▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
● डरकाळी फोडून वाघाची
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
दे लाथाडून २२ प्रतिज्ञा,
तु पोथी पुराण वाचत बस ।
तुझ्या झिंझ्या मोकळ्या सोडून,
त्या देवी पुढे नाचत बस ।।धृ।।
डरकाळी फोडून वाघाची,
क्षणार्धात म्याव मांजर होतोस ।
बा भिमाला दुर सारून,
देवांना जवळ करून घेतोस ।।१।।
अरे विचार काय करतोस,
खुशाल घरात गणपती बसव ।
अन देवीचा उदो उदो करत,
तिच्या समोर मुरूळ्या नाचव ।।२।।
नको करूस सविनय जय भिम,
जय अंबे माते म्हणत बस ।
दर दिवशी वेगवेगळे सोंग घेऊन,
नव रात्रीत तु नाचत बस ।।३।।
लाव कुंकू, लाव हळद,
जेजुरीचा भंडारा सुध्दा उधळ ।
सतरा पिढ्या सुधारल्या नाही,
आता तुझी पिढी तर सुधर ।।४।।
येतोय तुला राग माझा,
तो मी फाट्यावर मारतो ।
मी देवी देवता पुजत नाही,
मी फक्त बा भिमाला मानतो ।।५।।
कवी -
प्रतीक पाटील (पवई, मुंबई)
"लेखक, कवी एवं आंबेडकरी विचारवंत"
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
• YATIN JADHAV : 9967065953
• RAMESH BHOSALE : 9773338144
• BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.
धन्यवाद ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा