गुरुवार, ५ जुलै, २०१८

● मातंग नेते मंडळी, खोटा इतिहास आणि पेशवाईचा काळ

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

                 ● मातंग नेते मंडळी,
      खोटा इतिहास आणि पेशवाईचा काळ

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

लेखक -
लहु गायकवाड

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

मातंग समाजाच्या काही चळवळी ह्या लहुजी साळवे यांचा खोटा इतिहास सांगुन मातंग समाजाला फुले, शाहु, आंबेडकर, अण्णाभाऊ यांच्या विचारापासुन दुर ठेवण्याच मोठ षडयंत्र करत आहे आणि ह्याच चळवळी सध्या महाराष्ट्रात जोर धरून आहेत, म्हणुण आज मातंग समाज विचाराने व प्रबोधनाने दिशाहीन झाला आहे. केवळ समाजाच नेत्रत्व करण्यासाठी आज समाजाला मांगाची नेते मंडळी बाबासाहेबांच्या विचारापासुन दुर ठेवण्याच षडयंत्र करून समाजाला मनुवादी विचार प्रवाहात झोकुन देऊन गुलाम बनवण्याच कार्य महाराष्ट्रात जोर लावुन चाललेल आहे.

काही संघटना व काही मातंग समाजाची नेते मंडळी समाजाला पैशाचे अमीष देऊन सर्रास आर. एस. एस. च्या दावणीला नेऊन बांधण्याच काम करत आहे. आमच्याच मित्र असणाऱ्या समाजा विषयी मातंग समाजाला भडकवुन दोन समाजा मध्ये वैर निर्माण करूण जातीवाद्यांच्या षडयंत्राला खतपाणी घालण्याच कार्य काही मातंग समाजाचीच नेते मंडळी आज महाराष्ट्रात कार्यरत आहे.आता तर लहुजी साळवेंना काही मनुवाद्यांनी फडके टिळक आगरकर यांच्या पंक्तीत बसवुन लहुजी वस्ताद यांना फुले, शाहु, मुक्ता, आंबेडकर, अण्णाभाऊ यांच्या क्रांतिकारी विचारापासुन समाजाला दुर ठेवण्याच षडयंत्र शालेय इतिहासात सुद्धा मुलांना वाचायला मिळणार आहे. आपण विचार का करत नाही? की लहुजींचा जो काळ होता तो काळ हा जातीयतेचा दाखला देणारा भयानक काळ होता त्या काळात होता.

जातीयता इतकी शिगेला पोहचली होती की त्यावेळेस मांगा महाराचे तोंड बघणे सुद्धा अशुभ होते. पुण्याच्या पेशवाईने तर महार मांगाना प्रत्येक हक्क अधिकारावर बंधने आणली होती. त्यांचे सर्व अधिकार हिसकावून घेतले होते. तोंडाला मडके कमरेला झाडु मेलेले ढोर ओढण्याचे काम आमच्या वाटेला दिले होते. आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेऊन आम्हाला पोतराज बनवल होत. आमच्या राजकीय समाजीक धार्मिक समाजीक सांस्कृतिक आधिकारावर याच पुण्याच्या पेशवाईन गदा आणली होती मग विचार करण्याची गोष्ट आहे. जर एव्हडी जातीयता त्यावेळी होती. तर हेच ब्राम्हणी मनुवादी विचारसरणीचे फडके, टिळक, आगरकर मांग आसणाऱ्या लहुजी वस्ताद यांच्या कडुन प्रशिक्षण घेतील का?

१८१८ ला एकीकडे ५०० महार हे अत्याचारीत पेशव्यांच्या विरोधात लढतो आणि त्याच काळात हेच पेशवे लहुजींना पेशव्याचे सेनापती म्हणतो याच काय? कारण हे आम्हाला समजल पाहीजे. ही महार आणि मांग या दोन समाजात दुफळी निर्माण करण्याच षडयंत्र आम्हाला समजल पाहीजे. एकीकडे महार हे पेशव्याचे शत्रु आहेत आणि एकीकडे आमचेच नेते मांगाला पेशव्याचे मित्र ठरवुन मांग - महार वैर निर्माण करून मांगासोबत राजकारण करत आहेत. महार हे कधीच आमचे शत्रु नव्हते आणि आज पण नाही. ज्या पेशव्यांनी आमच्या स्रीयावर बलात्कार केले. ज्या पेशव्यांनी आम्हाला शिक्षणापासून वंचित केल. आम्हाला पोतराज बनवल होत. आमच्या राजकीय समाजीक धार्मिक अधिकार हिसकावून घेतले होते. तोंडाला मडके कमरेला झाडु लावले होते. आम्हाला पेशव्यांनी मेलेले ढोर ओढायला लावले. मग या अन्याय करणाऱ्या पेशव्याचे सेनापती लहुजी कसे होतील?

लाज वाटली पाहिजे. या नेत्यांना स्वतःची पोटची खळगी भरण्यासाठी सत्यशोधक लहुजी वस्तादांना गुन्हेगारी पेशव्यांच्या पंक्तीत नेऊन बसवताना महत्मा फुले स्वतः हि सांगतात - "जो पर्यंत या देशात इंग्रज आहेत तो पर्यंत अस्पृश्यांनी शिक्षणात प्रगती करून घ्यावी." मग लहुजींचे धोरण इंग्रजा विरूद्ध कसे राहु शकतात.ज्या वेळेस सावित्रीबाई ह्या मुक्ताला शिक्षण देत असत. त्या वेळेस सावित्रीबाई वर दगड शेण फेकुन मारणारे हे इंग्रज नसुन पुण्याचे पेशवे होते आणि याच पेशव्या पासुन लहुजींनी सावित्रीबाईच रक्षण केले आणि याच फुलेंच्या शाळेत शिकणाऱ्या मांगा महाराच्या पोरांना शिक्षणासाठी अनुदान देणारे दुसरे तिसरे कोणी नव्हते तर इंग्रज होते. मग हाच मला प्रश्न पडतो. ज्या लहुजींची नात इंग्रजांच्या अनुदानामुळे फुलेंच्या शाळेत शिक्षण घेते. तेच लहुजी वस्ताद इंग्रजांच्या विरोधात कसे राहु शकतात.

१८५५ ला मुक्ता आपल्या निबंधात म्हणते की - "इंग्रज हे आमचे माय बाप आहेत." त्या वेळेस फडके १३ वर्षाचे होते आणि आगरकर, टिळक यांचा तर जन्मच नव्हता कारण यांचा जन्म १८५६ सालचा आहे. मग हे दोघे लहुजींचे शिष्य कसे होऊ शकतात? कारण लहुजी हे तर फुले यांच्या क्रांतिकारी विचार प्रवाहात आले होते आणि ज्या वेळेस आठ वर्षाची मुक्ता इंग्रजांना "माय बाप' म्हणते. तर हे म्हणण्याच कारण लहुजी आणि फुलेंच्या प्रभावामुळे आम्ही मान्य करतो की - लहुजींनी इंग्रजांच्या विरोधात प्रशिक्षण देणारी शाळा काढली. परंतु तो काळ १८२२ चा होता आणि त्या वेळेस एकट्या ऊमाजी नाईकाशिवाय कोणत्याही क्रांतीकाराचा जन्मच नव्हता.

फक्त ऊमाजी नाईक यांनाच लहुजी वस्तादांनी प्रशिक्षण दिल, परंतु हे आम्हाला सांगीतल्या जात नाही. कारण बहुजनांना एकत्र येऊ द्यायच नाही. नंतर लहुजींना ज्या वेळेस समजल की इंग्रजापेक्षा घातक जर कोणी आमचा शत्रु असेल तर ते शत्रु दुसरे कोणी नसुन इथले मनुवादी पेशवे आहेत आणि त्यामुळेच लहुजींनी आपला मोर्चा फुलेंच्या क्रांतिकारी कार्याकडे वळवला लहुजींना समजल की मांगा - महाराची पोर शिकल्या शिवाय इथल्या अस्पृश्य समाजाची प्रगती होणार नाही. म्हणुन लहुजी साळवे यांनी फुले आणि सावित्रीबाई यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहुण पेशव्यापासुन संरक्षण देऊन शिक्षणात क्रांती घडवुन आणण्याच काम लहुजी वस्तादांनी केले. लहुजी वस्ताद हे फडके, टिळक, आगरकर यांचे गुरु नसुन ऊमाजी नाईक आणि फुल्यांचेच गुरू होते.

ज्या टिळकांनी जातीयतेतुन स्वतःची मुलगी कधीच फुलेंच्या शाळेत पाठवली नाही. तेच टिळक लहुजींकडे प्रशिक्षण घेण्यासाठी कसे येतील? जो टिळक कुणबी, मराठा, तेली, तांबोळी सारख्या लोकांचा कट्टर विरोधक होता. तो मांगाचा कसा शिष्य होऊ शकतो? तर लहुजींचा खोटा इतिहास मांगाला सांगुन मांगाचे नेते मंडळी ही मांगाला फुले, शाहु, आंबेडकर, अण्णाभाऊ यांच्या विचारापासुन दुर ठेवण्याच षडयंत्र करते. कारण या नेत्यांना समाजाच परिवर्तन घडवुन आणायच नाही. समाजाचा विकास करायचा नाही. तर या नेत्यांना फक्त समाजाच नेत्रत्व करायच आणि स्वतःची पोटाची खळगी भरायची एव्हडच यांच ध्येय धोरण आहे.

जर समाजाला बाबासाहेब कळाले तर समाज शिक्षणाकडे वळेल व समाज हुशार होईल व समाजाला त्यांच्या मित्राची व शत्रुची जाणीव होईल आणि समाज अशा अडाणी नेत्याच नेत्रत्व स्वीकारणार नाही ही भिती आज मांगाच्या नेत्यां मध्ये आहे, म्हणुन ही मांगाची नेते मंडळी मांगाना लहुजींचा खोटा इतिहास सांगुन फुले - शाहु - आंबेडकर अण्णाभाऊ यांच्या विचारापासुन दुर ठेवण्याच कार्य करत आहे आणि हे करण्यासाठी या नेते मंडळींना आर. एस. एस. कडुन पैसा पुरवल्या जातो. त्यामुळे मांगाचे नेते बाबासाहेब तर लांबच पण मुक्ता साळवे आणि अण्णाभाऊ हे सुद्धा समाजाला सांगत नाहीत. कारण त्यांना माहीती आहे की जर अण्णाभाऊ आणि मुक्ता जर समाजाला समजली तर समाज फुले - शाहु - आंबेडकर यांच्या विचारधारे कडे गेल्या शिवाय राहणार नाही, त्यामुळे हेच आर. एस. एस. चे मनुवादी मांग अण्णाभाऊ आणि मुक्ता समाजाला सांगत नाहीत.

◆◆◆

लेखक -
लहु गायकवाड
(लेखक, कवी एवं आंबेडकरी विचारवंत)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

• YATIN JADHAV : 9967065953
• BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा