रविवार, ३ सप्टेंबर, २०१७

● ३७० व्या कलमास बाबासाहेबांचा होता तीव्र विरोध

● ३७० व्या कलमास बाबासाहेबांचा होता तीव्र विरोध

२६ ऑक्टोबर १९४७ ला काश्मीरच्या सामिलीकरणावर स्वाक्षऱ्या झाल्या. काश्मीरच्या संरक्षणासाठी भारतीय सैन्य हवाई मार्गे श्री नगरला पोचले. यात प्रामुख्याने महार रेजिमेंटचा सहभाग होता. भारतीय सैन्याने पाक सैन्याचा पराभव करून बारामुल्ला परत घेत आणि श्री नगर सुरक्षित ठेवले. नेहरूंनी माउंट ब्याटनच्या सांगण्या वरून हा प्रश्न युनोत नेण्याचा निर्णय घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रश्न लगेच युनोत न नेता आणखी थोडे थांबा. पूर्ण काश्मीर ताब्यात घेण्याची हीच संधी आहे. सैन्यास आणखी पुढे जाण्याचा आदेश द्या, असा सल्ला नेहरू याना दिला. पण बाबासाहेबांचा हा सल्ला न ऐकता नेहरूंनी युनोत हा प्रश्न मांडला. युनोत दोन्ही देशांना युद्ध बंदीचा आदेश दिला. तेव्हा पासून पाक व्याप्त काश्मीरचा प्रश्न रेंगाळला आहे. १९५१ ला बाबासाहेबानी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची जी कारणे होती, त्यात काश्मिर बाबत '३७० वे कलम' आणि नेहरू यांची निर्णय घेण्याची पद्धती हि महत्वाची कारणे होती.

काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० वे कलाम घटनेत घेण्यास बाबासाहेबांचा सुरुवाती पासूनच तीव्र विरोध होता. या कलमातील तरतुदी भारतीय संघ राज्याच्या संरचनेत अंत: विरोध करणाऱ्या होत्या. या कलमानुसार काश्मीर बाबत भारत सरकारला केवळ परराष्ट्र धोरण, संरक्षण आणि दळण - वळण या बाबतीत कायदे करण्याचा किंवा धोरण ठरवण्याचा अधिकार असणार होता. काश्मिर बाबत इतर कोणता ही निर्णय घ्यायचा असल्यास काश्मीर विधान सभेची संमत्ती आवश्यक राहील.

३७० व्या कलमानुसार भारतीय संविधानातील कोणतीच तरतूद काश्मीरसाठी लागू असणार नाही. अशा अनेक तरतुदी यात होत्या. अशा तरतुदींना मी मान्यता देणार नाही, असे बाबासाहेबानी काश्मिरी नेते "शेख अब्दुल्ला" याना सुनावले. तेंव्हा "शेख अब्दुल्ला" हे नेहरूंकडे गेले. नेहरूंनी त्यांना सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. कारण पटेल हे बाबासाहेबांचे मित्र होते. शेख यांचे पटेल यांनी एकूण घेतले. मात्र बाबासाहेब अशा चुकीच्या गोष्टींना थारा देणार नाही. हे त्यांना माहित असल्याने पटेल व शेख हे दोघे ही मसुदा समितीचे एक सदस्य जे. गोपालस्वामी अयंगार यांच्याकडे गेले. पंडित नेहरूंच्या सूचनेनुसार अयंगार यांनी ३७० वे कलाम स्वतः च्या अधिकारा खाली घटनेच्या मसुद्यात समाविष्ट केले. बाबासाहेब नेहरूंच्या अशा वागण्यावर खूप नाराज झाले. बाबासाहेबांचा सल्ला न ऐकल्याने ३७० व्या कलमामुळे आज कश्मीर वाद चिघळला आहे.

संदर्भ -
समग्र बाबासाहेब (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध कार्य पैलूंचा संशोधनात्मक वेध घेणारा महाग्रंथ)

संपादक -
बाळासाहेब मागाडे

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा