● वैज्ञानिक दृष्टिकोन, धार्मिकता आणि आपण
लेख -
वसंत वाघमारे : मुंबई
◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆
वैज्ञानिक दृष्टिकोन हा स्थायीभाव असावा, धार्मिकता नव्हे!
पाश्चिमात्य देश आणि पौरात्य देश यांच्यातील सामाजिक व आर्थिक प्रगतीचा आलेख पाहिला, तर आपणास असे निदर्शनास येते की, पाश्चिमात्य देशा पेक्षा पौरात्य देश अजून ही अप्रगतशील आहेत. पाश्चिमात्य देशांनी वैज्ञानिक दृष्टिकोन विचार सरणी स्वीकारली आणि धर्माला महत्व न देता, विज्ञानाला महत्व देऊन औद्योगिक क्रांती केली. यामुळे झाले की, या औद्योगिक क्रांतीमुळे नवनवे शोध लागले, नव्या यंत्राचा शोध लागला, त्याचा त्याचा उपयोग मानवाच्या सुखासाठी, प्रगतीसाठी उपयोगात आणला गेला.
धर्म हा घरा पूरता मर्यादित ठेवला. म्हणून पाश्चात्य देश पौरात्य देशापेक्षा अनेक पटीने पुढे आहेत. आणि म्हणून ब्रिटन सारखा छोटासा देश एकेकाळी आख्या जगावर राज्य करीत होता. हे सर्व धार्मिक बळावर नसून, वैज्ञानिक दृष्टिकोन स्विकारल्यामुळे नवीन शास्त्राचा शोध लावून, इतरांवर आपला प्रभाव टाकला. त्यांना अंकित केले. याच बरोबर पाश्चात्य देशात वैचारिक विचाराची क्रांती झाली. आणि पुरोगामी विचार पुढे आला.
जुन्या चाली रीती व प्रथा नाकारल्या. जनतेला सामावून घेत लोकशाहीची निर्मिती केली. आणि लोकशाहीला पूरक असलेली विचार सरणीची संस्थापना केली. म्हणजे एकूणच पाश्चिमात्य देश आधुनिक पुरोगामीत्वाला पाठबळ दिले आणि माणसाच्या प्रगतीला केंद्रबिंदू ठरविले. परिणामी पाश्चिमात्य देश विकास करू शकले आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा त्यांचा स्थायीभाव झाला. धर्माला गौणत्व दिले. म्हणजेच धर्म हा घरापूरता मर्यादित ठेवला गेला.
आपण (भारत देश) विकासा मध्ये मागे का राहिलो याचा विचार केला तर याचे कारण धार्मिक समाज रचना हे होय. मुख्य म्हणजे धर्माने जाती व्यवस्थेची कृत्रिम निर्मिती करून श्रेष्ठ - कनिष्ठत्व, स्पर्शा - स्पर्श असा भेद करून अमानवी आणि घटक विचार सरणी भारतीयांच्या गळी उतरवली. यात आध्यात्म घुसडून मांडल, दैववादी बनविले. यामुळे बौद्धिक विचाराची पातळी गाठण्यासाठी जी विचार शक्ती लागते, तिला वाढूच दिले नाही. त्यात एक विशिष्ठ अशा वर्गसमूहांचा स्वार्थहेतु दडलेला आहे. याला संकुचित विचार म्हटले तर वावगे ठरणार नाही.
वैज्ञानिक दृष्ठीमुळे विचाराची पातळी अधिक विस्तारते आणि आधुनिक पुरोगामी विचार सुपीक डोक्यातून प्रस्तूत होतात. याला विशाल दृष्ठीकोन असावा लागतो. त्यासाठी विज्ञानवादी बनावे लागते. परंतु या देशात धार्मिक वर्चस्व जास्त असल्यामुळे जनता धार्मिक कर्मकांडात अडकून पडली आणि दैववादी बनली, भजन, कीर्तनात रमली आणि संशोधवृत्ती गमावून बसली.
इतिहासकार वि. का. राजवाडे यांनी म्हटले आहे की - पाश्चिमात्य देशात जेंव्हा औद्योगिक क्रांतीचे वारे वाहत होते, नव नवे यंत्र शोधण्यात गर्क होते. तेंव्हा पौरात्य देश (भारत देशातील) जनतेला देवाच्या नादी लावून टाळ कुटण्यात दंग केले. म्हणजे यांना विज्ञानाचा थांग पत्ताच नव्हता. आणि म्हणून पाश्चात्य देशापेक्षा पौरात्य देश शंभर योजने मागे आहेत. आणि म्हणून आपण लक्षात घेतले पाहिजे की, मानवाची प्रगती धार्मिक विचाराने नव्हे, तर वैज्ञानिक विचार सरणी स्वीकारल्यामुळे होते. प्रथम देश्याच्या प्रगतीचा विचार होणे हे सर्वांच्या हिताचे आहे.
धर्म हे आपल्या घरा पूरते मर्यादित ठेवणे हे आधुनिक विचार सरणीचे व शहाणपणाचे आहे. आपण सर्व प्रथम भारतीय आहोत, ही भावना वाढीस लावण्यासाठी वैज्ञानिक दृष्ठीकोनच हितावह ठरेल, धार्मिकता नव्हे.
आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
वसंत वाघमारे : मुंबई
(संपादक : साप्ताहिक प्रबुद्ध नेता)
❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖
प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
═══════════════════════
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆
• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा
धन्यवाद ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा