गुरुवार, १४ सप्टेंबर, २०१७

● पुतळा

● पुतळा

गेली कित्येक वर्ष,
मी असाच ईथे आहे उभा ।
चालण्या फिरण्याची,
थोडी नाही मला मुभा ।।धृ।।

सारं काही मी,
माझ्या डोळ्यांनी या बघतो ।
ऊन - पाउस - वारा,
थंडी सारं काही सोसतो ।।१।।

सकाळी येऊन बसतात,
अंगावर माझ्या पक्षी ।
कपड्यांवर ते माझ्या,
करून जातात नक्षी ।।२।।

आजु बाजुला माझ्या,
लावली आहेत झाडं त्यानी ।
एक म्हातारा रोज,
सकाळी त्यांना टाकतो पाणी ।।३।।

दिवस चढता दिसू,
लागतात माणसांचे लोंढे ।
सहन करतो दिवसभर,
मग गाड्यांचे मी भोंगे ।।४।।

भर उन्हात भाजुन,
निघते रोज माझी काया ।
डोक्या वरती छतरी,
बांधून देईल कोणी छाया ।।५।।

होते संध्याकाळ,
अजुन दिवस एक सरतो ।
आजु बाजुला माझ्या,
ठेल्यांचा मेळावा भरतो ।।६।।

एक वेडा रात्री रोज,
सोबतीला असतो माझ्या ।
झोपतो पायाशी,
फाटक्या चादरीवर त्याच्या ।।७।।

ओळख माझी मला,
ना माहीत इथे कुणा ।
मी आहे पार्क,
समोरचा पुतळा एक जुना

कवी -
अनामिक (कवीचे नाव नसलेल्या कविता)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा