● महामानवाला अभिवादन करूया. समाजाला सांस्कृतिक प्रदुषणातून मुक्त करूया.
दरेकाने दरेकाला धम्मदिक्षा देण्याची अनुमती देऊन डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक बौद्ध माणसाला धम्म प्रचार व प्रसार करण्याचा आदेशच दिला होता. बौद्ध माणसाने मिशनरी धम्म प्रचारक होणे हाच सारा भारत बौद्धमय करण्याचा राजमार्ग, बौद्ध धम्माच्या प्रतिनिष्ठा ठेऊन बौद्ध माणूस आपली शुद्ध ओळख निर्माण व्हावी व सुखी आणि स्वाभिमानाचे जीवन जगून इतरांना आदर्श देता यावा म्हणून २२ प्रतिज्ञाचं उल्लंधन करतात. बौद्ध वस्तांतील सांस्कृतिक प्रदुषण दुर करण्यासाठी आम्ही काही उपाय योजना मांडल्या आहेत. सांस्कृतिक प्रदुषण रोखण्यासाठी आम्ही विचारांनी काम करत असताना आता आमच्यातल्या काही मंडळीना भंडारा या प्रकाराला देखील उचलून धरायला सुरूवात केली आहे. या साथीच्या विकाराने अनेक लोक पछाडले जातात.
महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना त्याच्या बौद्धमय भारताच्या स्वप्नपूर्तीच्या मार्गातील हे अंतर्गत अडथळे मनाला फारच व्याकूळ करतात. महामानवाचे हे निर्मळ, प्रेमळ व करूणामय स्वप्न केवळ एका जमातीसाठीच नव्हे तर अखंड देशातील लोक डोळस संवेदनशील, सुखी होऊन शुद्ध मानवी जीवन जगू शकतील असे आहे. त्यांची जबाबदारी ज्या समुहावर टाकली गेली, केवळ जबाबदारी नव्हे तर बाबासाहेबांनी त्या समुहाने ही जबाबदारी योग्य प्रकारे पेलली नाही तर तो समुह एक बेजबाबदार व लायक नसणारा नालायक समुह होता अशी इतिहासात नोंद होईल.त्यात अखंड भारतीय समाजाच देखील मोठ नुकसानच आहे. सारा भारत बौद्धमय करण्याची जबाबदारी ज्या बौद्ध समाजावर आहे. त्या बौद्ध अर्थात पुर्वाश्रमीच्या महारांनी दरेकाने दरेकाला धम्मदिक्षा देण्याच्या बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराच महत्व समजून तर घेतले नाहीच पण स्वत: देखील परिशुद्ध बौद्ध म्हणून जगू शकले नाहीत. तेव्हा जागृत व प्रामाणिकपणे कार्यरत असणाऱ्या व प्रांजळ, निर्मळ बौद्ध उपासक उपासीकांवर अंतर्गत सांस्कृतिक शुद्धिकरणाची एक मोठी जबाबदारी येऊन पडते आहे.
क्रांतीसुर्य डां. बाबासाहेब आँबेडकरांना भावपूर्ण श्रद्धाजंली पाच कलमी शुद्धिक्रियेच्या निश्चयाने करून एकशुद्ध चळवळ अर्थात समतेचा हा रथ पुढे घेऊन जाण्यासाठी एक "क्लिन मुव्हमेंट" उभी करूया. बौद्ध समाज अतंर्गत सांस्कृतिक शुद्धिकरणा करिता पाच कलमी शुद्धिक्रिया :-
१) बौद्ध सणांच्या व्यतिरिक्त इतर धर्माचे सण साजरे करणार नाही. दिवाळी बोनस इतर सणांनिमित्त मिळणारी खर्ची इनव्हेस्ट करा. ज्या धम्म संघटनांनी धम्म शिबीरे आयोजित केली आहेत त्या शिबीरांमध्ये सहभागी व्हा.
२) अंधश्रद्धा वाढीस लागले अशा देव पुजेपासून परावृत करणे.
३) दर एकाने देवी बसविणाऱ्या एका कुटूंबाला किंवा एक मंडळाला देवी बसविण्यापासून परावृत करण्याचा निश्चय करावा.
४) धम्मचक्र प्रवर्तन दिन घरा - घरात सणा सारखा साजरा करण्याचा निश्चय करा. या पवित्र दिनी किंवा अन्य काही दिनांचे औचित्य साधून बौद्ध लेण्यांवर बौद्ध पर्यटन स्थळावर तसेच आपल्या प्रेरणा स्थळांवर सहलीचे आयोजन करा किंवा वैयक्तिक रित्या भेटी देत रहा.
५) वर्षावास कार्यक्रमाच्या आयोजना करिता विहार कमिट्यांना, मंडळाना, महिला मंडळांना, असंघटीत उपासकांना काही काळ अगोदर विचारपूस करून प्रोत्साहन द्या. वर्षावासाला अद्यावत स्वरूप देण्याचा निश्चय करा.
हा पाच कलमी कार्यक्रम म्हणजे महानगरपालिकेच्या साफ सफाई खात्या सारखाच पण सांस्कृतिक साफ सफाईचा कार्यक्रम आहे. त्याला संत गाडगे महाराजांच असणार स्वच्छता अभियान देखील म्हणता येईल. बौद्ध समाज जर शुद्ध स्वरूपात एक बुद्धिस्ट आयडाँल म्हणून उभा राहिला तर त्यांच प्रचाराने आणि प्रभावाने अनेक लोक कर्मकांड, अंधश्रद्धा, दैव्यवाद यापासून मुक्त होऊन बौद्ध धर्माचा स्विकार करतील. त्यातून शुद्ध बहूमत तयार होऊन राजा सम्राट अशोकासारखे कल्याणकारी राजकारण देखील साध्य होईल. पाच कलमी शुद्धक्रियेच्या प्रचार, प्रसाराचा सम्यक संकल्प हिच महामानव परमपुज्य डाँ. बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण आदराजली ठरेल.
महामानवाला अभिवादन करूया. एक असा संकल्प करूया. समाजाला सांस्कृतिक प्रदुषणातून मुक्त करूया.
आवहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123
• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com
• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com
• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा