शुक्रवार, २८ जुलै, २०१७

● धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा शोध आणि बोध

● धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा शोध आणि बोध

सम्यक संबोधी प्राप्त झाल्यावर भगवान बुद्धांनी जो प्रथम धम्मोपदेश केला. तो त्रिपीटकात "धम्मचक्र पवतन सुत्त" म्हणून ओळखला जातो. या सुत्तात असे म्हटले आहे कि -

मज्झिप्पा पतीपदा तथागतेन
अभिसमबुद्ध उपासमय, अभिज्ञान,
समबुद्धाय, निब्बानाय सवंतती ॥

एतेन भगवंता वाराणसिय
जासिपतादे मिगदये अनुत्तरन
धम्मचक्र पवत्तितन ॥

अनुवाद -
"तथागतानी जो मध्यम मार्ग जाणला आहे. तो ज्ञान प्राप्तीसाठी आहे, शांतीसाठी आहे, सम्यक संबोधीसाठी आहे, निर्वाणासाठी आहे. अश्या सर्वश्रेष्ठ धम्माचा वाराणसीतील मृगदाय वनामध्ये प्रथम उपदेश करून धम्म प्रवतीत करून केले."

धम्म म्हणजे बुद्ध तत्वज्ञानानूसार जीवन जगण्याचा मार्ग, चक्र म्हणजे त्या मार्गावरुन चालवण्याचा अनिष्ठ प्रथाचा त्याग करुन परिशुद्ध धम्माचा स्विकार करण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि प्रवर्तन म्हणजे या प्रक्रियेला वेग देऊन ती गतिमान करणे. हा उपदेश करित असताना तो पटवून देण्यासाठी धम्मचक्र प्रवर्तन मुद्रे द्वारे भगवान बुद्धांनी दोन्ही हातानी संकेतत्मक निर्देश करून सांगितले कि, कमळाचे फूल जसे एक - एक पाकळी करून अलगत उमळते तसी प्रत्येक मनूष्यात बुद्ध तत्वाची बिजे हळू - हळू विकसित करायचे काम धम्म करित असतो. म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत भगवान बुद्धाच्या उजव्या हाताच्या बोटांनी कमळ रूपी धम्म उलगडून दाखविला आहे.

बौद्ध धम्माच्या इतिहासानूसार या देशा मध्ये तीन धम्मचक्र प्रवर्तने घडली. परिवर्तनाच्या या तिन घटना मानवी मनाच्या सम्यक म्हणायचे कारण असे कि, हि तिन्ही प्रवर्तने त्या त्या काळात कायमस्वरूपी रुजली गेली आहेत. पहिले धम्मचक्र प्रवर्तन हे भगवान बुद्धांनी ई. स. पू ५२८ च्या अष्ठी पौर्णिमेला सारनाथ येथे घडविले, त्याचे प्रथम उपदेशाने प्रभावित होऊन पाच ब्राह्मण परिव्रजकांनी आपला परमपारिक धर्म सोडून बुद्ध धम्माचा स्विकार केला. म्हणजेच त्याचे परिवर्तन होऊन ते नवीन जीवन मार्गाला लागले. त्यानूसार बौद्ध कलेनुसार ते सम्राट अशोकाच्या काळापर्यत धम्मचक्र प्रवर्तन दिन हा "अष्टी पौर्णिमेला" या तिथीनुसार साजरा केला जात. कारण त्या काळात पश्चिमत्य कालगणना अस्तित्वात नव्हती; परंतू जी कालगणना अस्तित्वात होती त्यानूसार भगवान बुद्धांनी अष्ट पौर्णिमेला सुरु केलेला धम्मचक्र प्रवर्तन दिना सम्राट अशोकाच्या काळात विजया दर्शमी या तिथीत कसा परिवर्तीत झाला याचा अभ्यास करणे क्रम प्राप्त ठरते. सम्राट अशोकाने कलिंग वर विजय प्राप्त केल्यानंतर आठ वर्ष तो भिक्खू संघाच्या सहवासात राहिला आणि विजया दर्शमीलाच त्याने उपगुप्त या भिक्खू कडून बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. त्या आठ वर्षात त्याने प्रजा धर्म, राज धर्म आणि निती धर्म या धर्म नितीप्रमाणे आचरण करून प्रजेला अभय दिले. अनेक प्रकारच्या सुखसोयी निर्माण प्रजेला सुखी केले. पंचशीला वर "दसहरा" हि आचारसंहिता लागू करून प्रजेला बौद्ध धम्माची दिक्षा दिली. त्याचा कतृत्वाने तात्काळीन प्रजा इतकी भरावून गेली कि, त्यानी भगवान बुद्धांचा अष्ट पौणिमा हा धम्मचक्र प्रवर्तन दिन बाजूला ठेवून सम्राट अशोकाने ज्या दिवशी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली तो दिवस म्हणजे "विजया दर्शमी" हा दिन धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून पाळायला प्रारंभ केला.

अश्या प्रकारे धम्मचक्र प्रवर्तनाची दूसरी घटना हि अश्विन शुद्ध दर्शमीला सम्राट अशोकाने घडवली आहे. आपल्या प्रजेसाठी दहानिती असलेली "दसहरा" नावाची आचारसाहिता अंमलात आणून सर्व प्रजेला बौद्ध धम्माचे पालन करण्याचा आदेश दिला. ती दहा निती तत्वे खालील प्रमाणे होती.

१) धर्मिक कार्यासाठी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी पशूहत्या ना करणे.

२) कुणाची हि चोरी किंवा फसवणूक ना करणे.

३) व्याभिचार किंवा परस्त्री गमन ना करणे.

४) खोटे ना बोलणे.

५) मद्यपान ना करणे.

६) माणूसकीचा तिटकारा सोडून देणे.

७) माणसाच्या जातीपेक्षा त्याच्या गुणाचा श्रेष्ठ मानणे.

८) "वैर सोडल्याने वैर शांत होते" हे लक्षात ठेवणे.

९) "बहूजन हिताय बहूजन सुखाय" या तत्वास विसरू नये.

१०) "निती नियमांचे पालन केल्यास परम सुखाचा लाभ होतो" हे विसरू नये.

या आचारसंहिता नूसार सम्राट अशोकाच्या काळापासून ते डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (१९५६) काळापर्यंत "धम्मचक्र प्रवर्तन दिन" हा अशोका विजया दर्शमी म्हणून "दसहरा" या तिथीला साजरा केला जात असे.

तिसरे धम्मचक्र प्रवर्तन हे डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दिक्षा देऊन १४ आँक्टोबर १९५६ रोजी अशोका विजया दर्शमीच्या (दसहरा) दिवशी घडविले. खर म्हणजे डाँ. बाबासाहेब आंबेडकांना त्यापूर्वी धम्म दिक्षेचा कार्यक्रम ठेवता आला असता; परंतू १९५६ साली येणारी बौद्ध धम्मातील अशोका विजया दर्शमी आणि १४ आँक्टोबर हा एकाच दिवशी आल्याने या ऐतिहासिक दिनाचे औचित्य सोडून त्यानी १४ आँक्टोबर १९५६ रोजी तिसरे महान धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणले. या दिवशी लाखो दलित अनुयायांनी आपला जूना धर्म सोडून बौद्ध धम्माचा स्विकार केला. म्हणून १९५६ पासून १४ आँक्टोबर या दिनाशी आपले नाते जूळले. डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्विकारल्या नंतर पारंपारिक धर्माकडे हिंदू धर्माकडे कधीच नाहीत. तसे आजचे धर्मांतरीत बौद्ध परिपूर्ण आदर्श बौद्ध धर्मीय बनले आहेत काय? याच उत्तर खेदाने "नाही" असेच येते. आजच्या बौद्धानी सार्वजनिक सामाजिक स्तरावर बौद्ध धम्म स्विकारला पण व्यक्तित्व पावले मात्र अजून ही पारंपारिक धर्माच अडकलेली दिसून येतात. याच कारण ज्या गंर्भीयाने त्या धम्माचा अभ्यास करून तो प्रत्येक्ष आचरणात आणावयास पाहिजे होता. तसे घडले नाही परिणामी १९५६ नंतर बौद्ध समाज दोन्ही धर्मावर श्रद्धा ठेवून जगत राहिला आणि त्याचाच एक भाग अज्ञाना पोटी धम्मचक्र प्रवर्तन दिन हा १४ आँक्टोबर ऐवजी "विजया दर्शमी" या तिथीला साजरा करतो. ते चूकीचे आहे. १९५६ च्या धम्मचक्र प्रवर्तन नंतर आपण आंबेडकरी आदेश शिरसावज्ञा मानले आहेत. म्हणून १४ एप्रिल, ६ डिसेंबर हे दिवस तारखे प्रमाणे साजरे करतो. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन हा सुद्धा १४ आँक्टोबर या तारखेला साजरा केला पाहिजे, असे माझे स्पष्ट मत आहे.

कलिंगात विद्यापिठाच्या १९७५ सालाच्या अभ्यास पथकाच्या निष्कर्षानूसार कलिंग युद्धापूर्वी सम्राट अशोक हा राजा होता व त्याला आपल्या राज्याच्या भौगोलिक प्रदेशाची आणि राज्याची माहिती होती. म्हणजे सम्राट अशोकाला भगवान बुद्धांचा जन्म, त्यांना प्राप्त झालेली संबोधी आणि त्यांचे महापरिनिर्वाण या विषयी अगोदर पासून माहिती असावी. केवळ कलिंग युद्ध समाप्ती नंतर एका भिक्खूच्या उपदेशामूळे त्याचे डोळे उघडले व त्याला हजारो - लाखो सैनिक मारल्याचा पश्चाताप होऊन त्याने बौद्ध धम्म स्विकारला असे झालेले नसावे, कारण या घटने नंतर (युद्धानंतर) व त्याने आठ वर्षानी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली आहे.

इ. स. पू. २६२ मध्ये कलिंग युद्धात मिळविलेल्या विजयाचा दहावा हा अश्विन महिन्यात शुक्ल पक्षातील दहावा दिवस होता व अश्विन हा महिना पश्चात कल्पने नूसार आँक्टोबर महिना येतो. म्हणून इ.स.पू. २६२ च्या अश्विन शुध्द दर्शमी पर्यत सोलर कँलेडर नूसार मागे गेल्यास तो दिवस १४ आँक्टोबर येतो. हे संशोधनाने सिद्ध झालेले आहे. अश्विन महिन्यात भरपूर पाऊस झालेला असावा. कारण या युद्धाचे वर्णन "हाडमासाचा चिखल आणि रक्ताचे घाट वाहिले" असे केले जाते ते अतिश्योक्ती पूर्ण वाटते. खरे म्हणजे पावसाने झालेल्या चिखलात सैनिकांचे मृत्यू देह विरखूळलेले असावेत आणि पूर आल्याने नदीत रक्त मिसळलेले गेल्याने पूराच्या पाण्याला लाल रंग आला असावा. हे वास्तूस्थिती दर्शक वाटते आणि हे सर्व वर्णन आँक्टोबर महिन्यात होण्याऱ्या पावसाळी वाट वर्णनाशी जुळते. म्हणजे यावरून हेच सिद्ध होते कि, अशोक विजया दर्शमीचा दिवस १४ आँक्टोबर १९५६ या दिवशी विजया दर्शमी होती म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तो दिवस निवडला. हे हि खरे कि, असले तरी इतिहासाची नोंद तारखांनी होते. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राची तारिख ती नोंद १४ आँक्टोबर १९५६ या तारिखेचीच राहिल. यात वाद नाही. २३ सप्टेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी प्रेस ट्रस्ट आँफ इंडिया (Press Trust of India - PTI) यासारख्या वृत्त संथ्यांना दिक्षेची तारीख १४ आँक्टोबर १९५६ निश्चित केली असल्याचे कळवले होते. परंतू तो दिवस दसरा असल्याचे नमूद केले होते.

ते वाक्य असे होते -
"It Will Talk Place At Nagpur On The Dussehara Day, i.e. 14th Octobar, 1956. The Ceremony Of Conversion Will Take Place Between 9 to 11 A.M.

अनुवाद -
धर्मांतराचा सोहळा नागपूर येथे दसऱ्याच्या दिवशी, ता. १४ आँक्टोबर १९५६ रोजी, वेळ सकाळी ९ ते ११ वाजण्याच्या दरम्यान आयोजित होणार आहे.

असे नमूद असल्यामूळे त्या दिवसी दसरा होता. म्हणून तो दिवस निवडला हे तर निश्चितच आहे. परंतू १४ आँक्टोबर हि तारिख निश्चित करण्या मागचे कारण होते आणि मला वाटते. हे कारण खूपच महत्वाचे आहे. बौद्ध विद्वान J. F. Flit (जे. एफ. फ्लीट) आणि P. L. Narasu (पी. एल. नरासू) यांनी बुद्धांच्या महापरिनिर्वाणाची तारिख १३ आँक्टोबर दिली आहे. तसेच वामनराव गोडबोले यांनी हि त्यांच्या पुस्तकात दिलेल्या माहिती नूसार ख्रिस्ताच्या जन्माच्या ४८३ वर्षापूर्वी १३ आँक्टोबर या तारखेस भगवान बुद्ध कूशीनगर येथे सांयकाळी पोहचले होते व तेथेच सकाळी २ - ४ च्या दरम्यान म्हणजे चौथ्या यामात त्यांचे "महापरिनिर्वाणास" २५०० वर्ष होतात व चंद्रावर आधारित कँलेडर सुर्यदया पूर्वी जरी ती १४ तारिख झाली अश्या प्रकारे ती तारिख निवडल्या मागे बुद्धांचे महापरिनिर्वाण हे विशेष प्रयोजन होते. हे ही विसरून चालणार नाही.

भारतीय काल मापन पद्धती व पश्चात्य पद्धती हि शाल वाहन शके, विक्रम संवत चंद्राच्या गतीवर आधारित असल्याने, चंद्र वर्षाप्रमाणे येणाऱ्या तिथी नूसार घेतली जाते. त्यात कृष्ण पक्ष, शूक्ल पक्ष, अमावस्या आणि पौर्णिमा येतात. त्याला आपण लूणार कँलेडर (पंचाग) म्हणून ओळखतो. तर पाश्चत्य काल मापन पद्धत ही सूर्याच्या गतीवर आधारित असल्याने तिला आपण सौर वर्ष (सुर्य वर्ष) कँलेडर म्हणून ओळखतो व ते येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून तारखे नूसार गणली जाते. म्हणजेच तिला सोलर कँलेडर ही म्हटले जाते. चद्र वर्षावर आधारित तिथीनूसार वर्षाचे ३६० दिवस होतात, तर पाश्चत्य कालगणनात वर्षाचे ३६५ दिवस होतात. म्हणजे तिथी व तारिख यात खूप अंतर आहे. या सर्व पर्श्वभूमीवर १४ आँक्टोबर हि तारिख आणि विजया दर्शमी हि तिथी याचा विचार केल्यास आपणास दिसून येते कि, "अशोक विजया दर्शमी आणि दसरा" हे प्रत्येक वर्षी एकाच दिवशी येईलच असे नाही. अभ्यासात असे दिसून आले आहे कि, विजया दर्शमी आणि आँक्टोबर हे दिवश दर १९ वर्षानी एकाच दिवशी येतात. कारण १४ आँक्टोबर १९५६ नंतर असा योगायोग २०१३ ला आला होता. आता पून्हा २०३२ साली येण्याची शक्यता नकारता येत नाही.

नागपूर येथील १४ आँक्टोबर १९५६ च्या धम्म दिक्षा सोहळ्याचा पहिला वर्धापन दिन त्या १४ आँक्टोबर १९५७ ला साजरा व्हायला पाहिजे. पण त्या वर्षाची विजया दर्शमी अगोदर म्हणजे ३ आँक्टोबर रोजी आली. म्हणून नागपूरच्या राजकीय नेत्यांनी विजया दर्शमीच्या दिवशीच धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करून चूकीची प्रथा पाडली. तसेच शासनाने ही १४ आँक्टोबर ऐवजी विजया दर्शमीलाच सार्वजनिक सूट्टी जाहिर करण्याची प्रथा सूरू केल्याने लोक विजया दर्शमीलाच धम्मचक प्रवर्तन दिन समजून दिक्षा भूमीवर जमले व तेव्हापासून (दसरा) हा पारंपारिक सण म्हणजेच "धम्मचक्र प्रवर्तन दिन" अशी समाजाची धारणा झाली व आजत गाजत ती प्रथा सुरूच आहे. तिथे महत्वाची एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि, आंतरराष्ट्रीय स्तरावर धम्मचक्र प्रवर्तन दिनाची नोंद ही १४ आँक्टोबर अशीच झालेली आहे. कारण भारता शिवाय इतर राष्ट्रामध्ये विजया दर्शमी हि तिथी कुणालाच माहित नसणार. जापान, चीन, थायलँड, श्री लंका इतर बौद्ध धर्मीय राष्ट्रांचा राष्ट्री विजया दर्शमी तिथीशी संबंध नसल्यामुळे त्याच्या ४ ते १४ हि तारिख धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरातील १४ आँक्टोबर या तारखेचे महत्व लक्षात घेऊन हाच दिवस आपण "धम्मचक्र प्रवर्तन दिन" मानला पाहिजे व साजरा केला पाहिजे.

आजच्या काही वृत्तपत्रा मध्ये या सदर्भात काही लेख वाचण्यात आले. त्यात म्हटले आहे कि, १९५० ते १९५६ या काळात डाँ. बाबासाहेब आबेडकरांनी बुद्ध जंयती तिथीनूसार साजऱ्या केल्या, हे खरे आहे. याच कारण १९५० ते १९५६ हा सहा वर्षाचा काळ बौद्ध धम्माच्या बीजा रोपनाचा काळ आहे. या काळात बाबासाहेब "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथाचे लिखाण करित होते. त्यामूळे भगवान बुद्धांच्या जंयतीतील पौर्णिमेचे किती महत्व आहे, हे त्यानी जाणले होते. म्हणूनच त्यानी बुद्ध जंयती पौर्णिमेच्या तिथीवर साजरा केल्या. डाँ. बाबासाहेब आंबेडकर हे भगवान बुद्धाच्या विचारांनी आणि सम्राट अशोकाच्या प्रचार कार्याने प्रभावित झाले होते. तसेच आज २१ व्या शतकात आपण बाबासाहेबांच्या विचारांनी आणि कार्याने प्रभावित झालेले आहोत. म्हणून आपण आंबेडकरी विचार आणि आदेश शिरसावज्ञा मानले पाहिजे. त्यामूळेच दूसरे असे कि, दसरा हा मूळचा बौद्धांचा सण आहे, हे खरे असेल तरी किती बौद्ध धर्मीयांना दसऱ्या मधील दहा आचारसंहिता ज्ञात आहे? आणि किती लोक दसरा सण बौद्ध पद्धतीने पाळतात? उलट असे दिसून येते कि, धम्मा विषयी अज्ञान असल्याने अनेक बौद्ध बांधव धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा उद्देश समजून न घेता. दसरा हिंदूचा पांरपारिक सण म्हणून घरात "घट" बसवितात. सोने म्हणून एका विशिष्ट आपटा झाडाची पाने वाटत फिरतात. शस्त्राची (हत्यारे) आणि चिमोल्लोधन म्हणून घरातील कर्त्या पूरूषाला ओवाळतात, हे गैर आहे. तसेच दूसऱ्या एका वृत्तपत्रात म्हटले आहे कि, १९५७ पासून आज पर्यंत आपण विजया दर्शमी - धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करतो. म्हणून येथून पुढे ही त्याच दिवशी साजरा करावा असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. पण मग बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा १९५७ पासून आपण प्रामाणिकपणे पाळतो आहोत का? त्याचे मनापासून कोरकोरपणे पालन करतो का? आपल्यातील अनेक लोक आज ही देव - देवतांची पूजा करताहेत. हे योग आहे का?

धम्म जर परिवर्तनशील आहे. असे आपण म्हणतो तर संशोधकांना ज्या क्षणी योग विचार सापडला. तो बुद्धत्वाचा क्षण मानून नवीन विचार स्विकारने आपले कर्तव्य आहे. काही अभ्यासकांच्या व विचारवंताच्या मते बाबासाहेबांची जंयती आपण संपूर्ण महिने साजरी करतो, त्याच प्रमाणे "धम्मचक्र प्रवर्तन दिन" सूद्धा १४ आँक्टोबर या तारखेला व विजया दर्शमी या दोन्ही प्रकारे साजरा करावा. त्यात वाद विवाद करत बसू नये. या पेचातून खर तर मध्यम मार्ग काढणे फार महत्वाचे आहे. खर तर धम्मचक्राला एका दिवसापूर्ती गती द्यायची नसून गती देण्याची क्रिया नंतर चालू ठेवली पाहिजे. असे मला मनापासून वाटते. व त्यासाठी समस्त बहूजनांनी व विशेषत तरूणांनी भरिव कार्य ही करावयास हवे.

❖❖❖

आवाहात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा