● होळी दहन : एक कुजलेली संस्कृती
भारतातील बहुजन लोकांच्या मनुवादी विचारांनी माथी मारलेला सर्वात मोठा सण अर्थात होळी. आपण कधी तरी सहज म्हणतो पहा, हा तरुण स्वतःच्या आयुष्याची होळी काही दिवसात करून घेणार? माझ्या आयुष्याची होळी झाली आहे? मी स्वतःच माझ्या आयुष्याची होळी करून टाकलेय? काय रे आयुष्याचा शिमगा करून घेतो की काय? अर्थात का रे आयुष्याची वाट लावून घेतो आहेस? स्वताला बुद्धीवान समजणारे मनुवादी विचारांनी लादलेला शिमगा, होळी, धुळवड व रंग पंचमी हा सण, खेड्यात देवांच्या नावानं पालखी खांद्या, डोक्यावर नाचवून गावोगावी अंधश्रद्धेचा आलेख सतत उंचावून बुद्धिवादी माणूस ब्राम्हण सोडून बहुजनाच्याच अंगात येणाऱ्या देवाला आता शहरात तर रंगपंचमी होळीच्या नावा खाली "रंग बरसे भिगे चुनरिया.." च्या नावा खाली, पाणी बरसेच्या नावा खाली हिडीस, अनैतिक, शारीरिक चाळे अशा स्वरुपात जाहीर कार्यक्रम आयोजित करून याचे गंभीर रूप धारण होत असताना सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या परिवर्तनवादी लोकाना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. नैसर्गिक संपत्तीला अर्थात झाडांची खुलेआम कत्तल, मशागत करण्या करीता लागणारे सर्पण नैसर्गिक संपत्तीला उघडं नागडं भकास करून लाकडाची होळी तयार करून दैव, आत्मा, भूत, प्रेत स्वतः वर कोपता असा गैरसमज करून अर्थात कोणता देव कोपु नये म्हणून...
मित्र हो,
आम्ही देव डोक्यावर खांद्यावर पालखी नाचवली नाही म्हणून गेल्या ५० वर्षात कोणताही देव आमच्या वर कोपलेला पाहिला नाही, मात्र बुद्धिवादी माणूसच कोपतो हे मात्र उघड्या डोळ्यांनी नेहमी पहावयाला मिळतात. जळणाऱ्या होळी, होमा मध्ये स्वतःच्या अंगा वरून नैसर्गिक फळ नारळ ओवाळून टाकले जातात, नारळ फोडले जातात व दहन केले जातात? रंग पंचमीच्या नावावर बळजबरी अंगाला रंग लावून काही उर्मट तरुण इमारती वरून पायी जाणाऱ्या वाटसरू, त्यामध्ये अधिकाधिक तरुणीवर रंगाने भरलेले फुगे मारले जातात. त्या छुप्या हल्ल्यात अनेक जण जखमी होतात. काहीना डोळे गमावण्याची वेळ येते. फुग्यातील पाण्यात मिसळलेले रंग रासायनिक असल्यामुळे शरीरावर अनेक डाग निर्माण होऊन त्वचा काळी व त्यावर जखम पडते. अशा नकळत येणाऱ्या फेकणाऱ्या पाण्याने भररलेल्या फुग्याना सामोरे जावे लागते. या वादातून मारामाऱ्या, खून सुद्धा झालेले आहेत व होतात. अशा या मनुवादी निर्मित सणा मधून वाईट विकृती अधिक वाढताना दिसत आहे. काही हिंदुच्या मते मनातील एकमेकाबद्दल असलेले द्वेष, वाईट विचार वर्षातून एकदा होळीत जाळून नव्याने नवीन विचार सुरु करू अशा काल्पनिक मानसिकतेत राहून वैर कमी करण्याचा नाहक प्रकार केला जातो.
पहा मित्रानो,
एका दिवसांत असे प्रकार थांबतील का? असे झाले तर वर्षभर आपण काय करीत होतात? वाईट विचार, वृत्ती द्वेष कधीही जळत नाहीत ते जाळण्यासाठी सकारात्मक डोळस वृत्ती दृष्टीकोन, अंधश्रद्धा विरहीत संकल्प व स्वाभिमानाच आचरण करून नितीमत्ता असावी लागते.
मित्र हो,
अशा प्रथा एका दिवसाची होळी, रंग पंचमी, नारळ फोडून कमी होणार का? अशा या नाटकी मनुवादी सणा मध्ये आपले बहुजन सामाज कुटुंब, त्यात अधिक प्रमाणात तरुण महाभाग सहभागी होतात.
तरुण हो,
डॉ. बाबासाहेबांनी या करिताच बुद्ध धम्माचा महामार्ग दिला? २२ प्रतिज्ञा दिल्या? ६० वर्षात आपण काय केले? केवळ मनुवादी लोकांच्या विकृत सणांचे अनुकरण केले?
तरुण हो,
विज्ञान बुद्ध धम्माचे खरे पाईक, निष्ठावंत व्हा. अनुसरण करा, विचार प्रगल्भ होतील. त्याच बरोबर स्वतःची वैचारिक मानसिकता बदलून बुद्धिवादी वैज्ञानिक नवीन विचार अंगी येण्या करिता आपल्यात नितीमात्ता गुणवत्ता निर्माण करा. नक्कीच बदल घडेल.
भारताच्या इतिहासात मनुवादी विचाराने अनेक प्रकारचे काल्पनिक सण रूढी परंपरा पद्धती अमलात जाणीवपूर्वक निर्माण उपलब्धी करून ठेवली आहे. त्यामध्ये अनेक असे सण आहेत की ते शारीरिक, मानसिकतेला इजा पोहचविणारे आहेत. हे मान्य करावेच लागेल यात केवळ बहुजन वर्ग भरडला जातो आहे. देवाच्या नावा खाली शिमग्याच्या नावाने "होळी" करतात. दुसरा मुद्दा म्हणजे मुंबई सारख्या शहरात एक दिवसाच्या वाया जाणारे पाणी ज्या ठिकाणी दुष्काळ आहे त्या ठिकाणचा १५ दिवसाचा साठा आम्ही शिमग्याच्या होळीच्या नावाने पाणी गढूळ करून वाया घालवत आहोत. त्याचा योग्य वापर न कारता अशा मार्गाने जर होत असेल तर पाणी ही राष्ट्रीय संपत्तीची आपण लुट करीत आहोत. येणाऱ्या नजीकच्या काळात या पाण्याच्या प्रश्ना वरून युद्धे होतील. पूर्वी संपत्ती, सीमा आणि अंतर्गत वाद यावरून युद्ध झाली आहेत. यासाठी भारतातील प्रत्येक नदी ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करून कोहिनूर हिऱ्यासारखे जतन करून ठेवणं काळाची गरज आहे.कारण इतिहास साक्षीला आहे. डॉ. बाबासाहेबांनी संसदेत नद्या जोड ही संकल्पना मांडली होती. त्याच प्रमाणे माणसा सारख्या माणसांसाठी, आम्ही सुद्धा माणसे आहोत हे जगाला दाखविण्या करिता महाड येथे पाणी संगर करावा लागला होता. आपल्या समोर हे उदाहरण हा इतिहास आहे. आज महाराष्ट्रात लोकांना पाणी पिण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे. काही वर्षापूर्वी भोंदू बाबा आसाराम बापू (आज तुरुंगात आहे) याने होळी निम्मित्त स्वतःचे म्हतार चाळे जमलेल्या लोकांच्या अंगावर पाणी फवारून दाखवून दिले. म्हणे मी आधुनिक कृष्ण आहे.
मित्र हो,
लाखो लिटर पाणी वाया गेले. याला कोण दोषी? तो भोंदू बाबा तर आहेच. परंतु ज्यांनी परवानगी दिली होती ते सरकार सुद्धा दोषी होते. हे नाकारू शकत नाही. या अशा अनेक काल्पनिक संस्कृतीमूळे, सणामुळे २१ व्या शतकाकडे जाणारा तरुण वैचारिक व वैज्ञानिक दृष्ट्या "कोमात" जाणार अर्थात गेला आहे. अशा सणामुळे आयुष्याचा एकदाच "शिमगा" व "होळी" करून घेत आहेत. याच उर्मी मूळेच आई वडिलांना मान सन्मान सुद्धा देत नाहीत.
मित्र हो,
२२ प्रतिज्ञा हेच आपल्या प्रचार आणी प्रसाराचे खरे अस्त्र आहे. स्वतः घरोघरी, विहार मध्ये जावून कृतीशीलपणे २२ प्रतिज्ञा राबविणे काळाची गरज आहे. अन्य मार्ग वापरून किंवा मनु संस्कृतीचे अनुकरण समर्थन करून, म्हणजेच "होळी दहन" रंग पंचमी साजरी करून कोणतही धोरण ध्येये साध्य नक्कीच होणार नाही. हे समजून घेणे अत्यंत महत्वाच व गरजेच आहे. काही शतका पूर्वीच्या इतिहास कथन केला जातो की, होलीका ही वीरांगना होती. ब्राम्हणात तिला पराभूत करण्याची क्षमता नव्हती. दुसरं कारण असे की ब्राम्हणांनी प्रल्हादला आपले पिता हिरण्य कश्यप विरुद्ध कपटाने भडकावले होते. त्यामुळे होलिका प्रल्हादला समजावण्याचा प्रयत्न करीत होती याचा परिणाम प्रल्हाद वर झाला त्यामुळे ब्राम्हणांनी होलीकेचे कपट नितीने दहन करायचे ठरवले व प्रल्हाद देखील विष्णुच्या आहारी जात त्याचा फायदा घेत विष्णूने होलीके वर बलत्कार करुन होलीकेचे दहन केले व त्याच दिवसा पासून होळी हा सण ब्राम्हणांनी बहुजणांच्या माथी मारला. मात्र ताजा इतिहास, जाती पातीच्या धर्मातच असताना प्रखर बुद्धी तेजानं २५ डिसेंबर १९२७ साली मनुस्मृती दहन रायगडाच्या पायथ्याशी करून खऱ्या अर्थानं मानवाला मनुवादी विचारातून मुक्त केलं तो आपल्या करिता स्वातंत्र्याचा खरा दिवस मानावा लागेल! कारण त्यानंतर आपल्याला मनु निर्मित हिंदुच्या दहन, होळी अशा अंधश्रद्धातील प्रथा १९५६ नंतर करावयाची गरजच कधी भासली नाही. अशा मानसिकतेतून कायमची सुटका करणाऱ्या महान क्रांतीकारक उद्धारकाला अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना कायमचा लीन होत, त्यांना अभिवादन करतो.
तरुण हो,
होळी - शिमगा - रंग पंचमी हा आपला सण नसून तो साजरा अथवा सहभागी होऊ नये. अशी नम्र विनंती ।
●●●
आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
राजेश सावंत (लेखक, कवी, युवा मार्गदर्शक)
आसरा एज्युकेशन आणि सामाजिक संस्था
प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय
••¤••••¤••••¤••
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123
• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com
• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com
• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.
धन्यवाद ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा