● वर्षाची सांगता आणि नवं वर्षात प्रवेश करताना...
"नवीन वर्षाच्या हार्दिक सदिच्छा, शुभेच्छा "असे वर्षाच्या सुरुवातीला एकमेकाला' शुभेच्छा' देताना आपण म्हणतोच बघा.
मित्र हो,
सकाळचा आकाशातून पहाटे उगवणारा सोनेरी किरणांचा सूर्य हा जशा आहे त्याच अवस्थेत उगवतो व मावळतो ही. रात्रीच्या निळ्या नभात शांततेने भ्रमण करणारा चंद्र नेहमी प्रमाणे प्रज्वलित होऊन चांदण्यांच्या पडणाऱ्या सडा मध्ये प्रकाशमय अधिकच दिसत असतो. पृथ्वी वरील नैसर्गिक प्रक्रिया नेहमी प्रमाणे रमणीय प्रेक्षणीय दिसतात. अर्थात आपल्याला कोणताही बदल निसर्गात घडताना होताना उघड्या डोळ्यांनी दिसत नाही मात्र परिवर्तन सतत सृष्टीत होत असते. हे नाकारू शकत नाही.काळानुसार केवळ आकड्यात बदल होतो वर्षाचे आकडे बदलतात अर्थात तारीख वर्ष आणि शतके यांच्यात बदल होत असतो. त्यानुसार पृथ्वी वरील अनेक सजीव प्राणी जगत असतो. याचे आकलन केवळ बुद्धीजीवी प्राणी अर्थात मनुष्य प्राणी हाच स्वताला सुंदर निसर्गात स्वताच्या जीवनात बदल घडवू शकतो, विचारांची देवाण - घेवाण करीत असतो.
काळानुसार आकड्यात बदल झाला तो बदल देखील मानवानेच करून ठेवला असेल म्हणूनच त्याला बुद्धीजीवी प्राणी म्हणतो. पण हाच प्राणी स्वत:च्या आयुष्यात अनेक स्थित्यंतर बदल घडवून आणून स्वताच अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो. ही स्थित्यंतर बदल घडविण्यासाठी ज्या आईच्या गर्भाच्या गाभाऱ्यातून जन्म घेतल्या नंतर प्रथम पृथ्वीवर पहिला श्वास आपण घेतो तिचे महान उपकार असल्याशिवाय नाहीच ना! ती आपल्या प्रत्येक मुलाला समान वागणूक देत मोठे केलेलं असते. मात्र काही काळानंतर त्या मुलांच्या विचारात बदल होतो बघा.
मित्रानो,
पृथ्वी सूर्य चंद्र आहे त्या ठिकाणीच आहे. त्याबरोबर जन्म देणारी आई सुद्धा तिथेच आहे. मात्र विचारांच्या आकड्यात फसली जातात आणि मग विचारांची फारकत होत जाते. याचा अर्थ असा होत नाही की, आईने मुलांना समान वागणूक दिली नाही? तिने आपले कर्तव्य समान पार पाडले आहे. मात्र मुलांच्या विचारात परिवर्तन झाले आहे. हे परिवर्तन घडताना आईने सांगितलेल्या मार्गाने न जाता स्वताच्या बुद्धीने जाणारे अर्थात व्यक्तिगत विचाराने जाऊन आत्म घातकी निर्णयाच्या दिशेने जाऊन अहंकारी पद्धतीने वागू लागतात.
आपण समाजाचा विचार केला तिथे ही असेच प्रकार डोळ्या समोर येतात, आढळतात. काही अनुयायी स्वताच्या स्वकृत्वावर उंबरठे झिझवून कृतीशील पद्धतीने गेली अनेक वर्ष सतत आर्थिक सामाजिक व वैचारिक शैक्षणिक मदत करून विचार समाजाला देत असतात, हे सत्य असते. पण ते सत्य नाकारणारी बांडगुळे समाजात जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे खऱ्या सत्याला नाकारून दुसऱ्यांच्या बुद्धीने, इशाऱ्याने अर्थात स्वताची वैचारिकता कवडी मोल असून देखील त्याच्या व्यक्तिगत घडणाऱ्या जीवनावर बोलणाऱ्याला लिहिणाऱ्या कुटनीती लोकांना बोल घेवडेच म्हणावे लागेल. अर्थात 'दुसऱ्याच्या रंगमंचावर येऊन फुकटचा नाच करून जाणे होय.' अशी उत्पत्ती समाजा मध्ये वाढीस लागली आहे. 'दारू पाजणारा दुसराच, चढते मात्र याच्या अंगात' अशी अवस्था समाजाची झाली आहे बघा.
मित्र हो,
केवळ विचारांचे आकडे बदलतात बुद्धी बदलते, माणसे तीच असतात मग माणसाची बुद्धी तरी कोण बदलवते, मनात निर्माण झालेला अहंकार, 'मी' पणा किंवा स्वत:च्या बुद्धीने न चालता दुसऱ्याच्या बुद्धी वापरणे. त्यामुळेच वाद निर्माण होतात. जर स्वत:ची बुद्धीला पृथ्वी सूर्य - चंद्र या प्रमाणे स्थिरता निर्माण केलीत तर आपल्या येणाऱ्या भवितव्याच्या काळात वैचारिक भूमिका मांडू शकतो. कुणीही व्यक्तिगत द्वेष राग लोभ न ठेवता स्वत:च्या सामर्थ्यावर जीवनात मार्गक्रमण करू शकता.
चंद्र व सूर्य ग्रहण होते काही काळ पृथ्वी त्या दोघा मध्ये येते काही क्षणासाठी अंधार होतो. तो कायमचा राहत नाही ग्रहण सुटले जाते. मात्र आपल्या आजू बाजूला, समाजा मध्ये व्यक्तिगत ग्रहण बरीच लागली आहेत तर कशासाठी वैचारिक विचार समजावून न घेता जसे काय यांच्यावर मोठे आभाळ कोसळले आहे असे यांना वाटते.
मित्र हो,
आभाळ कधी कोसळणार नाही. पृथ्वी आहे तशीच राहणार आहे.नैसर्गिक कोप झाला तर आभाळी फाटेल क्सुनामी येणारच. मात्र त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपल्यालाच एकत्र यावे लागले यालाच सामाजिक भान, बांधिलकी म्हणतात. म्हणून कधी तरी ऐकले असेल काय तो मुलगा खुनी निघाला याच्यावर आई वडिलांनी काय संस्कार वैगरे केले की नाही. पण तिने ठासून संस्कार केलेलं असतात. मात्र दुसऱ्याच्या वाईट बुद्धीने दुसऱ्याच्या इशाऱ्याने कुट नितीत अडकलेला जातो आणि तो अस्सल गुन्हगार होतो. म्हणूनच दुसऱ्याने किती ही तुमच्या वर मानसिक दबाव आमिष दाखविले तरी त्याला बळी न पडता स्वत:च्या बुद्धीने वागा. वैचारिकता जोपासा. व्यक्तिगत कोणाच्या जीवनात बोलण्याचा लिहिण्याचा प्रयत्न करू नका. नुकसान अर्थात स्वतःच आहे. विचारांना विवेकतेने अर्थात वैचारिक सक्षम करून उत्तर देणे म्हणजेच स्वत:च्या बुद्धीचा वापर करणे. तरच आपली बुद्धी आपण स्थिर ठेवू माणसाचे चेहरे वेगवेगळे असतातच मात्र खोटे मुखवटे घातले तर आयुष्याची वाट अधिक बिकट होते हे विसरून चालणार नाही. म्हणून आपल्याला पृथ्वी, चंद्र, सुर्य आणि आई यांच्या प्रमाणे सृष्टीवर विचाराचे नवीन दालन निर्माण करून केवळ वर्षाचे आकडे बदलतात यावर विसंबून न राहता स्वता आईने पृथ्वीवर, भूमीवर एकदाच जन्म दिलेल्या आयुष्याचे सोनेरी पान लिहून ठेवा. तेच पान इतिहासात जोपर्यंत चंद्र, सूर्य, तारे आहेत तो पर्यंत ते वर्षानुवर्ष टिकून राहील आणि येणारा प्रत्येक दिवस हा नवीन दिवसच आहे. तो सोन्याचा दिवस आहे. असे समजूनच जीवनाचा प्रवास चालू ठेवा आयुष्याला वर्षाच्या आकड्यात न मोजता, न सीमित करता प्रकाशाकडे पहात रहा. अंधार जाणवणारच नाही. हेच खरे आयुष्याचे सौंदर्य आहे. कदाचित आपल्या आयुष्यात असे घडविले नाही तर केवळ आकडे म्हणून पाहणाऱ्यांना व संधी साधू लोकांना ३१ डिसेंबर म्हणजे हातात मध्याचा ग्लास नाकातून सिगरेटचा धुंवा! "पिनेवालों को पिणे का बहाणा चाहिये" अशी आपली अवस्था होणार आहे. याचा अर्थ वर्षभर चांगले विचार करावयाचे आणि कुणी तरी कान भरले, कुणी तरी सांगितले म्हणून वैचारिक विचार न करता व्यक्तिगत पातळीवर येऊन नाहक चिखलफेक करायची व स्वत: कुणी तरी आहे या भ्रमात राहून वावर करायचा अशा समाजात वृतीत वाढ होत आहे. केवळ बहाण्याने किंवा कुणी सांगितले म्हणून काम न करता स्वतःला कृतीशील बनवा जीवनात अनेक क्षितिजे पार कराल. तरच आईने जन्म दिल्याचे खरे सार्थक होईल.
अखेर या वर्षाची सांगता, निरोप देताना काही संकल्प करूनच नवीन वर्षात प्रवेश कराल अशी सदिच्छा व शुभेच्छा व्यक्त करून या वर्षातील आकडे बदलून नवीन आकड्यात जात असताना नवीन संकल्प अर्थात बौद्ध धम्माचे अनुसरण करणे आहे. पंचशिल पैकी "सुरामेरय मज्ज पमादठांना वेरमणी सिक्खापद समादियामी " याचं पालन करण म्हणजेच स्वतःला शुद्ध बुद्ध होणं होय!
आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
राजेश सावंत (लेखक, कवी, युवा मार्गदर्शक)
"आसरा एज्युकेशन आणि सामाजिक संस्था"
धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय
••¤••••¤••••¤••
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com
• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com
• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.