▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
● धर्मांधता आणि पितृसत्तात्मक
विचारसारणी आणि आपण
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
एक आहे नग्न स्त्रीचं चित्र (Painting : uffizi Museum, Florence) आणि दुसरं शिल्प आहे नग्न पुरुषाचं... मायकल अंजलो नावाच्या जग प्रसिद्ध कलाकाराने साकारलेले नग्न पुरुषाचे शिल्प (Florence, italy) दोन्हीही कलाकृतीं मध्ये नग्नता केवळ निसर्ग दर्शवणारी आहे. त्यात लैंगिक भावना अजिबात नाही.
स्त्रीच्या चित्रातील शरीराचा आकार हा आज - काल जाहिरात, मनोरंजन क्षेत्राने ठरवून दिलेल्या शरीर सौंदर्याच्या निकषात बसत नाही. मात्र पुरुषाचे शिल्प शरीर सौंदर्याचे निकष घालून देणारे आहे. दोन्हीही कलाकृती एकाच काळातल्या पण चित्र (Painting) मायकल अंजलोच्या काळानंतरचे म्हणजे तो पेंटर मायकल अंजलोला सर्वात लहान (Junior) होता. हे सांगायचं कारण मायकल अंजलोने पुरुषांचे नग्न काढायला सुरुवात करे पर्यंत फक्त बायकांचे नग्न काढले जात. त्यामुळे तो पर्यंत युरोपियन स्त्री शरीर सौंदर्याचे निकष रूढ झाले होते, मायकल अंजलोने प्रथम नग्न पुरुष काढायला सुरुवात केली. म्हणजे तो पर्यंत स्त्री - पुरुषांच्या साचे बद्ध शरीर सौंदर्याचे मापदंड ठरले. पण नव्याने उदयास येणाऱ्या कलाकारांनी पुन्हा तेच मापदंड मोडीत काढण्याचे ही प्रयत्न केले.
मायकल अंजलो त्या काळचा अतिशय बंडखोर कलाकार... पुरुषांचे प्रमाण बद्ध नग्न काढण्या बरोबरीनेच त्याने इतर अनेक नियम मोडायचा प्रयत्न केला. उदा. येशूचे (Jesus's Six Pack Body) सहा विभाग असलेले पिळदार शरीर, दणकट पिळदार स्तन असलेली मदर मेरी (Mother Mary) वगैरे... अर्थात पिळदार स्तनवाली मदर मेरी (Mother Mary) चर्चने नाकारली. पण येशू (Jesus) स्वीकारला. (स्त्री - पुरुष असमानता) मायकल अंजलोला तो नग्न डेविड तर चर्चच्या कळसावर लावायचा होता. पण Nudity is Not Allowed at Holy Church आता कोणी म्हणेल. बघा युरोपात पण धर्मसत्ता पितृसत्ताच मोठी पण नावं मात्र भारतीय समाजाला ठेवायची, तर हा युरोपचा इतिहास आहे. पाच सहाशे वर्ष जुना आहे. मात्र आपल्याकडे हे वर्तमान आहे. म्हणजे ५०० वर्षांची वैचारिक मागास संस्कृती. म्हणून आपल्याला एम. एफ. हुसेन, सआदत हसन मंटो, इस्मत चुगताई, र. धो. कर्वे ह्यांची किंमत नाही.
स्तन दाबण्या, कुस्करण्याचा, उत्तेजना वाढवणारा म्हणून लैंगिक अवयव, किंवा मग बाळाचे पोट भरणारा म्हणून वंदनीय पूजनीय अवयव. लिंग हे केवळ योनीत सरकवण्यास उपयुक्त साधन इतकीच अक्कल असणाऱ्या धर्मांध पितृसत्ताक समाजात प्रत्येक धर्माची, जातीची, कुटुंबाची, खानदानाची इज्जत त्या त्या जाती, धर्म, कुटुंबाच्या बाईच्या योनीत, स्तनात, शरीरात कोंबून ठेवलेली आहे आणि ह्या पितृसत्तेतच वाढलेल्या पितृसत्तात्मक विचारांच्या वाहक असलेल्या आम्ही मूर्ख बायका ही मग स्वतःला खानदान की किमती इज्जत सुखरूप ठेवणारी तिजोरी समजू लागतो आणि स्वतःला अधिक अधिक कुलूप बंद करत जातो. हे सर्व लिहिण्याचं कारण "दिनकर मनवर" ह्यांची एक कविता तृतीय वर्ष बी. ए. (B.A) च्या अभ्यास क्रमातून वगळण्यात आली. वगळण्याचे कारण कवितेत पाण्याचे वर्णन करताना दिल्या गेलेल्या अनेक उपमांपैकी एक उपमा आहे. आदिवासी मुलीच्या स्तनांची त्यामुळे काही आदिवासी संघटनांनी आक्षेप घेतला आहे.
आमच्याच स्त्रियांचे स्तन का? तुमच्या स्त्रियांचे का नाहीत? असा प्रश्न विचारला जातोय. त्यामुळे आता आमच्या स्त्रियांचे, ह्यांच्या स्त्रियांचे, त्यांच्या स्त्रियांचे स्तन अशी स्पर्धा लागलीय. मुळात शिकलेल्या लोकांना कविता नीट वाचून अर्थ बोध होत नसेल तर आपण आजवर नेमकं काय शिकलो? ह्याचा आधी विचार करायला हवा. "आदिवासी पोरीच्या स्तनासारखे जांभळे पाणी" हे किती सुंदर वर्णन आहे? मुळात हे वर्णन पाण्याचं आहे. स्तनांचं नाही. आदिवासी लोक (So called Civilized) लोकांपेक्षा निसर्गाशी जास्त एकरूप झालेले असतात. जे जितकं जास्त नैसर्गिक तितकं निखळ, निर्मळ आणि म्हणून पाण्याचा निखळ, निर्मळ गुण वर्णन करताना तितकंच निर्मळ सुंदर काय असावं? तर आदिवासी पोरीचे स्तन. इथेही "पोरीचे" स्तन, "बाईचे" नाही. ह्याचाच अर्थ लैंगिकतेच्या ही पल्याड अतिशय सुंदर, नाजूक भावना कोवळ्या स्तनांशी जोडलेली असु शकते ना? ही अशी कल्पना करण्याचा कवीला अधिकार नाही का? त्याची अभिव्यक्ती स्वीकारायला नको का? मुळात हे वर्णन कुठल्या ही ठराविक जातीचा अपमान करणारे आहे का? उलट आदिवासी जास्त निर्मळ असल्याचाच निष्कर्ष निघत नाही का?
कुठल्याही सुंदर गोष्टींच्या वर्णनासाठी कधी कुठल्या लेखक, कवी, चित्रकाराला माझे स्तन, डोळे, केस, ओठ, हात, पाय, नितंब, मेंदू, बुद्धी, आणि अगदी योनी जरी आठवली तरी मी तो स्वतःचा सन्मानच समजेन. "कुठल्या" गोष्टीला, "कशाची" उपमा कुठल्या "संदर्भात" दिली जाते. ह्यावर ते लिखाण अपमानकारक आहे की नाही? हे ठरवता येत नसेल तर आपला मेंदू अप्रगत बाल्यावस्थेत आहे. असं समजायला हरकत नाही. नग्नतेचा संबंध फक्त लैंगिकतेशी जोडणं आणि लैंगिकतेला ही अपवित्र समजणं. हे दांभिक आणि भ्रष्ट बुद्धीच लक्षण आहे. धर्मांधता आणि पितृसत्तात्मक विचार माणसाचा मेंदू भ्रष्ट करत माणसाचे माणूसपण संपवतो.
◆◆◆
लेख -
रेश्मा रामचंद्र देवधर (अभिनेत्री)
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
• YATIN JADHAV : 9967065953
• RAMESH BHOSALE : 9773338144
• BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.
धन्यवाद ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा