● अशी एक चिरंतन आठवण : झाला पोतराज जयभीमवाला
दुपारची वेळ होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजगृहामध्ये आराम खुर्चीत बसून वाचन करीत होते. रखरखत्या उन्हामुळे शांत वातावरण होते. बाबासाहेब आपल्या वाचनात मग्न होते. या स्मशान शांततेचा भंग करणारा डूमडूम, चकलम - नकलम, गुबुगुबू आणि चाबकाच्या फटक्याचा आवाज घरातील इतरांच्या कानावर पडत होता. हळूहळू हा आवाज वाढत होता. एक पोतराज उघडा बम कमरे पासून खाली नेसलेली विविध वस्त्रे, पायात घुंगराचे चाळ, हातात मोठा आसूड, त्याच्या बायकोच्या डोक्यावर मरिआईचा देव्हारा, पाठीवर कापडात बांधलेले लहानसे मूल, व तिच्या गळ्यात असलेले ढोलके ती जोराजोराने वाजवित होती. त्या तालावर पोतराज नाचत होता व आपल्या हातातील चाबकाचे स्वताच्या अंगावर फटकारे मारुन पैशासाठी हात पसरत होता. आता मात्र पोतराज व त्याची बायको बंगल्या समोर आल्यामुळे आवाज मोठा झाला होता.
बाबासाहेब वाचत असतांना त्यांचे लक्ष्य विचलित झाले. त्यांना वाटले एक दोन मिनिटांत हे थांबेल म्हणून ते तसेच बसून राहिले. पण आवाज काही बंद होईना. त्यांनी पुस्तक बाजूला ठेवून नोकराला बाहेर कोण आहे? ते बघायला सांगितले. नोकराने पोतराज व त्याच्या बायको विषयी सांगितले. बाबासाहेब शांत बसून राहिले, परंतु आवाज काही कमी होत नव्हता म्हणून बाबासाहेबानी त्यांना वर बोलावन्यास सांगितले. नोकराने हाक मारुन पोतराज व त्याच्या बायकोला वर येण्यास सांगीतले. बाबासाहेबानी वर येण्यास सांगीतले हे ऐकून त्यांची घाबरगुंडी उडाली. ते वाजविने - नाचने बंद करुन प्रचंड भीतीने निस्तेज होवून राजगृहाच्या जिन्याच्या पायऱ्या चढू लागले. त्यांच्या मनात भिती होती, आपल्यामुळे साहेबाना त्रास झाला असावा. वरच्या मजल्यावर त्यांनी दुरूनच बाबासाहेब आराम खुर्चीत बसलेले पाहिले आणि माना खाली घालून ते त्यांच्या समोर काही अंतरावर उभे राहिले.
बाबासाहेबानी त्यांचे निस्तेज चेहरे, उन्हाने काळवंडलेले व घामाने भिजलेले शरीरे, त्यांच्या अंगावरील जीर्ण वस्त्रे व त्या बाईंच्या पाठी वरील मूल पाहून पोतराजला त्याचे नाव काय ते विचारले - एखादी "नोकरी - धंदा का करीत नाहीस?" असे विचारले. हा भिक मागण्याचा धंदा तुम्हाला बरा वाटतो काय?
त्यावर पोतराज बाबा साहेबाकडे न पाहता खाली मान घालुनच म्हणाला - "माय बाप माझ नाव शिवराम पोतराज हाय. अन म्या शिकलो न्हाय म्हणून कुणी नोकरी देत व्हय अन धंद्यासाठी पैका (पैसा) नाय. पानाची टापरी काडिल म्हणतो पैन पैसा नाय. माय बाप दोन पोर, आय बाप हाय त्यांच पोट कस भरू? म्हणून हाच धंदा पत्कारला."
त्या महामानवाचे हृदय पोतराजची परिस्तिती ऐकुन पाझरले. काही क्षण ते स्तब्ध झाले व त्याला म्हणाले - "ठीक आहे. तुला जर धंद्यासाठी कुणी पैसे दिले, तर तू कोणता धंदा करशील?"
त्यावर तो म्हणाला - "माय बाप माझ्या गावाले जावून चाय पाण्याची नाय तर वीडी पान सुपारीची टपरी टाकिन. पण माय बाप आम्हासनी पैका देतो कोण?" बाबासाहेब पुन्हा स्तब्ध झाले आणि खुर्चीतून उठून कपटाकडे गेले. एक हजार रुपये आणले व विचार न करता त्या पोतराजच्या हातात ठेवले व म्हणाले - "हे बघ शिवराम एक हजार रुपये आहेत. तू म्हणालास त्याप्रमाणे तुझ्या गावाकड़े जा, काही तरी धंदा करुन तुझ्या कुटुंबाचे पालन कर आणि हा धंदा सोडून दे."
एक महापुरुष आपल्या हातावर एक हजार रुपये ठेवत आहे, हे आपण एक दिव्य स्वप्न तर पाहत नाही ना? त्याने क्षणात स्वतःला सावरले, ही वस्तुस्थिती आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हा भरभरुन दान देणारा माय बाप महापुरुष आहे तरी कोण? हे बघावे या उद्देशाने शिवरामने अश्रू भरलेल्या नयनानी बाबासाहेबकडे एक दृष्टीक्षेप टाकला. शिवराम पोतराजसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर किती तरी महान होते. या गोष्टीला आज ७५ वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. त्या वेळचे एक हजार रुपये आज एक लाखापेक्षा ही जास्त आहेत. दोघांनी ही हात जोडून वाकून बाबासाहेबाना वंदन केले.
"येतो माय बाप" म्हणून भरा भरा जीना उतरून निघून गेले. शिवराम पोतराजने त्याच दिवशी मुंबई सोडली व आपल्या बिरहाड सह तो अहमदनगर जिल्ह्यातील गावाकडे गेला.त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. कारण एक हजार रुपये त्याने आज पर्यंत कधीही पाहिले नव्हते. त्याने थोड़े पैसे घराच्या डागडुगीसाठी वापरले व बाकी पैशात पान सुपारी, वीडी, तम्बाखू वगैरेची टपरी लावली. दिवस जात होते, महीने जात होते. धंदा बऱ्या पैकी चालत होता. रोजच्या पैश्यातुन शिवराम आपले घर चालवून थोडे शिल्लक पैसे टाकत होता. त्याने दुसरी ही टपरी सुरु केली.
आता तो सुखाने जीवन जगत होता. अधुन मधुन त्याला बाबासाहेब यांची आठवण व्हायची. तो आपल्या मनातून त्यांना धन्यवाद द्यायचा. त्यांचे लाख आभार मानायचा. असे गरीबांचे वाली जन्माला यावेत इतराना सांगायचा. तो व्यथित होवून आपण बाबासाहेबाना हजार रूपये जावून दिले पाहिजेत म्हणायचा. त्यांच्यामुळे आज आपण खूप चांगले दिवस पाहत आहोत. असे त्याला मनोमन वाटायचे. अशी वर्षामागून वर्षे जात असतांना दिनांक ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. ही काळीज चिरणारी दुःखद बातमी जगभरात पसरली. विशेषतः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, खेडोपाडयात पोहचली. जेंव्हा ही बातमी शिवराम पोतराज पर्यंत पोहचली, तेंव्हा त्याने हंबरडाच फोडला. तो धाय मोकलून रडू लागला. तो रडताना म्हणत होता, बाबासाहेब तुम्ही माझ्यासाठी सर्वस्व होतात. तुम्ही आम्हाला जगायला शिकवलेत, एका पोतराजला माणूस बनवले. तुमचे पैसे कोणाला परत करू? डॉ. बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेसाठी अहमदनगरहून जी मंडळी मुंबईत दाखल झाली त्यात शिवराम पोतराज ही आला. दादर स्टेशनला उतरून इतरासोबत राजगृहाकडे जात असताना राजगृह दृष्टीस पडताच, तो हंबरडा फोडून म्हणत होता, बाबासाहेब याच रस्त्यावरच्या पोतराजला तुम्ही माणूस बनवले. तुमचे पैसे कोणाला परत करू? डॉ. बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेसाठी अहमदनगरहून जी मंडळी मुंबईत दाखल झाली त्यात शिवराम पोतराज ही आला. दादर स्टेशनला उतरून इतरासोबत राजगृहाकडे जात असताना राजगृह दृष्टीस पडताच, तो हंबरडा फोडून म्हणत होता, बाबासाहेब याच रस्त्यावरच्या पोतराजला तुम्ही माणूस बनविलेत. हाच तो राजगृह ज्याच्यामुळे आज मी सुखी झालो. आता तुमचे एक हजार रूपये कोणाला देवू?
सांगा बाबासाहेब सांगा.... हे त्याच्या रडण्यातील बोल ऐकूण त्या ठिकानी उपस्थित असलेल्या पत्रकारानी शिवराम पोतराजला घेरले व विचारले तुझ्या जीवनात बाबासाहेब कसे आले? तेव्हा शिवरामने आपल्या बाबतीत राजगृहावर घडलेला सर्व प्रसंग सांगितला व शेवट करताना म्हणाला - "गरीबांचा वाली गेला" व पुन्हा धाय मोकलुन रडू लागला. असे करुणेचे महासागर, मानवतेचे कैवारी होते बाबासाहेब. पुन्हा होणे शक्य नाही.
कथासार लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123
• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com
• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com
• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा