● इंग्रजांच्या काळातील रूढी, जाती निवडा आणि संविधान निर्मिती निमित्ताने थोडे काही...
लेख -
अॅड. शाम तांगडे
◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆
क) स्पृश्य हिंदू - Touchable Hindu.
ख) अस्पृश्य हिंदू - Untouchable Hindus
ग) मुसलमान - Mohammedans
घ) ख्रिश्चन - Christians.
ङ) पारशी - Parsees
च) ज्यूव - Jews.
इंग्रज भारतात (इंग्रजांच्या काळात) हे समाजातील धर्म रुढीनूसार विभाजन होते. जंबुद्विपा वर इंग्रज अधिपत्त्य स्वातंत्र्याचे आंदोलन सुराज्या पासून स्वराज्या पर्यंत विकसित होत होते. समग्र समाज विविध धर्म आणि रुढी परंपरांने विखण्डित होता. सरकारी हिस्सेदारीचे दावे - प्रतिदावे सुरु झाले. राजकीय संघटना निर्माण करुन सत्तेतील हिस्सेदारीचा दावा करु लागल्या.
१) हिंदूंच्या प्रतिनिधीत्त्वाचा दावा करणारी काँग्रेस
२) मुसलमानांचे नेतृत्त्व करणारी मुस्लिम लिग
३) अस्पृश्य वर्ग (आम्ही हिंदू पासून वेगळे आहोत, असा माणनारा बहिष्कृत वर्ग)
यात प्रामुख्यांने हे तीन प्रवाह स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात आपापल्या अस्तित्व आणि हक्कासाठी संघर्षरत झाली. या पैकी हिंदू आणि मुसलमान लोकमान्य धार्मिक समाज घटक होते. त्यांचे नेतृत्त्व बदल झाला तरी जनाधार धार्मिक मान्यता प्राप्त असल्यामुळे कायम होता. परंतु अस्पृश्य वर्गाला हिंदूंच्या गुलामीतून वेगळ होऊन आपलं स्वतंत्र अस्तित्त्व सिद्ध करण्यांसाठी संघर्ष करावा लागल होता.
इंग्रज सरकार समोर हिंदू - मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करणारे दोनच ओळख प्राप्त सामाजिक प्रवाह होते. त्यात तिसऱ्या बहिष्कृत समाज घटकाची भर पडली. इंग्रज भारतातील लोकांच्या सहभागाने लोकप्रिय सरकार चालवू इच्छित होते. बहिष्कृत वर्ग हा हिंदू पासून वेगळा करुन त्यांना अल्पसंख्यांचा दर्जा देण्यात येऊ नये. अशी मागणी हिंदूंच प्रतिनिधित्व करणारे नेतृत्वांने इंग्रजाकडे केली. यासाठी त्यांनी मुस्लिम नेतृत्वाची जरुर तिथे मदत घेतली.
गोलमेज परिषदेत बहिष्कृत वर्गाला हिंदू पासून वेगळा समाज घटक म्हंणून मान्यता मिळून १७ आॅगष्ट १९३२ ला "जातीय निवाडा" जाहिर करुन अस्पृश्य हे हिंदू नसून स्वतंत्र समाज घटक असल्याचे जाहिर केले. आता हे अस्पृश्य कोण कोण आहेत, त्यांच्यात ही हिंदूंचा हिस्सा नसतांना जाती कशा प्रभावाने निर्माण झाल्या हा भाग वेगळा अभ्यासू. त्यांची एक जातीसूची बनवविली. सुची बद्ध जातीच्यां समुहाला तो अस्पृश्य म्हणून बेइज्जत केला गेलेला चातूर वर्ण च्या परिघा बाहेर असलेला अल्प संख्यांक वर्ग म्हणून मान्यता मिळाली. असाच दुसरा जो जंगलात राहून आपला निर्वाह करतो तो Tribe म्हणून सुचीबद्ध झाला. यांची १९३५ च्या कायद्याने सुचींना कायद्याचा आधार मिळाला. म्हणजे जे हिंदू आहेत, ज्यांना जातीची ओळख आहे. यांना प्रतिनिधित्वांत सवलत दिलेली नाही. हे प्रथम आपण समजून घ्यायला हवे. पुढे १९३५ चा कायदा बाद करुन नवीन संविधान लिहण्याचा घाट घातला. फाळणी होऊन मुसलमानांना पाकिस्तान देण्यात आले.
नवीन संविधान कसे असावे? हे ठरविण्यासाठी संविधान सभा निर्माण करण्यात आली. फाळणीमुळे मुस्लिमांचा प्रतिनिधित्वाचा प्रश्न निकाली निघाला परंतु SC, ST चा Settle झालेला प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. त्यासाठी सक्षम बाजू मांडणारा संविधान सभेत नसेल तर आता पर्यंतच्या बहिष्कृत वर्गाच्या विकासाच्या तरतूदी वर पाणी फेरल जाईल. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत पोहचून तेच तत्व कायम ठेवण्यात व नवभारत घडविण्याची व्यवस्था निर्माण करण्यात यशस्वी पण झाले.
आता संविधान संमत भारत समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्यायाच्या तत्त्वावर चालण्याची हमी देत असून अस्पृश्यता नष्ट करण्याचा मुलभूत अधिकार सर्व नागरिकाला बहाल केला आहे. आरक्षणाची जी तरतुद करण्यात आली ती पुर्वा स्पृश्य व Tribe ला आहे जातीला नव्हे आणि ते ही अल्प संख्यांक आहेत. म्हणून State and Minorities या ग्रंथाची प्रस्तावना स्पष्टतेसाठी वाचावी.
धन्यवाद !
◆◆◆
आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
अॅड. शाम तांगडे : अंबाजोगाई
(लेखक, वकील एवं आंबेडकरी विचारवंत)
❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖
प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
═══════════════════════
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆
• YATIN JADHAV : 8767048591
(Use Only WhatsApp Massage,.)
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा
धन्यवाद ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा