मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१८

● आचारणाच्या दृष्टीने माणूसपण देणारी विचारधारा म्हणजे धम्म

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

       ● आचारणाच्या दृष्टीने माणूसपण
           देणारी विचारधारा म्हणजे धम्म
                 लेख - भन्ते संघरक्षित

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖
❖           डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची         ❖
❖               प्रेरणा घेऊन धम्म चळवळ            ❖
❖                उभारणारे धम्म सार्थी                ❖
❖           भन्ते संघरक्षित यांच्या ९३ व्या           ❖
❖                वर्षी दुःखद निधन....!!!             ❖
❖         (दिनांक : ३० ऑक्टोबर २०१८)           ❖
❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

जगातील कित्येक लोक स्वतःला मनुष्य समजतात,. परंतु त्यांचा हा गैरसमज आहे. केवळ मनुष्य मातेच्या गर्भातुन जन्म घेतल्याने कोणीही मनुष्य बनत नाही. जेवन केल्याने, कपडे घातल्याने कोणीही मनुष्य बनत नाही. तर मग आपण मनुष्य कसे काय बनतो? ख्रिश्चन, हिंदुंच्या अर्थानुसार धर्म आपल्याला मनुष्य बनवु शकत नाही. तर सामान्य आचरणात्मक अर्थानुसार 'धम्म' आपल्याला मनुष्य बनवतो. मनुष्य बनण्याबद्दल विचार करा. विकसीत मनुष्य बनण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या विचारांमध्ये स्पष्टता आणण्याचा प्रयत्न करा. प्रज्ञावान आणि करूणावान बनण्यासाठी प्रयत्नशील व्हा. धर्म ग्रंथांना मध्ये आणण्याची आवश्यकता नाही. बुद्धाच्या उपदेशानुसार बुद्धत्त्वाची प्राप्ती हि मनुष्यत्वाची सर्वात विकसीत पायरी आहे.

बुद्धत्त्व प्राप्ती म्हणजे? मनुष्य जीवनाचा सर्वोच्च रुप आहे. यासाठी तथाकथीत ईश्वराच्या बाबतीत विचार करण्याची आवश्यकता नाही. केवळ मनुष्य बनण्याबाबत विचार करण्याची आवश्यकता आहे. एक श्रेष्ठ प्रज्ञावंत, शीलवंत व करूणावान मनुष्य सर्व प्रकारच्या ईश्वर आणि देवांपेक्षा श्रेष्ठ आहे. आपण अनेक धर्म ग्रंथ वाचले असतील, विशेषतः ईश्वर प्रधान धर्म ग्रंथ जे ईश्वराची अंधभक्ती शिकवतात. त्यातुन आपल्याला समजते कि ईश्वर जो कि - सृष्टी निर्माता आहे. तो कित्येक प्रकारच्या चरित्र्यहीन गोष्टी करतो. काय तो मनुष्यांसाठी एक चांगला आदर्श बनु शकतो?

उदा : प्राचीन ग्रीक देवता कधी कधी लढाया करतात. स्त्रीयांना पळवुन नेतात. दारु व अन्य नशा जन्य पदार्थांचे सेवन करतात. प्राचीन भारतीय देवतांची वर्तनुक सुद्धा अशाच प्रकारची आहे, काही बलात्कार सुद्धा करतात. काय अशा देवता मनुष्यांसाठी आदर्श बनु शकतात. त्यामुळेच मी म्हणतो कि - एक चांगला मानव सर्व प्रकारच्या ईश्वर आणि देवांपेक्षा चांगला आहे. आम्हाला देवांची आवश्यकता नाही. तर मनुष्यांची आवश्यकता आहे. आपल्याला मनुष्य बनण्याची गरज आहे. एक श्रेष्ठ पुरुष, एक श्रेष्ठ स्त्री, एक श्रेष्ठ बालक, एक चांगली व्यक्ती बनण्याची आवश्यकता आहे.

भगवान बुद्ध आमचे एक महाकारुणिक शिक्षक आहेत. ते आम्हाला योग्य सल्ला देतात. जो आम्ही समजु शकतो. त्याचे अनुसरण करु शकतो. ते आमचे मोठे भाऊ आहेत. या नात्याने आम्ही जाणतो कि आम्ही जेव्हा मोठे बनु. तेव्हा त्यांच्या सारखे बनु शकतो. भगवान बुद्ध कोणत्या स्वर्गातुन उतरले नाहीत. ते याच भुमीतुन आले आहेत. याच मातृभुमीतुन आले आहेत  याचा अर्थ आम्ही एकाच गर्भाशयातुन जन्म घेतला आहे. यामुळे आम्ही जाणतो कि - भगवान बुद्ध जे काही करु शकतात. ते सर्व आम्ही सुद्धा करु शकतो. केवळ प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. धम्माला जाणा. धम्म मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा. भगवान बुद्धांच्या शिकवणीला वास्तवात अनुसरण करण्याचा प्रयत्न कराल, डॉ. आंबेडकरांच्या तत्वांना वास्तवात आनण्याचा प्रयत्न कराल, मनुष्याच्या नात्याने आपण आपले जीवन कल्याणकारक बनवु शकणार आणि अशा रितीने आपण मनुष्य बनलो तर आपण ज्या समाजात राहतो. तो अधिक सुखी बनेल.

◆◆◆

लेखक -
भन्ते महाथेरो संघरक्षित
"संध्यापक एवं संचालक : त्रिरत्न बौद्ध महासंघ"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

• YATIN JADHAV : 9967065953
• RAMESH BHOSALE : 9773338144
• BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

सोमवार, २९ ऑक्टोबर, २०१८

● नव दीक्षित लोक, खोडसाळ प्रचार, २२ प्रतिज्ञा आणि आपण

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

    ● नव दीक्षित लोक, खोडसाळ प्रचार,
              २२ प्रतिज्ञा आणि आपण
                   लेख - कैलाश शिंदे

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

परवा तालुक्यातीलच चिंचपूर येथील आप्तेष्टांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने तिथे जाणे झाले, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल आदर्श ग्राम हिवरे बाजारच्या शिवे वर असलेल्या व संपूर्ण हागणदारी मुक्ती मिळवलेले भारतातील पहिले गाव असा लौकिक मिळवून जागतिक स्तरावर झेंडा फडकविलेले वडगाव (आमली) ता. पारनेर जि. अहमद नगर. येथे मित्र महोदयांच्या चुलत्याच्या जल दान विधि निमित्त हजेरी लावणे झाले. तिथे एका सद गृहस्थांचे बुद्ध धम्मावर प्रवचन ऐकण्याचा योग आला. सुरुवातीला ते कुणी बौध्दाचार्य असतील. असा त्यांच्या विषयी समज झाला.

परंतु त्यांच्या प्रवचनात येणाऱ्या सर मिसळी वरून उत्सुकता निर्माण झाली. कार्यक्रम नंतर त्यांच्या विषयी चौकशी केली असता ते जुन्या काळातील एम.डी. डॉक्टर असून ही ग्रामीण भागात व्रतस्थ भावनेने वैद्यकीय सेवा करण्यामुळे तसेच स्वतः ब्राह्मण असुन ही जवळपासच्या दहा - पाच गावातील सर्व जाती धर्मातील सर्वांच्या सुख दुःखात कौटुंबिक भावनेतुन सहभागी होणारे सर्व समावेशक व्यक्तिमत्व असल्याने सर्वांच्या मनात आस्थेचे एक आगळे स्थान निर्माण केलेले व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख समजली. त्यांच्यात असलेल्या सदरच्या अंगभूत गुणांमुळे कोणीही शहाणा मनुष्य त्यांचे कौतुकच करील.

तसेच कौतुक मी ही मनापासून करतो. (कारण इतर धर्म - देव - मनुष्याच्या नात्या विषयी बोलतात. तर बुद्ध धम्म माणसाचे माणसाशी असलेल्या प्रेमळ आपुलकीच्या नात्यावर चर्चा करतो, असो.) बोलण्याच्या ओघात त्यांनी 26 देशांचा प्रमुख धर्म असलेल्या बुद्ध धर्माकडे मी कसा आकर्षित झालो, परंतु मला दीक्षा घेण्यासाठी योग्य स्थान भारतात उपलब्ध न झाल्यामुळे थायलँड येथे जाऊन धम्म दीक्षा घेतली. वगैरे सांगत असताना हिंदू धर्म व बौद्ध धर्मावर काही योग्य भाष्य ही केले. पण शेवटी एके ठिकाणी मात्र "बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे" असे सांगितले. त्यांच्या याच वाक्याने ही पोस्ट लिहिण्यास प्रवृत्त केले आहे. चिंचपूर येथे ही प्रवचनकारांनी कार्यक्रमा नंतर खाजगीत बोलताना हा मुद्दा मांडल्याचे ऐकले. आता अवतार म्हणजे काय? तर...

यदायदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।।
परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे ।।

ही गोष्ट कुरूक्षेत्रावर गिता सांगताना श्री कृष्णाने स्पष्ट केली. देवाचे असे दहा जन्म झाले असून शेवटचा बुद्धाचा असुन तोच सध्या चालू आहे, अशी हिंदू मध्ये धारणा आहे. गीतेनुसार देव म्हणतात - "धर्माचे रक्षण करण्यासाठी मी अवतार धारण करतो आणि अवनी तलावर जन्म घेतो." पण कोणत्या धर्माचे रक्षण हे मात्र देवाने स्पष्ट केलेलं नाही. ते का केलं नाही हे त्या परमेश्वरालाच ठाऊक! कदाचित भावी काळात जगामध्ये अनेक धर्म निर्माण होणार आहेत. हे त्या काळात श्री कृष्णाला ही माहीत नसावं! तर कुठल्या तरी धर्माचं रक्षण करण्यासाठी परमेश्वर अवतार धारण करतो.

पण ज्या ज्या वेळेस देवानं अवतार धारण केला  त्या त्या वेळेस धर्माला खरेच ग्लानी आली होती का? धर्मावर संकट आलं होतं का? ग्लानिर्भवति भारत नुसार धर्माला ग्लानी भारतातच का येत होती? देवाच्या वामणावताराने मारलेल्या बळीराजाचे पाप कोणते? त्याने असा कोणता कहर माजवला होता? जर बळीराजा दुष्ट होता. व्हिलन होता तर बहुसंख्य बहुजन स्त्रिया आज ही त्याची आठवण काढुन "इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो' अशी त्याच्या राज्याची करुणा का भाकतात? यावरून तर त्याचे राज्य न्यायाचे असावे असे दिसते. मग आपल्या अवतारांमध्ये देव गीतेतल्या आश्वासना प्रमाणे किंवा वचना प्रमाणे वागला का? हे प्रश्न कुणाही निष्पक्ष पाती विचारी जनाला विचारात न घेता टाळता येण्या सारखे नाहीत. रामावतार नंतर देवाने दोन अवतार घेतले. कृष्ण आणि बुद्ध!

तिसरा अवतार अद्याप झालेला नाही. देवाने घेतलेल्या सर्व अवतारात राम आणि कृष्ण हे फार श्रेष्ठ अवतार मानले जातात. यातील कृष्णावताराच्या सांगितलेल्या जाणाऱ्या कथेनुसार पाहिले तर देवाने तो अवतार अनार्यांना नष्ट करण्यासाठी नव्हे, तर वैदिक संस्कृतीची घडी स्थिरस्था वर करण्यासाठी आणि आर्यांतील आपसातले संघर्ष मिटविण्यासाठी घेतला होता. होय! श्री कृष्णाने आपल्या आयुष्यात हेच कार्य केलं. त्याच्या अवतारात दोन - चार असुर राजांचा उल्लेख येतो. पण ते फुटकळ स्वरूपाचे आहेत. त्यांनाही श्री कृष्णाने नष्ट केलं, परंतु केवळ त्यांना नष्ट करण्यासाठी श्री कृष्ण अवतार झालेला नव्हता. श्री कृष्ण अवताराचा प्रमुख हेतू तो नव्हता. आर्यांच्या साम्राज्याची घडी व्यवस्थित बसवून देणं. हे या अवताराचं प्रमुख कार्य होतं.

इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे इतर अवतारांचे सोडा. पण बुद्ध स्वतः अवतार, पुनर्जन्म मानतात का? या प्रश्नाच्या अनुषंगाने आधुनिक प्रबुद्ध महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आपल्या 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या ग्रंथात बुद्धाने काय नाकारले यातील अधम्म म्हणजे काय या प्रकरणामध्ये लिहितात, "दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे अधम्म होय." दैवी चमत्कृतीवादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धाचे तीन हेतू होते. पहिला माणसाला बुद्धिवादी बनविणे. दुसरा माणसाला स्वतंत्रता पूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे. तर तिसरा ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध घेण्याची प्रवृत्ती मारतात त्यांची उत्पत्तीच नष्ट करणे ही होत. यालाच बुद्ध धम्माचा कर्म (कम्म) सिद्धांत म्हणतात. याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा अधम्म मानली जाते.

"ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे!" कर्म सिध्दांत किंवा हेतूवाद हा बौध्द धम्माचा केंद्रिय सिध्दांत आहे. हा सिध्दांत विवेकवादाचा पुरस्कार करतो आणि बौध्द धम्म म्हणजे विवेकवाद शिवाय दुसरे काहीही नाही. म्हणून परप्राकृतिक शक्तिची उपासना म्हणजे अधम्म होय. मग जिथे बुद्ध स्वतःच देव - दैवाचे अस्तित्व नाकारतात. नव्हे तो विषय दुर्लक्षित करण्या इतका गौण मानतात. त्या देवाचा ते स्वतः अवतार असण्याचा प्रश्नच शिल्लक रहात नाही. म्हणूनच डॉ बाबासाहेब नागपूरच्या धम्म दीक्षे वेळी आपल्या अनुयायांना २२ प्रतिज्ञा देताना त्यातील ४ थ्या प्रतिज्ञेत लिहितात, "देवाने अवतार घेतला. यावर माझा विश्वास नाही." तर ५ व्या प्रतिज्ञेत सांगतात - "बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा खोडसाळ प्रचार असल्याचे मी मानतो.

संदर्भ
'बुद्ध आणि त्यांचा धम्म' या पुस्तकातून...
'खपले देवाच्या नावाने' या पुस्तकातून...

◆◆◆

लेखक -
कैलाश शिंदे : पुणे
(लेखक, कवी एवं आंबेडकरी विचारवंत)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

• YATIN JADHAV : 9967065953
• RAMESH BHOSALE : 9773338144
• BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

*मधन्यवाद ।

बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१८

● धर्मांधता आणि पितृसत्तात्मक विचारसारणी आणि आपण

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

        ● धर्मांधता आणि पितृसत्तात्मक
              विचारसारणी आणि आपण

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

एक आहे नग्न स्त्रीचं चित्र (Painting : uffizi Museum, Florence) आणि दुसरं शिल्प आहे नग्न पुरुषाचं... मायकल अंजलो नावाच्या जग प्रसिद्ध कलाकाराने साकारलेले नग्न पुरुषाचे शिल्प (Florence, italy) दोन्हीही कलाकृतीं मध्ये नग्नता केवळ निसर्ग दर्शवणारी आहे. त्यात लैंगिक भावना अजिबात नाही.

स्त्रीच्या चित्रातील शरीराचा आकार हा आज - काल जाहिरात, मनोरंजन क्षेत्राने ठरवून दिलेल्या शरीर सौंदर्याच्या निकषात बसत नाही.  मात्र पुरुषाचे शिल्प शरीर सौंदर्याचे निकष घालून देणारे आहे. दोन्हीही कलाकृती एकाच काळातल्या पण चित्र (Painting) मायकल अंजलोच्या काळानंतरचे म्हणजे तो पेंटर मायकल अंजलोला सर्वात लहान (Junior) होता. हे सांगायचं कारण मायकल अंजलोने पुरुषांचे नग्न काढायला सुरुवात करे पर्यंत फक्त बायकांचे नग्न काढले जात. त्यामुळे तो पर्यंत युरोपियन स्त्री शरीर सौंदर्याचे निकष रूढ झाले होते, मायकल अंजलोने प्रथम नग्न पुरुष काढायला सुरुवात केली. म्हणजे तो पर्यंत स्त्री - पुरुषांच्या साचे बद्ध शरीर सौंदर्याचे मापदंड ठरले. पण नव्याने उदयास येणाऱ्या कलाकारांनी पुन्हा तेच मापदंड मोडीत काढण्याचे ही प्रयत्न केले.

मायकल अंजलो त्या काळचा अतिशय बंडखोर कलाकार... पुरुषांचे प्रमाण बद्ध नग्न काढण्या बरोबरीनेच त्याने इतर अनेक नियम मोडायचा प्रयत्न केला. उदा. येशूचे (Jesus's Six Pack Body) सहा विभाग असलेले पिळदार शरीर, दणकट पिळदार स्तन असलेली मदर मेरी (Mother Mary) वगैरे... अर्थात पिळदार स्तनवाली मदर मेरी (Mother Mary) चर्चने नाकारली. पण येशू (Jesus) स्वीकारला. (स्त्री - पुरुष असमानता) मायकल अंजलोला तो नग्न डेविड तर चर्चच्या कळसावर लावायचा होता. पण Nudity is Not Allowed at Holy Church आता कोणी म्हणेल. बघा युरोपात पण धर्मसत्ता पितृसत्ताच मोठी पण नावं मात्र भारतीय समाजाला ठेवायची, तर हा युरोपचा इतिहास आहे. पाच सहाशे वर्ष जुना आहे. मात्र आपल्याकडे हे वर्तमान आहे. म्हणजे ५०० वर्षांची वैचारिक मागास संस्कृती. म्हणून आपल्याला एम. एफ. हुसेन, सआदत हसन मंटो, इस्मत चुगताई, र. धो. कर्वे ह्यांची किंमत नाही.

स्तन दाबण्या, कुस्करण्याचा, उत्तेजना वाढवणारा म्हणून लैंगिक अवयव, किंवा मग बाळाचे पोट भरणारा म्हणून वंदनीय पूजनीय अवयव. लिंग हे केवळ योनीत सरकवण्यास उपयुक्त साधन इतकीच अक्कल असणाऱ्या धर्मांध पितृसत्ताक समाजात प्रत्येक धर्माची, जातीची, कुटुंबाची, खानदानाची इज्जत त्या त्या जाती, धर्म, कुटुंबाच्या बाईच्या योनीत, स्तनात, शरीरात कोंबून ठेवलेली आहे आणि ह्या पितृसत्तेतच वाढलेल्या पितृसत्तात्मक विचारांच्या वाहक असलेल्या आम्ही मूर्ख बायका ही मग स्वतःला खानदान की किमती इज्जत सुखरूप ठेवणारी तिजोरी समजू लागतो आणि स्वतःला अधिक अधिक कुलूप बंद करत जातो. हे सर्व लिहिण्याचं कारण "दिनकर मनवर" ह्यांची एक कविता तृतीय वर्ष बी. ए. (B.A) च्या अभ्यास क्रमातून वगळण्यात आली. वगळण्याचे कारण कवितेत पाण्याचे वर्णन करताना दिल्या गेलेल्या अनेक उपमांपैकी एक उपमा आहे. आदिवासी मुलीच्या स्तनांची त्यामुळे काही आदिवासी संघटनांनी आक्षेप घेतला आहे.

आमच्याच स्त्रियांचे स्तन का? तुमच्या स्त्रियांचे का नाहीत? असा प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे आता आमच्या स्त्रियांचे, ह्यांच्या स्त्रियांचे, त्यांच्या स्त्रियांचे स्तन अशी स्पर्धा लागलीय. मुळात शिकलेल्या लोकांना कविता नीट वाचून अर्थ बोध होत नसेल तर आपण आजवर नेमकं काय शिकलो? ह्याचा आधी विचार करायला हवा. "आदिवासी पोरीच्या स्तनासारखे जांभळे पाणी" हे किती सुंदर वर्णन आहे? मुळात हे वर्णन पाण्याचं आहे. स्तनांचं नाही. आदिवासी लोक (So called Civilized) लोकांपेक्षा निसर्गाशी जास्त एकरूप झालेले असतात. जे जितकं जास्त नैसर्गिक तितकं निखळ, निर्मळ आणि म्हणून पाण्याचा निखळ, निर्मळ गुण वर्णन करताना तितकंच निर्मळ सुंदर काय असावं? तर आदिवासी पोरीचे स्तन. इथेही "पोरीचे" स्तन, "बाईचे" नाही. ह्याचाच अर्थ लैंगिकतेच्या ही पल्याड अतिशय सुंदर, नाजूक भावना कोवळ्या स्तनांशी जोडलेली असु शकते ना? ही अशी कल्पना करण्याचा कवीला अधिकार नाही का? त्याची अभिव्यक्ती स्वीकारायला नको का? मुळात हे वर्णन कुठल्या ही ठराविक जातीचा अपमान करणारे आहे का? उलट आदिवासी जास्त निर्मळ असल्याचाच निष्कर्ष निघत नाही का?

कुठल्याही सुंदर गोष्टींच्या वर्णनासाठी कधी कुठल्या लेखक, कवी, चित्रकाराला माझे स्तन, डोळे, केस, ओठ, हात, पाय, नितंब, मेंदू, बुद्धी, आणि अगदी योनी जरी आठवली तरी मी तो स्वतःचा सन्मानच समजेन. "कुठल्या" गोष्टीला, "कशाची" उपमा कुठल्या "संदर्भात" दिली जाते. ह्यावर ते लिखाण अपमानकारक आहे की नाही? हे ठरवता येत नसेल तर आपला मेंदू अप्रगत बाल्यावस्थेत आहे. असं समजायला हरकत नाही. नग्नतेचा संबंध फक्त लैंगिकतेशी जोडणं आणि लैंगिकतेला ही अपवित्र समजणं. हे दांभिक आणि भ्रष्ट बुद्धीच लक्षण आहे. धर्मांधता आणि पितृसत्तात्मक विचार माणसाचा मेंदू भ्रष्ट करत माणसाचे माणूसपण संपवतो.

◆◆◆

लेख -
रेश्मा रामचंद्र देवधर (अभिनेत्री)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

• YATIN JADHAV : 9967065953
• RAMESH BHOSALE : 9773338144
• BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

● पितृसत्ताक काळ, स्रियांच्या समस्या आणि स्रियांना घालून दिलेले विनय

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

    ● पितृसत्ताक काळ, स्रियांच्या समस्या
         आणि स्रियांना घालून दिलेले विनय

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

सुरूवातीला भिक्षूनींकडे अंथुरणे पांघुरणे नव्हती. मग त्यांनी काही काळासाठी भिक्षूंची अंथरूणे वापरण्याची परवानगी घेतली. खरं म्हणजे स्त्रीयांच्या शारीर गरजा लक्षात घेता, अपरिग्रहाचा विनय स्त्रीयांना संघ प्रवेशा वेळीच थोडा शिथील करायला पाहिजे होता. मग हा विनय शैथिल्यासाठीचा विषय संघ संसदेत आला. तेही ठिकच झाले म्हणा. विनय पिठकात या बाबतच्या ऐतिहासिक कथेची नोंद तरी झाली. विनय पिठकातील काही विनय हे स्त्रीयांना गौणत्व देणारे आहेत. याबाबत दुमत नाही. पण स्त्रीवादी अभ्यासक आणि काही अर्धवट स्त्रीवादी मात्र आठ गरू धम्माच्याच संदर्भात बुध्दाला पितृसत्ताक ठरवतात.

खरं तर बाबासाहेब आंबेडकर आणि धर्मानंद कोसंबी यांनी स्पष्ट केल्या प्रमाणे 'स्त्रीयांना संघ प्रवेश दिल्याने संघ हजार वर्षे टिकण्या ऐवजी पाचशे वर्षेच टिकेल' हे तथागतांच्या तोंडी घुसडून बुध्दानंतर चारशे वर्षात फाटाफुट झालेल्या संघाचे खापर स्त्रीयांच्या माथी मारण्यासाठी पुरूष भिक्खुंनी केलेली ही चालबाजी आहे. या मताला दुजोरा देणारे महत्त्वाचे अभ्यासक म्हणजे सी. ए. एफ. (C.A.F.), डेव्हिड, आय.बी. हाॅर्नर आणि एलिसन बॅन्क फिन्ली असो. एवढं मात्र खरं की - स्त्रीयांच्या संघ प्रवेशाने संघाचे विनय मात्र स्त्रीयांच्या शारीर गरजानुसार शिथील करण्यात आले. आज आपण स्त्रीयांच्या मासिक पाळीच्या संदर्भाने झालेल्या विनय दुरूस्तीचा विचार करणार आहोत.

ऋतूमती भिक्षूणी गादीवर, आसणावर, बसायच्या, झोपायच्या. आंथुरणे, आसणे रक्ताने भरत असत.  (कारण संघ प्रवेशीत भिक्खुनीं सुध्दा किमान कपडे जवळ बाळगण्याची मर्यादा पाळत.) तथागतांना ही बाब समजली. तेव्हा त्यांनी म्हटले - 'अनुमतीने देतो की, अवसथ चिवर वापरण्याची'. "अवसथ चिवर" म्हणजे मासिक पाळीत वापरावयाचा जादाचा कपडा. अवसथ चिवर पण रक्ताने भरत असे. तथागतांना ही बाब समजली. तेव्हा त्यांनी म्हटले - 'अनुमती देतो की, 'अणि चोळाची'. 'अणि चोळ' म्हणजे 'रक्त शोषक'. म्हणजे जादाच्या कपड्यात रक्त शोषून घेणारा कापूस, वा सूत घालण्याची. 'अणि चोळ' पडून जात असे. तथागतांना ही बाब समजली तेव्हा त्यांनी म्हटले, 'अनुमती देतो की, दोरीने बांधून 'अणि चोळ' वापरण्याची....'

सुताची दोरी भीजून तुटून जाई. तथागतांना ही बाब समजली. तेव्हा त्यांनी म्हटले - 'अनुमती देतो की, 'संवेल्लीय' वापरण्याची म्हणजेच कटी सूत्र अथवा कंबर पट्टा वापरण्याची. आज ही खेडेगावात ज्या महिला 'निकर' म्हणजे चड्डया घालत नाहीत. त्या कमरेला दोरी वा सुती कपड्यांची पट्टी बांधतात आणि मासिक पाळीचा कपडा गळून नये. म्हणून नाडी वा दोरीने बांधलेली कपड्यांची ती 'लंबोळी' त्यात खोचतात. या ठिकाणी ही लक्षात घेण्याची बाब की, स्त्रीयांनी हट्टाने संघ प्रवेशाचा अधिकार मिळवला. संघाचे विनय पाळण्याचे आश्वासन ही दिले, मात्र स्त्री शरिराच्या नैसर्गिक गरजा लक्षात घेता हे विनय पाळणे कठीण होते. अनुभवांती तथागतांनी स्त्रीयां बाबतचे विनय शिथील केले. आपण पहातो की - शनी मंदिर असो की, सबरी माला मंदिर स्त्रीयांना मंदिर प्रवेश नाकारण्या मागे मासिक पाळीचे कारण दिले जाते. काही मंदिरात तर मासिक पाळीच्या कारणाने प्रसादाचे लाडू स्त्रीयांकडून न बनवून घेता पुरूषांकडून वा म्हाताऱ्या कडून (वयोवृद्ध व्यक्ती) बनवून घेतले जातात. कोल्हापूर, तुळजापूर देवस्थान बाबत काही खमक्या कलेक्टरांनी या मुद्दावर ठाम भूमिका घेत स्त्रीयांना लाडू बनवण्याची टेंडरं दिलीत. हे सत्यच.

स्त्रीयांना मुक्ती मार्गतला अडथळा मानणे, स्त्रीयांच्या शरीराची घृणा करणे, मासिक पाळीच्या काळात देवळात प्रवेशबंदी करणे अगर घरातील देव घरात मज्जाव करणे. हे आजही राजरोस सुरू आहे. इतकंच काय ही निंदणीय बाब, स्त्रीयांच्या सुध्दा अंग वळणी पडली आहे. घरात असो वा सार्वजनिक धर्म उत्सव प्रसंगी मासिक पाळी हा स्त्रियांचे सीमांतीकरण, बहिष्कृतीकरण करणारी बाब बनते. काही स्त्रीया तर सणवारात अडचण नको, मान पानाला मुकायला नको. म्हणून पाळी पुढे मागे करण्याच्या गोळ्या खातात. त्यामुळे त्यांच्या शरीराला खरं तर धोका निर्माण होऊ शकतो. आज ही पाळी बाबत खुलेपणाने बोलने सुध्दा होत नाही, तिथे बुध्दाच्या संघात स्त्रीयांच्या मासिक पाळीला लक्षात घेऊन विनय शिथील करण्यात आले. ही बाब अतिमहत्वाची आहे.

विनय पीठकात न बदलाता येणारे कठीण विनय सुध्दा पुढच्या काळात बदल्याच्या खूणा दिसतात. प्रशिक्षण काळापुरता पुरूष भिक्खुं संघाचे असलेले नियंत्रण ही नंतरच्या काळात संपुष्टात आणून भिक्खुनी संघावर पूर्णपणे भिक्खुनींचेच अनुशासन प्रस्थापित केले गेले. एलिसन बॅन्क फिन्ली याला भिक्खुनींचे 'सेल्फ गव्हर्नन्स' असे गौरवते. स्त्रीवादी बहीणी जरा 'आठ गरू धम्माच्या' पलिकडे जाऊन विनय पिठक पहातील तर बरे होईल. धर्म आणि धर्मगुरूंनी घृणा केलेल्या, तुच्छ मानलेल्या, ज्ञानबंदी लादलेल्या या पितृसत्ताक वैशाख वणव्यात बुद्धच काय तो गारवा? या बहीणींनो, घ्या जरा विसावा.

तपशील -
१) "बुद्ध आणि त्यांचा धम्म" (बौद्ध धर्मा विषयी संशोधकांची मते)

२) त्रिपिटकापैकी विनय पीठक (स्रियांना घालून दिलेले विनय)

संदर्भ -
१) "स्त्रीवादी आंबेडकरवादी" या पुस्तकातून...

२) "विनय पीठक" या पुस्तकातून...

◆◆◆

लेख -
रमा गोरख (धम्मसांगिनी)
लेखिका, कवियीत्री एवं बुद्ध धम्म अभ्यासक

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

• YATIN JADHAV : 9967065953
• RAMESH BHOSALE : 9773338144
• BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।