सोमवार, ५ डिसेंबर, २०१६

● चैत्यभूमीवर क्रांती युगसूर्याची ऊर्जा

● चैत्यभूमीवर क्रांती युगसूर्याची ऊर्जा

बाबांचा जन्म नका,
समजू एका दिवसाचा ।
बाबांचा जन्म म्हणजे,
बुद्ध धम्म प्रत्येक क्षणाचा ।।

कायमच स्मरणात ठेवा,
नको विचार एका दिवसाचा ।
स्मृती ठेवा जपून हृदयात,
नको विसर या चैत्यभूमीचा ।।

डॉ. बाबासाहेबांचे महानिर्वाण भारताची राजधानी दिल्ली येथे त्यांच्या निवास स्थानी झोपेतच झाल्याचे गुरुवार दि. ६ डिसेंबर १९५६ रोजी सकाळी ६ वाजता आढळून आले. भारताच्या राजकीय, सामाजिक आणि क्षितिजाच्या पली कडील वैचारिक तेज असणारे आपल्या ज्ञान गंगेने मागासलेले उपेक्षित धम्म प्रवर्तनाने बुद्ध धम्माचा रक्तरहित क्रांती करून स्वीकारणारे महामानव यांच्या महापारीनिर्वानाची रात्र म्हणजे आपल्या बौद्ध बांधवांची काळरात्र ठरली होती. अतिशय संघर्ष पूर्ण जीवन उपेक्षित समाजासाठी बाबांनी वाहून घेतलेलं होत. हेच त्यांचे संघर्षमय जीवनाचा अंत अर्थात आपल्याला पुढील आयुष्यातील भवितव्याला सामोरे जाण्याचा आणि बुद्ध धम्माचा कायापालट करण्याचे मोठे आव्हान या समाजावर लवकरच आले असे राहवून वाटत आहे. धम्मचक्र प्रवर्तन करून अवघ्या दोनच महिन्यात बाबा आम्हाला सोडून गेले. याच दुख आज आपल्यावर आहे हा मोठा आघातच म्हणावे लागेल. कदाचित बाबासाहेब आणखी काही वर्ष हयात असते. तर या देशातील प्रत्येक अश्पृशय व्यक्ती बुद्ध धम्माचा अनुयायी झाला असता या बद्दल शंकाच नाही. तथागत गौतम बुद्धांनी अवघ्या मानव जातीला घरोघरी जावून धम्म सांगितला तसाच बाबासाहेबांचा संकल्प होता. "मी सारा भारत बौद्धमय करीन" परंतु काळाने त्यांच्या वरती लवकरच झडप घातली आणि महान युग सूर्याला वयाच्या ६५ व्या वर्षी महापारीनिर्वान प्राप्त झाले.

दिल्लीला महापारीनिर्वानानंतर बाबासाहेबांचे पार्थिव मुंबई विमानतळावरून राजगृह या त्यांच्या निवास्थानी आणले जात असताना विमानतळावर त्यांचे सहकारी, नातेवाईक बाबासाहेबांचे चिरंजीव यांना अश्रू आवरणे अतिशय कठीण जात होते. त्यावेळी विमान तळावरच बाबासाहेबांच्या अखेरच्या दर्शनाची संधी मिळावी म्हणून विमानतळ बाहेरील जागेत जवळ जवळ वीस ते पंचवीस हजार लोकांनी दुतर्फा रांगेत उभे राहून बाबासाहेबांना मानवंदना देत होते. नंतर बाबासाहेबांचे पार्थिव शव वाहिनीतून विमानतळ ते राजगृह या पाच ते सहा मैलाच्या रस्त्यावर ठिक ठिकाणी दोन्ही बाजूला बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी रात्रीची व कडाक्याची थंडीची पर्वा न करता बौद्ध बांधव अफाट जन समुदाय कितेक तास तिष्ठत उभा होता. डोळ्यातून अश्रूच्या धारा वहात ढसा ढसा रडत होता. काही जण पुष्यहार, फुले घेऊन बाबांचे दर्शन घेण्यासाठी वेडा पिसा झाला होता. केवढे मोठे दुख, संकट समाजावर आले होते. एक अस्पृशांचा कैवारी गाढ निद्रेत शांततेने मार्गक्रम करीत राजगृहाकडे मार्गस्थ होत होता. तेथे रात्रभर पाच लाख अनुयायी आकाश वाणीवर बाबांच्या महापारीनिर्वानाची बातमी ऐकून राजगृहावर जमा झालेले होते. एवढा जन समुदाय आवरणे समता सैनिक दल, पोलिसांना अशक्य झाले होते.

माझ्या काही जुन्या आजोबांनी सांगितले होते की, बाबासाहेबांचे महापारीनिर्वांची वार्ता सगळीकडे पोहोचली. तेंव्हा अनेक जण बेशुद्ध पडले होते. काहीना दुख अनावर होऊन वेडे पिसे होऊन लोळण घेत होते. काही स्त्रिया तर अकांड तांडव करीत होत्या. केवढ अमाप प्रेम या महामानावर होते. याची कल्पनाच करवत नाही त्यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी लोकांच्या रांगच रांगा दिसत होत्या. अनेक ठिकाणी जन सागराची गर्दी ओसंडून वहात होती. त्यामध्ये अनेक लहान मुलांच्या आई सहभागी झाल्या होत्या. त्या मधील एक त्या अलोट गर्दी मध्ये बाबासाहेबांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आक्रोश करीत होती. चोही बाजूला गर्दी असल्यामुळे तीच लहान मुल मोठ मोठ्याने रडत होतं. परंतु तिचं मुलाच्या रडण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. कसं तरी ती त्याला कडे वर घेऊन बाबासाहेबांच्या पार्थिवाच दर्शन घेणं हेच एकमेव लक्ष तिच्या समोर होत तिच्या नकळत त्या अलोट गर्दी मध्ये ते मुल तिच्याकडे वरून खाली पडलं आणि क्षणार्धात ते मुल अनेक लोकांच्या पाया खाली तुडवल गेलं आणि त्याचा मृत्यू झाला. जेंव्हा तिला काही लोकांनी विचारलं की एवड्या दुखाच्या महासागरात लहान मुलाला का घेऊन आलीस तेंव्हा ती स्त्री म्हणाली - "माझ्या मुलापेक्षा करोडो लोकांचे बाबा गेले त्याच मला जास्त दु:ख आहे." माझा मुलगा मरण पावला हे माझ्या डोळ्यासमोर आहे. परंतु काही झालं तरी बाबासाहेबांनी समाजाला मानवतेचा मार्ग दाखविला त्याचं अंतिम दर्शन घेणं हेच माझा ध्येय, कर्तव्य आहे. मला काही वर्षांनी परत मुल होईल. पण डॉ. बाबासाहेबांचे दर्शन कधी ही घडणार नाही.

डॉ. बाबासाहेबांच्या मोठा भिम सागर अंत्य दर्शनासाठी जमा झालेला होतं. केवढी महानता या युगपुरुषामध्ये होती हे महापारीनिर्वानाच्या यात्रे वरून सांगून जात होती. अथांग महासागरला लाजवेल असा जन समुदाय दर्शनासाठी येत होता. या बाबांच्या अंत्य यात्रेत अलोट जन समुदाया पुढे रस्ते सुद्धा वाट विसरायला लावणारे होते. लाखोच्या घरात जनसागर लोटला होता. काही तासाकरिता मुंबईचे जन जीवन विस्कळीत झाले होते. ज्या ज्या मार्गातून अंत्ययात्रा जात होती त्या भागातील सारे व्यवहार बंद झाले होते .या महामानवाला आदरांजली, अभिवादन करण्यासाठी आलेल्या जन सागराच्या भावनाचे जे विराट दर्शन दादरला पहावयास मिळाले. ते जगाच्या पाठीवर इतर कोणाला ही प्राप्त झालेलं नसावे हे आवर्जून नमूद करावेसे वाटते. या भूतलावरील कोणत्याही सामर्थ्यापेक्षा किंवा कोणत्याही सत्तेपेक्षा ही मानवी अंत:करणातल्या भावना किती प्रचंड शक्तिमान आणि पौर्णिमेच्या शीतल चांदण्या प्रमाणे असतात हे बाबासाहेबांच्या महापारीनिर्वांणाच्या दिनी बौद्धांनी अनुभवले. संपूर्ण जगाने अनुभवले असेल. शेवटी बाबासाहेबांना अश्रु नयनांनी बौद्ध बांधवांनी आणि त्यांच्या अनेक सहकारी राजकीय सहकारी मित्र परिवार मंडळीनी शेवटचा निरोप घेतला. तो महापारीनिर्वाणाचा दिवस कोणी ही विसरू शकणार नाहीत. कारण बाबासाहेबांनी स्वत:च्या रक्ताचा प्रत्येक थेंब हा मागासलेल्या उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी आणि त्यांना बुद्धांचा मार्ग दाखविण्यासाठीच सांडला केवढे थोर उपकार ।

शेवटी जाता जाता गौतम बुद्धांच्या धम्माची बुद्ध ज्योत लावूनच गेले. अश्पृशय माणसाला पशु ही निन्तेची वागणूक दिली जात होती. ती अभूतपूर्व सर्वांगाने मानवतेचा मार्ग दाखवून मनुवादी, हिंदुवादी याच्या विचारणा कवडी मोल ठरवून 'बुद्धिवादी' विचार आपल्याला दिला व आचरणात आणून तो वाढविण्यासाठी पराकाष्टा सहन केली म्हणून आपण सुखाने जगत आहोत. म्हणून बौद्ध बांधवांनी दादर स्मशान भूमी ही बाबांच्या महापरिनिर्वानंतर चैत्यभूमी म्हणून बौद्धांच अस्तित्व, भावना प्रेरणास्थान जागृत करण्याची भूमी उदयास आली. बाबासाहेबांवर समाजाने अमाप प्रेम केल त्यांचा आदर्श जपण्यासाठी चैत्यभूमीला बाबासाहेबांच्या अस्थि कलशाने पावन झालेली भूमी म्हणून आपण ओळखतो. चैत्यभूमीवर जाताना आपल्या डोळ्यासमोर त्यांची महानता उभी करून अभिवादन करा. स्वतः श्रद्धाळू बनण्या पेक्षा त्या चैत्यभूमीलाच आदर्शवान म्हणून पहा.

नक्कीच आपल्याला प्रज्ञा, करुणा याचा आभास होईल. चैत्य निर्मानाने बुद्ध धम्माची क्रांती निर्माण होईल. त्यातूनच धम्म प्रबोधानाने धम्म प्रवर्तनाला जोर येईल २२ प्रतीज्ञाचे पालन करणारा अनुयायी तयार झाला तर धम्म प्रचारक वाढतील. बाबासाहेबांच्या महापारीनिर्वान दिनी दर्शन घेण्यासाठी जगातून बांधव उपस्तीत राहतात. हा मोठा आदर्श आपल्या समोर उभा आहे. परंतु आज हा आदर्श त्यांच्या महापरिनिर्वानानंतर टिकवण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत का? मागासलेले उपेक्षित लोकांची संख्या या देशात अधिक आहे. अशा लोकांना बुद्ध धम्माकडे वळविण्याचा प्रयत्न होतील का? आणि तो होणे काळजी गरज आहे. अर्थात आपण बाबासाहेबांचा संदेश "मी सारा भारत बौद्धमय करीन" हा जय घोष टिकवण्याचा प्रयत्न करीत आहोत. असा त्याचं अर्थ होईल. अन्यथा अतिशय गहन प्रश्न आपल्या समोर पहाडा सारखे उभे आहेत. आज धम्मचक्र प्रवर्तन होऊन ५७ वर्ष उलटली तरी ही फक्त सकाळी उगवणाऱ्या सूर्याची किरणे डोंगराच्या माथ्याशी येईपर्यंत, प्रकाशमान होईपर्यंत कधी सांयकाळ होते तेच कळत नाही. अशी अवस्था आपली झाली आहे. असा आदर्शवान युग सुर्य बाबासाहेबांच्या संकल्पनेतील सूर्य आज मावळलेला असला तरी कदाचित उद्या उगवणारा सूर्य सकाळी क्रांतिकारक जग बदलण्यासाठी उगवेल त्याचीच प्रतीक्षा आहे.

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
राजेश सावंत (लेखक, कवी, युवा मार्गदर्शक)
आसरा एज्युकेशन आणि सामाजिक संस्था

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया

••◆●•●◆••●●◆••◆●•●◆••

• महामानवास विनम्र अभिवादन ।

••◆●•●◆••●●◆••◆●•●◆••

अभिवादक  -
राजेश सावंत, यतिन जाधव, सविता बावीसकार, तेजस हजारे (संचालक : दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया)

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा