● डॉ. आंबेडकर आणि लोकशाही
"Beware of Democracy" नावाचे वा शीर्षकाचे डॉ. आंबेडकरांचे कुठले ही भाषण नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे (BAWS) खंड १० मध्ये पान क्रमांक १०६ वर २० वे प्रकरण जे आहे ते एक भाषण असून त्याचे Indian Federation of Labour, 30 Faiz Bazar, Delhi यांनी "Labour and Parliamentary Democracy" या शीर्षकाने प्रकाशन केलेले आहे ज्याची तळटीप पान क्र १०६ वर आहे. सदर भाषण डॉ. आंबेडकरांनी ८ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर १९४३ दरम्यान दिल्ली येथे Indian Federation of Labour यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या All India Trade Union Workers Study Camp च्या समारोपा प्रसंगी १७ सप्टेंबर १९४३ ला दिलेले आहे. जे १८ सप्टेंबर १९४३ च्या फ्री प्रेस जर्नल मध्ये ही याच शीर्षकाने छापून आलेले आहे. या भाषणाच्या सुरुवातीच्या विवेचनात बाबासाहेबांनी Parliamentary Democracy ही Legislature, Executive Body आणि Judiciary Control याचे विवेचन केलेले असून याच्या सुरुवातीच्या विवेचनातच बाबासाहेब एक वाक्य म्हणतात - "Beware of Parliamentary Democracy, it is not the best product, as it appeared to be." हे वाक्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे (BAWS) १० च्या पान क्र १०७ वर आहे. बाबासाहेबांच्या भाषणात आलेल्या या वाक्याचा आधार घेऊन बाबासाहेब हे संसदीय लोकशाहीच्या विरोधात होते अशी आवई काही लोकं उठवत असतात. किंवा लोकशाहीपासून सावधान राहा असा शब्दशः अर्थ घेतला जातो. पण माझ्या मते याचा अर्थ कामगारांनो लोकशाही जाणून घ्या, तिच्या यशापयशाची कारणे जाणून घ्या असा वाटतो. पण बाबासाहेब खरच संसदीय लोकशाहीच्या विरोधात होते का? या एकूण भाषणात आणि या वाक्यातून बाबासाहेबांना नेमके काय अभिप्रेत होते, आणि डॉ. आंबेडकरांचे स्वतःचे एक दर्शन शास्त्र आहे त्यात संसदीय लोकशाही या महत्वाच्या विषयावरचे त्यांची रिपब्लिकन संकल्पनेतील दृष्टी काय यासाठी हा उहापोह. या भाषणाचे ढोबळ चार भाग करता येतील.
1) Parliamentary Democracy चे स्वरूप
2) Parliamentary Democracy ला नाकारलेले देश व नाकारण्याची कारणे
3) Parliamentary Democracy च्या मर्यादा
4) भारतीय कामगारांनी घ्यायची भूमिका.
पहिल्या भागात डॉ आंबेडकर संसदीय लोकशाहीचे स्वरूप मांडतात ज्यात Legislature, Executive body आणि Judiciary Control असे स्वरूप आहे. इटली जर्मनी रशिया आणि स्पेन हे देश हुकूमशाही प्रणव असल्याने या देशात संसदीय लोकशाही नाकारली गेली किंवा अपयशी ठरली. तिची कारणे मांडताना बाबासाहेब म्हणतात - "Why has Parliamentary Democracy failed? In the country of the dictators it has failed because it is machine whose movements are very slow. ज्यात विधिमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका यांच्यातील मतभेदांवर बाबासाहेब बोट ठेवतात. हुकूमशाह देश नाकारतात पण हुकूमशाहीला विरोध करणारे देशही संसदीय लोकशाही नाकारतात कारण संसदीय लोकशाही ही तीन दिशेने जाते असे बाबासाहेब सांगतात.
1) Expanding the notion of Equality of Political Rights
2) Recognized the principle of Equality of Social and Economic Opportunity.
3) It has recognized that the state cannot be held at bay by corporations which are anti social in their purpose.
नीट पाहिले तर आज ही संसदीय लोकशाही याच तीन मार्गाने जाताना दिसते आहे. पुढे बाबासाहेब म्हणतात की - But it can be said in general terms that the discontent against Parliamentary Democracy is due to the realization that it has failed to assure to the masses the right to liberty, property or the pursuit happiness.
संसदीय लोकशाही स्वातंत्र्य संपत्ती किंवा समाधान यांचा अधिकार मिळवून देण्यास अपयशी ठरली आहे. याची दोन कारणे बाबासाहेब सांगतात.
1) Wrong Ideology
2) Wrong Organisation.
पुढे सांगतात की संसदीय लोकशाहीच्या अपयशाला चुकीच्या विचार सरणी पेक्षा चुकीचे संघटन जास्त करणीभूत ठरते. म्हणजेच विचारधारा योग्य असून उपयोग नाही संसदीय लोकशाहीला योग्य संघटन ही अभिप्रेत असते. संसदीय लोकशाहीला अपयशी करणाऱ्या दोन धारणा आंबेडकर सांगतात की -
1) Parliamentary Democracy took no notice of economic inequalities and did not care to examine the result of freedom. Parliamentary Democracy standing as a protagonist of Liberty has continuously added to the economic wrongs of the poor the downtrodden and the dis-inherited class.
पुढे जाऊन दुसरी धारणा सांगताना एक अतिशय महत्वाचे वाक्य बाबासाहेब उच्चारतात ज्याचा पुनरुच्चार बाबासाहेब २५ नोव्हेंबर १९४९ च्या भाषणात ही करतात. ते भाषण १० मिनिटांची ऑडिओ क्लिप ही अवेलेबल आहे. आणि ज्यांनी वाचले आहे त्यांना ही ते स्मरेल. की -
2) The second wrong ideology which has vitiated Parliamentary Democracy is the failure to realize that Political Democracy cannot succed where there is no social and economical democracy.
यासाठी बाबासाहेब इटली जर्मनी व रशिया आणि अमेरिका व इंग्लडचे उदाहरण देतात. इटली जर्मनी रशियात संसदीय लोकशाही सहज कोलमडली पण इंग्लंड अमेरिकेत नाही. याचे कारण काय? याला उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात -
"To my mind there is only one answer - namely, there was a greater degree of economic and social democracy are the tissues and the fiber of a Political Democracy. The tougher the tissue and the fiber, the greater the strength of the body. Democracy is another name for equality. Parliamentary Democracy developed a passion for liberty. It never made even a nodding acquaintance with equality. It failed to realize the significance of equality and did not even endeavor to strike a balance between Liberty and Equality. With the result that Liberty swallowed Equality and has left a progeny of inequities."
बाबासाहेबांनी संसदीय लोकशाहीच्या मर्यादा इथे मांडलेल्या आहेत, त्याचा तौलनिक अभ्यास दिलेला आहे. संसदीय लोकशाहीत सर्व राजकीय संस्था दोन वर्गात विभागल्या जातात.
Rulers आणि Ruled शासक आणि शासित.
बाबासाहेब म्हणतात this is an evil, या आणि हे इथे थांबत नाही याचा सर्वात दुर्दैवी पैलू हा की - "Rulers arw always drawn from the ruling class and the class of the Ruled never becomes the Ruling class, People do not govern themselves, they establish a government and leave it to govern them."
"Parliamentary Democracy notwithstanding the paraphernalia of popular government, is in reality a government of a hereditary subject class by a hereditary ruling class."
पण पुढे एक वाक्य जे मला खूप महत्वाचे वाटले ते मी मुद्दाम अधोरेखित केलेले आहे, की - "The question is who is responsible for this? There is no doubt that if Parliamentary Democracy has failed to benefit the labouring and the downtrodden classes, it is these classes who are primarily responsible for it".
शेवटच्या भागात कामगारांच्या भूमिके बाबत बोलताना बाबासाहेब मार्क्सचा आवर्जून उल्लेख करतात.
"The economic man was never born, The common retort to Marx that man does not live by bread alone is unfortunately a fact."
"To my mind Marx propounded it not so much as doctrine as aas direction to Labour that if Labour cares to make its economic interests paramount, as the owning classes do, history will be reflection of the economic facts of life more than it has been."
Labouring Classes मधील प्रत्येकाने खालील चार पुस्तकांचा परिचय असला पहिले असा बाबासाहेब आग्रह धरतात.
1) Social Contract by Rousseau, 2) Communist Manifesto by Marx, 3) Encyclical on the condition of Labour by Pope Leo XIII, 4) Liberty by John Stuart Mill.
पुढे कामगारांना दिलेल्या मार्गदर्शनाचे संक्षिप्त स्वरूप -
1) Labour cares to make its economic interests paramount, as the owning classes do.
2) They have developed no ambition to capture government, and are not even convinced of the necessity of controlling government as a necessary means of safeguarding their interests.
3) I am not against Trade Unions. They serve a very useful purpose. But it would be great mistake to suppose that Trade Unions are a panacea for all the ills of labour.
4) The third besetting sin of the labouring classes is the easy way which they are lead away by an appeal to nationalism. The working classes who re beggared in every way and who have very little to spare often sacrifice their all to the so called cause of nationalism.
5) Trade unions as the final aim and object of Labour in India It must declare that its aim is to put labour in charge of Government. For this it must organize a Labour Party as a Political Party.
6) It must equally dissociate itself from communal or capitalist political parties such as the Hindu Mahasabha or the Congress. There is no necessity for Labour to submerge itself in the Congress or the Hindu Mahasabha or be the camp followers of either, simply because these bodiea claim to fighting for the freedom of India. Labour by a separate political organization of its ranks can serve both the purposes.
7) A labour party in India would be most welcome corrective to this irrationalism which has dominated Indian Politics for last two decades.
सदर भाषण एकूण सात पानांचे आहे. बरेच मोठे आहे. मी केवळ त्यातला एक्स्ट्रॅक्ट कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वाचकांनी संपूर्ण भाषण शक्यतो मूळ इंग्रजी टेक्स्ट वाचावा आणि आपले मत बनवावे. Beware of Democracy या वाक्यातून आंबेडकर कुठे ही लोकशाहीच्या विरोधात होते असे एकूण भाषणात दिसत नाही. उलट संसदीय लोकशाहीच्या मर्यादा, उणिवा दाखवून डॉ आंबेडकर त्या सुधारण्यासाठीचा अप्रत्यक्ष पुरस्कार करताना दिसत आहेत. डॉ आंबेडकरांची स्वतःची एक Independent Labour Party १९३६ पासून होती. जिचा मॅनिफेस्टो उपलब्ध आहे, मिळवून वाचणे अत्यंत आवश्यक आहे. १९४२ साली क्रिप्स मिशन आल्याने घटना बनवताना जातीय प्रतिनिधित्व असावे म्हणून स्वतंत्र मजूर पक्षाचे शेड्युल कास्ट फेडरेशन मध्ये रूपांतर केले गेले. तरी १९४३ च्या या भाषणात बाबासाहेब कामगारांनी स्वतःची राजकीय पार्टी असण्याचा आग्रह धरत आहेत. याच काळात आंबेडकर मजूर मंत्री ही होते. जर संसदीय लोकशाहीमध्ये एवढ्या त्रुटी आहेत असे बाबासाहेब दाखवून देतात तर मग बाबासाहेब आणखी कुठल्या वेगळ्या शासन पद्धतीचा पुरस्कार करतात का? म्हणजे काही अर्धवटराव बाबासाहेब लोकशाहीच्या विरोधात होते म्हणजे कामगारांच्या हुकूमशाहीच्या मताचे होते असाही अर्थ काढू शकतात. पण मग बाबासाहेब नेमके काय सांगतात? यासाठी यायला हवे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय पक्षाच्या निर्मितीकडे. २० ऑगस्ट १९५५ रोजी बौद्ध धम्म स्वीकारण्याचे जनता पाक्षिकाच्या अंकात जाहीर केले. बौद्ध धम्म स्वीकारणार म्हणजे शेड्युल कास्ट फेडरेशन नाव घेता यायचे नाही. म्हणून रिपाई हा नवा पक्ष काढण्याचा मानस डॉ आंबेडकरांनी डिसेंबर १९५५ ला औरंगाबाद येथे बोलून दाखवला. आणि या पक्षाच्या तत्वज्ञानाची १३ ऑक्टोबर १९५६ वार्ताहरांसोबत झालेली चर्चा आणि पुढे जाऊन भारतीय लोकसत्ताक पक्ष म्हणजेच रिपाई या नव्या पक्षाच्या धेय धोरणे विशद करणारे सविस्तर पत्र त्यांनी लिहिले जे आज खुले पत्र म्हणून ओळखले जाते.
आता त्याच्या खोलात जात नाही. लोकशाहीच्या परिप्रेक्षासाठी रिपाईची भूमिका वाचणे अत्यंत महत्वाचे आहे. १९४३ च्या उपरोक्त भाषणात बाबासाहेब संसदीय लोकशाहीच्या मर्यादा आणि अपयशाची कारणे नमूद करतात. २२ डिसेंबर १९५२ ला संध्याकाळी पूना डिस्रीक्ट लॉ लायब्ररीच्या हॉल मध्ये लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाच्या अटी सांगणारे विस्तृत भाषण करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे (BAWS) मराठी खंड १८ भाग ३ च्या पान क्रमांक ३२५ ते ३३९ हे भाषण उपलब्ध आहे. आणि १९५६ साली रिपाईची भूमिका मांडताना संसदीय लोकशाहीच्या यशस्वीतेच्या आवश्यक गोष्टी/ अटी मांडतात. ज्यात सर्वप्रथम बाबासाहेब लोकशाहीची व्याख्या करतात.
"लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात रक्तविहीन मार्गाने क्रांतिकारक बदल घडवून आणणारी शासन पद्धती म्हणजे लोकशाही".
तिच्या यशस्वीतेच्या सात अटी थोडक्यात -
1) समाज व्यवस्थेत विषमता असता कामा नये.,
2) प्रबळ विरोधी पक्षाचे अस्तित्व.,
3) वैधानिक व कारभार विषयक क्षेत्रात पाळावयाची समता. कायद्यापुढे सर्व समान. (Equality befor law),
4) संविधानिक नीतीमत्तेचे पालन. (Constitutional Morality),
5) लोकशाहीच्या नावाखाली अल्पसंख्यांकांची बहुसंख्यांकांकडून गळचेपी होता कामा नये. अल्पसंख्यांकांना सुरक्षितता वाटली पाहिजे.,
6) लोकशाही राज्यव्यवस्थेसाठी नीतिमान समाजव्यवस्थेची आवश्यकता. (Moral Order),
7) विवेकी लोकमत ( Public Conscience) आणि रिपाईचे भारतीय घटनेच्या preamble मधली न्याय स्वातंत्र्य समता बंधुता ही उद्दिष्टे साध्य करणे हे ध्येय व रिपाईची एकूण सात उद्दिष्टे. सर्व इथे देत नाही. त्यातील सर्वात शेवटचे सातवे उद्दिष्ट व्यक्ती आणि समाज या दोहोंच्या भाल्याच्या दृष्टीने संसदीय लोकशाही राज्यपद्धती ही सर्वोत्तम राज्यपद्धती आहे अशी या पक्षाची धारणा राहील.
तेव्हा या एकूण विवेचनातून डॉ आंबेडकर हे लोकशाही मूलक होते, संसदीय लोकशाहीच्या उणीवा त्यांनी स्पष्ट दाखवून दिल्या, संसदीय लोकशाहीच्या यशस्वीतेच्या अटी मांडल्या आणि आपल्या राजकीय भूमिकेत संसदीय लोकशाही राज्यपद्धती ही सर्वोत्तम राज्यपद्धती असल्याचे जाहीर केले. आजच्या परिस्थतीत आंबेडकरी तरुणांनी लोकशाही लोकशाहीच्या मर्यादा आणि तिच्या यशस्वितेच्या अटी समजून घेऊन मार्गक्रमणा करण्यावाचून आंबेडकरी चळवळीला आणि देशाला तरणोपाय नाही.
आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
डॉ. आशिष तांबे
धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"
••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••
एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA
• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU
• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123
• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com
• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com
••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••
• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number
सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा किंवा खालील लिंक ओपन करा.
सूचना -
आपण फक्त एकाच समूहात सामील होऊ शकता.
◆ BSNET INDIA :
https://chat.whatsapp.com/HHbSpflXc8Y8Juwa5WbNqy
◆ BSNET INDIA (1) :
https://chat.whatsapp.com/HHbSpflXc8Y8Juwa5WbNqy
◆ BSNET INDIA (2) :
https://chat.whatsapp.com/58XH9KINHuVL5OOMVoTADh
धन्यवाद ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा