रविवार, ९ सप्टेंबर, २०१२

शिवजयंती बदलापूरची - १९२७ सालची




शिवजयंती बदलापूरची - १९२७ सालची

बाबासाहेब नावाचं वादळी नेतूत्व स्पृश्य नि सवर्ण वर्गात मोठी खळबळ उडवून देत असे. सनातनी लोकांना सळो की पळो करुन सोडणारं हे व्यक्तिमत्व जाती पातीच्या बेड्या तोडून नवी समाज रचना उभी करण्यासाठी मोठा झगडा चालविला होता.
१९२७ साली ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे ३ मे रोजी शिवजयंती उस्तव दर वर्षी प्रमाणे याही वर्षी पार पडणार होता. पण उत्सव समितीने या वर्षी अध्यक्ष म्हणून कुणास बोलवावे हे ठरविण्यासाठी मिटिंगावर मिटींगा घेतल्या. अनेक नावाची चर्चा झाली पण काही ना काही कारणास्तव ही सर्व नावं नकारली गेली. शेवटी सर्वानूमते असे ठरले की डॉ. भीमराव आंबेडकरयाना या उत्सवाचे अध्यक्ष म्हणून बोलवावे. मग प्रश्न असा पडला की बाबासाहेबाना निमंत्रण देण्यास जाणार कोण? पालेय शास्त्री नावाच्या भिक्षूकावर (ब्राह्मण) ही जबाबदारी टाकण्यात आली.
हे भिक्षूक ब्राह्मण मुंबईस आले , पण थेट बाबासाहेबाना भेटण्याची हिंमत होईना. ’ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर’चे संपादक नाईक याना जाऊन भेटले. आपला मानस त्यांच्याकडे बोलून दाखविला. भिक्षूकाचा प्रस्ताव ऐकून नाईकाना फार आनंद झाला. नाईकानी या भिक्षूकाची बाबासाहेबांशी भेट घडवून आणली. पालेय शास्त्र्यानी आपला परीचय दिला व गावात भिक्षूकीचा व्यवसाय करतो असे सांगितले. या वर्षीच्या शिवजयंतीच्या उत्सवास आपण अध्यक्ष म्हणून लाभावे अशी ईच्छा व्यक्ती केली. बाबासाहेब मोठ्या आनंदाने हे निमंत्रण स्विकारतात.  हे ब्राह्मण गृहस्थ खूश होऊन निघून जातात.
ठरलेल्या तारखेप्रमाणे बाबासाहेब बदलापूरला येतात. अध्यक्ष स्थान स्विकारुन एक तेजस्वी भाषण देतात. बाबासाहेबांची खाण्या पिण्याची सर्व व्यवस्था या भिक्षूकाच्या घरी केली जाते. जेंव्हा महाराला शिवने सुद्धा विटाळ मानल्या जाई अशा काळात एका भिक्षूकाने बाबासाहेबाना आपल्या राहत्या घरी मुक्कामी ठेवून केलेला आदरातित्य पाहता  त्यांच्या मनाच्या मोठेपणाला सलाम करावयाची ईच्छा होते. त्या दिवशी मोठ्या जल्लोशात शिवजयंती साजरी होते. दुस-या दिवशी बाबासाहेब परत जातात. बाबासाहेबानी आपल्या आयूष्यात साजरी केलेली(? सहभाग घेतलेली) ही एकमेव शिवजयंती होय. 
पण...
पण ही झाली पडद्या पुढची घटना.
या एकंदरीत कार्यात पडद्या मागे जे घडले ते ही फार ईंटरेस्टींग आहे. मुळात या कार्यक्रमास बाबासाहेबानाच का बोलावले? प्रदिर्घ चर्चे नंतर यानाच बोलावण्याचे कारण काय? तर याचे उत्तर आहे, ईथे या दरम्यान मोठ्या प्रमाणात हिंदू-मुस्लिमांच्या दंगली झाल्या होत्या. हिंदूंची ताकद कमी पडू लागली होती. त्यातल्या त्यात अस्पृश्य समाज मोठ्या प्रमाणात ख्रीस्ती धर्म स्विकारू लागला होता. मुसलमानांची कु-हाड सतत आभाळात दिसे, कधी कोसळणार नेम नाही. त्याच दरम्यान बाबासाहेब नावाचा अस्पृश्यांचा मसीहा उदयास आला होता. त्याना वाटले असावे बाबासाहेबांच्या मदतीने अस्पृश्यांची ताकत आपल्या पाठीशी उभी करता येईल. त्याच बरोबर धर्मांतरही रोखता येईल. ही होती एक बाजू. दुसरी बाजू अशी होती की सुधारणेचे वारे वाहू लागले होते. बाबासाहेब व ईतर पुरोगामी मताचे नेते सामाजीक बदल घडवून आणन्यास मोठ्या जोमाने कामास लागले होते. याचा एकंदरीत  परिणाम असा झाला की आपल्याही गावात बाबासाहेबांसारख्या थोर पुरुषाचे पाय लागावेत असे वाटून त्यानी बाबासाहेबाना जयंती उत्सवाचे निमंत्रण दिले. ठरल्या प्रमाणे बिचा-या ब्राह्मणाने जाऊन बाबासाहेबांशी तसे बोलून निमंत्रण देऊनही टाकले.
त्या नंतर सुरु झाली खरी गंमत.
बाबासाहेब येणार हे पक्क झाल्यावर खरा प्रश्न उभा ठाकला, तो म्हणजे बाबासाहेब थांबणार कुणाकडे? मराठा व ईतर बहुजन समाज बाबासाहेबाना आपल्या घरची पायरी चढू देण्यास तयार नव्हता. सुधारणा बिधारणा त्या काय भानगडी असतात त्या घराच्या बाहेर. एक महार घराची पायरी चढून आता यावा हे त्याना अजिबात मान्य नव्हते. महाराच्या पदस्पर्शाने गाव पावन होणार होता पण तोच महार घरात आल्यास मराठ्यांचे घर बाटणार होते. त्यामूळे मोठा पेच निर्माण होतो.
गावची सर्व लोकं परत एकदा एकत्र येतात व मिटिंग घेतात. बाबासाहेबांची राहण्याची सोय कुणाकडे करायची यावरुन मोठा वाद उभा ठाकतो. सुधारणावादी बहुजन वर्गातून एकही माणूस पुढाकार घेण्यास तयार नसतो. शेवटी पंचायत होते ती बिचा-या ब्राह्मणाची. जेंव्हा बहुजन समाज मागे हटतो तेंव्हा पालेय शास्त्री उभे होऊन जाहीर करतात की मी करेन बाबासाहेबांची राहण्याची व्यवस्था, बॅरिस्टर आंबेडकरांची राहण्याची व खाण्या पिण्याची सर्व सोय मी  माझ्या घरी करण्यास तय्यार आहे.
एका भिक्षुकानी सर्व जबाबदारी स्वत:वर घेतल्यामुळे बहुजन समाज एका मोठ्या संकटातून सुटल्यागत श्वास घेतो. पण भिक्षुकी करुन जगणा-या ब्राह्मणावर आस पासच्या गावची लोकं बहिष्कार टाकणार व त्याचे जगणे मूश्किल करणार हे दिसत होते. त्याच्या भिक्षूकीच्या व्यवसायावर संकट कोसळणार हे उघड होते. तो प्रश्न निकाली काढण्यासाठी आस पासच्या चौदा गावच्या लोकांची दुसरी मिटिंग भरवून तसा बहिष्कार टाकण्यात येऊ नये म्हणून एक ठराव पास करण्यात आला. एवढं करुनही काही चित्पावनानी मराठ्याना या भिक्षूकाच्या विरोधात उठविण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. सर्व मराठा (व ईतर बहूजन) समाजानी बाबासाहेबांची जबाबदारी एक भिक्षूकाच्या माथी मारली व शिवजयंतीच्या कार्यक्रमात सुधारणावादी असल्याचा आव आणत मोठ्या तो-यात फिरत होते. पालेय शास्त्री नावाचे ब्राह्मण गृहस्थ मराठ्यांच्या या डबडल स्टॅंडर्डनी अवाक झाले. अन बाबासाहेबांचे आदरातिथ्य करण्यात व्यस्त झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा