शनिवार, १५ जुलै, २०१७

● भीम सूर्याचा जाळ (कविता)

● भीम सुर्याचा जाळ

साहीत्याचे आभाळ अण्णाभाऊ,
भांडवल शाहीचा काळ अण्णाभाऊ ।
मनुवादाची होळी केली ज्याने,
त्या भीम सुर्याचा जाळ अण्णाभाऊ ।।धृ।।

दीड दिवसाची शाळा शिकुनी,
झाला असा तू विद्वान ।
देशी विदेशी महती तुझी,
बहुजनांना अभिमान ।।१।।

रसवंती लेखनी अण्णाभाऊ,
निर्मीती देखणी अण्णाभाऊ ।
सत्तांधांची नशा डफाच्या,
आवाजाने उडवली ।।२।।

संयुक्त महाराष्ट्राची,
लढाई तू गाजवली ।
डफावरची थाप अण्णाभाऊ,
विद्राेहाची आग अण्णाभाऊ ।।३।।

कधी होते जे सुपामध्ये,
कधी होते जे जात्यात ।
पृथ्वी आणून दिली तू,
त्या कष्टकऱ्यांच्या हातात ।।४।।

स्वातंत्राची जान अण्णाभाऊ,
बंडाचे निशान अण्णाभाऊ ।
स्वातंत्राची जान अण्णाभाऊ,
बंडाचे निशान अण्णाभाऊ ।।५।।

कवी -
डॉ. नितीन अण्णा : पुणे
(लेखक, कवी एवं युवा मार्गदर्शक)

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••••••••••••••••••••••••••••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

• मंडणगड - दापोली सामाजिक प्रतिष्ठान
Plz Join us 'MDSP' : 7303535166

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा