▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
● चला आचरणाच्या
दृष्टीकोनाचा डोंगर गाडूया.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
सन्माननीय धम्म बंधु - भगीनी,
उपासक - उपासिकांना आपणास
मैत्रीपुर्वक नमो बूध्दाय, जय भिम ।
महोदय, आपणास हात जोडुन एक कळकळेची विनंती करतो की - दि. ६ डिसेंबर १९५६ साली आपल्या तमाम बहुजनांच्या आयुष्यातली काळरात्र कारण याच दिवशी प्रज्ञासुर्य बहुजनांचे कैवारी "मनुवादी संस्कृतीला" जमिनदोस्त करून असुडाचे फटके मारणारे बहुजनांचे भाग्य विधाते, भारत निर्माते, सविधानाचे शिल्पकार, बहुजनांच्या न्याय हक्काची तोफ, अन्यायाच्या विरुद्ध धगधगती आग, ज्ञानाचा महासागर, प्रज्ञावंत, ज्ञानवंत, शिलवंत, प्रबोधनकार, अन्यायाच्या विरुद्ध सळसळता विचाराचा मेरूमणी त्या स्मशानाच्या चिथेवर शांत झाला. कधी ही न उठण्यासाठी ६ डिसेंबर १९५६ साली तो "काळा दिवस" होता.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाणाचा तमाम बहुजनांच हृदय डोळ्यातील आसवे न आठणारे पाणी त्या कडवट आठवणी, कधी ही न भरणारी जखम आज ताजी होऊन आपण ६ डिसेंबर रोजी आपल्या बाबांना मानवंदना देण्यासाठी त्यांच्या महापरीनिर्वाण दिनी भारताच्या आणि भारताबाहेरच्या देशांच्या काना - कोपऱ्यातुन जमतो, एकवटतो. जन समुदाय धम्म बंधु - भगीनी, उपासक - उपासिका बाहेरून आल्या कारणाने समाज्यातील काही उदार निस्वार्थपणे काम करणाऱ्या शाखा, संघटना, भावक्या, दानशूर व्यक्ती आपआपल्या परीने पोळी, भाजी, पुलाव आपल्या समाज बंधु भगीनींची परीपरीने सुख सुविधा पुरवण्याचा काटोकाट प्रयत्न करतात.
खरच त्या सर्व संघटनांच कौतुक आणि अभिनंदन करावे. तेवढ थोडच आहे. पण या सुख सुविधांचा उपभोग घेणाऱ्या माझ्या धम्म बंधु भगीनी उपासक उपासिकांना माझी हात जोडुन कळकळेची विनंती की - प्रत्येक संघटनाचे कार्यकर्ते आपला देह चंदनासारखा झिजवुन जिवाचा आटापिटा करून रात्रीचा दिवस करून आपल्यासाठी होतील. तेवढ्या सुख सुविधा उपलब्ध करतात. त्याच्या मनात एकच असत. माझ्या भाग्य विधात्याच्या महापरीनिर्वाण दिनी आलेल्या माझ्या बंधु - भगीनी, उपासक - उपासिकांना कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. याची काळजी उपस्थित असलेल्रा सर्व संघटना घेतात. आपण त्यांना एकच सहकार्य करायचे आहे. त्यांनी दिलेले अन्न काही वस्तु कुठे ही टाकु नये. परीसर आपल्या मुळे खराब अस्वच्छ होणार नाही. याची काळजी घ्यावी. कुठे ही सार्वजनिक ठिकाणी बसु नये. रेल्वे स्टेशन फुटपाथवर उन्हात अन्य लोकांना त्रास होईल. अशी वर्तणुक करू नये.
मानवंदना देण्यास येताना गाडी वैगेरेतून जिव संभाळुन रस्ते ओलांडावेत. ट्रेनचा प्रवास काळजीपूर्वक करावा. रूळ किंवा प्लॅटफॉर्म ओलांडु नये. स्टेशन परीसरात किंवा सार्वजनिक ठिकाणी काम नसेल तर उगाचच कळपाने उभे किंव्वा बसुन राहु नये. जेणे करून ईतर लोकांना त्यांचा त्रास होईल. कुठे ही सैरावैरा रस्त्यावर धावू नये. गडबड गोंधळ आरडाओरड करू नये. आपण बाबांचे अनुयायी आहोत. याच भान ठेवुन वागावे, शांतता राखावी. मोटार वाहन आणले असेल तर व्यवस्थित पार्क करावे. उगाच हाॅर्न वाजवुन शांत परिसरात ध्वनी प्रदूषण उल्लंघन करू नये. लहान मुलांवर बारकाईने लक्ष ठेवावे. हात सोडु नये. त्यांना एकटे सोडु नये. दुःखीत दिवशी कोणत्याही प्रकारे नशापान करून येऊ नये.
आपला कचरा कचरा कुंडीत किंवा उभ्या असलेल्या कचरा गाडीत किंवा कुंड दानात टाकावा. झालेच तर आपल्या जवळ एक पिशवी ठेवावी. जेणे करुन आपला कचरा जमा करून कचरा कुंडीत नाहीतर कचरा गाडीत टाकता येईल. लहान मूलांना कोठे ही शौचास बसवू नये. आपण आणि आपल्या मुलांना तिथे उपलब्ध असलेल्या शौचालयात घेऊन जावे. रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसवू नये. पाणी पिण्यासाठी ठिक ठिकाणी टॅंकर असतात. तिथे पाणी पिण्यासाठीच उपयोग करावा. आपल्याकडे असलेल्या पाण्याच्या बाटल्या भरून घ्यावा. तेथे अंघोळ करू नये. पाण्याचा दुरुपयोग करू नये. शांतता राखावी. मारामारी - भाडणे टाळावी. कोणत्याही अफवांना बळी पडु नये. उपस्थित असलेले पोलिस प्रशासन वैद्यकिय यंत्रणा, अग्निशमन दल (फायर ब्रिगेड), स्वयंसेवक सामाजिक, शैक्षणिक कर्तव्य निष्ठ संघटनाना आपणास सुरक्षेच्या दृष्टिकोन काही सुचना करतील. त्याच काटेकोरपणे पालन करावे व त्यांना सर्वोत्तोपरी सहकार्य करावे. व त्यांनी उपलब्ध केलेल्या विविध सुख सुविधांचा लाभ घ्यावा.
आपण दुसऱ्यासाठी आदर्श बनून आपली चैत्यभूमी त्या बाजुचा परीसर जास्तीत जास्त कसा स्वच्छ, सुंदर, सुरेख दिसेल? याची काळजी आणि जबाबदारी व भान उपस्थितीचे भान ठेवुनच महामानवांस मानवंदना कराल. तर हिच खरी बाबांना श्रध्देची श्रध्दांजली व आदराची आदरांजली ठरेल. न जानो वरील नियमाच उपस्थित कोणतीही व्यक्ती पालन करत नसेल किंवा तसे वागत नसेल आणि हि बाब आपल्या निदर्शनास आल्यास वरील नियम त्यांना समजावून सांगुन तसे वागण्यास सांगणे हेच आपले ही कर्तव्य आणि जबाबदारी असु शकते. सफेद वस्त्र परीधान करून स्वच्छ यावे. जुने असले तरी फाटले असले तरी धुवुन, शिवुन टाप टीप असावे. अस्वच्छ राहु किंवा वागु नये. एक बाबांचे अनुयायी म्हणुन तरी सर्वानी वरील सुचनेच पालन काटेकोरपणे करावे. हिच हात जोडुन अपेक्षा करीत आहोत. धन्यवाद!
◆◆◆
आवहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
मंगेश मोहिते (एक आंबेडकरी अनुयायी)
साभार -
"Buddhism & Ambedkarism Blog"
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
• YATIN JADHAV : 9967065953
• RAMESH BHOSALE : 9773338144
• BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.
धन्यवाद ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा