● मितवा
हलता - हलता चाल मितवा
डुलता - डुलता चाल ।
जीवन समजूनी बाग फुलांची
फुलता - फुलता चाल ॥धृ॥
तुझ्या संगती आहे मी मितवा
बाहेर असताही चाल ।
कामात असता गुंग मितवा
झुलता - झुलता चाल ॥१॥
घरात राहूनी चाल मितवा
बाहेर असताही चाल ।
कामात असता गुंग मितवा
झुलता - झुलता चाल ॥२॥
मुलां संगती चाल मितवा
फुलां संगती चाल ।
काट्यावरती सुमने फुलती
रुतता - रुतता चाल ॥३॥
नसेल कुणाची साथ मितवा
चल अकेली चाल ।
जे जे भेटतील भोंदू सारे
सबुरीने तू चाल ॥४॥
हसता - हसता चाल मितवा
नयनात तरंगत चाल ।
रडता - रडता चाल मितवा
बाहुत दडुनी चाल ॥५॥
झुळूक प्रेमाची वाहील मितवा
वादळे ही ती येतील मितवा ।
सुख दु:खांचे गणित मितवा
सुटता - सुटता चाल ॥६॥
कवि -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय
••¤••••¤••••¤••
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123
• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com
• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com
• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा