● खेडी, शहर आणि स्थलांतर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नामांतर, स्थलांतर, धर्मांतर आणि राष्ट्रांतर अशी चतु: सूत्री मांडली होती. मात्र यातील राष्ट्रांतर शक्य नसल्याने पहिल्या तीन सूत्रांचाच त्यांनी विचार केला, इतकेच नव्हे तर त्यानुषंगाने कृती ही केली. स्थलांतराच्या संदर्भात त्यांचे म्हणणे असे की, इथलं प्रत्येक खेडं हे विषमतेचं नमुनेदार उदाहरण आहे. तेव्हा त्यांनी ‘खेडी सोडा, शहराकडे चला’ असे आवाहन केले: लोकांनीही काही प्रमाणात का असेना या आदेशाचे पालन केले. लोक शिक्षणाच्या - नोकरीच्या निमित्ताने शहरात येऊ लागले.
सुरुवातीच्या काळात त्यातील बहुसंख्य लोक झोपड पट्टीत राहू लागले, तेव्हाही अशीच टीका होऊ लागली, नव्हे आज ही ती टीका होत आहे की - खेडी सोडून तुम्ही शहरात आलात आणि येथे ही झोपड पट्टीतच राहायला लागलात मग तुमच्यात फरक तो काय पडला? म्हणजे तुम्ही खेड्यातच राहिले पाहिजे, हिंदू धर्मातच राहिले पाहिजे, असा त्यांचा आदेश. पण त्यांना तूर्त इतकेच सूचित करावे लागले की खेड्यातून शहरात आलेली पहिली पिढी कदाचित झोपड पट्टीत राहिली ही असेल पण त्याचीच दुसरी आणि तिसरी पिढी आता कुठे राहते याचा शोध घ्या म्हणजे स्थलांतराची किमया कळेल! आणि आपल्या मुख्य विषयाच्या संदर्भात बोलायचं तर यापैकी जातीय अत्याचाराचे किती बळी पडले! जसे की आज अहमदनगर जिल्ह्यातील खेड्या मधून अत्याचार होत आहेत. त्यात ही एक बारीकसा फरक करता येतो आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे. खेड्यात उच्चजातीय लोक मागासलेल्या जातींना मारतात. अगदी जीवे मारतात.
शहरात असं काही घडलं तर फार तर मारामारी होऊ शकते. खेड्यात फक्त मार खावा लागतो. आणि याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा, त्याच समाजातील खेड्यातून शहरात आलेला माणूस त्या जुनाट, टाकाऊ व्यवस्थेतून मुक्त झालेला असतो. मागासलेल्या समाजाचं खेड्यात जगणं आणि शहरात जगणं हे वर वर पाहता अनेकांना सारखंच वाटत असेल. विशेषत: केवळ आर्थिक जीवनाला प्राधान्य देणाऱ्या विचारसरणीच्या लोकांना, पण त्या मधील फरक कोणाला नीट समजून घ्यावा लागेल.
वास्तविक हा मुद्दा जातीय अत्याचार प्रतिबंधात्मक उपायांशीही निगडीत आहे. म्हणून जातीय अत्याचार प्रतिबंधात्मक म्हणा किंवा निर्मूलनाचे एक पाऊल म्हणा आजही पुन्हा एकदा ‘खेडी सोडा आणि शहराकडे चला’ हे अभियान कृतीशील करण्याची गरज आहे. ज्यांच्यावर जातीय अत्याचार झालेत त्यांना वेगवेगळ्या एजन्सी कडून (आणि प्रशासना कडून ही) आर्थिक मदत मिळते. पण त्यांना पुन्हा तिथेच राहावे लागते. मग त्यांच्यावर पुन्हा अत्याचार होतो. तेव्हा निदान अशा अत्याचार ग्रस्त लोकांचे तरी शासनाच्या वतीने शहरात निवास आणि प्रतिष्ठित उदर निर्वाहाच्या साधना सह स्थलांतर करावे. याही पुढे जाऊन ज्यांना खेड्यात असुरक्षित वाटते अशा सर्वांचीच प्रतिष्ठित उदर निर्वाहाच्या साधना सह शहरात स्थलांतर करावे.
●◆●
आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
वैभव जाधव : मुंबई (विचारवंत एवं युवा मार्गदर्शक)
❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖
धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
═══════════════════════
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆
• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा
धन्यवाद ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा