● "भारताच्या संविधानाचा अंमल" करणे आवश्यक...
लेख -
अॅड. शाम तांगडे
◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆
मित्र हो सप्रेम जयभीम,
जाती ग्रस्त व धर्म ग्रस्त भारताच लोक कल्याणकारी राष्ट्र निर्मितीचं मॉडेल म्हणजेच "भारताचे संविधान" ही अनमोल राष्ट्रीय ज्ञान दानाची देणगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा भारतीयांना प्रदान केली. भारताच्या प्रत्येक नागरिकाला "भारतीय संविधानाच ज्ञान असणं बंधकारकच असायला हवे. आज देशात महिलांवर लैंगिक अत्याचाराने टोकाची सीमा पार केली आहे, ज्यांना लोकांच्या कल्याणासाठी मंत्री बनविले तें हप्ता वसुली, कल्याणकारी योजनेतील टक्केवारी, विशेष उपक्रमाच्या योजना कागदावर रेखाटून सर्व रक्कम चोरणे, बॅंकातील गोर गरिबांच्या पैशाचा अपहार करणे, या कामात व्यस्त आहेत. असे चोर आम्ही सत्ता केंद्रावर बसवतो आणि त्यांच्या अशा कृतिची कळ लागल्यावर जोर जोराने बोंबलतो, आरडा - ओरडा करतो. अशा समयी हेच चोर मदतीचे नाटक करीत धावून येतात.
जाती - जातीत भांडण लावून त्यावर वेश्या समान राजकारण (Political prostitution) करणे हीं आजच्या राजकारण्यांची जीवन शैली बनलेली आहे. जितक्या जाती, जितके धर्म, जितके प्रांत, जितक्या भाषा, तितके राजकीय पक्ष निर्माण होणार. देशात जाती - धर्माच अराजक निर्माण होणार. जाती - धर्मातील लोक जो पर्यंत गुलामी मानसिकतेत जगतात तो पर्यंत राजकीय सत्ताधारी चोर सुरक्षितपणे आपली लुटपाट करु शकतात. परंतु हीच लुटपाटीची कला हे गुलाम लोक जागे होऊन शिकतात तेव्हा हे लोक लुटपाटीच नवीन तंत्र घेऊन राजकारणात प्रवेश करणार. तेव्हा परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेलेली असेल.
महिलांवरील अत्याचार हा अशा गलिच्छ राजकारणाचा दुष्ट परिणाम आहे. हे आकलन सहज लक्षात येण्यासारखं नाही. कारण आज भारतीय समाज जीवन जाती आणि धर्म ग्रस्ततेने विकार ग्रस्त झालेले आहे. यावर जालीम उपाय म्हणजे "भारताच्या संविधानाचा अंमल" आज अश्लीलता, भ्रष्टाचार, जातीवाद, धर्मांधता, अशा विकाराने कळस जवळ केला आहे. यातून भारताचे संविधान मूल्येच तारू शकते.
धन्यवाद !
◆◆◆
आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
अॅड. शाम तांगडे : अंबाजोगाई
(लेखक, वकील एवं आंबेडकरी विचारवंत)
❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖
प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
═══════════════════════
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆
• YATIN JADHAV : 8767048591
(Use Only WhatsApp Massage,.)
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा
धन्यवाद ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा