रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

● शीलवान छत्रपती

● शीलवान छत्रपती

शिवरायांच्या छाये खाली,
कधीच नव्हती वाण ।
आनंदाने नांदत होते,
हिंदू - मुसलमान ।।धृ।।

काळ्या रात्री तळपत होतं,
जिच्या रूपाचं उन ।
अशी देखणी होती,
एका मुस्लिमाची सून ।।१।।

त्या तरूणीला आई म्हणाला,
राजा तो शीलवान ।
आनंदाने नांदत होते,
हिंदू - मुसलमान ।।२।।

बांधीत होता मस्जिद,
ईथे अन तेथे मंदिर ।
त्या शिवाच्या चरणी,
झुकले सदैव माझे शीर ।।३।।

अशा नराच्या पुतळ्या,
पाशी अजून झुकते मान ।
आनंदाने नांदत होते,
हिंदू - मुसलमान ।।४।।

वामन वाणी शिवरायाला,
करतो मी वंदन ।
मला न आवडे जात
आणि धर्माचे बंधन ।।५।।

असाच माझा शिवबा होता,
माणुसकीची खाण ।
आनंदाने नांदत होते
हिंदू - मुसलमान ।।६।।

कवी -
वामन कर्डक

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा