● विदेशी बुद्ध आणि भारतातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बुद्ध यांची तुलना करावी का?
लेख -
रवींद्र सावंत उर्फ भिमरत्न सावंत
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
लेखक "राजेश सावंत" यांनी मांडलेल्या मुद्यावरील आंबेडकरी विचारवंत "रवींद्र उर्फ भीमरत्न सावंत" याची वरील मुद्यावरील मांडलेली उत्कृष्ट मते -
जगातील बुद्ध व भारतातील बुद्ध वेगळा आहे शिकवण एक आहे, कारण पर्यायच नाही त्यांच्याकडे नाही तर शिकवण पण बदलली असती बुद्धाने दिलेल्या शिकवणीत फरक करून सांगता आले नाही, म्हणून बोधिसत्व जातक कथा बुद्ध वंश नावाच्या थोतांड कल्पना आणल्या जगाचा बुद्ध अध्यात्मिक आहे. बाबासाहेबांचा बुद्ध क्रांतिकारी आहे. बाबासाहेब यांनी दिलेला बुद्ध लोकांना पटत नाही. जगाने हि नाकारला होता पण आज नाईलाज होत आहे, त्यांचा हि विज्ञान जसे जसे प्रगत पणे उकल करीत जाईल. तसा तसा बुद्ध - बाबासाहेब यांनी मांडलेला स्वीकारावा च लागेल. अजून काही दिवसांनी म्हणतील हेच लोक कि गौतम बुद्धाच्या आधी अनेक बुद्ध झाले होते आणि त्यांचे तत्वज्ञान गौतम बुद्धाने चोरले म्हणून काही जणांनी सुरुवात केलीच आहे. चुकीचा प्रश्न का वाटावा मी तर म्हणतो धम्म परिषदे मध्ये असले विषय व्हावेत. ज्यामुळे सत्य जगाने स्वीकारले पाहिजे जगात एकच बुद्ध असेल. नाही तर अनेक पंथात वाटला गेलाय बुद्ध.
धम्म संगीती यासाठीच झाल्या आहेत. बुद्धाने जे सांगितले आहे ते शोधण्यासाठी आता का होऊ नये. नुसते स्टेज शो कशाला हवेत? बुद्ध एकच नाही जगात बुद्धाची शिकवन एक आहे, पण बुद्ध मात्र वेगळे वेगळे आहेत. थोडक्यात कसा बुद्ध विकृत केलाय ते पण पाहू या जरा बऱ्याच वेळा सांगून हि झालाय तरी देखील आता परत परत सांगतो.
तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सम्यक संबोधि प्राप्त करून नव्या प्रवाहाची निर्मिती केली, त्यांनी स्थापन केलाला धम्म आज जगभर पसरला आहे. याच विजयादशमी दिनी जगभरातून धम्मगुरू दीक्षाभूमी नागपूर येथे आले होते. एक धम्मक्रांती जी रक्ताचा एक थेंब न सांडता करण्यात आली आणि या धम्म क्रांतीचे निर्माते विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ ला धर्मांतर करून एक नवीन समाज क्रांती केली जिला आज जगात तोड नाही. बाबासाहेबांनी बुद्ध साहित्याचा अभ्यास करून जो बुद्ध अपेक्षित होता तो शोधून काढला व विज्ञानाचा निर्माता बुद्ध जगासमोर मांडला पण काही धर्म मार्तंडानी तो फक्त बाबासाहेब यांचा बुद्ध बुद्ध समजले आता बुद्ध कसे चमत्कारी झाले हे पाहताना स्पष्ट जाणवते कि बौद्ध धम्मात काही ब्राह्मण लोक हे फक्त बुद्धाला शरण नव्हते आले तर त्या विराट बुद्ध संघाचा आणि त्या धम्माचा ओघ कमी करण्यासाठीच आले होते त्यामुळे बुद्धाची सत्य माहिती लपविण्यात आली आणि चमत्कारी बुद्धाची माहिती या त्यांच्या चरित्रात टाकण्यात आली.
प्रथम बुद्धाचा जन्म हा चमत्कारी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तो असा कि सुमेध बोधिसत्व हा महामाया यांच्या स्वप्नात येतो मुळात इथे प्रश्न असा आहे कि सुमेध हा बोधिसत्व होता हे लिखाण करणाऱ्याला कसे काय समजले? इतर लोकांना त्याची माहिती का नव्हती? सुमेध बोधिसत्व यांच्या जन्माची देखील काहीच माहिती नाही तरी देखील त्याला बुद्धाच्या चरित्रात आणले आहे, सरळ गोष्ट आहे. २७ बुद्धांची संकल्पना मंडळी तेव्हाच सुमेध बोधिसत्व जन्माला घातला गेला. अन्याथा बुद्धाच्या जन्माची कथा वेगळी असल्याचे जाणवते त्यानंतर त्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी ब्राह्मण ज्योतिष्यांना बोलावले जाते. आता शुद्धोधन हा शेतकरी सम्राट आहे. त्यामुळे भविष्य पाहण्यासाठी किंवा कोणत्या स्वप्नाचा अर्थ समजून घेण्यासाठी तो ब्राह्मण पंडित बोलावेल यावर शंका येते आणि यावेळी गणराज्य संस्कृती नांदत होती आणि शुद्धोधन हा कोणत्याही अंधश्रद्धेला न मानणारा असल्याची नोंद मिळते, त्यामुळे बुद्धाच्या ह्या कथा थोड्या शंका येणाऱ्या वाटतात आत लिखाण कर्त्यांनी अजून भर टाकली कि जन्मताच ते सात पावले चालले हि घटना काल्पनिक आहे. हे सांगायला कोणत्याच पुराव्याची गरज नाही कारण सर्व जन चांगले जाणतात कि जन्मताच कोणताच मानव या इतर कोणते प्राणी जन्मताच चालू शकत नाही.
पाहिलं म्हणजे असा जन्म ईश्वरवादी धर्मात कोणत्याच देवांचा या देवतेचा झालेला नाही. म्हणून इथे जाणून बुद्धाच्या जीवनात हे घुसडण्यात आले आहे. शिवाय बुद्ध जन्मताच सम्यक संबुद्ध नव्हते ते सामान्य माणूस असल्याचे सांगितले जाते. मग ते जन्मताच कसे काय सात पावले चालले आत हे का बरे टाकण्यात आले आहे? ह्यासाठी जर हिंदूचे अग्निपुराण पहा त्यात बुद्धाला विष्णूचा नववा अवतार सांगितला आहे, दाखवण्यात आले आहे. यावरून सरळ लक्षात येते. बुद्धाला जर या अवतार मध्ये आणायचे असेल तर त्याला चमत्कारी दाखवले पाहिजेच. नाही तर प्रश्न निर्माण होतो कि विष्णूचे सर्व अवतार चमत्कारी आणि बुद्धाचा अवतार का चमत्कारी नाही म्हणून त्याला असे चमत्कारी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला पुढे बालपणात बुद्धाचा एक हि चमत्कार दिसत नाही जसे पहा बायबल मध्ये येशु जसा लहानपणी चमत्कार करतो आणि तो तेराव्या वर्षापासून जो गायब होतो तो ३० व्या वर्षी परत येतो पण पुढे तो मार्ग बुद्धाचाच सांगताना दिसतो हा भाग यासाठी सांगतो कि - येशुला जसे चमत्कारी केले तसेच चमत्कार हे बुद्धाच्या जीवनात दाखवण्याचा प्रयत्न करणात आली आहे. आता बुद्ध हे लहान पानापासून कधी हि चमत्कार करताना दिसत नाही, पण त्या काळात काही ठिकाणी ते रामाची पूजा करताना सुद्धा दाखवण्यात आले आहे.
आता हे लिहिणारा नक्कीच मूर्ख आहे. कारण रामाचा जन्म कधी झाला हे माहित नाही, रामायण कधी लिहिले याचा पत्ता नाही मग रामाची बुद्धाने पूजा केली आहे हे चुकीचा प्रसंग दाखवणे हे चुकीच आहे. जे न पटणारे आहे शिवाय या पढे गेले तर बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली हे आपल्याला माहित आहे पण त्याच बरोबर अजून एक बात आहे कि बुद्धाला संबोधि प्राप्त झाल्यावर आकाशातून देवानी पुष्पवृष्टी केली असे सांगण्यात आले आहे. आता हे किती खरे आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. इथे स्वतः बुद्ध सांगत आहेत कि, ईश्वर आत्मा या गोष्टी काल्पनिक आहेत. त्याला कोणताच पुरावा नाही त्यामुळे ह्या गोष्टीना काहीच महत्व नाही तिथे असे म्हटले कि बुद्धाच्या संबोधी प्राप्त झाल्यावर कोणत्या देवतांनी त्यांच्यावर आकाशातून पुष्पवृष्टी केली.
आता आकाशात फुले कुठे उमलतात हे ज्याने लिहिले असेल त्याला नक्कीच माहित असेल आपण समजले पाहिजे कि, काही गोष्टी बुद्धीला विसंगत वाटत आहेत आता एक असे म्हणावे लागेल एक तर बुद्धाने हे देव नाही म्हणणे त्याच्या चरित्रकाराने लिहिले असणार अन्यथा बुद्धाने सांगितले असणार नाही जर चरित्रकाराने सांगितले असेल तर एक हि गोष्ट खरी मानवी लागेल आणि जर खरच बुद्धाने म्हटले असेल तर हे ईश्वर कल्पना खोटी आहे. यात तिळमात्र शंका नाही आता बुद्धाला का असे सांगण्यात येते त्याला एक कारण आहे. पहा इथे बुद्धाला हिंदू पासून वेगळा नाही हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आल आहे. पहा अजून काही उदाहरणे बुद्धाला हिंदूशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रथम आपण हिंदुच्या त्रिमूर्तिपैकी एक ब्रह्मा यांच्या बाबत पाहू या.
आता बुद्धाच्या ज्ञान प्राप्ती नंतर एक कालावधी दाखवला जातो कि, बुद्धाच्या मनात शंका निर्माण झाली. ते द्विधा अवस्थेत अडकले कि मला भेटलेल ज्ञान हे मी लोकापर्यंत नेवू कि नको त्ये वेळी आकाशातून ब्रह्मा स्वतः खाली येवून बुद्धाला विनंती केली कि, हे भगवान तुम्हाला भेटलेली बुद्धी तुम्ही जनतेला द्या विश्वाला त्याची आवश्यकता आहे आणि हीच गोष्ट काही हिंदू लोकांना खटकली दिसते त्यांनी ब्रह्माचे अवघ्या भारतात केवळ एक मंदिर दिसते जे राजस्थान मध्ये आहे इथे बुद्धाला हिंदू धर्मात जुळवून घेवून धर्म विभाजित होवू नये म्हणजे लोक इतर धर्मात जावू नये यासाठी हा प्रयत्न आहे आता अजून पुढे जावून असे पाहिलं तर ज्यांनी त्रिपिटक लिहाल त्या भन्ते नि काय म्हणून हा विषय मांडला हेच समजत नाही जर हे खर असेल तर नक्कीच हा बुद्धाला खोटा ठरवणारा आहे काय आहे मुद्दा रीतसर पाहू या.
त्यानंतर आता त्रिपिटक पाहू या काय आहे त्रिपिटक मधील सुत्तपिटक दिघनिकाय महागोविंद सुत्त १९ - २ - ६ मध्ये देवांचा राजा इंद्र बुद्धाचे गुणगान गाताना दिसतो आहे म्हणजे त्रिपिटक मध्ये सुद्धा काही घोळ आहे कि नाही पहा हा इंद्र काय म्हणतो आहे तथागत यांना तर इंद्राने बुद्धांच्या आठ गुणांचे वर्णन केले आहे ते असे - "बुद्धाचा पहिला गुण बुद्ध अर्हत आहे. आता हे सांगायची काही गरज नाही बुद्ध झाले म्हणजे अर्हत तर असणार ना म्हणजे हे सांगणारा सुद्धा भ्रमात आहे. त्याला ही समजले नाही कि बुद्ध हे ज्ञानी असतात म्हणजे ते अर्हत असणार ना आता दुसरा गुण काय आहे पहा. बुद्धाचा दुसरा गुण आहे ते सत्यवादी आहे. आता बुद्ध झाल्यावर मनुष्य कोणत्या खोडसाळ भाषेचा वापर करेल बुद्ध हे सत्यवादी आहेतच ना यापुढे गुण पहा. ते सम्यक संबुद्ध आहेत ते विद्या आणि आचरणाने परिपूर्ण आहेत ते सुप्तात आहेत. ते सर्व लोकात विद्वान आहेत. ते मानवी मनाला जाणून घेतात त्यांनी काम वासनेवर विजय मिळवला आहे. म्हणून देव आणि मनुष्य आणि प्राणीमात्रांचे ते भगवान आहेत."
मित्रांनो,
जरा विचार करा जर इंद्राने बुद्धाची महती गायली असेल हे खुद्द तथागत यांनी सांगणे शक्यच नाही म्हणजे हे कोणी तरी तिसऱ्याच व्यक्तीने किंवा अति शाहण्या माणसाने लिहिले असेल एवढे नक्की कारण मुळात इंद्र हा देवतांचा राजा मग त्याचे आणि बुद्धाचा सबंध काय त्याचा बुद्धाशी जोडण्याचा काय सबंध आहे काही करणे आहेत का तर समजून घ्या कि बुद्धाला जे ज्ञान प्राप्त झाले होते ते त्यांचा स्वत:च्या मेहतीने कोणत्या चमत्काराने नाही तरी आमच्या लोकांनी त्याचा अभ्यास न केल्याने हा प्रश्न उदभवत आहेत इथे सरळ बुद्धाकडून लोकांना हिंदू धर्माकडे न्यायचा पर्यंत दिसून येतो त्याला कोणताच वैज्ञानिक आधार नाही कि ऐतिहासिक पुरावा नाही म्हणून हे थोतांड आहे. जे आमच्याच ब्राह्मण भिक्षु नि मांडले आहे. आता स्वतः बुद्ध ईश्वर नाकारत आहेत, तरी देखील आम्ही बुद्धाला देवत्व द्यायला निघत आहोत. हे चमत्कारी पण का आणतो आहोत आम्ही बुद्ध हे संबुद्ध व्हायच्या आधी एक सामान्य मानव होते हे त्यांनी आधीच सांगितले आहे. जे जे बुद्धाच्या चारित्र्यात लिहिले गेल आहे ते सर्व प्रमाणात सत्य आहे, असे अजिबात नाही हा केवल बुद्धाला चमत्कारी दाखाण्याचा प्रत्यत्न आहे. बुद्धाच्या नंतर आणि अगोदर अनेक काल्पनिक कथा व व्यक्ती जन्माला आल्या होत्या आणि त्याच कथा जाणून घेतल्यावर त्यामध्ये बुद्ध कोठे पाठी पडू नये म्हणून काही भिक्षु नि त्या कथा ना अशा काही कथांचा रचना करून ठेवल्या कि विचारायची सोय नाही.
आता आपण पहिले तर समजेल कि इंद्र, ब्रह्मा विष्णू, शंकर ह्या हिंदू धर्माच्या प्रमुख देवता आहेत. आता ह्या कोणी चमत्कारी देवता नसून या सुद्धा मानवी व्यक्ती आहेत. ज्यांचा इतिहास हा बाहेरच्या देशात सापडतो. त्यांना फक्त भारत देशात चमत्कारी दाखवले आहे. बाकी काही नाही आता जाणून घ्या बुद्धाला जो ब्राह्म संपत्ती हा बुद्धाला सांगायला येतो कि तुम्ही या जगाला तुम्हाला जे ज्ञान भेटले आहे ते तुम्ही जगाला सांगा आता हे स्वतः बुद्धाने कोठेच सांगत नाही तरी देखील ते आम्हाला सांगण्यात येत त्याला कोणताच पुरावा नाही आहे. त्यामुळे असे मानने बुद्धीच्या कक्षेत बसत नाही त्यामुळे आज आपल्याला जे बुद्ध चारित्र्य सांगण्यात येते ते खर आहे असे नाही ते खोटे हि ठरते आहे पण बहुजन समाजात एक परंपरा रिवाज आहे कि कोणत्याची गोष्टीची समीक्षा न करता स्वीकारणे याची पद्धत आहे त्यामुळे ह्या असल्या गोष्टी आमच्या इतिहासात घुसल्या जातात याची जाणीव आम्हाला होत नाही आम्ही त्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवतो.
बुद्ध जेव्हा शाल वृक्षाच्या झाडाखाली बसले असताना त्यांच्यावर शाल वृक्ष फुलांची वृष्टी करतो तसेच दहा हजार ब्रह्मांडातून सर्व देव आकाशातून पुष्पवृष्टी करून तथागत यांची पूजा केली जाते. त्यावेळी तथागत आपल्या शिष्यांना सांगतात कि, तथागताला हि असली पूजा मान्य नाही इथे सांगण्याचा उद्देश के आहे कि तथागत बुद्धाने आपली पुंजा करू नये हाच संदेश दिला होता. महायान यांनी पूजा विधी बौद्ध धम्मात आणला आता दहा हजार ब्रह्मांड कोठून शोधले या लोकांनी माहित नाही अजून कोणत्याच देशाला त्याचा शोध लागला. नसताना यांना कसा काय लागला हेच समजल नाही महायानी पंथ हा यामध्ये हिंदूंच्या हि पुढे गेला आहे हिंदू नि केवळ दहाच अवतार सांगितले. यांनी मात्र २८ बुद्ध जगा समोर आणले शिवाय २९ ऑन द वे आहे असे सांगण्यात येते.
आता बुद्धाच्या नंतर करण्यात आलेल्या धम्म सांगीति का घेण्यात आल्या याचा विचार केला असता बौद्ध धम्मात एक प्रकारचे विचार आणि अनेक गट पडले होते ब्राह्मणी लोकांनी त्यांचे ध्येय साधल होत बुद्ध चमत्कारी कसे झाले. याच स्पष्टीकरण इथे भेटत तथागत बुद्धाने ८२००० स्कंद चा धम्म सांगितला. पण इतर भिक्षु नि त्यामध्ये २००० स्कांदांचा भर दिलाय ८४००० स्कांदांचा धम्म सांगितला जातो आणि लिखाण्याची कला हि बुद्धाच्या १०० वर्षांनी अस्तित्वात आली सांगितलेले शिकवण आणि संदेश हे भिक्षु ना पाठ करावे लागत असत. त्यामुळे बुद्धाची शिकवण हि जशीच्या तशी आलो असेल असे म्हणणे कदापि योग्य होणार नाही बाबासाहेब यांच्या नुसार धम्म वेगळा मांडण्याचा प्रयत्न केला, पण या बौद्ध पंडित लोकांनी तो स्वीकारला नाही. आता जे त्रिपिटक बुद्ध धम्माचा मूळ ग्रथ मांडला जातो त्याविषयी पहा त्याची निर्मिती श्री. लंकेत भारतात नाही. बघा बौध्द धम्म उगम भारतात आणि त्याच्या ग्रंथाची निर्मिती श्री. लंकेत होते यावरून समजून घ्या बाबासाहेब सुद्धा श्री. लंकेत यासाठीच गेले होते कि ज्या देशात या ग्रंथाची निर्मिती झाली त्या देशात बौद्ध धम्म नक्की कसा आहे हे पाहण्यासाठी बाबासाहेब हे त्या ठिकाणी गेले होते बाबासाहेब यांच्या काही अलग घटना आहेत ज्यांनी त्या पडताळून पहिल्या आपल्या बुद्धीला पटल्या त्याच स्वीकारल्या बाकीच्या फेकून दिल्या.
बुद्ध हा चमत्कारी होण्याची पाहिलं कारण आहे. बौध्द धम्मात उडालेली संघाची शकले बुद्धाच्या नंतर हीनयान महायान असे अनेक पाठ उदयास आले आणि त्यात बुद्ध चमत्कारी झाले अनेकांनी आपल्या परीने बुद्धाला चमत्कारी करण्याचा प्रयत्न केला. शेवटी प्रत्येकाचा प्रयत्न यशस्वी झाला आणि बुद्ध हे चमत्कारी झाले यामध्ये बुद्धाला चमत्कारी करण्यामागे महायान याने जास्त पुढाकार घेतला मग बुद्ध धम्मात पुंजा आली पूजा करून मुक्ती मिळते असा नवा फंडा या धम्मात आला आणि यातून कथावूत्स हा ग्रंथ उदयास आला. हे लगेच समजून आले कि नंतर लगेच २८ बुद्धांची संकल्पना अस्तित्वात आली आणि इथुन् बुद्धाच्या धम्मात दैववाद आल आणि इथे नवा वंश जन्माला आला त्याचे नाव बुद्धवंश बुद्धाने याविषयी कुठेच काही सांगितले नाही पण बुद्धाच्या नंतर हि माहिती देण्यात आली इथे फक्त एक प्रयत्न दिसून येतो कि ज्या बुद्धाने देव नाकारला त्याचा धम्म हा ईश्वरवादी धर्माकडे नेण्याचा एक प्रयत्न दिसतो.
पुढे पहिले तर जातक कथा सांगितल्या जातात. पण जातक कथेचा उल्लेख बाबासाहेब टाळतात. त्यांना ते पटत नाही कारण सुद्धा आहे बुद्धाने आपल्या आयुष्यात कुठेच त्या कथा सांगितल्या नाहीत मग या बुद्ध साहित्यात आल्याच कश्या बुद्धाच्या पूर्वजन्माचे बौद्ध साहित्यात नाना गमतीशीर कथा आहेत. या कथांचा संग्रह सुत्त पिटक नामक पाली ग्रंथात जातक कथा या नावाने प्रसिद्ध आहे. या जातक कथा याचा अर्थ काय तर जातक म्हणजे जन्मा संबंधी आणि कथा म्हणजे गोष्टी असा याचा अर्थ आहे आणि मूळ मुद्दा असा आहे कि या जातक कथा केवळ दहा होत्या आणि त्या बुद्धाच्या अगोदर पासून दंतकथा म्हणून प्रसिद्ध होत्या यावरून एक सिद्ध होते कि - या बुद्धाच्या जन्म कथा नाहीत दुसरे असे या जातक कथेत इतकी वाढ झालीकी त्या दहा वरून सरळ ५४७ वर जावून गेल्या आणि ह्या सर्व कथा प्राचीन काळी दंतकथा होत्या ज्या लोकामध्ये प्रचलित होत्या अश्या पद्धतीने बुद्धाच्या जीवनात या दंतकथा भरण्यात आल्या आणि या कथांमध्ये तथागत बुद्धाना आपले पूर्वजन्म कसे आणि किती झाले हे सांगताना सांगितले जाते कि बुद्धाला ८३ वेळा संन्यासाचा जन्म घ्यावा लागला ५८ वेळा राजाचा जन्म घ्यावा लागला २४ वेळा ब्राह्मणाचा जन्म घ्यावा लागला. याशिवाय वानर सिंह हत्ती वराह घोडा यांचे सुद्धा अनेक जन्म आहेत.
कल्पना करताना सुद्धा विचार पडतो जर एकट्या बुद्धाला इतके जन्म मग बाकीच्या बुद्धांचे काय किती जन्म असतील, असा चमत्कारीपण बुद्धाच्या क्रांती रूपी जीवनात आणून बुद्धाला चमत्कारी करण्याचे मोठे काम हे ब्राह्मण जे बुद्ध धम्मात आले होते जे बुद्धाच्या शिकवणीला मनात होते त्यांचे अर्हत पद प्राप्त केले, पण जे बुद्धाच्या धम्माचे तुकडे करण्यासठी आले होते त्यांना काही अर्हत पद आज पर्यंत नाही भेटले आहे. असे करून काही हि करून बुद्धाला चमत्कारी दाखविण्याचा प्रयत्न केला जातो हे आपण पाहत आलो आहे. आता प्रश्न असा उपस्थित होतो कि जर बुद्धाने जन्मताच सात पावले चालले मग त्यांनी पुढे जावून आपण एका मानवाचा पुत्र असल्याचे का सांगितले असेल कारण येशु चा जन्म झाला हा पवित्र आत्म्यापासून झाला म्हणून त्याने स्वताला देवपुत्र म्हटले आहे. मग बुद्धाने का नाही म्हटले यात उत्तर सापडते बुद्धाचा पूर्वजन्म होते तर ते सांगण्यात ही पूर्वी चालत आलेल्या दंतकथा सांगण्याची का आवश्यकता पडली हीच फार मजेशीर गोष्ट आहे.
आता बाबासाहेब यांनी कर्म आणि पुनर्जन्म याबाबत आपल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म मध्ये सांगितले आहे बाबासाहेब म्हणतात कि भगवान बुद्धाच्या काळी लिखाण कला अवगत नव्हती त्यामुळे भिक्षुंना ते संदेश पाठ करून ठेवावा लागत असे आणि त्रिपिटक आणि अष्टगाथा इतक्या अवाढव्य आणि विशाल आहेत कि सर्व पाठ करून ठेवणे केवळ अशक्यच आहे. पुष्कळ ठिकाणी बुद्धाचा संदेश जसाच्या तसा पाठ करुह्न ठेवला असेल असेल नाही त्यामुळे भिक्षूच्या शिकवणी सुद्धा यात भेसळ झाली आहे, हे नाकारता येत नाही आणि त्याची काही उदाहरणे बाबासाहेब यांनी दिली आहेत बाबासाहेब यांनी अश्याच पाच स्थळांची माहिती दिली आहे ती अशी अलगद्दुपम सुत्त, महाकम्म सुत्त, विभंग सुत्त, कण्नाकुठ्ठल सुत्त, महातन्हासंखय सुत्त आणि जीवन सुत्त.
कर्म आणि पुनर्जन्म या विषयी ब्राह्मणी धर्मात सुद्धा स्थान आहे. त्यामुळे कालांतराने ब्राह्मणी धर्मातून ते बौद्ध भिक्षु झाले त्यांनी वैचारिक गोंधळ केला आणि त्याचा परिणाम असा झाला कि ब्राह्मणी सिद्धांत सहज रीत्या बुद्ध धम्मात शिरले त्यामुळे त्रिपिटक मध्ये जे बुद्ध वचन आहे. त्या बाबत सावधान असलेले योग्य असेल बाबासाहेब यांनी बुद्ध वचन कोणते या विषयी दोन सिद्धांत सांगितले आहेत. त्यानुसार तुम्ही बुद्ध वचन समजू शकाल.
१) जे बुद्धाच्या विसंगत व तर्काला सोडून आहे, ते बुद्ध वचन नाही.
२) जी चर्चा मनुष्याच्या कल्याणाला पोषक नाही, ते बुद्ध वचन नाही.
आता भगवान गौतम बुद्ध हे पुनर्जन्म मनात होते, तर कसा पुनर्जन्म सांगितला हे जाणून घेतले पाहिजे. तथागत बुद्धानाचा पुनर्जन्माचा सिद्धांत असे सांगतो कि जेव्हा एखाद्या झाडाला लागलेले फळ त्यातील बीज हे जेव्हा दुसरे झाड उत्पन करते तेव्हा त्या झाडाचा पुनर्जन्म झाला असे म्हणता येईल, कारण ते बीज हे एक उर्जा अजे आणि उर्जा हि अविनाशी आहे म्हणजे तिचा विनाश नाही तीची निर्मिती होत राहते. त्याच प्रमाणे सजीव प्राण्याचा शरीर हे निसर्गातील पंच महाभूत यांनी तयार झालेलं आहे, त्यामुळे चैतासिक उर्जा जिला म्हटलं जात ती एकातून नवीन अशे तयार करत असते, त्यामुळे होणारा सजीवाचा जन्म हा पुनर्जन्म म्हटला जातो म्हणजे एक बीज आपल्या सारख्या दुसऱ्या जीवाला जन्म देतो. तेव्हा ते बीज मारून जाते त्याच्या जागरी दुसरे बीज तयार होते याला पुनर्जन्म म्हणतात.
नाही कि आत्मा असतो त्यामुळे तो दुसरे रूप धारण करतो असे काही नसून चेतना हि फक्त पंच महाभूत यांच्या सोबत नवीन शरीर निर्माण करून दुसरी चेतना निर्माण करते त्यावेळी अर्थात पहिली चा अंत असतो असा हा बुद्धाचा सिद्धानात नंतर बदलला गेला अशाच पद्धतीने बुद्धाच्या जीवन चरित्रात अनेक गोष्टी रचल्या गेल्या त्या का रचल्या गेल्या असतील याचा उलगडा होतो कि, इतर धर्माच्या तुलनेत आपला धर्म कुठे मागे राहता कामा नये यासाठी बुद्धाला इतर धर्माच्या तुलनेत मागे पडू नये. म्हणून चमत्कारी करण्यात आले अश्या पद्धतीने या लोकांनी बुद्धाला चमत्कारी केले. वास्तविक पाहता बुद्ध कालानुरूप बदलत गेले आहेत आणि आज जे बुद्ध जगासमोर आले आहेत ते बुद्ध म्हणून नव्हे तर चमत्कारी बुद्ध म्हणून आले आहेत म्हणून आपल्याला बुद्ध स्वीकारताना खूप त्रास होतो यासाठी बाबासाहेब यांचा बुद्ध जास्त जवळचा वाटतो. आज विज्ञान इतकी प्रगती करत आहे कि नेमके बुद्धाने जे सांगितले आहे ते आज मान्य करत आहे त्यामुळे येणारा काळ विज्ञान हे सिद्ध करू शकेल कि या विश्वात देव नावाचा कोणताच प्राणी अस्तित्वात नव्हता तेव्हा एकमेव बुद्धाचा धम्म अस्तित्वात असेल बाकीच्या धर्मांना आपले दुकान बंद करावे लागेल. म्हणून या भारतात नांदणारा धम्म हा बुद्धाचा धम्म आहे. याचा तुम्हाला लेण्या मध्ये अनेक ठिकाणी मिळतील. बाबासाहेब यांचा बुद्ध हाच खरा बुद्ध आहे. स्वीकारायला सोपा असणारा धम्म आहे.
बंधुनो,
कोणता धम्म स्वीकारायचा आणि कोणता बुद्ध स्वीकारायचा हि सर्वस्वी तुमच्या बुद्धीला पटेल तरच स्वीकारा अन्यथा काय नाकारायचे याचा अधिकार आहेच ना?
◆◆◆
आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
रवींद्र सावंत उर्फ भिमरत्न सावंत
(लेखक, कवी एवं आंबेडकरी विचारवंत)
❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖
प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
═══════════════════════
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆
• YATIN JADHAV :
9967065953, 8767048591
(Use Only One WhatsApp Number)
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा
धन्यवाद ।
लेख सुंदर अभ्यापूर्वक पण ,बाबासाहेबानी त्याच्या ग्रथात सहमपती ब्रम्हा व सतीपठ्ठान ,व काही चमत्कारिक गोष्टी दिल्या आहेत त्याचे काय ????सर्वात शुद्ध सोरूप पाली वाङमयाचे आहेआणि त्यातही सम्यक संबुद्ध व 31 लोक हे विज्ञानिक आहेत ,पण हिंदूंच्या बबालिश कथांचा व त्याच्या देव परमात्मा ह्या संकल्पनेला बुद्धांच्या 31लोक व निर्वाण च्या शोधला जर समान मानले तर बुद्धाच्या शोधला बबालिश महत्व देऊन बुद्धांचा अपमान केल्यासारखे आहे ,पूर्ण पोस्ट बुद्धांचा अपमान करणारी आहे कारण कि हिंदू संस्कृती व बोद्ध शोध एकच आहे हे सिद्ध करण्याचाबबालिश प्रयत्न आहे , पाली वाङ्ममय अजूनही शुद्ध वांगमय आहे आणि ज्या अर्हतांनी लिहले जोपासले त्यांना विरोध एक विपश्यना न समजलेला वेक्ती सरळ करतोय त्याच वाईट वाटत आहे ....लिखाण छान आहे पण जरा दुसरी बबाजू हि पडंतालुंन पाहावी
उत्तर द्याहटवा