My Followers And Disciples Were in Great Grief Standing on Both Sides of Streets from Rajgruha Where from My Procession Was to go for Last Journey.
Amazing Fact is That Then Maharashtra Government Showed inability to Give Place for My Last Rights, A Great Constitutionalist and Architect of Indian Constitution, however, My Collogue and friend from OBC (Bhandari) Shri C. K. bole Came to My Rescue and he Offered hos Own Land for My last rights. My body Was on Pyre Amidst The Chants of BUDDHAM SHARANAM GACHHAMI !!! Ultimately I Reduced to the Ash.
In My Remembrance CHAITYA BHOOMI was Built Which has Now Became Memorial. Having Passed 59 years Lacks of People Visit Every Year to CHAITYA BHOOMI to Pay Respect and Homage to me. Some People Throngs for Their Financial Gain. They have made me a Saleble item in Their Stalls, Be it a Political Leader or Any Street Singer. I have Already Warned Everybody That you Should Strive for The Things for Which I Fought Through out My Life for You People, Unfortunately I Find you People in Hero Worshipping of Mine and Nobody Marching on The Path I Choose.
Some of You Have Incarnated me as God to Earn Their Subsistence, Some have Branded me as Saviour of Dalit Who is Responsible for this? Have you not betrayed me? Just imagine, in What Way You People Gather at CHAITYA BHOOMI as if you are Visiting a Village fare! Can Not You People Observe Decorum of My Personality and Sanctity of my titanic work and Remembrance day with Discipline? I Feel Shame on You People by Seeing your Disgusting Act in Guise of Paying Homage to Me! You people have Belittle me Every where by Calling me "BABA" Who says I am Not Yours? But your Action on that Particular day is making others to laugh on you. You People Must Stop all This Nonsense Forthwith forever.
Just imagine your Kith and Keen Passes Away; do you Celebrate Their Death in Such Fashion by Dancing, by Laughing, by Playing Songs on Loud Speakers, That Time You People Observe Your Buddhist Rituals, Then, How all Singers Throngs to CHAITYA BHOOMI on This Day Only to Play Their Songs on Loud Speakers That too in Unbearable Volume? Have Anybody Tried to Stop Them at Any Time? No! If Anybody Asked you as to Why you Have Gathered Here in Such Fashion then You people Angrily Reply them to Pay Homage to BABASAHEB is it right? You Should Celebrate in Such Fashion on 14 th April and Not on 6 th December.
By Such Act You People have Made me Isolated from Others. Now, You People Need to Change Your Attitude and Mentality Too. You Should Observe Silence on 6 th December and Make all Singers -Shahirs to Understand it Properly so That they will Create Atmosphere Like Village Fare. I Expect Every Section of the Society to Visit CHAITYA BHOOMI but by Your Action you People Distancing them Deliberately Forever. Therefore, You Need to Maintain Silence and Encourage Others to Visit CHAITYA BHOOMI.
Nowdays Some Government Officers and Political Leaders are Resorting Shower Flowers on CHAITYA BHOOMI by Plane, it is Not Proper, it is a Plot to Create Pilgrimage Centre of CHAITYA BHOOMI. You People should Prohibit Such Things Instantly. All they are Gong to Deceive you People by Giving you Falls Promisess and Assurances. I want it to be Stopped by Youth who are Marching on The Path Laid by me and Striving for The Cause of the Society. This Change is Imminent, this May Happen Only When Disciplined Youths Would take Reins of the Society in Their Own hands. If, It is Not Impossible, Then Stop Coming to CHAITYA BHOOMI. Mind it that I am Not Yours Alone! I Belongs to The Nation but You People have Segregated me Emotionally.
I am FIRST and LAST Indian till my Last Breath, but, you Confined me Within the Ambit of Buddhism. You People Argues Sometime that Great Men does not Belongs to Any Caste, Creed, or Religion then why do You People Doing all This Things. I know I have Embressed Buddhism and You People too, but do not forget that I am Bharat Ratna of This Land therefore, I Appeal to all Youth to Break all this Barrier and Make The People from Kashmir to Kanyakumari That they ows to one and only DR. BABASAHEB AMBEDKAR. I am BABA for all Therefore it is the Formost Duty of Youth to Strive for it.
Article By -
RAJESH SAWANT (Author, Poet)
Chairman : Asra Social Trust
Translated & Edited By -
RAJESH SAWANT And YATIN JADHAV
•◆●■●◆• •◆●■●◆• •◆●■●◆•
हिंदी अनुवाद :
● चैत्यभूमी से डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोल रहा हूं...
में डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोल रहा हूं... "में हिंदू धर्म मे जन्म लिया है पर मे हिंदू धर्म मे मरुगा नही." ऐसी घोषणा येवले नाशिक यहाँ १९३५ साल को पागल धर्म द्वारा सड़े हुए जातिभेद का उच्छेद करनेवाले मनुवादी विचारो को लात मारकर गरीब उपेक्षित पिछड़े समाज को समता की राह पर ले जानेवाले बौद्ध धम्म की रक्तरहित क्रांति १४ ऑक्टोबर १९५६ कर दी है। यह रह निर्माण करने के लिये घोषणा थी कि - "में पूरा भारत बौद्धमय करूँगा." आखरी दो दिन "बुद्ध और उनका धम्म" इस ग्रंथ को लिखते परखते वक़्त अचानक में हमेशा के लिए गहरी नीद में सो गया। मेरा देहांत ६ डिसेंबर १९५६ दिल्ली यहाँ रहने की जगह ही हुआ था। तब मैने समकालीन समाज को अनुयायियों को दिक्षा दी, उस नागपुर शहर में कुछ घंटे रख के मेरे शव को हवाई जहाज द्वारा मुंबई को लाया गया।
लोखो अनुयायी मेरे प्यार की वजह से इतनी भीड़ में कतार लगा कर बहुत ही रो रहे थे। आँखों के आंसू रुख ही नहीं रहे थे, इतने प्यार की वजह से राजगृह के यहाँ से मेरी अंतिम यात्रा सुरु हुई। मेरे शव को अग्नि लगाने के लिए तत्कालीन महाराष्ट्र सरकार द्वारा भूमिपुत्र, भारत के अधिनायक, घटनाकार को जगह देने के लिए असमर्थता दिखाई मतलब मेरे शव को अग्नि लगाने के लिए जगह देनी नहीं थी। अंतिम में गुहागर तालुका रत्नागिरी जिल्हा के सुपुत्र मेरे सहकारी दोस्त बहुजन समाज के नेता (भंडारी) सी. के. बोले इनके हक्क की जमीन सोचे बिना मेरे अंतिम संस्कार की तैयारी करने कि सूचना दी और मेरे अनुयायियोंने चित्ता की रचना करके मेरे पुत्र यशवंत ने बुद्ध धम्म स्वीकार करके अग्नि दिया। में गहरी नींद में हमेशा हमेशा के लिए डूब गया। कुछ दिनों बाद मेरे स्मृती के वास्ते मेरे पुत्र ने और समाज के नेता, बुद्धिवादी वर्ग ने मेरे अस्ति के माध्यम से "चैत्यभूमी" की संकल्पना खड़ी की है. आज दुनिया और भारत के पिटपे "चैत्यभूमी" नाम से प्रसिद्ध है। मेरे जाने जाने को ५९ वर्ष हो गये। अनेक अनुयायी मुझे वंदन, अभिवादन करने आते है, उनके प्यार भरे दिल उनके दिल की जगह मेरे लिए निकालकर रखी है। भारत से आते है घंटो घंटे कतारो में खड़े रह कर दर्शन लेते है और मुझे अभिवादन करते है। कुछ लोग आते है खुद के स्वार्थ के लिये, पर मैंने आपको कहा था की - "मेरे नाम का जय जयकार करने से अच्छा मेरे कार्य को आगे ले जाने की कोशिश करने का संकल्प करे." पर वैसा होते हुये नजर नहीं आता।
अभी मुझे कुछ अनुयायी भगवान समजने लगे है। मेरे नाम से आर्थिक लाभ उठाकर अपना पेट भरने लगे। मेरे नाम का दुरुपयोग करके बाबासाहेब को केवल पिछड़े लोगो का मसीहा कहकर पहचानने लगे। इसे कारण को जिम्मेदार कोण? अरे गद्दारो तुम ही? आप सब आते हो अभिवादन करने वह भी हसते - खेलते घूमते हो? यात्रा का रूप ना दे वैसे आप उद्योग करते है? जब मेरे स्मृती के दिन यात्रा का रूप लानेवाले होंगे तो याद रखो, अपना पैर चैत्यभूमी पर हरगिज मत रखना। में तुम्हारा उद्धारकर्ता हु, ऐसा तुम्हे पता है की निर्वाण, दुखी दिन चुपचाप पैरो के निचे देखकर जा नहीं सकते? कौनसे आप भीम सैनिक शर्म आनी चाहिए? मुझे अपने आपका हमेशा बना लिया। हमारा बाबासाहेब? हमारा आंबेडकर? एक ही साहब बाबासाहेब? क्या चल रहा हे क्या?
अरे मेरे बच्चों,
में तुम्हारा हु ही पर पहले इस भारत का इस दुनिया का हूँ जान लो। जिस भारत की राज्य घटना लिखी, तब दुनिया ने "बुद्धि का महामेरु" कहकर गौरव किया। उसका इस प्रकार ६ डिसेंबर को मतलब मेरे स्मृती दिन को महायात्रा का स्वरुप लाना और मेरे नाम से मनुवादियों को हसाने का वक़्त लाते हो, तुम्हे गाय के बछड़े इतना भी आवाज करना भी मुश्किल था इधर शेर जैसी दहाड़ लगाने के लिये इंसानियत में लाया, पर क्या आज ही ६ डिसेंबर को स्मृती दिन को शेर जैसी दहाड़? जोर से हसना क्या? एक दिन के लिये मुँह भी नहीं संभाल सकते क्या? क्यों मेरा स्मृती दिन मना रहे हो, आओ रुको, मत करो।
अरे तुम्हारे घर में खुद के माँ - बाप मर जाने पर स्मृती दिन मानते वक़्त हसना, लाऊड स्पीकर लगा कर गाना लगाते हो क्या? यात्रा निकलते हो क्या? नही ना? तब बौद्ध धम्म के रिवाज से विधी पूरा करते हो? अरे मैने अपने पुरे घरवालो की चिंता को छोड़कर तुम्हे समता निर्माण करके दी है, समता की राह पे ला रखा और ६ डिसेंबर को मेरे स्मृती दिन को जिसे मैंने कहा था - "एक शाहिर का गाना मेरे दस भाषणों समान है." असा होकर भी इस दिन महाराष्ट्र के सब आघाडी के शाहिर गायक शिवाजी पार्क पर खुदका दुकान डाल के में जहाँ सोया था वह जगह अस्वर्थ हो रही है। इतना कर्कश आवाज उस जगह होता है की इसे कौनसा स्वरुप कहा जाए? यह खुशयाली का दिन की दु:खयाली का बताओ ना? यह तो यात्रा निकली है ऐसा बोलना पड़ेगा? उस दिन कोई वैचारिक अनुयायियों ने पूछा कि - यह कौनसा दिन है? आप क्या कर रहे हो? तब उसका द्वेष करके गुस्से में बिना चिंता के कहोगे - "हम बाबासाहेब को अभिवादन करने आये है इसलिए जबरदस्ती से मानते है? कैसी यह शरारते?
अरे अनुयायियों,
मेरा जन्म दिन १४ एप्रिल को होता है, ६ डिसेंबर को नही। बाकी मनुवादियों को मेरे स्मृति दिन को वंदन अभिवादन करने आना होता है। परंतु हम ही ऐसा वर्ताव करते है, मेरे नाम को "बाबासाहेब आंबेडकर" यह दुनिया को होते ही, केवल हमारे ही हे "पिता" ऐसा दुनियाभर जाहीर करके भाग जाते है और गये है।
कृपया आप अपनी मानसिकता बदले नहीं तो मनुवादी जाने दो, पर मुझे शंका है। अपने ही कुछ अनुयायी खुद को बौद्ध ब्राह्मण समजने वाले भी मेरे स्मृती दिन को नही आएँगे, जरा सोचो? यह लगाया गया बाजार यात्रा का स्वरुप बदलकर कुछ नया मतलब चुपचाप रहकर स्मृती दिन मनाना होता है। अब आप पिछड़े नहीं है उसमे से आपको बाहर निकालकर तुम्हे नये विचार समर्पित किये है, उस तरह चलो। ऊपर बताये गये मुताबिक खुदके माँ - बाप का स्मृती दिन बौद्ध धम्म को स्वीकार करके मनाया करते हो वैसा मेरा भी करे। इसके पहले मेरे नाम से बाजार भरनेवाले गायक, शाहिर, आर्केस्टा रचनेवाले लोगो को सही रस्ते पे ला के शांती प्रस्थापित करे, इतने दिन सहे अभी मेरी सहनशीलता नष्ट हुई है।
यह रोको। मेरे नाम से अब तक और आनेवाले वक़्त को भी आर्थिक बाजू मजबूत की है, करनेवाले है और वह करे। पर मेरे स्मृती दिन को बुरी अदातो से एक दिन लिए तो दूर रहे? शांति से आकर मुझे वंदन करके चले जाओ? आज तक मेरे स्मृती दिन को आनेवाला वर्ग सिर्फ पिछड़े वर्ग का ही है, पर मेरे स्मृति दिन को आनेवाला हर अनुयायी हर एक वर्ग का ही होना चाहिये। वह जरूर आयेगा इसलिए आप सदा प्रयत्नशील रहे, शिस्तप्रिय और नियम का पालन करके शिवाजी पार्क मतलब चैत्यभूमी का मोहल्ला शांतता से कैसा रहेगा इसकी आप खोज करे।
आज कल कुछ सरकारी अधिकारी और नेता लोग मेरे स्मृती दिन को मेरे स्तूप पर और जमा हुये जनसागर पर उड़ान लेनेवाले हवाई जहाज से पुष्यवृष्टी कर रहे है। यह बिलकुल गलत हे क्योंकि चैत्यभूमी को तिर्थ क्षेत्र बनाने की कोशिश चल रही है। उस पे कुछ उपाय करे उसपर बंदी लायी जाये, उसी प्रकार मुझे अभिवादन सभा नाम से हसते हसते मनुवादी विचारधारा वाले लोगो को लाकर सामने बैठे अनपढ़ लोगो को नहीं चाहिये वही वादा दे कर और दिशाहीन बनाकर नहीं चाहिये वह विचारधारा की सोच दे कर लोगो को फ़साने की कोशिश कर रहे है। ऐसो को रोककर मेरे विचारधारा पर चलनेवाला समाज निर्माण करे। ऐसे आवाज उठाकर बोलनेवाले युवक निर्माण करे। जागृत होकर, आवाज उठानेवाले तैयार हो जाओ, बदलाव निच्छित होगा।
स्मृती दिन संयमप्रिय तरीके से मानाने के लिये तुम्हारे जैसे समर्थनिय युवक चाहिये ही यह सब तुम्हारे ही हात में है। खून मेरा ही है, सिर्फ खून अपनाओ, खुन्नस अपने आप तैयार होगी तो रक्तभिसरण होते बिना नहीं रहेगा मतलब बदलाव होते बिना नहीं रहेगा। पहले मेरे स्मृती दिन को शाहिर और गायको को शांत करे, उन्हें शांती से ध्वनि की फित विक्री करने की सलाह दो और कृती करने कहो। नेतो का भाषण मेरे स्मृती दिन नहीं चाहिये इसलिए प्रयत्न करे, उन्हें सलाह दे। एक दिन के लिए शांत रहो, अभिवादन केवल वंदन करके चले जाओ। ऐसा बतानेवाला युवक वर्ग निर्माण करे। तब ही बुद्ध ने बताये मार्ग द्वारा मेरा स्मृती दिन मनाया गया समजो।
खुद से शुरुआत करे, तब ही में तुम्हारा पालन उद्धारकर्ता हु और हमेशा रहूँगा। मेरे स्मृती दिन महाराष्ट्र के शाहिर, गायक, नेता, अनुयायी अभिवादन करने आते वक़्त हमेशा के लिए चित्ता पे सोया हुआ दुनिया का महान बुद्धिमान प्रकांड विद्वान बोद्धिसत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऐसे इतने बड़े नाम से खड़ा है, ऐसे होते भी बताये मुताबिक मेरे नाम से अशांतता निर्माण करने से अच्छा खुदके लिये और समाज के लिये काम करे। मुझे तुम्हारे ऐसे स्थिती में देखकर बुरा लग रहा है। मेरे जाने को मेरे नाम से केवल ५९ साल हुए हे, कैसे भी वर्ताव करके अपने समाज की एकता नष्ट कर दी है।
अनुयायियों,
इसके आगे मेरे निर्वाण दिन को चैत्यभूमी पर ऐसी घटना हुई तो आना ही नहीं। मेरे नाम से हज़ारो रुपये कमाने होंगे तो हिन्दू धर्म को में छोड़ने वाला, ऐसे धर्म को लेकर यात्रा का महारूप देकर अशांतता निर्माण कर रहे होंगे तो हरगिज मत आओ। मैंने इतना कुछ किया तुम्हारे लिये, में मरने पर तुम्हारा हमेशा के लिये उद्धार हो गया है। मेरे नाम से मनुवादी पहले से ही पागल है। आज मेरे नाम का दुरूपयोग ज्यादा करने दे रहे हो याद रखो, मुझे उसमे शामिल मत करो, में पूरी दुनिया का महामानव हु, ऐसी मेरी पहचान हो कर भी मुझ पर कोई आशा ना रखे।
मेरे महापरीनिर्वाण दिन को आनेवाला हर अनुयायी धर्मनिरपेक्ष होना चाहिये, इसलिये मैने आपको जाहिर करके बताया था कि, "में प्रथम और अंत मे भी भारतीय हूँ। यह आप भुला देना चाहते है। मुझे सिर्फ बौद्ध धम्म में सिमित ना करो। आप ही कहते है ना कि, महामानव, युगपुरुष ना कोई धर्म में, ना कोई जाती में पैदा होते? फिर आप ऐसा क्यों कर रहे है? मुझे कबूल है कि, में आपका मार्गदाता, उद्धारकर्ता हूँ, मैने बौद्ध धम्म स्वीकार किया है उसके साथ ही अपने भी स्वीकार किया है। पर में भारत का पहला आदमी हूँ मतलब में देश का भारतरत्न हूँ, इस दुनिया का विश्वरत्न हूँ, इसको आप भूल ना जाये। मेरे विचार दुसरो को साझा (बताके) करके बुद्ध का धम्म कितना महान और आदर्श है, यह समजाये, तब ही पूरा भारत बौद्धमय होगा। बदलाव हो जाने पर पूरा भारत ६ डिसेंबर मतलब मेरे स्मृती दिन को मुझे अभिवादन करने आयेगा, उसी वक़्त सच्चे अर्थ से महत्व प्राप्त होगा इसलिये सिमा को पार करे बिना महत्व प्राप्त नहीं होगा। इसलिये बाबासाहेब सिर्फ बौद्ध, गरीब पिछड़े समाज के ही नहीं "कश्मीर से कन्याकुमारी" तक इस पुरे भारत का पिता हूँ, यह जानकरी बताने की जिम्मेदारी युवको तुम पर है।
आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
राजेश सावंत (लेखक, कवी, युवा मार्गदर्शक)
आसरा एज्युकेशन एव सामाजिक संस्था
हिंदी अनुवाद -
यतिन जाधव (व्यवस्थापक एव संचालक)
दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया
धम्म प्रचारक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एव संचालक)
दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया
जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय
••••••••••••••••••••••
एकबार अवश्य भेट दे.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123
• बुद्धभूमी फाऊंडेशन (अपना संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com
• मी भारतीय (अपना संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com
• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number
सदर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group पर Add होना होतो मेसेज द्वारा संपर्क करे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा