● कुटुंब नियोजन : "पुरुष नसबंदी" विषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि मांडलेली मते
लेख -
दिपक महादेवराव वानखेडे
❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖
पुरूष नसबंदी बाबासाहेबांनी सुचवली. तेव्हा ही गांधींनी विरोध केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कुटुंब नियोजन आणि लोकसंख्या वाढीचा प्रश्न या सारख्या ज्वलंत विषयावर आपले परखड विचार मांडले होते आणि काही पर्याय सुचवले होते जे आज सुद्धा लागू पडतात. लोक संख्या वाढ आटोक्यात आणली तरच आर्थिक नियोजन आणि प्रगती चांगल्या प्रकारे होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे होते. बाबासाहेबांनी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण करायचे असेल तर "कुटुंब नियोजन" हा एकाच प्रभावी पर्याय आहे हे ठासून सांगितले; उपलब्ध साधन सामग्रीचे समान वितरण हे गरिबी दूर करण्याचा पर्याय होऊ शकत नाही. जो पर्यंत लोकसंख्या आटोक्यात येत नाही आणि तसा ही ठराविक समाजाला समान वितरणाचा फायदाच होणार आहे, त्यामुळे गरीब आणि शोषित समाजाला जर आर्थिक प्रगती करायची असेल तर कुटुंब नियोजन हा एकमेव पर्याय आहे, असे बाबासाहेब सुचवतात, ३ अपत्य च्यावर जर जन्मदर गेला तर गरिबी दर आणि मृत्यू दर सुद्धा वाढेल असे त्यांचे ठाम मत होते.
आज सुद्धा "हम दो हमारे दो" वरून "एक किंवा दोन बस्स" पर्यंत हा जन्म दर कमी करावा लागतोय. "एकच मुल सुंदर फुल" अशी वेळ आज दाम्पत्यांवर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील पहिले व्यक्ती होते. ज्यांनी लोक संख्या वाढी सारख्या अती महत्वाच्या प्रश्नांवर विचार मांडले आणि पाठ पुरावा केला. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महासत्ता होण्यासाठी बाबासाहेबांची धडपड, तळमळ त्यांच्या प्रत्येक कामातून दिसून येते. बाबासाहेबांनी १० नोव्हेंबर १९३८ साली मुंबई पालिका सभागृहात आपले सहकारी श्री रोहम यांच्या वतीने लोकसंख्या नियंत्रणावर एक विधेयक सादर केले होते.
जन्म दर आटोक्यात यावा म्हणून बाबासाहेबांनी विवाहितांना पद्धती सुद्धा सुचवल्या होत्या आणि आपला मुद्दा लोकांपर्यंत पोहोचावा, म्हणून बाबासाहेब एक प्रश्न विचारात "काय महत्वाचे आहे जनामाला येणे कि जगणे?" तुम्ही जर मुलांना जन्मच देत राहिलात तर आर्थिक नियोजन आणि प्रगती कशी करणार? असा वैचारिक प्रश्न ते करत असत लोक संख्या वाढ हि परिमाणात (संख्या) नसावी तर गुणवत्तेत असावी. असे ते नेहमी सांगत, हे वैश्विक सत्य त्या काळात बाबासाहेबांनी मांडले होते जे आज सुद्धा फार गरजेचे आहे. आपल्या देशातील लोक, अशिक्षित असले तरी आता त्यांना गर्भ टाळण्यासाठी झालेले नवनवीन संशोधन माहित असावे.
"पुरुष नसबंदी" (VASECTOMY) हा पर्याय आपल्या देशात उपयुक्त ठरू शकतो. असे बाबासाहेब सांगत आणि त्यासाठी सरकारने माहिती आणि सुविधा पुरवाव्यात असे ही ते सुचवत असे. जात, धर्म, वंश, भाषा यांचा विचार करता प्रत्येक भारतीयाने जन्म दर आणि लोकसंख्या नियंत्रणावर लक्ष द्यायला हवे. परंतु बाबासाहेब दलित आणि मागास वर्गीयांनीया पद्धतींचा अवलंब करून कुटुंब नियोजन करावे यावर ते भर देत असे. बाबासाहेबांना स्त्रियांच्या आरोग्याची विशेष काळजी होती. त्यामुळे गर्भ धारणा टाळण्यासाठी त्यांनी स्त्री नसबंदी न सुचवत पुरुष नसबंदी सुचवली होती, अशी नोंद आहे. बाबासाहेबांनी हे विधेयक संसदेत मांडले. परंतु राजकीय पक्षांनी या बिलाला जास्त महत्व दिले नाही.
बाबासाहेबांनी तरुणांना चेतावणी वजा इशारा दिला होता "हे कायमचे लक्षात ठेवा. जास्त मुल जन्माला घालणे म्हणजे सामाजिक अपराध आहे." बाबासाहेबांच्या मते मानवाचे जीवन हे प्राण्यांप्रमाणे नसावे, तेच जर सुशिक्षित आणि सुसंस्कृत असेल तर लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी सोपे जाते आणि बेरोजगारी, सामाजिक व आर्थिक मागासलेपण, वेश्या व्यवसाय, चोरी, खून, गुन्हे आटोक्यात आणण्यास मदत होते. गांधीं यांच्या मते गर्भ धारणा हि स्वतःच्या संयमावर अवलंबून आहे आणि त्यासाठी कुठल्या ही गर्भ निरोधची आवश्यकता नाही , बाबासाहेब आणि गांधी यांची या विषयावर सुद्धा जुगल बंदी झाली होती.
गांधीनी जन्म दर कमी करण्यासाठी उशिरा लग्न, स्व - संयम या मालथूस यांच्या पर्याया पेक्षा "स्व - संयम" यावर भर दिला परंतु बाबासाहेबांनी गांधींच्या या विचारणा असहमती दर्शवली होती आणि निरोगी आणि आनंदी आणि एकमेकांवर खूप प्रेम करतात. अशा विवाहित जोडप्या कडून संयमाची अपेक्षा करणे म्हणजे मानवाच्या नैसर्गिक स्वभावाकडे दुर्लक्ष केल्या सारखे होईल आणि हा एक प्रकारे शारीरिक आणि मानसिक अन्याय ठरेल. निरोगी विवाहितांना गर्भ धारणा रोखण्यासाठी संयम बाळगण्यास सांगणे म्हणजे गैरसमज आणि भ्रम निर्माण करण्या सारखे आहे. असे बाबासाहेब म्हणत आणि गर्भ धारणा रोखण्यासाठी गर्भ निरोधक वापरणे हाच एकमेव उपाय आहे, असे ते खडसावून सांगत. बाबासाहेबांना वैज्ञानिक संशोधनावर पूर्ण विश्वास होता आणि म्हणून ते गर्भ निरोधकांचा आग्रह धरत असत. परंतु अशा कृत्रिम गर्भ निरोधकांच्या वापराला समाजात खूप विरोध होता.
भारतीय समाज हा अध्यात्मिक आहे आणि हिंदू धर्म ग्रंथात कुटुंब नियोजनाचा स्वयं संयम सारखे उपाय सुचवले आहेत. असा पवित्र लोकांनी घेतला होता. बाबासाहेब अशा लोकांना सांगत, एक दिवस संयम पाळल्याने सुद्धा वर्षभरात गर्भ धारणा टाळता येणार आहे का? बाबासाहेब अध्यात्मिक शिकवणीच्या विरोधात होते, लोक अजिबात धार्मिक किंवा अध्यात्मिक नसतात. परंतु ते तसे असल्याचा निव्वळ दिखांवा करतात आणि धर्माच्या नावाखाली स्वतःचे इप्सित, स्वार्थ साध्य करून घेतात. बाबासाहेब भारताचा विकास करण्यासाठी चतुरस्त्र विचार करणारे एकमेव भारतीय होते, स्वतंत्र्या पुर्वी भारताच्या लोक संख्येबाबत चिंता व्यक्त करताना आपण केलेल्या चुकीचे उदाहरण देताना बाबासाहेब म्हणाले - ‘माझी चुक निसर्गाने सुधारली.'
बाबासाहेबांनी इंग्लंड आणि भारताच्या लोकसंख्या वाढीचा सखोल अभ्यास केला होता आणि तेथील लोकानी लोकसंख्या नियंत्रणासाठी किती मेहनत घेतली आहे हे ते आपल्या भाषणात नेहमी सांगत असत बाबासाहेबांच्या मते लहान कुटुंब म्हणजे कल्याणकारी संस्कृतीची सुरुवात आणि आज सुद्धा हे तितकेच उपयुक्त आहे असे नाही वाटत तुम्हाला? "भारताच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसंख्या नियंत्रित ठेऊया. बाबासाहेबांचे स्वप्न साकार करूया. "मुलगा किंवा मुलगी एकच !
◆◆◆
आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
दिपक महादेवराव वानखेडे
(लेखक, कवी एवं आंबेडकरी विचारवंत)
संदर्भ -
Geographical Thought of Doctor B.R. Ambedkar
❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖
प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
═══════════════════════
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆
• YATIN JADHAV :
9967065953, 8767048591
(Use Only One WhatsApp Number)
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा
धन्यवाद ।