● शोधू नका बहाणे
व्हारे आता शहाणे,
शोधू नका बहाणे ।
आपलीच लोक हरली,
आपल्यातल्या तहाने ।।धृ।।
आपल्याच बहाद्दूराने,
केलिया आपली दैना ।
आपल्या लोकांविरोधी,
आपलीच भिम सैना ।।१।।
आपल्यातूनी पळाला,
शत्रूस तो मिळाला ।
देई ऊलट आरोळी,
तुम्हा भीमच ना कळाला ।।२।।
आपल्याच माणसाचं,
चाले निराळं डोकं ।
आपल्याला पाडणारी,
आपली खट्याळ लोकं ।।३।।
अकलेचा आलेख आमच्या,
कधी ही सरळ ना गेला ।
बापाच्या विरोधात,
मुलगाच ऊभा केला ।।४।।
परक्या घरात सत्ता,
आम्हीच देत गेलो ।
आपल्याच समाजाची
मज्जाच घेत गेलो ।।५।।
सतराशे साठ आम्ही,
अमुक टमुक गटाचे ।
कसू - कसून आटे,
गेलेत रे नटाचे ।।६।।
दोरी जरी जळाली,
तरी पिळ जात नाही ।
टिका विना रिकामा,
इथे ईळ जात नाही ।।७।।
सोडून द्या ते पक्ष,
सोडा मनाचा हट्ट ।
बांधा एकीची मुठ,
आवळूनी घ्या रे घट्ट ।।८।।
कळते बघा आम्हाला,
वळत कसे रे नाही ।
त्यांना दिव्याची गाडी,
तुम्हीच का पायी पायी ।।९।।
आपलेच लोक झाले,
आपलेच हाड वैरी ।
झाडून आपल्या वरती,
आपल्याच पाच फैरी ।।१०।।
आपलेच गार केले,
आपल्याच माणसाने ।
गाऊन पुन्हा आपल्याच,
पराभवाचे'' गाणे ।।११।।
कवी -
नामदेव ढसाळ
प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय
••¤••••¤••••¤••
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123
• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com
• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com
• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा