● २८ बुद्ध संकल्पना : शंका, आशय आणि तर्क
लेख -
आयुष्यमान आनंद आरकडे
◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆
२८ बुद्ध ही संकल्पना मुळ बौद्ध तत्वज्ञानाचा भाग नाही. २८ बुद्धांची संकल्पना प्रथमतः सिंहल देशात (श्रीलंका) बुद्धवंस. ह्या पद्य (महाकाव्य) ग्रंथात मांडली गेली. बुद्धवंस हा ग्रंथ इतिहास दर्शक ग्रंथ नसून हा एक पद्य काव्यात्मक ग्रंथ आहे. कवी कल्पनांना मर्यादा नसतात असे मानले तर, ऐतिहासिक दृष्ट्या यातील उक्त केलेल्या व्यक्ति रेखांना कितपत महत्व द्यावे हे प्रथम ठरवावे लागेल. हा ग्रंथ सिंहल देशात (आजचा श्रीलंका) रचला गेला. हा ग्रंथ इ. स. पूर्व दुसऱ्या ते तिसऱ्या शतकात रचला गेला असे मानले जाते. पुढे त्याच्यात दीर्घ काळापर्यंत भर घालण्यात आली. हा काळ विशेषतः ध्यानात घेणे गरजेचे आहे. हा तोच कालखंड आहे ज्याकाळात महाभारत, रामायण आणि दशावतारावर आधारित अनेक ग्रंथ रचले गेले. म्हणजेच हा कालखंड अवतारवादाने भारलेला होता. अवतारातील व्यक्ति रेखा लोकांच्या मनो धारणा ठरवीत होत्या. या महाकाव्यांनी भारतीय समाज व्यवस्थेला आकार देण्याचे काम केले. २८ बुद्ध ह्या संकल्पनेचा मूळ स्त्रोत प्रस्तुत ग्रंथात काव्यात्मक पद्धतीने रचल्या गेलेल्या जातक कथा आहेत. यातील २८ बुद्धांच्या नावांचे बारकाईने अध्ययन केल्यास असे निदर्शनास येते कि - यातील काही व्यक्ति रेखांची नावे बुद्धांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांतील पात्रांच्या नावांशी साधर्म्य दर्शवतात. उदा. कौंडिण्य बुद्ध, सुमेध बुद्ध, काश्यप बुद्ध इत्यादी.
दुसरा मुद्दा असा त्यात आहे कि, यातील एक बुद्ध ज्याचे नाव 'तिष्य' आहे, या नावाची व्यक्ति रेखा सिंहल देशात सर्वात मोठ्या असलेल्या सम्राट पियदस्सी 'तिष्य' या राजाच्या नावाशी साधर्म्य दर्शवणारी आहे. यात या सम्राटाचे उदात्तीकरण करण्याच्या हेतूने त्याचे नाव टाकले असावे. महामहेंद्र आणि संघमित्राने जेंव्हा सिंहल देशात आगमन करून बौद्ध धम्म तेथे त्यांनी स्थापित केला, तेंव्हा सम्राट तिष्य नावाचा राजा तिथे अस्तित्वात होता. त्यामुळे अश्या अनेक विसंगतीमुळे २८ बुद्ध यांच्या ऐतिहासिक आधारावर शशांकता वाटते.
२८ बुद्धांचा काळ हा तो काळ आहे ज्या काळात रामायण, महाभारत, दशावतार इत्यादी सारखे अवतार कथांवर आधारित ग्रन्थ रचले गेले. हा काळ बौद्ध धम्माच्या ऱ्हासाच्या सुरुवातीचा काळ आहे. त्याकाळात जैन दर्शन आणि बौद्ध धम्म यांच्यात अघोषित अशी स्पर्धा होती. ज्याप्रमाणे जैन मान्यतेत २४ तिर्थकारांची संकल्पना आहे, त्याप्रामणे बौद्ध धम्माची पडती बाजू सावरण्या करिता बौद्ध धम्मात देखील अवतारवादावर आधारित २८ बुद्ध अशी संकल्पना असावी, जेणेकरून बौद्ध धम्मास गत वैभव प्राप्त होईल ह्या विचारांनी प्रेरित होऊन काही साहित्यिक भिक्खुंनी केलेला हा फसलेला प्रयत्न असावा. पंचशील ध्वजाचे जनक, जेष्ठ बौद्ध अभ्यासक आणि अनागरिक धम्मपाल यांचे सहकारी पुरकातत्व शास्त्रज्ञ, कर्नल एच एस अलकॉट (१८८१) म्हणतात - "असा पारंपरिक विश्वास आहे की, सनातन कार्यकारण भावाच्या परंपरंपरेनुसार युगानयुगे बुद्ध जन्मास येवून मानव जातीस सत्याचा मार्ग दाखवितात. दंत कथेनुसार २८ बुद्ध होऊन गेले म्हणतात. परंतु, ऐतिहासिक रित्या सिदार्थ बुद्ध हे एकच बुद्ध होऊन गेले आहेत." (कर्नल. एच. एस.ऑलकॉट, सं: बुद्धिस्ट केटेसीजम [Buddhist Catechism] पृ. १०५, प्रकाशक: सांस्कृतिक मंत्रालय, श्रीलंका}
त्यानंतरच्या रचल्या गेलेल्या काही बौद्ध ग्रंथात प्रत्येक बुद्धाचा काळ नोंदवला आहे. ककुसंध बुद्ध (इ. स. पूर्व ३१०१), कोणा गमन बुद्ध (इ. स. पूर्व २०११), कश्यप बुद्ध (इ. स. पूर्व १०१४) अश्या प्रकारे बिनचूक कालखंड काही ग्रंथकार देतात, तो देत असताना हे ग्रंथकार "बुद्ध वंश" ह्या ग्रंथाचा संदर्भ देतात. मला असे वाटते, एखाद्या प्राचीन वस्तूचा अचूक काळ कुठला? हे जाणून घेण्या करिता Carbon Dating हे तंत्रज्ञान वापरले जाते. त्याकाळी अश्या प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध नसताना 'बुद्धी वंश' आणि तत्सम ग्रंथ लिहणाऱ्यांनी २८ बुद्धांपैकी सर्व बुद्धांचा काळ अचूक कसा लिहून ठेवला? हे अनाकलनीय आहे.
बौद्ध मतानुसार तार्किक दृष्ट्या विचार केल्यास असे जाणवते कि - कुठल्याही गोष्टीचे अस्तित्व तेंव्हाच प्रमाणित होत असते जेंव्हा त्या गोष्टीचे अस्तित्व प्रत्येक्षात प्रमाणित जरी होत नसले तरी, अप्रत्येक्षपणे अन्य माध्यमातून त्याचे अस्तित्व प्रमाणित व्हावे लागते. जसे बुद्धाचे अस्तित्व तेंव्हाच प्रमाणित होते जेंव्हा बुद्धाने केलेल्या सामाजिक क्रान्ति नंतर लोकांच्या मनोधारणा बदलल्या आणि चंद्रगुप्त मौर्य सारखे कनिष्ठ जातीतील राज घराणे उदयास आले. याचाच अर्थ असा होतो, बुद्धाच्या सामाजिक विचारांमुळे लोकांची कनिष्ठ जातीच्या राज्याचा स्वीकार करणारी मानसिकता निर्माण झाली.
आता आपण विषयाकडे वळूयात, जातक कथा नुसार इत्यादी. पूर्व १०१४ साली बुद्धाच्या आधी कश्यप नावाचा बुद्ध होऊन गेला, तो ज्या अर्थी बुद्ध आहे त्या अर्थी त्याचा प्रभाव युगानुयुगे जाणवणे गरजेचे आहे. मात्र डॉ. आंबेडकर लिखित 'प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती' या ग्रंथानुसार बुद्ध पूर्व भारतातील जीवन हे अनैतिकता पूर्ण होते. लोकांची जीवन जगण्याची नैतिक पातळी रसा तळाला जाऊन पोहचली होती. बुद्ध पूर्व काळात यज्ञयाग, कर्मकांड, अनैतिक व्यवहार याने परिसीमा गाठली होती. कश्यप नावाच्या बुद्धाचा प्रभाव असताना असले प्रकार व्हायला नको हवे होते. मात्र परिस्थितीचे विसंगत दर्शन होते. याचाच अर्थ असा होतो, कि बहु बुद्ध हा सिद्धांत काल्पनिक तथा काल्पनिक दृष्ट्या तकलादू आहे. कल्पना करुत कि, उद्युक्त केलेले वरील चार बुद्ध, हे बुद्धा प्रमाणे सम्यक संबद्ध जरी नसले तरी देखील ते बुद्ध होते, असे जरी गृहीत धरल्यास बुध्दत्व प्राप्त झालेली व्यक्तीस महापुरुषांच्या पली कडील प्रज्ञा निश्चितच प्राप्त असणार. आणि त्यांची जागतिक कीर्ती देखील अफाट असणार यात शंका नाही, अश्या अलौकिक बुद्धीमत्ता, प्रज्ञा आणि कीर्ती असणाऱ्या व्यक्तींचा इतिहास हा पुरातत्व विभागाच्या उत्खननात उजेडास न येणे हे पटण्या सारखे नाही. २८ बुद्धांचे नखभर पुरातत्व नाही जे यांचे अस्तित्व सिद्ध करू शकेल. अगदी हडप्पा संस्कृतीच्या काळापासूनचे म्हणजेच इ. स. पूर्व ३५०० - ४००० काळापासूनचे पुरातत्व आढळले आहेत, मात्र "बुद्ध" ह्या पदी पोचलेल्या व्यक्तीचे पुरातत्व आढळून न येणे हे कुठेतरी ह्या निष्कर्षा प्रति पोचवते कि - बहू बुद्ध सिद्धांत हि दंत कथांची देण आहे.
काही बुद्धांचा इतिहास हा हरप्पा मोहेंजोदडो संस्कृतीच्या आधीचा आहे असे जर मानले, तर पुरातत्वाचा एक नियम इथे लागू पडतो , तो असा कि ५००० - ६००० च्या प्रचंड मोठ्या कालावधीत, काळाच्या ओघात सर्वच गोष्टी नामशेष होत असतात. मग सदर ग्रंथकारांनी, बुद्धांच्या अस्तित्वाचा इसवी सन पूर्वी घडलेला प्रचंड मोठा कालखंड कश्याच्या आधारे दर्शवीला? बरं.. २८ वा बुद्ध याचे नामकरण देखील अश्या ग्रंथकारांनी आधीच करून ठेवले, त्याला 'मैत्रेय' नाव देऊन टाकले. भारताचा इतिहास हा बौद्धवाद आणि ब्राह्मणवाद यातील संघर्ष आहे असे बाबासाहेब म्हटले होते. मग असे असेल तर सिदार्थ गौतम बुद्ध यांचे ऐतिहासिक आणि तात्त्विक महत्व कमी करण्या करिता प्रतिक्रांती वाद्यांनी रचलेले हे कुभांड तर नाही ना ? याबाबत चाचपणी करणे देखील महत्वाचे ठरते. या २८ बुद्धांच्या सिद्धांताला बाबासाहेबांनी आपल्या बौद्ध तत्वज्ञानात कुठेच स्थान दिले नाही. या सर्व बाबींचा सखोल विचार करता, असा निष्कर्ष निघतो कि, बौद्धांनी २८ बुद्धाच्या तत्वज्ञानाला मूठमाती देऊन, एकाच बुद्धाला म्हणजेच सम्यक संबद्ध गौतम बुद्धांना सरणं जावे.
●◆●
आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
आयुष्यमान आनंद आरकडे
(लेखक, विचारवंत एवं अभ्यासक)
❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖
धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
═══════════════════════
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆
• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा
धन्यवाद ।