शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

● आर्थिक व्यवहार बाबतचा बौद्ध दृष्टीकोन

● आर्थिक व्यवहार बाबतचा बौद्ध दृष्टीकोन

मनुष्यांच्या सर्व आर्थिक क्रियांचे अंतिम उद्दिष्ट सुख व समाधान मिळविणे हेच असते. सुख - समाधान ही व्यक्ती अपेक्षा बाब आहे. यामुळे कोणत्या व्यक्तीला कशामुळे सुख-समाधान मिळेल हे शासन संस्थेला अथवा बाह्य शक्तीला ठरविता येत नाही.मात्र व्यक्तिगत सुख प्राप्ती करतांना इतरावर अन्याय होऊ नये, सभोवतालचे पर्यावरण बिघडू नये, सामाजिक स्थैर्य धोक्यात येऊ नये या किमान बाबींची खबरदारी घेणे हे प्रत्येक व्यक्तीचे मानवी कर्तव्य आहे. यामुळे मनुष्याच्या आर्थिक वर्तन व आर्थिक व्यवहारास नैतिक मुल्यांचा आधार असणे आवश्यक आहे. व्यक्तीचे नैतिक वर्तन व आर्थिक वर्तन आणि अर्थ व्यवहार याबाबत मुक्त अमेरिकन भांडवलशाही दृष्टीकोनआणि हिंदू दृष्टीकोन याचा अभ्यास केल्या नंतर आपणास असे दिसून येते की, आर्थिक व्यवहार व वर्तन या बद्दलचा अमेरिकन दृष्टीकोन किमान मानवी मुल्यांची जाण ठेवणारा परंतु स्वेच्छाचारी स्वरूपाचा आहे. तर हिंदू दृष्टीकोन कोणत्याही मुल्यांची जाण न ठेवणारा अनाचारी स्वरूपाचा आहे. हे दोन्ही दृष्टीकोन पाशवी प्रवृत्तीचे म्हणजेच जो बलवान किंवा अनीतिमान त्याला यश मिळण्याची अधिक संधी (Survival Of टhe Fittest) देणारे आहेत. अशा प्रकारच्या आर्थिक दृष्टीकोणामुळे जगातील मनुष्य समूह मध्ये परस्परा विषयी इर्षा, द्वेष, घृणा वाढीस लागली आहे. यातून मानवी समूह एकमेकांचा नाश करण्याच्या मानसिकतेने युद्ध सज्ज आहेत. या पार्श्वभूमी वर मनुष्याचे आर्थिक वर्तन व आर्थिक व्यवहार मनुष्य समूह मध्ये प्रेम, आपुलकी निर्माण करणारे, दुर्बलांप्रती करुणा बाळगणारे, बलवानाला यश मिळण्याची अधिक संधी देतानाच दुर्बलांचा संपूर्ण विनाश होणार नाही याचीं काळजी घेणारे होतील असा आर्थिक दृष्टीकोन विकसित करणे शक्य आहे काय? हे तपासून पहिले पाहिजे. या दृष्टीने आर्थिक व्यवहार बाबतचा बौद्ध दृष्टीकोन कसा आहे, याचा अभ्यास केला पाहिजे.

• बुध्दाचा संपत्तीविषयक दृष्टीकोन :

बुद्धाने व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि समतेचा पुरस्कार केला, बुद्धाने मानव जातीला शांती आणि अहिंसेचा संदेश दिला या बाबी सर्वमान्य आहेत. मात्र बुद्धाचा संपत्ती विषयक दृष्टीकोन काय होता याबाबत फारशी चर्चा बौद्ध धर्मीय अभ्यासक तसेच इतर अर्थतज्ञ करताना दिसत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाची तुलना कार्ल मार्क्स या कम्युनिष्ट तत्वज्ञांशी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध कार्ल मार्क्सला उत्तर देतो काय? असा प्रश्न उपस्थित करून या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर दिले आहे. बुद्धाने भिक्खू संघात खाजगी मालमता धारण करण्यास मनाई केली आहे. यामुळे बुद्ध खाजगी संपत्ती धारण करण्याचा विरोधक होता. समाजवादी विचार सरणीच्या जवळचा होता अशी ही मांडणी काही आंबेडकरवादी विचारवंत व्यक्ती कडून करण्यात आली आहे. याबाबत नेमकी वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.

व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी चार प्रकारच्या मुलभूत गरजांची पूर्तता झाली पाहिजे असे बुद्ध म्हणतो. (चत्तारो पच्चया) यापैकी अन्न मिळणे ही प्रथम गरज आहे ही बाब बुद्धाने अधोरेखित केली आहे. (सब्बे सत्ता आहारतीत्त्ठीका - अभिधम्म पिटक). भूख हा सर्वात मोठा रोग आहे असे बुद्धाचे निदान आहे. (जिगिच्छा परमा रोगा - धम्मपद २०३) त्यानंतर वस्त्र, निवारा आणि औषधोपचार या गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे. दरिद्री मनुष्य या चार प्राथमिक गरजांची पूर्तता करण्यास असमर्थ ठरतो. म्हणून दारिद्य हे सर्वोच्च दुःख आहे असे बुद्ध निक्षून सांगतो. (दलिद्दीयम' पिदुखं लोकास्मिम). दारिद्य असेल तर मनुष्य सुखी जीवन जगू शकत नाही. दरिद्री मनुष्य धम्माचे (नैतिक आचरण) योग्य पालन करू शकत नाही. यामुळे सामाजिक समस्या निर्माण होतात असे बुध्दाचे मत आहे. चक्क्वत्ति आणि कुटदंत सुत्तात बुद्धाने हे स्पष्ट केले आहे की, समाजाचे नैतिक अध:पतन होण्याचे प्रमुख कारण दारिद्य आहे. यामुळे समाजात दारिद्य वाढू नये याची खबरदारी राज्याने घेतली पाहिजे. यासाठी राजाने कोणताही भेदभाव न करता जनतेच्या कल्याणासाठी धन वाटप केले पाहिजे (सब्बे जनस्स अनावता) जेणे करून राज्यामध्ये अशांतता निर्माण होणार नाही असा उपदेश बुद्धाने केला आहे.

बुद्धाचा आर्थिक व्यवहाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन नैतिक नीती (Morality) आणि सामाजिक रिती (Modality) लक्षात घेऊन केलेल्या नीती - रीतीच्या संयोगातून विकसित झालेला आहे. आर्थिक व्यवहार करताना आपल्या सभोवतालील इतर मनुष्यांना व मनुष्येत्तर प्राण्यांना उपद्रव होईल अशा मार्गाचा अवलंब करू नये असा दृष्टीकोन बुद्धाने मांडला आहे. यालाच बुद्धाने सम्यक आजीव असे म्हटले आहे. व्यक्तीने आपल्या निर्वाहासाठी व्यवसाय निवडताना समाज हितासाठी घातक असलेले व्यवसाय निवडू नयेत असा बुद्धाचा उपदेश आहे. तत्कालीन परिस्थिती नुसार...

१) माणसाचा - गुलामांचा व्यापार (सत्ता वाणिज्ज)

२) कत्तलीसाठी जिवंत प्राण्याचा व्यापार

३) शस्त्रांचा व्यापार (सत्थ वाणिज्ज)

४) विषाचा व्यापार (वीसं वाणिज्ज)

५) मांसाचा व्यापार (मांस वाणिज्ज)

६) मादक द्रव्य - पेय (मज्जा वाणिज्ज)

यांचा व्यापार हे सहा प्रकारचे व्यवसाय बुद्धाने समाज हितासाठी अपायकारक मानले आहेत. याचाच अर्थ केवळ नफा मिळतो म्हणून समाजाचे अहित होईल असे व्यवसाय करू नये असा बुद्धाचा उपदेश आहे.

• बुध्दाची खाजगी संपत्तीस मनाई नाही :

बुद्धाने खाजगी संपत्ती धारण करण्यास विरोध केलेला नाही. या संदर्भात बुद्धाने तत्कालीन धनाढ्य व्यापारी अनाथ पिंडक याला केलेल्या उपदेशातून बुद्धाचा खाजगी मालमत्ते विषयीचा दृष्टीकोन स्पष्ट होतो. अनाथ पिंडकाला उपदेश करताना बुद्ध सांगतो की, व्यक्तीने कायदेशीर मार्गाने संपत्ती कमावली पाहिजे तसेच आपले नातेवाईक कायदेशीर मार्गाने संपत्ती कमावतात किवा नाही यावर लक्ष ठेवले पाहिजे. यामुळे व्यक्तीला संपत्तीची मालकी मिळाल्याचे समाधान (अत्थि सुख) आपल्या मित्र आणि नातेवाइक इत्यादी सोबत संपत्तीचा उपभोग घेण्याचे व दुर्बलांना दान देण्याचे समाधान (भोग सुख) कर्ज मुक्त असण्याचे समाधान (अनन्न सुख) आणि कोणालाही न दुखावता कायदेशीर मार्गाने संपत्ती मिळविल्याचे समाधान (अनवज्जा सुख) या चार प्रकारच्या सुखाची प्राप्ती होते. असे बुद्धाने म्हटले आहे. हत्थक आलवक याच्याशी झालेल्या संवादात हत्थकाने जेव्हा दरिद्री माणसाच्या बोलण्या कडे कोणीही लक्ष देत नाही, म्हणून मी भरपूर ऐश्वर्य कमावले आहे असे बुद्धास सांगितले, तेव्हा बुद्धाने त्याची प्रशंसा करून हत्थका तुझे म्हणणे बरोबर आहे असे त्यास सांगितले.

संविज्जंति खो पन मे भंते कुले भोगा।
दलिदस्स खो नो तथा सोतब्बं मञ्ञंति।।

वैशाली येथील महावनातील कुटागार शाळेत आपल्या शिष्यांना केलेल्या उपदेशात सांगितले की, भिक्खुनो, जी व्यक्ती धन - धान्य, पुत्र - पौत्र, गुरे - ढोरे यांनी संपन्न असते अशी ऐश्वर्य संपन्न व्यक्ती त्याचे नातलग, मित्र तसेच राजा यांच्या दृष्टीने यशस्वी व्यक्ती असते. या सर्व उदाहरणा वरून बुद्धाने गृहस्थाना खाजगी संपत्ती धारण करण्यास मनाई केलेली नाही हे सिद्ध होते.

• दारिद्र्य हे दु:खाचे कारण :

मनुष्य जेव्हा दरिद्री बनतो तेव्हा तो दुसऱ्या कडून कर्ज घेतो. कर्जाची परतफेड वेळेवर न केल्यास कर्ज देणारा मनुष्य कर्जदाराचा छळ करतो, त्याचा सर्वां समक्ष अपमान करतो. यामुळे मनुष्याला शारिरिक व मानसिक दुःखाचा सामना करावा लागतो. असे बुध्दाने अंगुत्तर निकायात स्पष्ट केले आहे. दारिद्य हे दुःखाचे प्रमुख कारण असल्यामुळे मनुष्याने कष्टपुर्वक कमावलेल्या संपत्तीची गुंतवणूक योग्य प्रकारे केली पाहिजे असे बुध्दाचे मत आहे. या संदर्भात "सिगालोवाद सुत्तात" केलेल्या उपदेशात बुध्दाने सांगितले आहे की, व्यक्तीने आपल्या उत्पन्नाचे चार भाग केले पाहिजेत. या पैकी एक भाग स्वत:च्या निर्वाहासाठी, दोन भाग उत्पादक गुंतवणूकी साठी आणि चौथा भाग भविष्यात उद्भवणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी बचत यासाठी केला पाहिजे. गुंतवणुकीचे बुध्दाने चार पकार सांगितले आहेत.

एकेना भागे भुज्जेय, द्विही कम्मम पयोजये ।
चतुत्थम च निधापेय्या आपदासु भविस्सति ।।

१) अचल संपत्तीमध्ये गुंतवणूक (थावरा)

२) चल संपत्तीमध्ये गुंतवणूक (जंगमा)

३) कला - कौशल्य शिकण्यासाठी गुंतवणूक (अमगासना)

४) मृत्यू नंतर प्राप्त होणाऱ्या लाभासाठी गुंतवणूक (अनुगामिका)

मनुष्याने जिवंत असताना सामाजिक कल्याणासाठी दान देणे दुर्बल व अनाथ लोकांच्या भल्यासाठी व्यवस्था करणे इत्यादी कामा मध्ये गुंतवणूक केल्यामुळे त्याची ख्याती व्यक्तीच्या मृत्यू नंतर ही टिकून राहते. यामुळे या प्रकारची गुंतवणूक केली पाहिजे. असे बुध्दाचे मत होते.

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
सुनील खोब्रागडे (संपादक : दैनिक जनतेचा महानायक, मुंबई)

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा किंवा खालील लिंक ओपन करा.

सूचना -
आपण फक्त एकाच समूहात सामील होऊ शकता.

◆ BSNET INDIA :
https://chat.whatsapp.com/HHbSpflXc8Y8Juwa5WbNqy

◆ BSNET INDIA (1) :
https://chat.whatsapp.com/HHbSpflXc8Y8Juwa5WbNqy

◆ BSNET INDIA (2) :
https://chat.whatsapp.com/58XH9KINHuVL5OOMVoTADh

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा