गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

◆ महापरीनिर्वाण दिनी पोटाच्या खळगीची चिंता कशाला हो?

◆ महापरीनिर्वाण दिनी पोटाच्या खळगीची चिंता कशाला हो?

बापाकरिता ते सुद्धा करू शकत नाही का? आज आपण खरंतर नाकानं श्वास, तोंडात घास घेतो तो आपल्या महाजन्म देणाऱ्या बापामुळे अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच. ६ डिसेंबर आपल्या बाबांच्या महापरीनिर्वांनाचा दिवस हे सांगण्याची गरज नाही? मात्र त्यादिवशी ना धड 'श्वास', ना 'घास' घेऊ शकत? अशी केविलवाणी अवस्था झालेली असते. याला जबाबदार कोण? अर्थात आपण सर्व अनुयायी? महाराष्ट्रातून आलेल्या अनुयायीना घास (जेवण) देणारे, वाढणारे व हातात पत्रावळी घेत खाणारे यांना महापरीनिर्वान दिनाचं महत्व, गांभीर्य याची परिभाषाच उमजून येत, घेत नाही.

खाली अस्ताव्यस्थ विखुरलेल्या पत्रावळ्या जिकडे तिकडे झालेली अन्नाची नासाडी, नियोजन बद्धता याची कमालीची उणीव, याला कारणीभूत कोण? आपणच नाही का?
महापारीनिर्वान दिनाला अभिवादन करणं दूरच केवळ बापाच्या नावानं दोनचार दिवस टाईमपास करण्याकरिता चलो मुंबई. प्रवास सुद्धा त्यांच्या नावानं अगदी फुकटात, नाही का?

कोणाच्या बापाची भीती आहे? तुमच्याकडे तिकीट आहे का असं विचारायची? हिंमत आहे का? आहे की नाही आपल्या महाजन्मदात्या बापाची कमाल? कमाल तर आपल्या बापानी नक्कीच करून ठेवली आहे. मात्र त्यांच्या अनुयायी महापारीनिर्वांच्या दिवशी कशा प्रकारे वावर करतो. कोणत्या तोऱ्यात असतो? कोणत्या थाटा माटात असतो याचा विचार कधी होतो का? कोण मायका लाल करतो का?

पहा, 
बापाच्या महापरीनिर्वान दिनी केवळ एक दिवस तोंडात घास घेतला नाही तर कोणता अनर्थ संकट घडणार आहे का? अथवा आपला जीव प्राण जाणार आहे का? एक दिवस पोटाच्या खलगीला दाबून ठेवू शकत नाही का? अर्थात उपाशी राहू शकत नाही का?

मित्र हो,
मान्य आहे, अनेक मैल दूर वरून येणाऱ्या उपाशी पोटी अनुयायी लोकाकरिता जेवणाची व्यवस्था करणाऱ्यांनी अगदी पूर्व नियोजन पद्धतीने केलं तर अवघ्या शिवाजी पार्कवर अन्नाच्या अस्ताव्यास्त दिसणाऱ्या पत्रावळ्या नक्कीच दिसणार नाही.

बंधुनो,
बाबांच्या महापारीनिर्वांण दिनी अन्नाची कमालीची नाशधुस होत असून हेच अन्न ५८ वर्षापूर्वी उकिरड्यावर सुद्धा खायला मिळत नव्हते, ही त्या काळातील वस्तुथिती असताना ६ डिसेंबर अर्थात स्मरण दिवशी अन्न आपण अक्षरशः पायदळी तुडवतो आहे हे लक्षात असून देखील एवढी वर्ष असेच प्रकार उघड्या डोळ्या देखत पाहत आहोत, घडत आहेत.

जबाबदार कोण? अर्थात आपणच बरोबर ना?
ज्यांनी घास तोंडात घ्यायला शिकवला व त्याच्याच निर्वाण दिनी पाया खाली तुडवितो हे अक्षम्य बाब नक्कीच आहे. ही वास्तव नजरे समोर घडत असताना पाहून अतिशय खेद वाटतो. आपण बाबासाहेबांच्या महान विचारांची नक्की पाय मल्ली करावयला लागलो की काय? अशी पुसटशी जाणीव मनात निर्माण होते? शंका निर्माण होते?

आपणच परिवर्तन घडवून आणू शकतो. असे प्रकार थांबणं, थांबवणं बाबासाहेबांच्या तरुण लेकरांच्या बुद्धी विचारात घडवून आणायला वेळ लागणार नाही. केवळ विचारांची सांगड नियोजनता समय सूचकता राखून ६ डिसेंबर अर्थात महानिर्वाण दिन नियोजन कमिटीच्या सानिध्यात राहून विचार विनिमय करून नवीन संकल्पना राबवून महापारीनिर्वान दिन अगदी मौन, पायाकडे पहातच पार पडेल. या करिता प्रत्येक तरुण, अनुयायी व सामाजिक संघटनेचा सहभाग अधिक महत्वाचा असून महापारीनिर्वान दिनाला अभिवादन करताना केवळ बाबांच्या महान विचारांनाच उपकृत करून मार्गक्रमण करावे. त्यामुळे एक दिवस पोटाच्या खळगीची चिंता नकोच. बापाकरिता ते सुद्धा आपण करू शकत नाही का? त्यांच्या महान कार्यामुळेच वर्षातील ३६४ दिवस सुखानं दोन वेळच दोन घास पोटात ढकलतोच ना, मग केवळ एक दिवस उपाशी राहून अभिवादन करू शकत नाही का?

अहो, 
नव संजीविनी देणाऱ्या जन्मदात्या बापानं आपल्या करिता परदेशात केवळ एका पावावर दिवस काढले आहेत हे विसरू नका. त्यामुळे महापारीनिर्वान दिनी एका दिवसानं आपल्यावर कोणतीही आपत्ती अथवा मरण नक्कीच येणार नाही. अर्थात त्या ठिकाणी होणारी अन्नाची नाशधुस नक्की थांबेल. महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येक अनुयायीनी मनाशी पक्का विचार केला व स्वतःच्या अन्नाची व्यवस्था स्वतःच केली तर महापारीनिर्वान दिन अगदी शांततेत सुरळीत पार पाडण्याकरिता नक्कीच मोलाची साथ मिळेल.

मित्र हो,
विचार करून पहा. बदल परिवर्तन आपल्याच हातात आहे.

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
राजेश सावंत (लेखक, कवी, युवा मार्गदर्शक)
"आसरा एज्युकेशन आणि सामाजिक संस्था"

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा