शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

● डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिनक्रम

● डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दिनक्रम

बाबासाहेब सकाळी ५ ते ६ च्या दरम्यान उठत असत रात्री जरी ते उशिरापर्यंत वाचन लिखाण करीत तरी सुद्धा त्यांना सकाळी लवकर जाग येत असे. त्यांनंतर मुखार्जन व इतर प्रातःविधी उरकून ते चहा घेत असत चहा पिता पिता त्यांना वर्तमान पत्रे चाळण्याची सवय होती. त्यांनतर थोडा वेळ ते वर्तमान पत्र वाचत बसत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना न्युरायटीस व रक्तदाबाचा त्रास असल्याने त्यावर योगासन हा एक चांगला इलाज होता. म्हणून बाबासाहेब नियमित रोज योगासने करीत असत. त्यानंतर थोडा वेळ व्यायाम केल्यावर ते बंगल्याच्या व्हरांड्यात येऊन आराम खुर्चीत बसत. त्यानंतर त्यांचा ड्रायव्हर बाबासाहेबांच्या सर्वांगाला माॅलिश चे तेल लावून माॅलिश करीत असे. अशा प्रकारे नियमित माॅलिश करण्याची त्यांना सवय होती. ह्या माॅलिश चा हेतू हा कि त्यांच्या शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होऊन मज्जातंतुना तरतरी यावी. अशी त्यांची माॅलिश जवळ - जवळ अर्धातास चालत असे. योगासने व माॅलिश हा करणे हा त्यांच्या आजारावरील उपचाराचा एक भाग होता. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंघोळीला जात असत आंघोळ झाल्या नंतर डॉ. बाबासाहेब सकाळच्या न्याहरी (BrekFast) करण्यासाठी डायनिंग टेबल वर येऊन बसत साधारण ८ ते ९ च्या दरम्यान ते न्याहरी करिता ते टेबलावर हजर असत. डॉ. बाबासाहेबांच्या न्याहरीचा पहिला पाॅरिज कोर्स असे.

पाॅरिज म्हणजे उकळलेले ओट्स (Boiled Oats). हे उकळलेले ओट्स दुधात चांगल्या रीतीने मिसळायचे म्हणजे झाला तयार पॉरीज कोर्स! ह्या दुधात थोडे बादाम वाटून घातलेले असत. त्याला तुम्ही पेज म्हणा, कांजी म्हणा, पाश्चीमात्य भाषेत हा पदार्थ पॉरीज म्हणून ओळखला जातो. कधी कधी ते कॅार्न फ्लेक्स देखील घेत असत. कधी कधी अंड्यांचे बाॅईल्ड एग फ्राय, फुलं फ्राय, आमलेट, भूरजी तसेच स्क्रॅम्बल्ड एग, अंड्यासोबत गरम गरम टोस्ट बटर लावून घेत असत. निरनिराळ्या प्रकारचे जाम त्यांना विशेष आवडत असे. त्यानंतर कॉफी त्यांना खूप आवडत असे क्रोकरीची (चिनी मातीची भांडी) त्यांना फार आवड म्हणून नाश्त्यासाठी, चहासाठी, कॉफीसाठी जेवणासाठी असा निरनिराळ्या प्रकारच्या क्रोकरीचे संच त्यांच्या बंगल्यावर होते आणि तशी ताकीद त्यांनी घरातील नोकरांना दिली होती. निरनिराळ्या प्रसंगी निरनिराळे सेट ते वापरायला सांगत.

सकाळचा नाश्ता घेतल्यावर कार्यालयाला जाण्याची तयारी करीत असत. त्यांना ड्रेसअप व्हायला खूप आवडत असे. अशा प्रकारे सर्व तयारी झाल्यानंतर ते जायला निघत. बंगल्याच्या पोर्च मध्ये गाडी तयारच असे. घरातून ते साधारण ९.३० च्या दरम्यान बाहेर पडत. कारण त्यावेळी घटनेचे काम सुरु होते. म्हणून वेळेवर जावे लागत असे. त्यानंतर ते दुपारच्या वेळेस साधारणपणे १.३० ते २.०० च्या सुमारास घरी येत. आल्यावर जेवण घेत त्यांचा आहार फार कमी होता. गव्हाच्या पीठाचे दोन लहान फुलके (पुऱ्या) व थोडासा भात ते खात असत, जेवणात त्यांना मांसाहार आवडत असे. ते अगदीच थोड खात पण पदार्थात त्यांना विविधता आवडत असे.

दुपारचे जेवण आटोपल्या नंतर डॉ. बाबासाहेब थोडा वेळ आराम करीत असत. म्हणजे नुसते पडत असत कारण त्यांना आरामाची फार गरज होती. कार्यालयात कामे करून खूप थकून जात असत. मग थोडा वेळ आराम करून ते दुपारी ३.०० ला उठत आणि चहा घेतला कि पुनः पार्लमेंटला उपस्थित होत असत. त्यानंतर ते ९.०० ते १०.०० च्या दरम्यान परत येत आल्यावर ते खूप शिणलेले असत दिवसभराच्या अतीव ताणामुळे ते मलुल गेलेले असत. त्यांच्या इतकी जबाबदारी त्या वेळच्या कोणत्याही नेत्यावर नसावी. बंगल्यात खूप भव्य अशी लाॅन होती. एक लहानसा हौद होता. त्या हौदात कमळ देखील होती. हौदात लहानसे सुंदर असे कारंजे होते. या हौदा जवळ रात्रीच्या वेळी खुर्च्या व टेबल लावलेले असत तिथे बाबासाहेब बसत असत. घटना समितीचे काम, कायदा मंत्रालयाचे काम, दुसऱ्या दिवशी मांडल्या जाणाऱ्या कलमांची माहिती इतर सभासदांना देऊन त्यांच्या शंका निरसन करणे इ. अनेक कामे करून ते अतिशय थकून जात आणि मग त्यांची जेवणाची इच्छा होत नसे. परंतु नानाकचंद रत्तू हे त्यांना आग्रह करीत म्हणून नाईलाजाने त्यांना थोड खाव लागे. त्यानंतर ते बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर झोपण्यास जात. परंतु रात्रीच्या १ ते २ वाजेपर्यंत त्यांचे लिखाण - वाचन किंवा घटना समितीच्या नोट्स काढण्याचे काम सुरु असायचे. तसा बालम म्हणजे त्यांचा नोकर हा अधून मधून त्यांना काय हवे नको ते पहायचा. अशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दिनक्रम होता.

आवहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
सविता बावीसकार (संचालिका)
दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

1 टिप्पणी: