▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
● पितृसत्ताक काळ, स्रियांच्या समस्या
आणि स्रियांना घालून दिलेले विनय
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
सुरूवातीला भिक्षूनींकडे अंथुरणे पांघुरणे नव्हती. मग त्यांनी काही काळासाठी भिक्षूंची अंथरूणे वापरण्याची परवानगी घेतली. खरं म्हणजे स्त्रीयांच्या शारीर गरजा लक्षात घेता, अपरिग्रहाचा विनय स्त्रीयांना संघ प्रवेशा वेळीच थोडा शिथील करायला पाहिजे होता. मग हा विनय शैथिल्यासाठीचा विषय संघ संसदेत आला. तेही ठिकच झाले म्हणा. विनय पिठकात या बाबतच्या ऐतिहासिक कथेची नोंद तरी झाली. विनय पिठकातील काही विनय हे स्त्रीयांना गौणत्व देणारे आहेत. याबाबत दुमत नाही. पण स्त्रीवादी अभ्यासक आणि काही अर्धवट स्त्रीवादी मात्र आठ गरू धम्माच्याच संदर्भात बुध्दाला पितृसत्ताक ठरवतात.
खरं तर बाबासाहेब आंबेडकर आणि धर्मानंद कोसंबी यांनी स्पष्ट केल्या प्रमाणे 'स्त्रीयांना संघ प्रवेश दिल्याने संघ हजार वर्षे टिकण्या ऐवजी पाचशे वर्षेच टिकेल' हे तथागतांच्या तोंडी घुसडून बुध्दानंतर चारशे वर्षात फाटाफुट झालेल्या संघाचे खापर स्त्रीयांच्या माथी मारण्यासाठी पुरूष भिक्खुंनी केलेली ही चालबाजी आहे. या मताला दुजोरा देणारे महत्त्वाचे अभ्यासक म्हणजे सी. ए. एफ. (C.A.F.), डेव्हिड, आय.बी. हाॅर्नर आणि एलिसन बॅन्क फिन्ली असो. एवढं मात्र खरं की - स्त्रीयांच्या संघ प्रवेशाने संघाचे विनय मात्र स्त्रीयांच्या शारीर गरजानुसार शिथील करण्यात आले. आज आपण स्त्रीयांच्या मासिक पाळीच्या संदर्भाने झालेल्या विनय दुरूस्तीचा विचार करणार आहोत.
ऋतूमती भिक्षूणी गादीवर, आसणावर, बसायच्या, झोपायच्या. आंथुरणे, आसणे रक्ताने भरत असत. (कारण संघ प्रवेशीत भिक्खुनीं सुध्दा किमान कपडे जवळ बाळगण्याची मर्यादा पाळत.) तथागतांना ही बाब समजली. तेव्हा त्यांनी म्हटले - 'अनुमतीने देतो की, अवसथ चिवर वापरण्याची'. "अवसथ चिवर" म्हणजे मासिक पाळीत वापरावयाचा जादाचा कपडा. अवसथ चिवर पण रक्ताने भरत असे. तथागतांना ही बाब समजली. तेव्हा त्यांनी म्हटले - 'अनुमती देतो की, 'अणि चोळाची'. 'अणि चोळ' म्हणजे 'रक्त शोषक'. म्हणजे जादाच्या कपड्यात रक्त शोषून घेणारा कापूस, वा सूत घालण्याची. 'अणि चोळ' पडून जात असे. तथागतांना ही बाब समजली तेव्हा त्यांनी म्हटले, 'अनुमती देतो की, दोरीने बांधून 'अणि चोळ' वापरण्याची....'
सुताची दोरी भीजून तुटून जाई. तथागतांना ही बाब समजली. तेव्हा त्यांनी म्हटले - 'अनुमती देतो की, 'संवेल्लीय' वापरण्याची म्हणजेच कटी सूत्र अथवा कंबर पट्टा वापरण्याची. आज ही खेडेगावात ज्या महिला 'निकर' म्हणजे चड्डया घालत नाहीत. त्या कमरेला दोरी वा सुती कपड्यांची पट्टी बांधतात आणि मासिक पाळीचा कपडा गळून नये. म्हणून नाडी वा दोरीने बांधलेली कपड्यांची ती 'लंबोळी' त्यात खोचतात. या ठिकाणी ही लक्षात घेण्याची बाब की, स्त्रीयांनी हट्टाने संघ प्रवेशाचा अधिकार मिळवला. संघाचे विनय पाळण्याचे आश्वासन ही दिले, मात्र स्त्री शरिराच्या नैसर्गिक गरजा लक्षात घेता हे विनय पाळणे कठीण होते. अनुभवांती तथागतांनी स्त्रीयां बाबतचे विनय शिथील केले. आपण पहातो की - शनी मंदिर असो की, सबरी माला मंदिर स्त्रीयांना मंदिर प्रवेश नाकारण्या मागे मासिक पाळीचे कारण दिले जाते. काही मंदिरात तर मासिक पाळीच्या कारणाने प्रसादाचे लाडू स्त्रीयांकडून न बनवून घेता पुरूषांकडून वा म्हाताऱ्या कडून (वयोवृद्ध व्यक्ती) बनवून घेतले जातात. कोल्हापूर, तुळजापूर देवस्थान बाबत काही खमक्या कलेक्टरांनी या मुद्दावर ठाम भूमिका घेत स्त्रीयांना लाडू बनवण्याची टेंडरं दिलीत. हे सत्यच.
स्त्रीयांना मुक्ती मार्गतला अडथळा मानणे, स्त्रीयांच्या शरीराची घृणा करणे, मासिक पाळीच्या काळात देवळात प्रवेशबंदी करणे अगर घरातील देव घरात मज्जाव करणे. हे आजही राजरोस सुरू आहे. इतकंच काय ही निंदणीय बाब, स्त्रीयांच्या सुध्दा अंग वळणी पडली आहे. घरात असो वा सार्वजनिक धर्म उत्सव प्रसंगी मासिक पाळी हा स्त्रियांचे सीमांतीकरण, बहिष्कृतीकरण करणारी बाब बनते. काही स्त्रीया तर सणवारात अडचण नको, मान पानाला मुकायला नको. म्हणून पाळी पुढे मागे करण्याच्या गोळ्या खातात. त्यामुळे त्यांच्या शरीराला खरं तर धोका निर्माण होऊ शकतो. आज ही पाळी बाबत खुलेपणाने बोलने सुध्दा होत नाही, तिथे बुध्दाच्या संघात स्त्रीयांच्या मासिक पाळीला लक्षात घेऊन विनय शिथील करण्यात आले. ही बाब अतिमहत्वाची आहे.
विनय पीठकात न बदलाता येणारे कठीण विनय सुध्दा पुढच्या काळात बदल्याच्या खूणा दिसतात. प्रशिक्षण काळापुरता पुरूष भिक्खुं संघाचे असलेले नियंत्रण ही नंतरच्या काळात संपुष्टात आणून भिक्खुनी संघावर पूर्णपणे भिक्खुनींचेच अनुशासन प्रस्थापित केले गेले. एलिसन बॅन्क फिन्ली याला भिक्खुनींचे 'सेल्फ गव्हर्नन्स' असे गौरवते. स्त्रीवादी बहीणी जरा 'आठ गरू धम्माच्या' पलिकडे जाऊन विनय पिठक पहातील तर बरे होईल. धर्म आणि धर्मगुरूंनी घृणा केलेल्या, तुच्छ मानलेल्या, ज्ञानबंदी लादलेल्या या पितृसत्ताक वैशाख वणव्यात बुद्धच काय तो गारवा? या बहीणींनो, घ्या जरा विसावा.
तपशील -
१) "बुद्ध आणि त्यांचा धम्म" (बौद्ध धर्मा विषयी संशोधकांची मते)
२) त्रिपिटकापैकी विनय पीठक (स्रियांना घालून दिलेले विनय)
संदर्भ -
१) "स्त्रीवादी आंबेडकरवादी" या पुस्तकातून...
२) "विनय पीठक" या पुस्तकातून...
◆◆◆
लेख -
रमा गोरख (धम्मसांगिनी)
लेखिका, कवियीत्री एवं बुद्ध धम्म अभ्यासक
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
• YATIN JADHAV : 9967065953
• RAMESH BHOSALE : 9773338144
• BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.
धन्यवाद ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा