शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०१६

● दिशा कशी देणार?

● दिशा कशी देणार?

"बोले तेसा चाले त्याची वंदावी पाऊले" पत्नी रमाला दिल्या प्रमाणे पंढरपूरलाच नव्हे तर उभ्या महाराष्टातील पवित्र तिर्थस्थळांना लाजवेल असं दादर चैत्यभूमी वर महापंढरपूर निर्माण करणारे प्रज्ञासूर्य डाँ. बाबासाहेब आंबेडकर आपले मुक्तीदाता आहेत. त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने देश विदेशातून भीमानुयायी चैत्यभुमी वर येवून महामानव डाँ. बाबासाहेबांच्या चरणी माथा टेकून अभिवादन करतात. ही कोटी कोटी प्रणाम करणारी लाखो माणसं अन्याया विरूद्ध संघर्ष करण्याची डाँ. बाबासाहेबांकडून प्रेरणा घेत असतात. जन सागराने मानवता धर्म पाळला तर तिर्थक्षेत्र पंढरपूर आणि चैत्यभूमी मधील फरक स्पष्ट करता येईल.

शिवाजी पार्क वरील कँसेट विक्रेते, सामाजिक संघटना, आणि भोजन दान करणाऱ्या संघटना यांचा चाललेला गोंधळ हा आम्ही महामानवाचा महापरिनिर्वाण दिन साजरा करतो कि आनंदोत्सव साजरा करतो याचे आम्हाला भान राहिलेले नाही. लाखोच्या संख्येने चैत्यभूमी वर आलेल्या भीमानुयांना आपण अंधभक्त बनवित आहोत का? दादर चैत्यभूमी वर बाहेर गावावरून आलेल्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था पाहिली की वाटतं खरचं आमची परिस्थिती सुधारली का? कारण शिवाजी पार्क वर लोक गर्दीचा धुरळा उडत असतो. शहरी बांधव तोंडाला रुमाल लावून इकडे तिकडे फिरत असतात. बाहेर गावावरून येणाऱ्या लोकांसाठी मोफत भोजन दान करणाऱ्या स्थानिक सामाजिक संघटना आपला विभाग आणि मुंबईतून मोठ्या प्रमाणात वर्गणी जमा करतात. शासकीय, निम शासकीय कंपन्या आणि मुंबईतून मोठ्या प्रमाणात वर्गणी जमा करतात. शासकीय निम शासकीय कंपन्या आणि बँका आपली जाहिरात करण्यासाठी त्याच्या व्यवस्थापनातील एस.सी, एस.टी (S.C, S.T) कर्मचारी संघटनांना मोफत भोजन दान करण्यासाठी एक लाखापासून दहा लाखापर्यत आर्थिक मदत करित असतात. मुंबईतील कित्येक स्थानिक संघटना विभागातून वर्गणी काडून विभागातच रात्री जेवण बनवून प्लँस्टिक पिशवीत बंद करून सकाळी चैत्यभूमी वर येवून वाटप असतात. बरेचदा ते रात्री बनवलेले जेवण अंबलेले असल्याने खेड्यातील लोक घेतात आणि तेथेच खातात. करोडो रुपयांचा निधी जमा होवून देखील आम्ही बाहेर गावांवरून आलेल्या लोकांची सामुहिक भोजनाची नोंद व्यवस्था गेल्या ६० वर्षात करु शकलेला नाही.

मुंबई आणि महाराष्टातील मोफत भोजन करणाऱ्या चैत्यभूमी वरील सर्व सामान्य आणि कर्मचारी संघटना एकत्र फेडरेशन बनविली तर बाहेर गावावरून येणाऱ्या लाखो लोकांना टेबल खुर्चीत बसवून चांगल्या प्रतिचे जेवन, नास्ता, चहा - पाणी देता येईल. या शिवाय परतीच्या प्रवासाची त्याला गाडीत जेवण्यासाठी जेवणाचे पँकेट देखील देता येईल. सामुदायिक भोजनाने शिवाजी पार्कवर एक शिस्तप्रिय वातावरण निर्माण होईल. सामाजिक संघटनाना सहकार्यातून सहकार कळला तर सहकारातून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग सापडेल. त्यासाठी आम्ही सर्वानी येवून सामुदायिक एकत्र भोजनाचा उपक्रम राबविला पाहीजे. शिवाजी पार्क मैदानाची उभा राहून पाच लाख आणि बसून तीन लाख लोकसंख्येची क्षमता आहे. त्यासाठी शिवाजी पार्क मैदानावरील सर्वच स्टाँल हे मैदानाबाहेर माहिम ते वरळी रोडच्या फुटपाथ वर स्थालांतरीत केले पाहिजेत. शिवाजी पार्क मैदानात एकच भव्य मंडप घालून सर्व बाजूंनी पडदे लावून बंदिस्त केला आणि जमिनीवर संपूर्ण कारपेट टाकले तर त्या परिसरात धुळ उडणार नाहीत. मोफत भोजन दान घेणांऱ्या लोकांची नोंदणी केली तर गाव खेड्यात आंबेडकरी चळवळीचे जाळे तयार होईल. त्यांच्या मार्फत आम्हाला आमची अर्थ व्यावस्था उभी करण्याचा मार्ग सापडेल.

मानुष्य केवळ भाकरीवर जगत नसून त्याला चांगल्या संस्कृतीची गरज असते. शिवाजी पार्कच्या मैदानात अर्ध्या भागावर भोजनची तर अर्ध्या भागात धम्म ज्ञानाची खरी गरज आहे. त्यासाठी शिवाजी पार्कच्या मैदानांवर ३ दिवस जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात यावे. धम्म परिषदेचे चैत्यभुमीचा परिसर बौद्धमय होईल. प्रबुद्ध भारत हे डाँ. बाबासाहेबांचे ध्येय होते. त्यासाठी गटतट विसरुन शिवाजी पार्कच्या मैदानावर जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्याने केवळ आंबेडकरी चळवळीलाच नव्हे तर बहुजन समाजाला एक नवी दिशा मिळेल. डाँ. बाबासाहेबांच्या ६० व्या महापरिनिर्वाणानंतर खेड्या पाड्यातील सुद्धा आंबेडकरी चळवळीची पोटाची भुक तशी वैचारीक भुक वाढलेली आहे. त्यासाठी विचार मंथन जरुरीचे आहे. बौद्ध धम्म हा मानवी विकासाचा केंद्रबिंदू आहे. त्या केंद्रबिंदू मध्ये सामाजिक धार्मिक आणि राजकीय संघटना एकत्र येवून डाँ. बाबासाहेब यांना अभिप्रेत असलेली धम्मक्रांती यशस्वी करू शकतो. आपण सर्वच मतभेद विसरून सहकारातून समृद्धीकडे जाण्याचा मार्ग स्विकारीत नाही तोपर्यत स्वत:चा आणि बहुजनांचा उद्धार होणार नाही. निदान विचार मंथनाला सुरूवात करा, लगेच कृतीला सुरूवात होईल.

आवहनात्मक मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया

साभार -
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा