● नवरात्र सण अर्थात दांडिया म्हणजे शारीरिक आकर्षणाचा 'डिस्को' नाच
सूचना -
सर्व वाचकांना नम्र विनंती हा लेख वाचून इतरांना नक्की शेअर करा.
उद्देश -
डॉ. बाबासाहेबांच्या महान विचारांचा आदर करून या वर्षाच्या दांडिया उत्सवात कोणी ही बौद्ध तरुण - तरुणी नाचणार नाहीत, याचा नक्की संकल्प करतील, अशी माझी खात्री आहे. आपणच यावर सुसंस्कृत विचार करून विज्ञान दृष्टीकोन मोठा नक्कीच कराल.
लेख -
राजेश सावंत
◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆
भारतात मनुवादी विचारांनी काल्पनिक देवांची अनेक रूपं निर्माण करून नुकताच धंदे वाईक विनायकाला पाण्यात विसर्जन करीत नाही तो पर्यंत काल्पनिक सरस्वती, शारदा माता येण्याच्या तयारीत असून त्या मातेच्या नावाचा जयघोष करीत नऊ दिवस पूजेला लावून तिला सुद्धा जल समाधी देणार. असे कसे यांचे देव? पूजेला लावायचे काळा पैसा जमवायचा व माणसानेच बुद्धीच्या कला कृतीच्या जोरावर बनविलेला मातीच्या देवाला पाण्यात टाकून द्यायचा? स्वतःच्या हातानं बनविलेल्या कलाकाराला खरतर देव मानायला हवं बरोबर ना? या हिंदुस्थानात नेमकं उलट आहे हो. या मातेचा जागर करण्यासाठी रातभर गेल्या अनेक वर्षापासून दांडिया जल्लोषाला, पुर्वीचा गरबा, धार्मिकतेच्या कळसाची टोक पार करून अधर्मिकतेच स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे दांडिया घरातून मैदानात आला व त्यात झालेले बदलही लोकांनी अति उत्साहाने स्विकारले. त्यातुनच पंचातारिक हॉटेल मध्ये होणारा व ऐकलेला शब्द "डिस्को 'आता काल्पनिक देवीचा थाट मांडून तिच्या समोर नऊ दिवस “डिस्को दांडिया” च्या स्वरुपा मध्ये गाण्याच्या तालावर ज्यांना नाचता येत नाही ते सुद्धा हातात काठी टेकत टेकत जाऊन काट्या फिरवायला लागलेत. दांड्या हातात घेऊन नाचायला लागलेत व त्यांच्या काट्या नको तिकडे नकळत फिरायला लागल्यात.
पुर्वी हडप्पा मोहन्जाडो कालीन संस्कृती मध्ये काही पुरावे पहावयास मिळतात. त्याकाळी नुकतीच मशागत होऊन लावणी लावलेली आहे. शेत काही दिवसात अमाप पिक देणार आहे. सुगीचे दिवस जसे जसे जवळ यायला लागतात. त्यावेळी शेतकरी हा आनंदाने बेभान होऊन नाचत - गात अभिनया सोबत स्त्रिया व पुरुष नाच, नृत्य ही करायचे. अशी खरी पार्श्वभूमी आहे. आज ही अनेक ठिकाणी शेतीचे काम करताना गाणी म्हटली जातात. नाच केले जातात तो केवळ आनंद म्हणूनच! खरतर शरीराचा क्षीणपणा निघून जावा, नवीन जागृती संचार निर्माण व्हावा.
आज मात्र काल्पनिक देवीचं स्थान पक्क करून तिच्या अवती भवती गोळा होऊन ढोल नगारे वाजवून नको ते अंग विपक्षेप करून नाचायला लागलेत. हाच दांडिया सामाजिक पातळीचा तळ शोधून धार्मिकतेच्या नावावर काळा पैसा कमवण्याच्या हेतू स्वरुपात साजरा केला जाऊ लागला. याला कल्पनिकतेचा अंधश्रद्धेचा कळस म्हणा अथवा किती प्रभाव या मनुवादी व्यवस्थेने जागृत करून ठेवला आहे. त्यामध्ये केवळ बहुजन समाजातले लोक श्रदेच्या नावाखाली भरडले गेले आहेत. त्यात हुशार ब्राम्हणांची जात हातावर मोजण्या एवढेच असतात.
साधारणत: तीस वर्षापुर्वी खेळला जाणारा गरबा हा धार्मिक स्वरूपाचा होता. तसेच त्याचे स्वरुप ही छोटे खाणीच असायचे. त्यावेळी आजच्या सारखे व्यापक स्वरुप नव्हते. वस्ती अधिक असलेल्या वसाहतीत, त्या - त्या क्षेत्रा पुरते मर्यादित असे. त्या ठिकाणी स्त्री - पुरुष पारंपारिक गरबा नृत्य करायचे. आज ज्या पध्दतीने गरबा आयोजित केला जातो, ज्या पध्दतीने गरबा नृत्य केले जाते त्याचा सारासार विचार करता त्यामागे धार्मिक, पवित्र भावनांचा आणि सांस्कृतिक विधींचा लवलेशही सापडणे दिवसें दिवस दुरापास्त होत चालले आहे. अर्थात आज - कालचे गरबाला असणारे धार्मिक पवित्रतेचे वलय बाजूला पडून त्याठिकाणी एका “मस्त मस्त डिस्को दांडियाने” ती ती जागा घेतली आहे. याच दिवसात तरुण - तरूणींची देखील एकच धावपळ तेवढ्याच जोमाने चालली असते.
खास नविन विकत आणलेली चनीया चोली, लिप्स्टीक, त्याच शेडची नेलपेंट आणि खास ब्युटि पार्लरमधे जाऊन सेट केलेली केशरचन अशी सारी जय्यत तयारी सकाळ पासून चाललेली आहे. सोबतच रात्रीला रंगलेली दिसावी म्हणुन सकाळीच हातावर काढून घेतलेली मनमोहक मेहंदी देखील बऱ्या पैकी रंगलेली असते. ही सारी जय्यत तयारी आहे ती रात्रीच्या गरबा दंडियाची! आणि हो हा सारा खटाटोप केवळ एका रात्री पुरता कशासाठी?
अशा धावपळी मध्ये आपण जर का एखाद्या तरुणीला प्रश्न केला ‘का ग एवढं सारं कशासाठी?’ तर ती नक्कीच आपल्याला शेलकी प्रतिक्रिया देत म्हणेल, कशासाठी म्हणजे काय? वर्षातून एकदाच तर येतो दांडिया सॉलिड धम्माल येत. दहा दिवसात एक तरी दिवस पुरस्काराची लॉटरी ही लागते. पण जेंव्हा या दिवसात चुकून आयुष्याची बरबादी न सांगता येऊ शकते हे तिला कळत नाही. असे अनेक अनैतिक प्रकार घडले जातात. याकडे मात्र कुणी ही लक्ष देत नाही. या सर्व सुंदर दिसण्याच्या प्रयत्नात व दांडिया खेळण्याच्या नादात स्वतःची दांडीगुल होऊन त्यातील अनेक तरूणींच आयुष्य जीवन बरबाद झालेले आहे. दरवर्षी अशा अनेक घटना घडत आहेत. काही वर्षा पूर्वी फोर्ट भागातील विद्यालायतील विद्यार्थिनीवर पाशवी अत्याचार झाला होता तो या दिवसातच. असा पहाटे पर्यंत दांडियाचा जल्लोष चाललेला असतो. आजूबाजूला असणारी रुंग्नालय अधिक डेसिमल असणाऱ्या कर्कश आवाजामुळे भरडून जातात. आजारी माणूस अर्धमेला असलेला शेवटच्या घटकेला येऊन थांबतो. याची चिंता दांडिया खेळणाऱ्या लोकांना नसते. अशी केविलवाणी अवस्था हिंदूसणा मध्ये होते. गुजरात मधून महाराष्ट्रामध्ये आलेल्या या दांडियाने तरूण-तरूणींना अगदी वेडं करून सोडलं आहे. त्यांना मोठया प्रमाणात एकत्र बांधून ठेवलं आहे.
विविध मंडळे या उत्सवाचे आयोजन मोठया प्रमाणात करीत असतात. मात्र आज या उत्सवातील भक्ती बाजूला सारली जाऊन तिथे दिखाऊ वृत्ती प्रस्थापित होऊ लागली आहे. दांडिया रास म्हणजे केवळ भारी वेशभुषा करून, टिपऱ्या हातात घेऊन विद्युत रोषणाईत, मोठया आवाजात डिस्को दांडियाचे नावाखाली कसल्या ही प्रकारचा नृत्य प्रकार करायचा हे प्रमाण वाढीस लागले आहे.तसेच या दांडिया मध्ये सहभागी होणारी जास्तीत - जास्त तरूण मंडळी ही १८ ते २५ या वयोगटातीलच असतात. ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसा मध्ये तरूण - तरूणी मोठ्या आनंदाने. उत्साहाने दांडियाच्या निमित्ताने एकत्र येतात. आणि याचवेळी अचानक दोन भिन्न लिंगी मन एकत्र येतात. एकमेकांशी खुप मन मोकळ्या गप्पा मारतात. बेधुंद होऊन दांडिया खेळतात, आलेले बरे - वाईट अनुभव एकमेकांना सांगतात. एकमेकांजवळ मनं मोकळी करतात. हळूहळू त्यांच्य़त चांगली मैत्री निर्माण होते. आणि दिवसेंदिवस ह्या नऊ दिवसा मध्ये त्यांच्यातील सहवास वाढत जातो. आणि पुढे कालांतराने आपली जवळीक प्रेमात बदलत असल्याचे त्यांना जाणवू लागते.
प्रेम म्हणजे नेमके काय? हे कळत नसतांना ही किशोर वया मध्ये एकमेकां विषयी वाटणारं आकर्षण म्हणजे प्रेम नसतं. ती एक शारीरिक ओढ असते. हे किशोरांना माहित नसतं आणि म्हणूनच ते यास प्रेम समजून बसतात. याच काळा मध्ये त्यांच्या मध्ये लैंगिक बदला विषयी एक आकर्षण जिज्ञासा वाढिस लागलेली असते. त्यांच्या मध्ये वारंवार लैंगिक अनुभव घेवुन बघण्यास प्रवृत्त होतात. ही प्रवृत्ती रोखणे महत्वाचे असते. परंतू प्रेम म्हटले की त्यातून उद्भवणारी लैंगिकता टाळता येत नाही.
‘सोळावं वरीस धोक्याचं म्हणतात ने काही उगीच नाही’ कारण येथे उद्याच्या चांगल्या वाईटाचा विचार नसतो. अशा अनधिकृत प्रेम संबंधातूनच लैंगिक आकर्षण वाढत जाऊन ते शारीरिक सुख उपभोगण्या मध्ये मशगूल होऊन जातात. आणि यातुनच मग घडते ते विकृत प्रेमास बळी जाण्याचे प्रकार आणि बऱ्याचदा अनेक जण नशा करून ही दांडियात सहभागी होत असतात. तरूणींची छेडछाड होते पारंपारिक संस्कृतीच्या नावाखाली चंगळवादाला खतपाणी देणाऱ्या तरुणांमुळे वातावरणातील पार बिघडून जाते . आज दांडिया म्हणजे एन्जॉय असं समीकरण झालं आहे. या एन्जॉयच्या माध्यमातून प्रकाशात दिसणारी अंधकाराची, वाईट विचार प्रवृत्तीची बीजे पेरली जाऊ लागली आहेत. आणि हीच संकल्पना रूढ रुंदावत चालली आहे. प्रत्यक्षात समाजातील अविवेकी, अविचार व असंस्कृत कु - प्रवृत्तिचा दाट अंधार डोळ्या समोर जाणवत आहे.
पूर्वीचे राजे महाराजे या नाच गरब्यातून एखादी आवडत्या स्त्रीला उपभोगण्यासाठी सुद्धा वापर करीत असत किंवा तिला कायमची रखेली म्हणून ठेवत असतं. तसे आजही त्याचेच अनुकरण होत आहे. आणी तीच विकृती वाढीस लागली आहे. गेल्या वर्षी केवळ मुंबईत या दांडिया नऊ दिवसात लाखोच्या घरात निरोध मेडिकल दुकानातून विकले जातात त्याच बरोबर लाखाच्या घरात गर्भपाताच्या केसस समोर येतात असा हा दांडियाचा किळसवाना प्रकार या गुजरात पासून देशभर 'डेंगी" सारखा पसरतो आहे. याच्या वर कोणाचे ही नियंत्रण नाही. त्यामुळे अधिकच गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. याकडे सरकार न्यायालय लक्ष देईल का? दांडिया याचा खरा अर्थ दांडी मारणे. उदा: शाळेला दांडी मारणे, दांडिया म्हणजेच वाईट गोष्ट करणे,चाट देणे फसविणे. याचाच अर्थ या दांडिया माध्यमातून आपण कुणाला तरी फसवत आहोत, फसवून स्वतः बरोबर दुसऱ्या कोणाचे तरी आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न करीत आहोत. कुणाला तरी बदनाम करण्याचा हेतू या दांडियाच्या नऊ दिवसात घडणार आहेत. कोणाचं तरी आयुष्य कायमच लोप पावणार आहे. कोणाच्या तरी कुंटुबाला बदनामीला तोंड द्यावे लागणार आहे. अनेक अनैतिक प्रकार घडणार आहेत. याचा विचार मनापासून केला तर सहज वाटायला लागते. या क्षणाला आता, आजच हे सारं थांबणे महत्वाचे आहे. आपण जुन्या प्रथांना कवटाळुन बसावं की टाळावे?
या सर्व विकृतीतून, प्रकारातून मुक्त होणं म्हणजेच देशातील गरीब लोकांच्या सहवासात राहणे त्यांचा विचार करणे होय. प्रत्येक नऊ दिवशी नवीन कपडे घालता त्यापैकी एक दिवसाचा कपडा अनाथ आश्रम किंवा गरीब शिकणाऱ्या मुलांना द्याल किंवा त्याला लागणारी शाळेची पुस्तके द्याल तर कदाचित तो या देशाचा निस्वार्थी अनुयायी बनेल कदाचित या देशाच, राज्याच, गावाच, घराच, नेतृत्व तो करेल ही भावना, आस्था, संकल्प आपण प्रत्येकानी आपल्यात निर्माण केला तर हा देश विज्ञान युग म्हणून आकाशात गरुड झेप घेतल्या शिवाय राहणार नाही, तो घेणारच! असा आत्म विश्वास स्वतः पासून निर्माण करा क्षितीजाला ही काही क्षणात जवळ कराल.
●◆●
आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
राजेश सावंत (लेखक, कवी एवं युवा मार्गदर्शक)
"आसरा शैक्षणिक आणि सामाजिक संस्था"
❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖
प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
═══════════════════════
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆
• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा
धन्यवाद ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा