बुद्धाचा संदेश गावोगावी पोहचविणारे संत गाडगेबाबा
श्री संत गाडगे महाराज |
टिळकांला शब्दांनी चराचर कापणारा क्रांतिकारी बाबा - गाडगेबाबांचा एक किस्सा मी या ठिकाणी उदधृत करतो. १४ फेब्रवारी १९१८ ला टिळक म्हणतात "स्वराज्य (भटमान्य) हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि मी तो मिळवणारच "स्वराज्य म्हणजे भट लोकाचे पेशवाईचे राज्य." १३ नोव्हेबर १९१७ च्या अथनीपासून महाराष्ट्रात टिळकांनी एकच नारा दिला. "तेल्या ताबोल्याना का कौन्सिलात घाना चालवायचा आहे, कुणब्यांना काय नागर हाकायाचे आहे, शिप्यांना काय मशीन चालवयाची आहे" या दोन्ही वाक्यांना अर्थ होतो फक्त ब्राह्मणशाहीचे राज्य. पंढरपूरच्या भाषणात टिळकांनी इज्जत काढली. बाबासमोर येत होते. श्रोत्याची माना वळवल्या टिळकांना घाम फुटला, टिळकांनी श्रोत्याची मने ओळखली बाबांनी काहीतरी बोलवे असेच त्याचे मते होते. टिळकांनी बहुजानाचे मते काऊन्टर केले आणि गाडगेबाबान स्टेजवर आणले. गाडगेबाबा डॉ बाबासाहेबाच्या स्टेजवर कधीही चढले नाहीत. परंतु टिळकांनी गाडगेबाबांना स्टेजवर आणताच गाडगेबाबांनी टिळकांच्या ब्राह्मणपथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बहुजनांनी पार्लमेंटमध्ये स्वतंत्र प्रतिनिधीकी मागणी केली होती त्यासाटी १९१८ मध्ये (ए.सी, ए.टी, ओ.बी.सी) बहुजनांनी फार मोठे आंदोलन केले तेव्हाही सोलापूर मध्ये टिळकांनी अथनीचेच तेच भाषण केले. आणि तेच पंढरपूरला केले. तेव्हा बाबा म्हणतात. "टिळक महाराज, म्या चुकलो आम्ही ह्यातीभर तुमची कपडे धुतली, इस्त्री केली तवा आम्ही कस मार्गदर्शन करू. महाराज कायबी करा पण आमालाबी ब्राह्मण करा!' टिळकांच्या भाषणाचा बट्याबोळ करणारा तत्वज्ञानी बाबा गाडगे महाराजाच्या शब्दाना समाज समाज समजला. दरम्यान शाहू महाराज, भास्करराव जाधव यांनी साऊथ ब्युरो कमिशनपुढे मागणीचे निवेदन पदाविले होते. अहवाल भाग ५, दिनांक २३ एप्रिल १९१९ ला अहवाल प्रकाशित झाला. टिळकांनी केलेली समाजाची हक्क अधिकाराची हिंसा बाबांनी बहुजनाना पाठवून दिली.
अश्पृशाला मदत करताना संत गाडगे आणि त्याचे साथीदार |
अश्पृशाला मदत करताना संत गाडगे आणि त्याचे साथीदार |
'गेले कोटी कोटी काय रडू एका साठी'
बाबांनी कीर्तन सुरु केले. देवदासी जोगती मुर्ळीच्या प्रथा ब्राह्मणा पडल्या होत्या या प्रथेत मुली देवाच्या नावाने सोडल्या जात त्याची लाग्ने देवाशी लावत व त्याचा उपयोग ब्राह्मण पंडे, पुरोहित घेत ती प्रथा बाबांनी मोडली. देव मोठा कि माणूस मोठा लोक सांगत देव मोठा बाबा म्हणत देव मोठा तर त्यांने तुम्हाला द्यायला पाहिजे तुम्हीच त्याला नारळ पेढे, लाडू,प्रसाद,फळे चढवटतात, तो खातही नाही मह तुम्ही का दगडाच्या मुर्त्यासमोर ठेवतात. त्याला कपडेही तुम्हीच घालतात त्याची अंघोळ तुम्हिच घालतात मग तो कसला देव ?
संत गाडगे बाबासह कीर्तन ऐकण्यासाठी जमा झालेल्या महिला |
ईश्वर, आत्मा, ब्राह्यधाम, भोंदुगिरी, कपटनिती, फसवणूक, अहमपणा या टाकाऊ गोष्टी बाबांनी नाकारल्या ते उपदेश करताना म्हणत.
मेरा कोई शिष्य नहि है, और मै किसी का गुरु नाही हु! स्वयप्रेरणा से प्रपच के मोह को त्याग कर जो कोई इच्चामुक्त होकार दिनोद्धार के और अनपढ गरीब लोगो के देवधर्म के बरे मे लगा है, वे सभी मेरे अनंत जन्म के गुरु है!
समतावादी डेबुजीने महार, मराठा, सुतार, धोबी, भिकारी, भटके एकत्र करून समता स्थापन केली. |
सुखी संसार, समर्थक धीरवंत पत्नी, दोन गोडस मुली, नातेवाईक, शेतीबाडी, घरदार सारे कष्टाने मिळविले होते, गायी-गुरे, धनधान्य एवढ सर्व वैभवशाली जीवन असूनही बाबांनी घरदार का सोडले, तर त्यांना सत्य, न्याय, समता, ज्ञान, स्वतंत्र पाहिजे होते. प्रामाणिकपणे कष्ट करण्याची हिम्मत व टाकत होती; म्हनुनच त्याचे आंदोलन प्रामाणिकपणे "कष्टकरी अभियान" होते.१९०५ ते १९१७ पर्यंत १२ वर्षाच्या कालावधीत त्यांनी मोह, माया द्वेष,मत्सर, लोभ या सार्या टाकाऊ गोष्टी जमिनीत गाडल्या.
डॉ. बाबासाहेबानी एक महत्वाची खबर धर्मातारापर्यंत पोहोचली.कदाचित डॉ. बाबासाहेबानी बाबानाच प्रथम त्याचे विश्लेषण सांगितले असावे. कदाचित गाडगेबाबा मुंबईच्या जे.जे. हॉस्पिटल शेजारी असलेला आश्रम शाळेचे काम पाहत होते. बाबासाहेबांनी निरोप पाठवीला 'मला (हिंदुत्व सोडून) धर्मांतर करायचे आहे. मी आपल्याबरोबर चर्चा करू इच्छितो, बाबांना निरोप मिळताच डॉ. बाबासाहेबाना ते कुलाबा येथे येऊन भेटले. बराक वेळ चर्चा झाली. गाडगेबाबा खुश झाले. "डॉ. तुम्ही करणार ते योग्य असणार सारा समाज तुमच्या पाठीशी आहे." डॉ. बाबासाहेबाच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. बाबा मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. मी बुद्धाला स्वीकारणार आहे. हा समारंभ नागपूर येथे होणार आहे' बाबासाहेब या चांगल्या कार्यातयशस्वी होतील, अशी आशा करून गाडगेबाबा तेथून न थांबता तेथून निघून गेले. गाडगेबाबा जास्त वेळ बाबासाहेबासोबत थांबत नसत. बाबासाहेबांवर फारमोठी जबाबदारी आहे. असे त्यांना वाटे. त्याचा बहुमोल वेळ वाया जाऊ नये असा ते विचार करीत. आणी इतरांसोबत ते जास्त ते जास्त वेळ घालवत नसत. त्यात त्याचा वेळ वाया जाणार नाही, याची त्यांना चिंता होती.
आई, कळावणी (मुलगी) मुलगा गोविंद बाबापासून दूर गेलेत तरी बाबांनी त्याचा थागपत्ता घेतला नाही. समाज आणी त्याचे उत्थान हाच बाबाचा परिवार.
बाबांनी तुकाराम, चोखामेळा यांचा आदर्श घेतला आणी बाबा सतत चालत राहिले. समोरासमोर प्रहार केलेत. लोकांनी अधिकार म्हणून त्यांना मारहाण केली, त्यांनी सोसले, देव धर्माच्या नावाने यात्रेला व जत्रेला जाऊ नका असे गाडगेबाबा अज्ञानव पीडित समाजाला सांगत परंतु भट,पुरोहित,बडवे, पंडे त्याचे विचार काऊटर करण्यासाठी समाजाला फसवित. ऊन, वारा, पाऊस, वादळ, दिन, रात्र न पाहता भुके व अनवाणी भटशाहीला बळी पडत. जातीच्या नावाने अस्पृश फासत व जातीच्याच नावाने ब्राह्मण या अज्ञान समाजाला फसवत. त्यात जखमी होत, कोणी मेलेरीया, हैजा, गैस्टो, महामारी,रोगांनी गरीब जनतेचे बळी जात असे, या जीवघेण्या रोगात जर बळी गेलातर देवाच्या दरी जागा मिळाली असा प्रचार-प्रसार ब्राह्मण अंगात ताप असतानाही लोक पंढरपुरला जात. त्या ठिकाणी हलकी जातीची माणसा म्हणून त्यांना ऊन, पावसात कोणीही घराचा छपराचा आसरा देत नसत.
गाडगेबाबांनी समाजाचे उत्थान करण्यासाटी जो त्याग घेतला तो फारक वेगळा होता असे मुळीच नाही. पंढरपुरला यात्रेला जाणारे महार, मांग,वडार आणि इतर जातीच्या लोकांसाठी १९१८ साठी लाखो रुपये जमीन मिळवून धर्मशाळा बांधली. महार-मांगसारख्या कथित जातीला पंढरपुरात देवाच्या नावाने मृत्यू येऊन नये म्हणून व या बहुजन समाजाने स्वत:चे हक्काचे निवास समजून कोणाची भीती न बाळगता हक्क अधिकाराने राहावे हा विकार करून "संत चोखामेळा धर्मशाळा"असे नाव दिले.
(ढोंगी) बाबा, बुवा, पाखंडी, वैरागी,साधू-संन्यासी अशा लोकापासून बाबा आणी बाबासाहेब दोन्ही दूर होते. परंतु गाड्गेबाबाचे बाबासाहेबांवर अफाट प्रेम होते.समाजासती ते आंदोलन चालवत होते. पायाला स्पर्श न करू देणारे हा महान संत. समानतेने अभिवादन करणारा संत. समानतेने व समतेने अभिवादन करणारा संत बाबांनी कपाळावर टिळा, गंध, भस्मलावला नाही , न अंगावर भगवे कपडे घातले, गळ्यात धाग, दोरा, माळा घातला नव्हता, स्वत: फार मोठा विद्वान, साधू, संन्याशी, संत, आचार्य पंडित, स्रमाट जोगी मानले नाही. किवा उच्च आसनावर बसले नाहीत. समानता, बंधुभाव न्याय त्यांनी अंगीकार केलेला गुण आणी हेच बाबाचे समता-स्वातंत्र्याचे आंदोलन समाप्त करण्यासाटी गांधीनी बऱ्याचदा प्रयन्त केला. १९२५ ला सत्यशोधक आंदोलन समाप्त गांधीनी केले. नंतर ते १९२७ ला पेरियार आंदोलन समाप्त करण्यासाठी गांधीनी प्रयन्त केले. मात्र पेरियार रामसामी गांधीपासून सावध होते. बाबांचे आंदोलन समाप्त करण्यासाटी गांधीनी त्याची भेट घेण्याचा प्रयन्त केला. बाबांना बाबांना गांधीनी निरोप पाठविला तेव्हा बाबा म्हणतात, :मुझे क्या काम है उनसे, समाज का बहुत काम करना है, मेरे पास वक्त नाही है!" तेव्हा गांधीनी नवीन उपाय आखला. मुंबई प्रांतचे प्रोव्हिसीएल मुखमंत्री बाळ गंगाधर खेर (गांधीचा ब्राह्मणावादी ब्राह्मण चेला) यांस गाडगेबाबांची भेट घालून देण्याविषयी कळविले. खेरने बाबाच्या मुक्कामावर पाळत ठेवली. एक साधा परंतु भरपूर जनजागृतीचे ज्ञान गांधीना कळल्यावर त्याचे आंदोलन संपविण्याची गांधीनी तयारी केली.
३० नोव्हेबर १९३५ ला बाबांचे सामाजिक आंदोलनाचे कीर्तन वर्धा येथील गांधीच्या आश्रमजवळक खेरने दिली. सुमारे २०-२५ किमीवरून लोकांचे समूह बाबाच्या कीर्तनाला आले होते. झौंदिच्याझुंडी वर्धा नगरीत व तेथून आश्रमाच्या दिशेने येत होते. गांधीच्या मागे मागे एवढी प्रजा नव्हती. अख्या देशातूनही गांधीकडे एवढी जनता आली नव्हती.बाबाचा प्रभाव पाहून गांधी बाबाच्या भेटीसाठी स्वतहून गेले. आणि गांधीनी बाबांना उच्च आशान देताच बाबा जमिनीवर बसले. नंतर ते उभे राहिले त्यांनी (गांधीनी) हरिजन धर्माशाळेचा पुन्हा विषय काढला. (ज्या धर्मशाळेचे नाव संत चोखामेळा धर्मशाळा-पंढरपुर असे होते.) या सर्व धर्मशाळा गांधी (स्वत:च्या) ट्रस्टमध्ये जमा करणार होते. त्या धर्माशाळेचा विषय संपवून बाबांनी 'आंदोलनात्मक' कीर्तन सुरु केले. (संदभ -गाडगेबाबा पृ.९० प्रबोधनकार) गांधी, मदन मोहन मालवीय, शंकराचार्य कुर्नकोटी या सत्वाचा तत्कालीन नाटकी समाजसेवा अक्षरश: खोटा ठरविला. बाबांसमोर येऊन उभे राहणे गांधी स्वत:ला धन्य माणू लागले व बाबाच्या कार्यापुडे बापू, काय आणी शंकराचार्य काय सार्वक फोल ठरले. बाबांनी सत्यशोधक विचारातून गांधीला निस्टेन केले. लोकांनी त्याची वाहवा केली काय आणी बऱ्याचदा त्याची बदनामी आपल्या म्हात व उद्देश विचारले परंतु त्याचे उत्तराक त्याच्याकडे असल्याने मला बदनाम करू नका असेच त्यांनी चार्घावले व याज्ञाकारांना सांगितले. साक्षाकार, दृष्टांत यात्रा जमा हि थोतांड पटवून दिली.
गांधीनी बाबांना जेवणाचे आमंत्रण दिले. कीर्तन त्याच्याच आश्रमाच्या आवारात असल्याने व लोकांच्या प्रेमळ अन्ग्राहणे बाबांनी गांधीचे आमंत्रण स्वीकारले. त्याच्या आश्रमाच्या समोर गांधीचे निवासस्थान होणे बाबा त्याच्या निवासस्थाना बाहेर कट्ट्यावर बसले त्यांना त्याच्या आवडीचे जेवण विचारल्यावर बाबांनी कांदा, चटणी, ज्वारीची भाकरी व मासुरची डाळ असे जेवण सांगितल्यावर जमिनीवर बसून जेवले. बाकरींना सफरचंद, द्राक्षे, खाऊ घालून स्मित हास्य केले व "गरीब लोग खाते वही खाना बाबा खाते है." अपवित्र मानतात व ते पूर्वी प्रेतावर हि डाळ टाकायला सांगत देवोदास व कस्तुरा गांधी यांनी बाबांना जेऊ घातले आणि बाबा परभणीच्या रस्त्याला लागले. बाबा कोणाचाही भेट घेऊन वेळ वय घालवीत नसत डॉ. बाबासाहेबांची भेट मात्र ते स्वत:हून घेत हा त्याच्या आंदोलनाचा भाग होता. बाबाची आई (सखुबाई) खूप आजारी होती. तिला आपल्या लाडक्या डेबुची तोंड पाहण्याची इच्छा झाली पत्नी कुंता बाबाकडे आली आल्याचे कारण सांगितल्यावर बाबा कुंताबाईला म्हणतात. मला समाजाची भरपूर कामे करायची आहेत. संध्या वेळ नाही, माझे तोंड पाहून काय होणार. मागच्या तर भेटलो आईचा मृत्यू झाला परंतु बाबांनी समाजकार्य सोडले नाही. अस्पृश्य समाजाला दुक्ण्यासाठी मातीचे भांडे घेऊन त्याचा भिक्षापात्र म्हणून वापरले तर पाटीमागे पाऊल खुणा पुसण्यास घाण, अंधश्रद्धा, अज्ञान, अंधकार, विषमत्ता साफ करण्यासाठी (झाडूचा वापर) केला. महार, मांगांना अस्पृश्य म्हणून गावाच्या बाहेर राहण्यास भाग पडले. तर बाबानी आंदोलनासाठी त्याचा वापर केला. झाडाखाली पोत्यावर झोपून रात्र काढल्या. अंगभर चांगले कपडे वापरण्याची बंदी होती. त्या बंदीला काऊटर करण्यासाठी आणि त्या परिस्थितीला आंदोलनात बदल करून घेतला. फाटक्या कपड्याचे पासुकुलीत (चीवर) बनवून गाडगे बाबांनी आंदोलन केले. ब्राह्मण माधुकारीच्या नावाने फुकटचे खात बाबांनी गावच्या-गाव साफ केले. किवा लाकडे फोडून दिल्यावर आपल्या मातीच्या भांड्यात कष्टाचे जेवण घेतले. हि महान ओळखीच्या वर्गाला बाबांनी दिली. ब्राह्मणानी ज्या पद्धती बाबांनी आंदोलनासाठी वापरून अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी लढा दिला. धोबी जातीला १९६०-६१ पर्यंत महाराष्ट्रात अनुसूचित जाती म्हणून ओळखले जात होते परंतु नंतर महाराष्ट्र त्यांना ओबीसी म्हणून ओळखले जाते. पंढरपुरला एकदा गाडगेबाबा आपल्या मिशनसाठीआले होते. त्यांना पाहून त्या दिकाणी उपस्थित चालू आहे, अशा फाटक्या कपड्यात देव कधी भेटतो काय ? देव फटके कपडे घातल्यावर भेटत नसेल, तर कोणते कपडे घातल्यावर देव भेटतो ते तरी आपण सांगावे गाडगेबाबांच्या खेर उत्तर देऊ शकले नाहीत ते खाली मन घालून निघून गेलेत. गाडगेबाबा समोरच्या व्यक्तीला त्याच्याच विचाराने उत्तर देत. पी के अत्रेना त्याच्या पत्रकारितेवर घमेंड होता परंतु त्यांनी जेव्हा बाबाचे अभिनवयुक्त जिते-जागते समाज जागृत कीर्तन पहिले एकले तेव्हा त्यांनी आपला अभिप्राय व्यक्त केला. "गाडगेबाबांचे कीर्तन एकले तर मला असे वाटले माझे ५५ वर्षाचे आयुष्य फुकट गेले.
" डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बाबांचे कीर्तन ऐकत. जेव्हा बाबासाहेब कीर्तन एकूण आपल्या पुढील कामासाठी निघत तेव्हा गाडगेबाबा आपल्या कीर्तनकार मंडळींना डॉ. आंबेडकर कि जय अशा घोषणा देत मनमाड येथे १९४२-४३ ला गाडगेबाबांनी बाबासाहेबांना शोषित-पिडीत समाजाचे उद्धारक म्हटले. बाबासाहेबांची महानिर्वानाची बातमी गाडगेबाबांनी ऐकली आणि त्यांनी दवा, ऑषधी घेण्याचे सोडले. ते खचून गेले,करोडो समाजाला ते सोडून गेले आणि त्यांनी त्यासंदभार्त उदगार हि काढले, बाबासाहेबांची दु:खद बातमी कळली. त्यानंतर त्यांनी मुंबई सोडली. मुंबई-हावडा एक्सप्रेसने अमरावतीला निघाले, जणू त्यांना जीवनात संपल्याची आयुष्याने सूचना दिली होती. आता त्यांना जीवनात निराशा दिसली १७ डिसेंबर १९५६ ला प्रकृती गंभीर झाली. त्यांनी आडमिट केलेले हॉस्पिटल हि सोडले. १९ डिसेंबर १९५६ ला ते बडनेराला गेले आणि त्यांना नगरवाडीला जाण्याची इच्छा केली. "माझा मृत्यू कोणाच्याही घरी व्हायला नको, मी रस्ताने जाताना मारायला पाहिजे,. जेथे मी मृत होणार त्याक ठिकाणी माझे अंतिमसंस्कार करावे." असे बाबांनी आपल्या साथीदारांना सांगितले. स्मारक किवा मंदिर बनून न मी जे कार्य केले ते अखंड चालू ठेवा तेच माझे स्मारक आहे." , बाबांनी आपल्या नागर्वाडीला शेवटचा श्वास घेण्याची परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना अमरावतीला घेऊन जायला सांगितले, बाबा झोपले होते, त्यांना अचानक जाग आली, "नागरवाडी अजून आली नाही का?" बाबांनी विचारले.साथीदारांनी गाडी अमरावतीकडे जात असल्यास सांगितले. बळगावच्या पुलावरून गाडी जात असताना बाबांनी प्राण सोडले. रात्री १२.२० वाजले होते. २० डिसेंबराचे फक्त २० मिनिटे बाबांनी अंतिम श्वासाचे घेतले, "नागरवाडी अजून आली नाही का?" हे वाक्य बाबाचे अंतिम शब्द ठरले. अंधार पडल्यावर अग्नीसंस्कार केले जात नव्हते परंतु बाबांनी केलेले कार्य अंधश्रद्धा नष्ट करण्याचेही असल्याने बाबाच्या प्रेरणा घेणारयानी बाबाचे संस्कार केलेत. हा संदेश आकाशवाणीवरून सर्व दूर प्रसारला. एकाच महिन्यात दोन महापुरुषाची महाअंत्ययात्रा जगातील एकमेव उदाहरण आहे. जे दोन्ही एकाच विचाराचे व एकदुसर्याला मान-समान देत. स्व:तच्या प्राणाची आहुती देणारे थोर समाजसुधारक होते. दोघाची रणनीती वेगवेगळी असली तरी उद्देश,ध्येय एकच होते. इतिहासाला चराचर कापणारी महापुरुषाची एकमेव जोडी होय. ज्यांचे राहणीमान व शिक्षण एकसमान नव्हते परंतु दोघांच्या विचारचा खजिना बुद्धाच्या सामाजिक क्रांतीकडे घेवून जाणारा होता. रात्री २.२० मिनिटांनी बाबाचे अंत्यसंस्कार पार पडले. आणि एक महान अशा राष्टीय संताला भारत देश मुकला, बाबाचे अपूर्ण कार्य आज फक्त बामसेफ करीत आहे. १९०५ ते २० डिसेंबर १९५६ असे ५१ वर्ष या समाज क्रांतीकाराने अविरत कार्य केले. सतत चालत राहिले. मृतदेहसुद्धा अस्थिर राहिला त्यांना स्थायी निर्वाण नको होते. तेच घडले. वयाच्या २९ वर्ष गृहत्याग करणाऱ्या बाबाचे ८०व्या वर्षी महानिर्वाण झाले, बुद्धाचे महानिर्वाणाप्रमाणे बाबा अखेर पर्यंत झुंजत राहिले. ब्राह्मणी साहित्यकारांनी लेखणीचा गैरवापर करून ब्राह्मण, भट, पुरोहित, पंडे अशा भात समाज सुधारक बनवले.
बांद्रा पोलीस स्टेशन येथे ८ नोव्हेंबर १९५६ ला बाबांना किर्तनासाठी बोलावले गेले. बाबांची प्रकृती ठीक नव्हती, तरीही किर्तनासाठी हजर राहिले. त्यांना कोणीतरी प्रकृती ठीक नाही तरी का आलेत. तेव्हा त्यांनी विनोदांनी त्यांना हसविले. "पोलिसचा नियम आहे. का नाही आला. बेड्या घालून पकडून आणा." साळ्याला माझीच फजिती झाली असती. शेवटी मी आलोच. मग खोकला होऊन मरा.. आणखी कशाला मरो! पोलीसानां लाजवणारा विचार बाबांनी सांगितला तेव्हा पोट भरून हसलेच........
बाबांचा अमर संदेश -
"बाप हो, देव न तिर्थात ना मूर्तीत , तो दरिद्रीनारायणाच्या रुपात तुमच्या समोरच उभा आहे."
तन मन धनाने बाबांचे मिशन बहुजन समाजाला पूर्ण करायचे आहे. बाबा पुढे चालत राहिले-मागे कीर्ती वाटत गेली!
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
किर्तीचा लोप हि शुल्लक गोष्ट आहे,
पण प्रज्ञेचा लोप हि दु:खद गोष्ट आहे.,
दोन्ही महामानव आणि एकच राष्ट्र आहे....!!!
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
त्याच्या पवित्र स्तृतीस कोटी कोटी प्रणाम........!!!!!
- यतिन जाधव.
- यतिन जाधव.
मी पूर्ण ब्लॉग वाचला, त्यातील प्रत्येक वाक्य हे काळजाला भिडणारे आणि सत्य परिस्थिती डोळ्यासमोर आणणारी होती.
उत्तर द्याहटवायामध्ये प्रामुख्याने महत्वाच्या घटना दाखवल्या आहेत, प्रत्येक गोष्ट आणि घटना वाचून साहजिकच आश्चर्य, राग, आणि शेवटी भावनिक होते, खूप खूप धन्यवाद तुमच्या ब्लॉग बद्दल....
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवादहा वर्षांनी यावर कमेंट आली,
उत्तर द्याहटवा