शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

● वर्षाची सांगता आणि नवं वर्षात प्रवेश करताना...

● वर्षाची सांगता आणि नवं वर्षात प्रवेश करताना...

"नवीन वर्षाच्या हार्दिक सदिच्छा, शुभेच्छा "असे वर्षाच्या सुरुवातीला एकमेकाला' शुभेच्छा' देताना आपण म्हणतोच बघा.

मित्र हो,
सकाळचा आकाशातून पहाटे उगवणारा सोनेरी किरणांचा सूर्य हा जशा आहे त्याच अवस्थेत उगवतो व मावळतो ही. रात्रीच्या निळ्या नभात शांततेने भ्रमण करणारा चंद्र नेहमी प्रमाणे प्रज्वलित होऊन चांदण्यांच्या पडणाऱ्या सडा मध्ये प्रकाशमय अधिकच दिसत असतो. पृथ्वी वरील नैसर्गिक प्रक्रिया नेहमी प्रमाणे रमणीय प्रेक्षणीय दिसतात. अर्थात आपल्याला कोणताही बदल निसर्गात घडताना होताना उघड्या डोळ्यांनी दिसत नाही मात्र परिवर्तन सतत सृष्टीत होत असते. हे नाकारू शकत नाही.काळानुसार केवळ आकड्यात बदल होतो वर्षाचे आकडे बदलतात अर्थात तारीख वर्ष आणि शतके यांच्यात बदल होत असतो. त्यानुसार पृथ्वी वरील अनेक सजीव प्राणी जगत असतो. याचे आकलन केवळ बुद्धीजीवी प्राणी अर्थात मनुष्य प्राणी हाच स्वताला सुंदर निसर्गात स्वताच्या जीवनात बदल घडवू शकतो, विचारांची देवाण - घेवाण करीत असतो.

काळानुसार आकड्यात बदल झाला तो बदल देखील मानवानेच करून ठेवला असेल म्हणूनच त्याला बुद्धीजीवी प्राणी म्हणतो. पण हाच प्राणी स्वत:च्या आयुष्यात अनेक स्थित्यंतर बदल घडवून आणून स्वताच अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो. ही स्थित्यंतर बदल घडविण्यासाठी ज्या आईच्या गर्भाच्या गाभाऱ्यातून जन्म घेतल्या नंतर प्रथम पृथ्वीवर पहिला श्वास आपण घेतो तिचे महान उपकार असल्याशिवाय नाहीच ना! ती आपल्या प्रत्येक मुलाला समान वागणूक देत मोठे केलेलं असते. मात्र काही काळानंतर त्या मुलांच्या विचारात बदल होतो बघा.

मित्रानो, 
पृथ्वी सूर्य चंद्र आहे त्या ठिकाणीच आहे. त्याबरोबर जन्म देणारी आई सुद्धा तिथेच आहे. मात्र विचारांच्या आकड्यात फसली जातात आणि मग विचारांची फारकत होत जाते. याचा अर्थ असा होत नाही की, आईने मुलांना समान वागणूक दिली नाही? तिने आपले कर्तव्य समान पार पाडले आहे. मात्र मुलांच्या विचारात परिवर्तन झाले आहे. हे परिवर्तन घडताना आईने सांगितलेल्या मार्गाने न जाता स्वताच्या बुद्धीने जाणारे अर्थात व्यक्तिगत विचाराने जाऊन आत्म घातकी निर्णयाच्या दिशेने जाऊन अहंकारी पद्धतीने वागू लागतात.

आपण समाजाचा विचार केला तिथे ही असेच प्रकार डोळ्या समोर येतात, आढळतात. काही अनुयायी स्वताच्या स्वकृत्वावर उंबरठे झिझवून कृतीशील पद्धतीने गेली अनेक वर्ष सतत आर्थिक सामाजिक व वैचारिक शैक्षणिक मदत करून विचार समाजाला देत असतात, हे सत्य असते. पण ते सत्य नाकारणारी बांडगुळे समाजात जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे खऱ्या सत्याला नाकारून दुसऱ्यांच्या बुद्धीने, इशाऱ्याने अर्थात स्वताची वैचारिकता कवडी मोल असून देखील त्याच्या व्यक्तिगत घडणाऱ्या जीवनावर बोलणाऱ्याला लिहिणाऱ्या कुटनीती लोकांना बोल घेवडेच म्हणावे लागेल. अर्थात 'दुसऱ्याच्या रंगमंचावर येऊन फुकटचा नाच करून जाणे होय.' अशी उत्पत्ती समाजा मध्ये वाढीस लागली आहे. 'दारू पाजणारा दुसराच, चढते मात्र याच्या अंगात' अशी अवस्था समाजाची झाली आहे बघा.

मित्र हो,
केवळ विचारांचे आकडे बदलतात बुद्धी बदलते, माणसे तीच असतात मग माणसाची बुद्धी तरी कोण बदलवते, मनात निर्माण झालेला अहंकार, 'मी' पणा किंवा स्वत:च्या बुद्धीने न चालता दुसऱ्याच्या बुद्धी वापरणे. त्यामुळेच वाद निर्माण होतात. जर स्वत:ची बुद्धीला पृथ्वी सूर्य - चंद्र या प्रमाणे स्थिरता निर्माण केलीत तर आपल्या येणाऱ्या भवितव्याच्या काळात वैचारिक भूमिका मांडू शकतो. कुणीही व्यक्तिगत द्वेष राग लोभ न ठेवता स्वत:च्या सामर्थ्यावर जीवनात मार्गक्रमण करू शकता.

चंद्र व सूर्य ग्रहण होते काही काळ पृथ्वी त्या दोघा मध्ये येते काही क्षणासाठी अंधार होतो. तो कायमचा राहत नाही ग्रहण सुटले जाते. मात्र आपल्या आजू बाजूला, समाजा मध्ये व्यक्तिगत ग्रहण बरीच लागली आहेत तर कशासाठी वैचारिक विचार समजावून न घेता जसे काय यांच्यावर मोठे आभाळ कोसळले आहे असे यांना वाटते.

मित्र हो,
आभाळ कधी कोसळणार नाही. पृथ्वी आहे तशीच राहणार आहे.नैसर्गिक कोप झाला तर आभाळी फाटेल क्सुनामी येणारच. मात्र त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपल्यालाच एकत्र यावे लागले यालाच सामाजिक भान, बांधिलकी म्हणतात. म्हणून कधी तरी ऐकले असेल काय तो मुलगा खुनी निघाला याच्यावर आई वडिलांनी काय संस्कार वैगरे केले की नाही. पण तिने ठासून संस्कार केलेलं असतात. मात्र दुसऱ्याच्या वाईट बुद्धीने दुसऱ्याच्या इशाऱ्याने कुट नितीत अडकलेला जातो आणि तो अस्सल गुन्हगार होतो. म्हणूनच दुसऱ्याने किती ही तुमच्या वर मानसिक दबाव आमिष दाखविले तरी त्याला बळी न पडता स्वत:च्या बुद्धीने वागा. वैचारिकता जोपासा. व्यक्तिगत कोणाच्या जीवनात बोलण्याचा लिहिण्याचा प्रयत्न करू नका. नुकसान अर्थात स्वतःच आहे. विचारांना विवेकतेने अर्थात वैचारिक सक्षम करून उत्तर देणे म्हणजेच स्वत:च्या बुद्धीचा वापर करणे. तरच आपली बुद्धी आपण स्थिर ठेवू माणसाचे चेहरे वेगवेगळे असतातच मात्र खोटे मुखवटे घातले तर आयुष्याची वाट अधिक बिकट होते हे विसरून चालणार नाही. म्हणून आपल्याला पृथ्वी, चंद्र, सुर्य आणि आई यांच्या प्रमाणे सृष्टीवर विचाराचे नवीन दालन निर्माण करून केवळ वर्षाचे आकडे बदलतात यावर विसंबून न राहता स्वता आईने पृथ्वीवर, भूमीवर एकदाच जन्म दिलेल्या आयुष्याचे सोनेरी पान लिहून ठेवा. तेच पान इतिहासात जोपर्यंत चंद्र, सूर्य, तारे आहेत तो पर्यंत ते वर्षानुवर्ष टिकून राहील आणि येणारा प्रत्येक दिवस हा नवीन दिवसच आहे. तो सोन्याचा दिवस आहे. असे समजूनच जीवनाचा प्रवास चालू ठेवा आयुष्याला वर्षाच्या आकड्यात न मोजता, न सीमित करता प्रकाशाकडे पहात रहा. अंधार जाणवणारच नाही. हेच खरे आयुष्याचे सौंदर्य आहे. कदाचित आपल्या आयुष्यात असे घडविले नाही तर केवळ आकडे म्हणून पाहणाऱ्यांना व संधी साधू लोकांना ३१ डिसेंबर म्हणजे हातात मध्याचा ग्लास नाकातून सिगरेटचा धुंवा! "पिनेवालों को पिणे का बहाणा चाहिये" अशी आपली अवस्था होणार आहे. याचा अर्थ वर्षभर चांगले विचार करावयाचे आणि कुणी तरी कान भरले, कुणी तरी सांगितले म्हणून वैचारिक विचार न करता व्यक्तिगत पातळीवर येऊन नाहक चिखलफेक करायची व स्वत: कुणी तरी आहे या भ्रमात राहून वावर करायचा अशा समाजात वृतीत वाढ होत आहे. केवळ बहाण्याने किंवा कुणी सांगितले म्हणून काम न करता स्वतःला कृतीशील बनवा जीवनात अनेक क्षितिजे पार कराल. तरच आईने जन्म दिल्याचे खरे सार्थक होईल.

अखेर या वर्षाची सांगता, निरोप देताना काही संकल्प करूनच नवीन वर्षात प्रवेश कराल अशी सदिच्छा व शुभेच्छा व्यक्त करून या वर्षातील आकडे बदलून नवीन आकड्यात जात असताना नवीन संकल्प अर्थात बौद्ध धम्माचे अनुसरण करणे आहे. पंचशिल पैकी "सुरामेरय मज्ज पमादठांना वेरमणी सिक्खापद समादियामी " याचं पालन करण म्हणजेच स्वतःला शुद्ध बुद्ध होणं होय!

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
राजेश सावंत (लेखक, कवी, युवा मार्गदर्शक)
"आसरा एज्युकेशन आणि सामाजिक संस्था"

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

● १ जानेवारी अर्थात वर्षाची सुरुवात

● १ जानेवारी अर्थात वर्षाची सुरुवात

नाग वंशियांच्या पराक्रमाने, वीरतेने नव वर्ष सुरु होते. भीमा - कोरेगाव चा संग्राम याची साक्ष आहे. नागांच्या अतुलनीय शौर्याने "महा - अरी" च्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या पेशव्यांचे राज्य धुळीस मिळविले. केवळ ५०० महार सैनिकांनी ३० हजार पेशव्यांच्या सैन्यास पराजित केले. या युद्धात आवश्यकते पेक्षा जास्त दारु गोळा खर्ची घातला म्हणून ब्रिटीश अधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात शेरे लिहिले. काय कारण असावे? एका गोळीने शत्रू मेला तरी त्याचे धूड गोळ्यांनी छलनी करण्याचे कृत्य महार सैनिकांनी केले.

शेकडो वर्षाचा हा असंतोष, कंबरेला लावलेल्या बोराट्याच्या झाडूची जखम आणि गळ्यातील मडक्यांचा भार क्रोधाग्नी बनून बंदुकीच्या फैरीतून झडला. एका पराक्रमी वंशाचा हा अपमान ज्वालामुखी बनून बाहेर आला. नाग हे आर्यांचे कट्टर शत्रू होते. आर्यांशी लढे देताना ते परागंदा झालेत. गौतम बुद्धांच्या समतावादी धम्मामुळे जे सामाजिक बदल घडले त्यामुळे पुनःश्च नाग वंशीय लोक राजे झालेत. या नागांनीच बुद्धाच्या तत्त्वांचा प्रचार प्रसार केला.

शिशु नाग ते बृहद्रथ असा हा प्रवास आहे. पुष्यमित्र श्रुंग या सामवेदी ब्राह्मणाने धोक्याने बृहद्रथ या सम्राट अशोकाच्या वंशजाचा खून केला आणि आपले ब्राह्मणी राज्य स्थापित केले. त्याच्याच काळात मनुस्मृती लिहून शस्त्राच्या जोरावर कायम करण्यात आली. या मनुस्मृती आणि ब्राह्मणी आतंकवादाने पूर्वाश्रमीच्या बौद्धांना अस्पृश्यतेच्या खाईत ढकलले. मात्र महार जी जात नसून एक लढवय्या वंश होता त्याचे रक्त गोठणार थोडीच होते? अनेक अस्पृश्य जाती, वीरांच्या वंशावळीतील होत्या. नागनाक या "महा - अरी" ने वैराटगड जिंकून दिला. तर शिदनाकाने खर्ड्याच्या लढाईत परशुराम भाऊ पटवर्धन यांचा पठाणाच्या हल्ल्यातून जीव वाचविला आणि पेशवाईला जीवदान दिले.

रायनाकाने बाजीप्रभू सारखी खिंड लढविली. विठू महाराने दामाजी पंताचे ब्रिटीशां कडील देणे चुकता केले. १७९६ ला स्थापित झालेल्या महारांच्या फौजेने १ जानेवारी १८१८ ला इतिहास घडविला आणि एका नव्या युगाचा प्रारंभ झाला. पुन्हा उच्चजातीच्या मुखंडांनी ब्रिटीशांकडे कागाळ्या करून महारांची सैन्यभरती थांबविली. मात्र अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ब्रिटिशांना निवेदने देवून भरती सुरु करायला बाध्य केले. त्यात गोपाल बाबा वलंगकर यांचा मोठा वाटा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण ताकदीने या प्रश्नास रेटले आणि १ जानेवारी १९४६ ला महार रेजिमेंटचा उदय झाला. वर्षभरातच भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस जम्मू काश्मीरच्या भूमीवर महार सैनिकांनी जो पराक्रम केला त्याला इतिहासात तोड नाही . झान्गुर आणि नौशेरा येथे रावू कांबळे आणि बारक्या कांबळे यांनी ६००० पाकी सैनिकांना थोपवून अनेक भारतीय सैनिकांना बाहेर काढले. यावेळी रावू आणि बारक्या यांच्या गर्दनी तुटून पडल्या तरी त्यांची मशीन गन गर्दानी शिवाय ५ ते ७ सेकंद सुरूच होती. या धुमश्चक्रीत १० वीर कामी आले त्याचा बदला नाईक कृष्णा सोनावणे यांनी घेतला. इतर सैनिकांच्या मदतीने एकट्या सोनावणे यांनी "जयभीम" च्या जयघोषात १००० शत्रूंचा खात्मा केला.

महार रेजिमेंट च्या पाच वीरांना वीरचक्र प्रदान करण्यात आले. पहिले महावीर चक्र नाईक कृष्णा सोनावणे यांना मिळाले. ३ लाख मुस्लिमांना पाकिस्तानात सुखरूप पोहचविण्याचे काम महार रेजिमेंटने पार पाडले. असे हे वीर म्हणूनच आंबेडकरी आंदोलकांच्या धमन्यातून गर्जना करीत असतात. आज ही ...मग ते नामांतर आंदोलन असो कि खैरलांजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या पूर्वजांचा गौरवांकित इतिहास सांगून आपल्या लोकांच्या शुरतेला जागे करायचे आणि त्यांच्या हिंमतीला उर्जा द्यायचे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर उत्तर भारत अस्पृश्य वीरांच्या ऐतिहासिक नोंदींनी बद्द आहे. पंजाब मध्ये शिखांचे नववे गुरु तेगबहादूर यांना जेव्हा औरंगजेबाने कैदेत टाकून त्यांचे शीर कलम केले आणि त्यांचे तुकडे करून किल्ल्याच्या चारी बाजूला लटकावून गिधाडांना खाण्यासाठी ठेवायचे असा मनसुबा रचला तेव्हा मणि सिंग या अस्पृश्य वीराने स्वत:च्या मुलाला तलवार चालवायला सांगून आपले धड व शीर तिथे ठेवून गुरुचे शीर व धड न्यायला सांगितले. अशा तऱ्हेने गुरुसाठी बलिदान देणाऱ्या मनिसिंगचे नाव शीखांमध्ये आज आदराने घेतले जाते.

आज पंचप्यारे यांना अवघा शीख समाज गुरुस्थानी मानतो. शिखांचे १० वे आणि अंतिम गुरु गोविंद सिंग यांनी पाच तरुणांच्या हिमतीची परीक्षा घेतली आणि जे प्रत्यक्ष मरायला तयार झालेत त्यात तीन तरुण अस्पृश्य होते. पहिल्या पंचप्यारयात धर्म सिंग, दया सिंग , साहेब सिंग अस्पृश्य बंदे होते. झलकारी देवी ते फुलन देवी या सर्व वीरांगना होत्या. या देशातील तमाम अत्याचाराच्या विरोधात महाराष्ट्रातून आवाज उठतो. पिप्रा / बेल्छी / पारस्बिघा / नारायणपूर / अरवल / देवलीतील अत्याचार असो की दक्षिण भारतातील मीनाक्षीपुरम असो, बौद्ध समाजाने सदैव आंदोलनातून या अत्याचाराला धिक्कारले आहे. प्रत्येक वेळेस बौद्ध समाजाची परीक्षा घेण्याचे काम राज्यकर्ते करतात आणि अशा आंदोलनात गुंतवून आपली प्रगती रोखण्याचे षड्यंत्र रचतात. त्यास रोखठोक उत्तर देण्याचे काम आपण आता केले पाहिजे. नागवंशी शुरांनी आता बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय उच्चावस्था गाठली पाहिजे. भारिप - बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कडे विजन आहे, दांडगा अभ्यास व राजकीय शहाणपणा आहे. आंबेडकरी निष्ठा व पारदर्शकता आहे. आंबेडकरी घराण्याचा वारसा आहे त्यांना सर्वांनी पाठबळ दिले पाहिजे. प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांचा त्याग आणि लढाऊ वृत्ती चळवळीस ठावूक आहे. त्यांनी बाळासाहेबांना सहयोग केला पाहिजे.

आज ही ते दमदारपणे सामाजिक लढे लढू शकतात. रामदास आठवले कार्यकर्त्यांच्या अडचणी समजणारे व त्यांच्याशी मिळून मिसळून राहणारे म्हणून त्यांची छवि आहे. एक कुशल संघटक म्हणून ते चळवळीच्या पाठीशी उभे राहिले तर चमत्कारिक निकाल बाहेर येईल. बसपा ही काही आपली शत्रू नाही. प्रत्येकाचे आपले पवित्रे असतात. बसपा कडे प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज आहे आणि पैसा ही आहे. कल्पना शक्ती आणि व्यूह रचना करणारी डोकी आहेत. त्यांनी सर्व हात हातात घेवून हजारो वर्षापासून आमच्या शरीराला गुंडाळलेली शृंखला तोडण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे.

काय रिपब्लिकन - बहुजन आघाडी होऊ शकत नाही. ते एक येतात - बजरंग दल, आर एस एस, विश्व हिंदू परिषद, श्री राम सेना, हिंदू महासभा, हिंदु सेना, अभिनव भारत, हिंदू जन जागरण मंच, भामसं, पतितपावन संघटना, दुर्गा वाहिनी, राष्ट्र सेविका समिती, भाजपा, शिवसेना आणि अशा शेकडो संघटना एकच छत्राखाली आहेत. आपण का नाही? आपल्या पूर्वजांच्या शिशु नाग, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोकाची राजछत्रे सांभाळण्यासाठी सज्ज व्हा. उठ सुठ कुणी ही आपणास डिवचतो, अन्याय करतो, अत्याचार करतो, हिणवितो, षडयंत्रे रचून आपल्या अधिकार्यांना पोलिस प्रकरणात अडकवितो, समस्त जणांना भ्रष्टाचारी म्हणतो. आपण मुठभर क्षेत्रात आहोत. मिडिया, चित्रपट, खेळ, लष्कर अधिकारी, उद्योग, शेती येथे आपला नन्नाचा पाढा आहे. या क्षेत्रांचा मार्ग, राजमार्गा वरूनच जातो. आपण मुठभर नाही फक्त आपली पाच बोटांची मुठ बनण्याचीच तेवढी देरी आहे.

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

• पेशवाईचा अंत करणाऱ्या त्या शुरविरांना, पूर्वजांना त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ।

अभिवादक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

साभार -
Buddhism - Ambedkarism Blog

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
WWW.Facebook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
WWW.Facebook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
WWW.Facebook.Com/UatinJadhaV789456123

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

● मी भिमा कोरेगावचा विजय स्तंभ बोलतोय...

● मी भिमा कोरेगावचा "विजय स्तंभ" बोलतोय...

उद्या १ जानेवारी म्हणजेच आपला ‘शौर्य दिन’! ऐका बाळानो त्या शौर्य पराक्रमाची गाथा कधी वाचले नसेल तर वाचा आणि वाचायला लावा.

भिमा कोरेगावच्या महासंग्रामात फक्त पाचशे महारांनी पंचवीस हजार पेशव्यांना कापून काढले. त्यांना मानवंदना देण्यासाठी बाबासाहेब ही भीमा कोरेगाव पुणे येथे नेहमी यायचे! आपण ही या शौर्य दिनी विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी भीमा कोरेगावला यायला हवे. महारांचा इतिहास म्हंटल कि आपल्याला वाटेल यांना कसला आलाय पराक्रमी इतिहास, पण महारांचा इतिहास म्हणजे कुण्या येड्या गबाळ्याचा इतिहास नसून तो शूर योद्ध्यांचा इतिहास आहे हे आपल्याला इतिहासात डोकावल्या वर कळते.

चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला ‘खुश्रु खान’ च्या नावाला भारताच्या इतिहासात विशेष महत्व आहे कारण खुश्रु खान हा खालच्या अस्पृश्य जातीतील ‘परवारी’ म्हणजेच महार होता. (परवारी या शब्दाचा अर्थ समजण्यासाठी क्रांतीबा फुले यांचा गुलामगिरी हा ग्रंथ वाचवा ज्यांनी वाचला आहे त्यांना समजने सोपे जाईल) गुजरात मध्ये महारांना ‘धेड’ म्हणतात. महाराष्ट्रात ही हा शब्द प्रचलित आहे. महाराष्ट्रातील पोट जातीत धेड हि पोट जात आहे, पण हा शब्द जाती वाचक शिवी म्हणूनच जास्त वापरला जातो. खुद्द मला ही ठाकर या समाजा कडून ‘ये धेडपटा’ या शिवीचा मार पडला आहे, तो गमतीदार किस्सा मी नंतर कधी तरी पोस्ट करून आपल्याला सांगेल. तर आपण पाहत होतो खुश्रु खान! तर हाच ‘परवारी’ महार या महार बहाद्दराने मुस्लीम धर्माचा स्वीकार केला होता पण मुस्लीम धर्म स्वीकारण्यामागे त्याची महत्वाकांक्षा काही लहान नव्हती. बौद्धांच्या कात्तलींचा REVENGE म्हणजे बदला, सूड घेण्यासाठी हा धर्म स्वीकार केला होता. धर्मांतर केल्यावर त्याने ‘खुश्रु खान’ हे नाव धारण केले.

इ. स. १४ व्या शतकाच्या दुसऱ्या दशकातला हा काळ होता. त्यावेळी दिल्लीच्या गादी वर ‘मुबारक’ नामक तुर्क सुलतान राज्य करीत होता त्याच्या पदरी हा खुश्रु खान हा सरदार होता त्याच्या महात्वकांक्षेच्या पोटात धगधगते ध्येय ही होते. THE SULTANATE OF DELHI या ग्रंथात (पुण्यातील रामकृष्ण मठ येथे हा ग्रंथ उपलब्ध आहे आपण वाचू शकता) डॉ. ए. सी. श्री वास्तव म्हणतात - “आपल्याला दिल्लीची गादी हस्तगत करायची तर आपल्या जवळ सैन्य पाहिजे हे खुश्रु खानाने जाणले होते त्यासाठी त्याने आपले राजे मुबारक याची ४०,००० घोडदळ सैन्य आपल्याच परवारी म्हणजेच महार व खालच्या जातीचे उभारण्याची परवानगी मागितली मुबारक सुलतानने तशी परवानगी दिली. त्यानंतर खुश्रु खानने आपले नातेवाईक व मित्रांना राज वाड्यात प्रवेशची परवानगी मागितली त्याप्रमाणे परवानगी मिळाली. पुढे एकदा सुलतान मुबारक याच्या तातडीच्या मुलाखतीची राज वाड्यातील दरबारात परवानगी मागितली, तीदेखील सुलतान मुबारक याने मान्य केली आणि ता. १४ एप्रिल १३२० या दिवशी खुश्रुखानचा कट पक्का झाला. त्याच दैवाशी त्याचे सैन्य राज वाड्यात घुसले व त्यांनी राज वाड्यातील सुरक्षा शिपाई यांना कापून काढले. लगेचच खुश्रु खानचे सहकारी चेले लोक मुबारक च्या राज महालात पोहचले. त्यांना पाहून सुलतान मुबारक घाबरला आणि तो राज वाड्यातील राणीकडे पळाला परंतु खुश्रु खानाने त्याला पकडले व लगेचच त्याला भोकसून ठार केले मुबारक याचे मस्तक धडापासून वेगळे केले व ते खाली कोर्ट दरबारात फेकून दिले. याच मुस्लीम, अरब, तुर्क सुलतानांनी अशीच बौद्ध - भिक्खूंची मुंडकी धडापासून वेगळी करून अशा मुंडक्यांच्या माळा लावल्याची वर्णने बौद्धांच्या इतिसात आपण पाहू शकता. त्याच पद्धतीने खुश्रु खानाने मुबारकचा सूड घेतला. (JOURNAL OF THE BUDDHIST TEXT SOCIETY VOL. 1 PART - II यात आपण वाचू शकता बौद्धांवरील अत्याचाराची परिसीमा वाचू शकता.) मराठी वाचकांनी बौद्ध पर्व हा ग्रंथ वाचवा!

पुढे त्याने ‘नश्रुद्दिन खुश्राव शहा’ नाव धारण करून तो दिल्लीच्या तक्तावर १४/४/१३२० ला बसला पुढील इतिहास स्पष्ट करण्यासाठी मी एक छोटे खानी पुस्तक लिहून लवकरच प्रकाशित करेन! ज्यांना कुणाला खुश्रु खान हा पर्वरी महार होता हे जाणून घ्यायचे असेल त्यांनी प्रो. अजीज अहमद यांचे ‘Studies in Islamic Culture in The Indian Environment’ हा ग्रंथ वाचवा यामध्ये ते म्हणतात - "One of The Most Curious Forming Hindu Resurquce Against The Muslim Rule Took Was The Usurpation and Apostacy, Khusru khan in 1320 AD. He Was Low Caste Parawari from Gujarat Community Also Known as Mahar or By More Reviling Appelation Dhed“ वरील नमूद केलेली सर्व ग्रंथ संपदा हि पुणे येथील ‘रामकृष्ण मठ’ येथिल ग्रंथालयात उपलब्ध आहे. नाहीतर आपण ऑनलाईन खरेदी ही करू शकता.

महारांच्या शौर्याचा इतिहास जाणून घ्या आणि आता तलवारी नव्हे पेन हातात घ्या आणि छाटा अन्याय, अत्याचारांचे, विषमतेचे मुंडके!

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

• पेशवाईचा अंत करणाऱ्या त्या शुरविरांना, पूर्वजांना त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ।

अभिवादक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

साभार -
Buddhism - Ambedkarism Blog

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
WWW.Facebook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
WWW.Facebook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
WWW.Facebook.Com/UatinJadhaV789456123

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

● माणुसकी मिळवण्या करीता झालेले युद्ध : भिमा कोरेगाव

● माणुसकी मिळवण्या करीता झालेले युद्ध : भिमा कोरेगाव

"मराठा क्रांती मोर्चा" च्या पार्श्वभूमी वर माझ्या एक मराठा मित्राच्या मोबाईल वर आलेला एक मॅसेज मला त्याने वाचायला दिला, २२ ते २५ वयाच्या एका मुलीने तो मॅसेज पोस्ट केला होता, त्यामध्ये तिने असे मत मांडले होते की, नेहमी भीमा कोरेगावच्या विजयाने छाती फुगविणाऱ्याचा खऱ्या मर्द मराठ्यांशी सामना न झाल्यामुळे व्यर्थ अभिमान बाळगत आहात, ५६ इंची छाती नसलेले सुद्धा अश्याच प्रकारची मते कधी सोशल मीडियात तर कधी खाजगी चर्चेत सुद्धा मांडतात ते केवळ मराठा समाज्या त जन्मले या गर्वा मुळेच,आपल्या समाज्याच्या उजवल जाज्वल्य इतिहासाचा अभिमान प्रत्येकाने जरूर बाळगावा पण गर्व मात्र बाळगू नये, कारण गर्व होत्याचे नव्हते करते, याची इतिहासात अनेक उदाहरणे आहेत आणि भीमा कोरेगाव सुद्धा त्याचीच पुनरावृत्ती म्हणायला हवी, भीमा कोरेगावचा रण संग्राम नेमका का आणि कश्यासाठी घडला? त्यास जबाबदार कोण? इतदेशीय जुलमी सत्ता उलठविण्यास कोण जबाबदार? धर्माने आंधळे झालेले पेशवे की पेशव्यांच्या बेबंद शाहीला पायबंद घालण्यास असमर्थ ठरलेले शिव छत्रपतींचे साताऱ्याचे राज घराणे की पेशवाही चा अस्त करणारे ते स्वाभिमानी ५९९ महार सैनिक? आज तरी याचा गंभीरपणे विचार होणार की नाही? खरा प्रश्न हाच आहे, आता तरी आम्ही जात पात सोडून माणूस म्हणून जगणार की जनावर सारखेच वागणार? काय आहे हा समर माझ्या अल्प माहिती नुसार असा,

दिनांक १ फेब्रुवारी १६८९ रोजी संभाजी महाराज यांना इथल्या धर्म अभिमान्यांनी घरभेदीच्या सहाय्याने रत्नागिरी जिल्यातील सँगमेश्वर तालुक्यातील कसबा यागावी औरंगजेब बादशहाच्या सरदार मुकरबाद आणि त्याचा मुलगा इखलास खान याने कैद केली, तर दिनांक ११ मार्च १६८९ रोजी छत्रपती संभाजी महाराज्यांच्या हत्या हिंदू धर्म शास्त्र मनुस्मृती नुसार भीमा कोरेगाव परिसरात करण्यात आली, शंभु राजे जवळ जवळ १ महिना ११ दिवस औरंगजेब च्या कैदेत होते, ते ही मराठ्यांच्या महाराष्ट्रात, पण एक ही मर्द मराठा शिव पुत्रास सोडवण्याचे धाडस करू शकला नाही, एव्हडेच काय शंभू राजाच्या हत्ये नंतर त्यांच्या छिन्न विछिन्न देहाला अग्नी द्यायला एकही मराठा कुणबी तेली माळी सोनार कुंभार अथवा कोणी पंडित पुढे आला नाही, वडूज गावच्या महारानी या रण धुरंधर शिवबाच्या सुपुत्राच्या शरीरास जोडून मुखाग्नी दिला, का महारांना बादशहाची भीती नाही वाटली जी मराठ्यांना वाटली, आज ही छत्रपती संभाजी महाराज्यांची समाधी  वडूजच्या महार वाड्यातच आहे, तर जिजाऊचा वाडा पचाडच्या महार वाड्याच्या मधेच आहे, काय हा योगा योग म्हणायचा की रक्ताचे नाते म्हणायचे?

संभाजी महाराज्यांच्या हत्ये नंतर मराठी साम्राज्य श्री वर्धनच्या मनुस्मृती ग्रस्त ब्राह्मणांच्या हातात गेले, त्याचीच औलाद दुसरा बाजीराव, सून १८१७ साली ब्रिटिश आणि पेशव्यांचे संबंध विकोपाला गेले, आणि बाजीरावाने युद्धाची तयारी सुरु केली, पेशव्याच्या बाजूने निपणकर अक्कल कोटवाले भोसले, निबालकर, घोरपडे, जाधव, विचुरकर, राजे बहाद्दूर, भोईटे, पुरंदरे छोटे मोठे सरदार आणि सातारचे छत्रपतींचे राज घराणे, या फोजेचा सेनापती होता बापू गोखले,

मराठा साम्राज्य आणि ब्रिटिश्या मधील विकोपाला गेलेले संबंध पाहून युद्ध कधी ही होईल तेंव्हा आपण ही आपला पराक्रम शिव राज्यासाठी खर्ची घालावा आणि इथे ठाण मांडून बसलेल्या गोऱ्यास कायमचे हाकलून देऊया, या उदात्त भावनेने शिवाजी संभाजी महाराज्यांच्या मराठे शाहितल्या सरदार शिदनाक महार यांचा नातू शिदनाक महार ज्याने खरड्याच्या लढाईत अप्रतिम पराक्रम गाजविला होता, पठाणांच्या तावडीत सापडलेल्या मराठा सरदार भाऊ पटवर्धन याचे रक्षण करून हरणारी मराठी सेने स विजय मिळवून दिला होता असा हा शूर सरदार महार जातीतल्या अन्य सरदारास घेऊन दुसऱ्या बाजीराव पेशव्यास भेटून आम्ही महार सरदार तुमच्या बाजूने ब्रिटिशा विरुद्ध लढाईत उतरू इच्छितो, तुम्ही आम्ही सारे एकत्र येऊन ब्रिटिशाला हाकलून लावु या, आम्हांला इंग्रजांच्या बाजूने लढायचे नाही, परन्तु माय बाप तुमच्या लष्करात आणि राज्यात आमच्या महार जातीचे स्थान काय राहणार? आमच्या गळ्यातील मडके कंबरेचा झाडू खांद्या वरच्या घोंगडी आणि हातातील घुंगराची काठी नष्ट करणार काय? आम्हांला माणसा सारखी वागणूक मिळणार काय? काय मागितले शिदनाक महार? फक्त माणुसकी! पण आमच्या राज्याच्या राज्यास आपल्या बापाची जागिरदारी समजणाऱ्या या उन्मत घमड खोर आणि मनुस्मृतींनी आंधळ्या झालेल्या या मूर्ख  बाजीरावाने तिरस्काराने जबाब दिला, सुईच्या अग्रावर थरथरत रहाणाऱ्या धुळीच्या कणा एव्हडी ही स्थान तुम्हां महारास माझ्या राज्यात रहाणार नाही, तुम्ही आमच्या बाजूने जरी लढळात तरी ही तुम्हाला तुमच्या पायरी वरच राहावे लागेल, ब्राह्मण धर्मात कोणताच बदल घडणार नाही, हे पक्के ध्यानात धरावे, तुमची आम्हाला गरज नाही आणि जर तुम्हांला तुमचे स्थान हवे असेल तर ते मिळूनच दाखवा, बाजीरावाच्या उन्माद उत्तराने शिदनाक महारांच्या तळ पायाची आग मास्तकास भिडली आणि तो योद्धा कडाडले. धर्माचे तत्वज्ञान सांगणाऱ्या भेकडा पुरुषार्थ हाच जर तुझा क्षत्रिय धर्म असेल आणि तुम्ही खरे क्षत्रिय असाल तर आमचा युद्धात पाडाव करून दाखवाच, आज पासून तुमच्या जीवन मरणाच्या सीमा आम्ही ठरवु, असे निर्वाणीचा इशारा देऊन महार सरदार पेशवे दरबारातून बाहेर पडले,

१९ ऑक्टोंबर १८१७ ला विजया दशमीच्या मुहूर्त साधून पेशव्यांचे सैन्य जमा झाले, २९ ऑक्टोबर १८१७ ला बापू गोखल्याने मूळा मुठा नदीच्या बेटावर हल्ला केला बेट लुटून  जाळण्यात आले, ३० ऑक्टोबर गणेश खिंडीवर पेशव्याने हल्ला केला, दिनांक ५ नोव्हेंबर १८१७ रोजी खडकीच्या युद्धास सुरुवात झाली, मात्र पेशव्यास यशाने हुलकावणी दिली, तर दिनांक ६ नोव्हेंबर १८१७ रोजी केवळ २०० (दोनशे) सैनिकांच्या बळावर आणि पेशव्याचा फितूर ब्राह्मण बालाजी नाथू च्या मदतीने झुलमी शनिवार वाड्या वरचा भगवा उतरवून त्या ठिकाणी गोऱ्यांचा युनियन जॅक फडकविण्यात आला, कोणी मदत केली बालाजी नाथू, कश्यासाठी? स्वतःच्या फायद्यासाठी, शिदनाक महार काय मागत होता? फक्त माणुसकी! सत्ता जहागिरी नाही, पेशव्याची गादी च गेली आणि बाजीराव माहुलीला पळून गेला, पेशव्याच्या सैन्याची दाना दान उडाली, सेनापती बापू गोखले पेशव्यास येऊन मिळाल्या नंतर गनिमी काव्याने बाजीरावाने पुन्हा एकदा सैन्याची जमवा जमाव करून युद्धाच्या तयारीस लागला, व जे युद्ध झाले ज्यात पेशवाईचा अस्त आणि ब्रिटिश सत्तेचा निरंकुश अंमल ते युद्ध म्हणजेच भीमा कोरेगावचे महार सैनिकांच्या महान विजयाची शौर्य गाथा होय !

ब्रिगेडियर जनरल स्मिथच्या सैन्यास झुकांड्या देत बाजीरावने ३०००० घोड दल १३८०० पाय दल घेऊन श्रीमंत बाजीराव पुण्यापासून ८ कोसावर असलेल्या फुल गावला दिनांक ३० डिसेंबर १८१७ रोजी दाखल झाला, सदरची खबर पुण्याच्या बंदोबस्त सांभाळणाऱ्या कर्नल बार्टला समजली, परन्तु त्याच्या जवळ पुरेसे सैन्य बळ नसल्यामुळे त्याने सातारा शिरूर छावणीला "लाखोटा" पाठवुन मदत मागितली, कर्नल बार्टने पाठविलेला "लखोटा" लेफ्टनंट कर्नल फिल्समन ने वाचून या कामासाठी कार्य कुशल साहसी, हमखास विजय मिळवून देणारी ज्यामध्ये महार जातीचे सैनिक मोठ्या प्रमाणात आहे अशी सैन्य तुकडी, ज्या महारांची पेशव्याशी असलेले हाड वैर या गोऱ्या अधिकाऱ्यास चांगले ठाऊक होते, त्याने त्याच  "बॉंबे नेटिव्ह इन्फंट्री सेकण्ड बटालियन फर्स्ट रेजिमेंट" ची ताबडतोब निवड करून कॅप्टन स्टोनटनाला ५०० महार सैनिक २७० घोडेस्वार तोफा ओढणारी २५ माणसे आणि २ तोफा चालविणारे असा विषम मानवी बळ देऊन पेशवे रुपी मृत्यूच्या कराल जबड्यात ढकलले, परंतु त्यास महार सैन्याच्या पराक्रम वर पूर्ण विश्वास होता महार मरतील पण पाठ दाखविणार नाहीत हे त्याला पक्के माहित होते,

महार सैनिक २५ किलो मीटरचा प्रवास करून दिनांक १ जानेवारी १८१८ रोजी सकाळी ८ वाजता कोरेगाव या ठिकाणी पोचले, भीमा नदीच्या पैल तीरावर दुसरा बाजीराव जातीने ३०००० पेक्षा जास्त शस्त्र सज्ज फौजे सह युद्धास तयारच होता, त्याचा यावेळी ही सरदार होता बापू गोखले, तर सैन्यात मात्तबर होळकर जाधव, गायकवाड, विंचूरकर  पुरंदरे भोसले सातारचे भोसले, निंबाळकर घोरपडे इत्यादी दिनांक १ जानेवारी १८१८ रोजी कॅप्टन स्टोनटनालाने पूर्ण कोरेगाव आपल्या ताब्यात घेतले मात्र कोरे गावातील गढी आणि धर्म शाळा मात्र ताब्यात न घेतल्याचा परिणाम हि त्याच्या सैन्यास भोगावा लागला, सकाळी १० वाजता पेशव्यांनी आक्रमण केले, पेशव्यांच्या सेनापतीस ब्रिटिशांच्या अल्प सैन्याची पुरेपूर कल्पना होती आणि स्वतःच्या बलाढ्य  सैन्या बद्दल फाजील आत्म विश्वासाच्या जोरावर त्याने चढाई केली, ५०० महार सैनिकांनी सतत ४ तास गोळ्यांचा पाऊस पाडून पेशवे सैनिकांची दाना दान उडवली, तर ब्रिटिश तोफ सांभाळणाऱ्या लेफ्टनंट चिशोल्माने तोफांचा भडीमार करून विरोधी सैन्याचे प्रचंड नुकसान केले, स्वतः बाजीराव तोफेच्या जबरदस्त हदर्याने त्याच्या पाया खालची जमीन सरकली व पायांना कंप सुटला, बाजीरावाच्या सैन्याच्या होत असलेली वाताहत थांबविण्यासाठी सेनापती बापू गोखले आणि विंचूरकर यांनी ब्रिटिश सैन्याच्या पिछाडीने कोरेगावात प्रवेश करून धर्म शाळा ताब्यात घेतली, परन्तु ती पुन्हा महार सैनिकांनी ताब्यात घेतली, दरम्यान पेशव्यांच्या सैन्याने तोफ चालविणाऱ्या लेफ्टनंट चिशोल्मास एकटे गाठून त्याचे शीर धडपासून छाटून भाल्याच्या टोकावर नाचवत  "मारला... मारला... तोफ वाला मारला"असा उन्माद करीत भीमेचे पात्रं ओलांडून हात घाईवर आले, दरम्यान ब्रिटिश सैनिकांच्या गोळ्या सुद्धा संपल्या होत्या, त्याच बरोबर बाजीरावाच्या सैन्याने कोरेगावतील गादीवर कब्जा केला होता, तिथून जबरदस्त मारा सुरु होता, पेशव्यांचा भडीमराने ब्रिटिश अधिकारी भांबावून गेले, काही अधिकारी कॅप्टन स्टोनटनाला माघार घेण्यासाठी विनवण्या करू लागले, तेव्हा महार सैनिकांनी त्या अधिकाऱ्यांची कान उघडणी करून कॅप्टन स्टोनटनाला निर्वाणीचा शब्दात सांगितले,  ज्यांना जीवाची भीती आहे त्यांनी खुशाल रणातून माघार घ्यावी, परन्तु आम्ही महार सैनिक पेशव्यां सोबत लढूनच मरू मात्र मरणा पूर्वी माघार घेणार नाही, महार सैन्याच्या दृढ निश्चयाने कॅप्टन स्टोनन ला बळ चढले आणि आता बंदुकी सोडून तलवारीला तलवारी भिडल्या, महार सैन्याने आपल्या कुशाग्र बुद्धीने वेग वेगळ्या लढाऊ रचना रचून बाजीरावाच्या सैन्यास जेरीस आणले, पोटात ना होते अन्न ना पाणी समोर होते बलाढ्य शत्रू जे तुला माणुसकी नाकारत होते, एक तर मर अथवा मारून जग, असा त्या महार सैनिकास त्याचे मन बजावीत होते, भीमेच्या पैल तिरा वरून बाजीराव युद्ध पाहत होता, तर आकाशातील सूर्य भास्कर आपल्या शहत्र धारांनी त्या वीर पुरुषांना चेतवत होता, त्याने एका स्त्रीसाठी झालेले राम रावण युद्ध पहिले होते, सत्तेसाठी कौरव पांडवांना कोंबड्या सारखे भांडताना पहिले होते, परंतु हे युद्ध ना राज, गादीसाठी होते, ना स्वर्ग प्राप्तीसाठी होते, हे युद्ध होते माणूस म्हणून जगण्यासाठीचे, दिनकर ही खुश होता, नेहमी पेक्षा जरा जास्तच आग ओकत होता, ज्यात महालातील गोरी चामडी भाजून निघत होती तर दुसऱ्या बाजूने महारांची वर्मी घाव पडत होते, महारांच्या मजबूत आणि दणकट हातातील तलवारीचे घाव झेलता झेलता पेशव्याची सेना मेटाकुटीस आली,  लढाईचे पालटणारे स्वरूप आणि नूर बघून बाजीरावाने रण गणातून धूम ठोकली, बाजीरावाचे अनुकरण त्याच्या जीवावर आणि भरवश्यावर अवलंबून असलेल्या आणि जीवाची भीती असणाऱ्यांनी तात्काळ केले, सेनापती बापू गोखल्यांच्या एकुलत्या पुत्राच्या गोविंद बाबाची तुकडी त्याला युध्दात एकट्याला सोडून जिवाच्या आकांताने पळत सुटली, मात्र तश्या हि परिस्थितीत गोविंद बाबा तलवार गाजवीत होता, त्याची महार सैनिक सोन नाकाशी पडली, मदमस्त हत्ती प्रमाणे एक दुसऱ्यावर चालून गेले, परंतु सोननाक महारांच्या जबरदस्त तलवारीचा पहिलाच घाव गोविंद बाबाला चुकवता आला नाही, उजव्या अंगावर घाव झेलीत पुन्हा चढाई करण्याचा प्रयत्न असफल ठरला, सोनानाकाच्या दुसऱ्या घावसरशी गोविंद बाबा "आई ग..." अशी आर्त किंकाळी फोडून भीमेच्या किनाऱ्या वरील मातीत मिसळला, एक एक महार सैनिक ५६, ५६ पेशव्यांच्या सैनिकाला कापून काढीत होता, सेनापती बापू गोखल्यांल त्याचा तारणा ताठा एकुलता एक पुत्र युद्ध भूमीवर बेवारस पडल्याचे समजताच त्याच्या सर्वांगास कंप सुटला, तो धीपाड योद्धा आपल्या लेकरास शोधीत युद्ध भूमीचाच पडू लागला, भीमेच्या तटावर त्याला त्याच्या पुत्राचे कलेवर सापडल्या वर तो शूर सेनापती मूक आक्रोश करू लागला, इतक्यात त्याच्या खांदयावर कुणाचा तरी हात पडला, मान वर करून पाहिले असता तो विंचूरकर सरदार होता, विंचूरकर धीर गंभीर आवाजात म्हणाला उठा सेनापती शोक करण्यात अर्थ नाही, खूप मजल मारायची आहे, पुत्राच्या मरणाने बापाचे काळीज फाटले होते, तो शत्रूच्या नारडीचा घोट घेऊ इच्छित होता, पण समयाने कूस बदलली होती, पेशव्याच्या सैन्याला युद्ध भूमीवर महारानी चिरनिद्रेस पाठविले होते, जे मूठभर आपला जीव घेऊन पळाले होते, तेच तेव्हडे वाचले होते, सूड घेऊ पाहणारा सेनापती हतबल होता, विंचुरकरांचा शहाणपणाचा सल्ला शिरोधार्य मानून पेशव्यांचा सेनापती बापू गोखले सुद्धा त्याच्या धण्या प्रमाणे रणभूमी सोडून बाजीरावाच्या मागे चालता झाला, युद्धाचा निकाल लागला होता, ज्या शिदनाक सरदाराने बाजीरावास आव्हान दिले होते, ते त्याच्या शूर वीरांनी बाजीरावास उघड्या डोळ्यांनी पहायला भाग पाडले होते, ज्या भीमा कोरेगावच्या भूमीवर मराठ्यांच्या छत्रपती संभाजी महाराज्याना मनुस्मृती नुसार हाल हाल करून ठार मारण्यात आले होते, त्याचा सुड संभाजीच्या मर्द मराठ्यांना जरी घेता आला नाही तरीही १००,  १२५ वर्षाच्या प्रतिक्षे नंतर अधर्माने माजलेल्या आणि बाप मनूच्या कायद्याने उन्मत, मस्तवाल घमेंड खोर भेकड ब्राह्मण शाही रुपी पेशवाईस छत्रपती शिवाजीच्या खऱ्या मर्द मावळ्यांनी चारी मुंड्या चीत केले होते, हाच वर्मी घाव पेशवाई नायनाट करण्यास कारक ठरला, बाजीराव जे बोलला ते शिव काळ असता बोलला असता काय? शिवबाने त्याची जिभच छाटली असती, पण कर्तृत्ववान महापुरुषांचे वारस तसेच निपजतील असे कोणी ही सांगू शकणार नाही, काही अपवाद असू शकतात हि...

डॉ, बाबासाहेब म्हणायचे - आमचे पूर्वज नक्कीच मेष राशीचे नव्हते, ते सिह जातीचे होते, याची जाण जर नादान बाजीरावास झाली असती तर, सरदार शिदनाकाची माणुसकीची मागणी मान्य केली असती तर... तर खरेच इंग्रज इथे १५० ते २०० वर्ष राज्य करू शकले असते? आम्हाला आमच्या पूर्वजांचा सार्थ अभिमान आहे, गर्व नाही, पण आनंद मात्र नक्कीच नाही, कारण हा देश माझा आहे.

लेख -
अनिल जाधव

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

• पेशवाईचा अंत करणाऱ्या त्या शुरविरांना, पूर्वजांना त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन ।

अभिवादक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
WWW.Facebook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
WWW.Facebook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
WWW.Facebook.Com/UatinJadhaV789456123

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.