शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८

● धडग्यातून ऊठूनी... (Lyrics)

● धडग्यातून ऊठूनी... (लेखी गीत)

कवी -
गौतम धुमाळ

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

धडग्यातून ऊठूनी,
पोचीराम नाचला ।
आई सांग जा साऱ्यांना,
जय भीम पोहचला ।।धृ।।

नचु दे, गाऊ दे,
मला विसरून देह भान ।
नामांतर झाल्या ऐकुनी,
हे तृप्त झाले कान ।।१।।

सन्मानाचा शिरी,
हा शिरपेच खोचला ।
आई सांग जा साऱ्यांना,
जय भीम पोहचला ।।२।।

आई आज उगवली गं,
ही सोनेरी सकाळ ।
ही सकाळ पाहण्यासाठी,
तुझ तडफडल बाळ ।।२।।

सत्याचा विजय झाला,
अविचार ठेचला ।
आई सांग जा साऱ्यांना,
जय भीम पोहचला ।।३।।

महाराष्ट्राची विश्वामध्ये,
उंचावली मान ।
नामांतराने वाढवली,
विद्यापीठाची शान ।।४।।

या स्वप्नपूर्तीसाठी,
क्षण - क्षण हा वेचला ।
आई सांग जा साऱ्यांना,
जय भीम पोहचला ।।५।।

आज भेटायला मला,
आला होता तो धुमाळ ।
हातात घेऊन या,
नवा कोरा नवा काळ ।।६।।

आई छातीशी धरुनी,
नवा काळ वाचला ।
आई सांग जा साऱ्यांना,
जय भीम पोहचला ।।७।।

कवी -
गौतम धुमाळ

आभार -
प्रफुल चटसे (हिंगोली जिल्हा संघटक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/Y.M.JADHAV123

• मातृ संघटनेत सहभागी होण्या करिता
Www.SSDIndia.Org

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV : 7738971042
(Use Only WhatsApp Massage,.)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा