शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०१७

● राजा लाचारी अशी रे (हास्य कविता)

● राजा लाचारी अशी रे...

राजा लाचारी अशी रे,
पैकं दिलं मत मला दे ।।धृ।।

इंजिनाचा माझा धनी,
बळ सेटिंगच आलंया ।
हजाराच्या नोटामदी,
ट्रंक भरून गेलीया ।
ओढ राजाला सत्तेची,
जशी खाज राजकारणाची
खादी भजनाला लागू दे ।।१।।

राजू भेटला दादाला,
युती साठी बंगल्यावर ।
खुळ्या आनंदात त्याच्या,
घड्याळ काका मागावर ।
भरजरीचा हिरवा,
शेला पांघरून निळा ।
समाज हा सारा भुलू दे ।।२।।

थेंब नव्हं हे घामाचं,
ज्याचं बनतील मोती ।
घास खाइन फुकाचा,
लई मायाळू ही युती ।
न्याहारीच्या वखुताला,
सांजच्या इसाव्याला ।
नगरपालिका ही मिळू दे ।।३।।

कवी -
मिलिंद धुमाळे

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा किंवा खालील लिंक ओपन करा.

सूचना -
आपण फक्त एकाच समूहात सामील होऊ शकता.

◆ BSNET INDIA :
https://chat.whatsapp.com/HHbSpflXc8Y8Juwa5WbNqy

◆ BSNET INDIA (1) :
https://chat.whatsapp.com/HHbSpflXc8Y8Juwa5WbNqy

◆ BSNET INDIA (2) :
https://chat.whatsapp.com/58XH9KINHuVL5OOMVoTADh

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा