शुक्रवार, २३ डिसेंबर, २०१६

● लागू करतो, बोंबलत बसा...

● लागू करतो, बोंबलत बसा...

उद्देश -
लहान ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत जनहितार्थ प्राचीन काळातील माहिती प्रसारित करणे, हे प्रत्येक व्यक्तीचे कार्यव्य असले पाहिजे.

लेख - 
यतिन जाधव

पूवीचे आमचे पूर्वज इस्लाम धर्म पैदा येण्या आधीच मनुस्मृतीचे शिकार होत आलेत, सर्वांन पेक्षा शुद्र म्हणून हिंनवले जाणारे हाडा मासाची माणसांनाच खुपच हालापेष्ठा, अत्याचार, दुख जास्त भोघावे लागत होते. शुद्रांची संख्या जास्त होती तरी संघर्ष करण्याची ताकद मनगटात उगवत नव्हती, असे असले तरी जेव्हा त्यांना आपला पुढारी तर मिळालाच तो म्हणजे डाँ. बाबासाहेब आंबेडकर.

पूर्वी स्त्रिया आणि शुद्रावर होत असलेले अन्याय अत्याचार ब्राह्मण सोडून इतरांवर ठेवलेले वर्चस्व पाहून बाबासाहेबांनी माणसाला माणूसकीचा हक्क मिळवून देण्या करिता एका एकाला भिम शक्तिचा पोलादी कणा दाखवणून दिला, असे खुप काही करून दाखवाचे होते. नंतर  ते स्त्रियांना हक्क मिळवून देण्यास विचारधीन झाले त्याना या संलोख अभ्यासा नंतर कळून आले की या सर्वांचे हाल एका कु - विचारी ग्रंथामुळे झाला आहे. यातत स्त्रियाना हिन लेखले गेले आहे शुद्राना खचले गेलेले आढळले, अश्या बाबतीत निर्णय घेऊन स्त्रियांसाठी इतरांसाठी याला भुगृ याचे विचार म्हणजे मनुस्मृती जबाबदार असल्यास ती भर चौकात जाळून टाकण्यात आली. आता पुरे झाले राज्य घटना आम्हाला बरी आहे मग जर ब्राह्मणानो तुम्हाला मनुस्मृती प्रिय तर तो तुम्हाला लागू करुतो. बोंबलत बसा...

आताचे ब्राह्मण, भट, पंडे, स्वत:ला कट्टर म्हणजे सनातन हिंदू म्हणणाऱ्या लोकांसाठी मनुस्मृती संध्या राज्य घटनेपेक्षा चांगली वाटते. तेव्हा यांच्या पुरती राज्य घटना रद्द करून मनुस्मृती लागू करण्याची परवागनी त्यांना देऊ या. इतरांवर वर्चस्व गाजवणारी मनुस्मृती लागू व्हावी असे यांना वाटत असले तरी इतर लोक ते आता मानणार नाहीत, त्या इतर लोकांना मनुस्मृती नको आहे, राज्य घटना हवी आहे. तेव्हा मनुस्मृतीचा ते भाग लागू व्हावा असे ब्राह्मणाना किती ही वाटत असले तरी आता ते घडू शकत नाही परंतू मनुस्मृतीचे समर्थन करणाऱ्या ब्राह्मणा पुरती बाकीची मनुस्मृती लागू करण्यास आमची काही हरकत नाही.

ब्राह्मण विदूषकांना मनुस्मृती सु - राज्याची निर्मिती करणारी वाटू लागली आहे. तेव्ही त्यांच्या साठीच ती लागू करू या. त्यांच्या मुलींची लग्ने वयाच्या ८ व्या वर्षी २४ वर्षाच्या तरूणा बरोबर होऊ देत. त्यांच्या मुलींचे शिक्षण बंद करा, विधवा विवाहावर बंदी आणा. स्त्रियांना कोणत्याही निर्णय घेण्याचा अधिकार देऊ नका. त्या अप्रिय बोलल्याचे निमित्त करून त्यांच्या नवऱ्यांना २ लग्ने करू द्या. रजस्थलेशी बोलू नये (४. ५७), पत्नी सह भोजन करू नये (४. ४३) इत्यादी नियम लागू होऊ देत अर्थात कोणत्याही स्त्रियांच्या बाबतीत असे नियम लागू करावेत, असे मी अंत:करणा पासून म्हणू शकत नाही  कोणी खरोखरच असे नियम लागू करू लागले तर मी त्यांना जोरदार विरोधच करेन. भारतीय राज्य घटना मनुस्मृती पेक्षा हिणकस आहे. असे मानण्याचे पर्यवसान कशात होते, इतकेच मला या विधानातून दाखवून द्यायचे आहे.

ब्राह्मण पुरूषांच्या बाबतीत ही मनुस्मृतीचे नियम लागू होऊ देत. ब्राह्मणाने संथ्या केली नाही, कि त्याला शुद्रा प्रमाणे बहिष्कृत करावे (२. १०३), असे तिचे सांगणे आहे. जो वेदांचे अध्ययन न करता इतरत्र श्रम करतो. तो ताबडतोब शुद्र बनतो, (२. १६८) असे तिचे म्हणणे आहे. तिच्या म्हणण्या नुसार चप्पल व छत्री धारण करण्याची नाही. राजमेवा, शेती इत्यादी मुळे कुलाचा नाश होतो (३. ६३ - ६४), शुद्र राज्यात राहू नये (४. ६१), नृत्य, गायन, वादन करू नये (४. ६४), नग्न स्थान करू नये (४. ४५), चप्पल घालून व दक्षिणेकडे तोंड करून जेवू नये (३. २३८), चिकित्सक म्हणजे डाँक्टर, व्यापारी, नोकरी करणारा. अग्नि होत्राचा त्याग करणारा, व्याज घेणारा, पशूपाल, पगार घेऊन शिकवणारा, पगार घेऊन शिकवणाऱ्या कडे शिकवणारा, शुद्रचा शिष्य, शुद्राचा गुरू, समुद्र प्रवास करणारा, भाट, तेल विकणारा, मद्य पिणारा, युद्धाचार्य, ज्योतिषी, पक्षी पाळणारा, कुत्र्यांशी खेळणारा, नित्य याचना करणारा, कृषि जीवी इ. ब्राह्मण अंध पतीत होत असे मनुस्मृतीचे (३. १५३ - १६७) सांगणे आहे. असे आणखी बरेच नियम आहेत.

मनुस्मृतीचे समर्थन करणाऱ्यांसाठी हे सगळे लागू देत. व समर्थकांना मात्र या नियमांसाठी मनुस्मृती प्रिय नाही. ब्राह्मणोत्तरांना तुच्छ लेखणाऱ्या नियमांसाठी ती हवी आहे. तिचे कौतुक आहे. मनुस्मृतीचे झोंबणारे नियम यांना रूजणार नाहीत. पण इतरांच्या काळजी वर जखमा करणाऱ्या नियमांचा संताप येण्या इतपत विवेक मात्र यांच्याकडे नाही. म्हणे समतेच्या बाबतीत राज्य घटना मनुस्मृती पेक्षा हिणकस आहे! सगळ्यांना आत्मा एकच असतो वैगेर ढोंगी वाक्ये राज्य घटना त्यांच्या पेक्षा हिणकस आहे, अशी बतावणी हे करणार! प्रत्यक्ष आचाराच्या बाबतीने मनुस्मृतीचे काय दिवे लावले आहेत. आणि या दिव्याचा तुमच्या हृदयात, बुद्धित काय उजेड पडेला आहे? ते पाहा ना! आपल्या जातीच्या अंहकार पलीकडे काहीही पाहायचे नाही इतके आंधळे होऊन राज्य घटनेला नावे ठेवत आहात आणि वर राष्टाच्या, समाजाच्या, हिंदूच्या ऐक्याच्या गप्पा मारत आहात. आम्हाला आमची राज्य घटना प्रिय आहे. तिच्यातील उणिवा दूर करून ती अधिकाधिक परिपूर्ण आणि न्यायाधिष्ठित करण्याचा आम्ही प्रयत्न करू.

तुम्हाला तुमची मनुस्मृती लाख लाभ असो. तुमच्या पुरती तिची अंमल बजावणी ताबडतोब सुरू करा. क्षणाचा ही विलंब लावू नका. त्यामुळे संमृद्ध, संपन्न व्हाल. तुमची मुले - बाळे सुख - समाधानात राहतील. तुम्ही संस्कृती सर्वांन पेक्षा श्रेष्ठ ठरेल. सगळे जग सु - संस्कृत होण्यासाठी, संस्कार विकून घेण्यासाठी तुमच्या पायावर लोळण घेईल. अशा भ्रमात खुशाल राहा. मनुस्मृतीला उराशी कवटाळून बसा. तिची पुजा करा. ती डोक्यावर घेऊन नाचा. बोंबा मारत बोंबलत बसा. ती तुमच्या वाटेला आली नाही. तर आम्ही त्या अप्रतिम शब्दांचा उच्चार ही करणार नाही.

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

साभार -
"यतिन जाधव" यांच्या फेसबुक पेज वरून..

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

• मनूच्या चित्तेला आग लावणाऱ्या महापुरुषास त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन तसेच स्त्री मुक्ती दिनाच्या करोडो शुभेच्छा ।

अभिवादक एवं शुभेच्छुक -
यतिन जाधव (व्यवस्थापक), राजेश सावंत, सविता बावीसकर, तेजस हजारे, भंते गौतम रत्न थेरो (संचालक : दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया)

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर ADD (सहभागी) व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा