बुधवार, २४ जानेवारी, २०१८

● कोण उजवे? कोण डावे? (कविता)


● कोण उजवे? कोण डावे?

कवी -
सुनील खोब्रागडे

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

परिषदा भरल्या पुन्हा,
अभियान ही झाले सुरु ।
जुन्याच होत्या घोषणा,
पण छाकटे होते नवे ।।धृ।।

नवा हा साज चढविला,
पुन्हा आता मढ्याला ।
चालली खांदेकऱ्यांची,
पुन्हा नव्याने आर्जवे ।।१।।

गर्दीत या एक ही,
कलदार नाही बोललो मी ।
मंडपातील काजव्यांनी,
घेतले माझेच चावे ।।२।।

काल तेथे शूर होते,
आज तर बाजार बुणगे ।
जत्थ्यात शिखंडीच्या,
घुसला तो टाळी वाजवे ।।३।।

भोंदू जमावाच्या थव्याने,
जरी कल्लोळ केला ।
पारखी ते जाणती,
कोण उजवे? कोण डावे? ।।४।।

●◆●

कवी -
आयुष्यमान सुनील खोब्रागडे
(संपादक : दैनिक जनतेचा महानायक, मुंबई)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 Or 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा