रविवार, १३ नोव्हेंबर, २०१६

● जाणीव असू द्या.

● जाणीव असू द्या.

६ डिसेंबर, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न, दि ग्रेट इंडियन डाँ. बाबासाहेब आंबेडकर ६० व्या महानिर्वाण दिना निमित्त भिमानुयायांचा आपल्या पित्यास अभिवादन करण्यासाठी दादर चैत्यभुमी येथे जनसागर उसळणारच आणि अशा वेळी मनुवादी टि.व्ही. चँनलवाले तसेच वृत्त पत्रीय पत्रकार आपापल्या परीने या कार्यक्रमाकडे जेवढे दुर्लंक्ष करता येईल, टाळता येईल, असे प्रयत्न करत असतात. परंतु ते शक्य होत नाही. डाँ. आंबेडकरांचे महात्म प्रसार माध्यमांनी दुर्लंक्षित केले म्हणजे या महामानवाला अभिवादन करणाऱ्यानी संख्या कमी होईल किंवा बुद्ध धम्माकडील लोकांचे आकर्षण धम्माचरण यात बद्दल होईल असे मुळीच नाही. उलट दिवसे दिवस देश विदेशातील लोक बाबासाहेबांच्या विचाराला सलामी देत आहेत. वंदन करून बाबासाहेबांना स्विकारत आहेत. तरी ही निष्काम कर्माला दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न षडयंत्र द्वारे रचला जातोय.

धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि संविधान दिन हे दोन्ही दिवस स्वतंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिन या दिना इतकेच महत्वाचे असतात. प्रत्येक भारतीयाने ते आंनदाने साजरा करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी साजरे होत असतात हे कार्यक्रम साजरे करण्याचे प्रमाण ही दिवसे दिवस वाढत आहे. संविधान दिन हा राज्यभर साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले होते. त्यानुसार आयोजन ही केले होते, परंतु प्रसार माध्यमांनी आपले आवाज बंद ठेवले होते. १४ आँक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाकडे सर्वच वृत्त पत्रकांनी दुर्लंक्ष केले. त्यामध्ये काही आंबेडकरी विचारी वृत्तपत्रे सोडली तर आजचे विषेश बाळासाहेबांच्या जत्रा मेळाव्या शिवाय काहीच नाही, असे मानले होते. बाळ ठाकरेचा 'दसरा मेळावा' त्याची गर्दी आणि शिव्यांचा भडीमार भाषण प्रदर्शन एवढच दाखवायचे आणि तेच दिन विशेष म्हणून दिवसभर चविष्ट मसाल्याची फोडणी देवून चघळत होते, पण अशा कार्यक्रमाच्या प्रसारणातून बहूजन जनतेला काय मिळते. त्यांना काय अपेक्षित असते? याचा विचार या चँनल वाल्यांना पडतो, परंतु या चँनल वाल्यांनी एवढे ध्यानात ठेवले पाहीजे की, हा देश विकासाकडे वाटचाल करत आहे. ते केवळ बुद्ध - फुले - शाहू - आंबेडकर - शिवाजी राजे यांच्या प्रबोधनी विचारामुळेच !

डाँ. आंबेडकरांचे परिपूर्ण विचार जर या देशाने स्विकारले असते तर केव्हाच देश महासत्ता झाला असता. बाबासाहेबांसारख्या युगपुरुषाचे मार्गदर्शन आज साऱ्या विश्वाला लाभदायक ठरत आहे आणि त्यांनी लिहलेलं संविधान अखंड विश्वामध्ये प्रथम क्रमांकाचे आणि सर्वोत्कृष्ट आहे. शिवाय देशाचा कारभार या संविधानानुसार चालतो, असे असताना जर अशा कार्यक्रमाकडे दुर्लंक्ष केले तर लहान मुलापासून तरूण पिढी - युवक घडणार कसे? बाबासाहेबांच्या कार्यक्रमाकडे दुर्लंक्ष करून प्रसार माध्यमे आंबट शौकिन बातम्यांचा भडीमार करण्यात समाधान मानतात. परंतु असा कोणताही दर्जा प्रबोधन नसलेल्या, महत्व नसलेल्या बातम्या कार्यक्रमातून लोकांपुढे कोणता आदर्श जातो?

इतिहास घडवायचा असेल तर इतिहास विसरून चालत नाही असे खुद्द डाँ. बाबासाहेब आंबेडकरच उद्गारले होते. आपल्याला जर विकसित राष्ट्राच्या यादीत उतरायचे असेल तर बुद्ध - फुले - शाहू - आंबेडकर - शिवाजी राजे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन क्रांतिकारी पावले टाकणे गरजेचे आहे. तुसते अर्धनग्न अवस्थेतील रिअँलिटी शोज प्रदर्शन, राजकारण्यांची हमरी - तुमरी, 'दसरा मेळाव्या' सारख्या शिवराळ कार्यक्रमांचे प्रदर्शन बुवाबाजी आणि अंधश्रद्धा यासारख्या कार्यक्रमांना प्रसिद्धी देणे अशाने कोणतीच प्रगती आपल्या देशाची होणार नसून उलट बहुजन वर्ग लुटला जात आहे, हे लक्षात घेतले पाहीजे. तसेच भटाळलेल्या सडक्या मेंदूच्या चँनल वाल्यांनी ही ध्यानात घेतले पाहीजे की, आपण या देशाचे नागरिक आहोत. देशाचे देणेकरी आहोत. जे योग्य असेल तेच देण्याचा प्रयत्न करा. कारण असल्या कु - कर्मी यांना कोणत्याही प्रकारची लाज लज्जा नसते.

बाबासाहेबांच्या प्रत्येक विचार आणि कृतीतून मरगळ आलेल्या व्यक्तीला सुद्धा प्रेरणा मिळते. एका नव्या शक्तिची ऊर्जा मिळते आणि अबोल माणूस बोलू लागतो. बिघडलेला व्यक्ति घडू लागतो आणि म्हणूनच बाबासाहेबांचे प्रखर विचार आणि त्याचा अर्थ समाज विषयक गाढा अभ्यास पाहून देशी विदेशी लोक तोडात बोट घालतात आणि नळकत बाबासाहेबांना टाळणारे लोक आज बाबासाहेबाच्या विचारांना शरण जावून वंदन करून त्यांचा स्विकार करतात. शिवाय बाबासाहेबांनी लिहलेले ग्रंथ हेच आपले गुरु आहेत सांगू लागतात.

डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माचा स्विकार केल्या नंतर सारा भारत बौद्धमय करण्याच्या दिशेला लागले. परंतु बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर क्रांती मध्ये खंड पडला. बहुजन बांधव एकत्र आले पण त्यांच्या ताकदीने गट - तट निर्माण झाले. पुन्हा विस्तृत फेकले गेले. कार्यकत्ता, नेता, पुढारी यांचे निवडणूकीच्या वेळी फक्त दर्शन होते म्हणूनच बाबासाहेबांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न आपल्या अनुयायांना संविधाना द्वारे मार्गदर्शन करून बहूजनांनी एकत्रित राहून सतत प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. परंतु आजचे वास्तव चित्र पाहता बाबासाहेबांच्या क्रांतीत खंड पाडल्या नंतर सर्वत्र अलबेल आहे. आम्ही बाबांचे विचार आचरणात आणण्यास कमी पडतो. मग आम्ही भिमानुयायी कसे? ६ डिसेंबर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी सर्वत्र विविध रुपाने अभिवादन केले जाते. त्यातील महत्वाचे म्हणजे लाखो लोक दादर चैत्यभुमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जातात. त्यावेळी आपल्यातील काहीना आपल्या कर्तव्य जाणीवेचा विसर पडलेला दिसतो. अक्कलेची तार तुटलेल्या व्यक्तिनी आंबेडकरी विचाराची धार वापरली पाहिजे. असे आपल्या सर्वांना माझे आवाहन आहे.

चला एक पाऊल विकासाकडे नेऊया.
चला एक होऊन धम्म सागरात न्याहुया.

आवहनात्मक मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया

साभार -
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा