सर्व मुस्लिम समाजाला टारगेट करण्याचा प्रयत्न -
अफजल खानाचा शिवरायानी वध केल्यानंतर त्यांच्यातील राजकीय शत्रुत्व (धार्मिक नव्हे ) शिवरायानी तिथेच संपवून टाकले . ज्या शत्रूला आपण स्वताच्या हाताने ठार केले त्याचीच कबर सन्मान पूर्वक प्रताप गडावर उभार णारा राजा एक्मेवाद्वितियच म्हणावा लागेल . शिवरायांचे मोठेपण नेमके याच्यात आहे . त्यानी कधीच परधर्माचा द्वेष केला नाही . पर्धर्मियाना नेहमी सन्मानाने वागविले .युद्धाच्या प्रसंगी कोणत्याही धार्मिक स्थळाना अथवा धर्म ग्रंथाना हानि पोहचवायची नाही शिवरायांचा दंडक होता . परंतु आज नेमके त्याच्या उलट वर्तन चालले आहे . अफजल खानाच्या नावाखाली मुस्लिम द्वेष करायचा किंवा त्याना बोचेल अशी इतिहासाची मान्डनी जाणीव पूर्वक करायची , असे प्रकार सर्रास घडत असतात . अफजल खान वधाच्या त्याच्यावर द्वेष मूलक मजकुर लिहिला जातो ते टाळले पाहिजे . अफजल खान मुसलमान होता म्हणुन तो स्वराज्याचा शत्रु नव्हता . किवा तो स्वराज्याचा शत्रु होता म्हणुन सर्व मुसलमान स्वराज्याचे शत्रु आहेत , असेही कुणी समजू नये . सर्व जाती -धर्माचे मावळे शिवरायांच्या पदरी होते . दौलत खान दर्यासारंग हा मुसल मान त्यांचा आरमार प्रमुख होता . नुरखान बेग नावाचा मुसलमान त्यांचा घोडदल प्रमुख होता . इब्राहिम खान नावाचा मुसल मान त्यांचा पयदळ प्रमुख होता । काझी हैदर हा मुसल मान त्यांचा वकील , न्यायाधीश होता. मदारी मेहतर हाही त्यांच्या दरबारी आहे . मुसल मान मौनी बाबा त्यांचे गुरु होते . राजांच्या अन्गरक्शंकापैकी अर्धे मुसल मान होते । आणि ही प्रमाणिक , जीवाला जीव देणारी मानसे होती . आयुष्यात त्यानी कधीही राजांशी गद्दारी केलि नाही . असे असताना फ़क्त अफजल खान वध हे एकच प्रकरण समाजासमोर नेहमी मान्दायाचे आणि राजांच्या पदरी असणार्या प्रामाणिक मुसल मान मावळ्याकदे दुर्लक्ष करायचे , हे कितपत बरोबर आहे . शिवरायांचे कर्तुत्व फ़क्त अफजल खान वधापुराते मर्यादित नाही याचे भान आम्ही ठेवणार आहोत की नाही ? शिवरायांच्या चरित्राचा चिकित्सक अभ्यास करून ते विचार , तो आचार आम्ही आमच्या आचरणात आणले तर “मिरज दंगली ” सारख्या वाईट घटना आम्ही तालू शकतो । मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर म्हणतात ना , “शिवाजी महाराज हे काही डोक्यावर घेवून नाचायाचे विषय नाहित तर डोक्यात घालायचे विषय आहेत .”
दंगलीचा प्रचार आणि प्रसार -मिरज येथे झालेल्या हिंदू मुस्लिम दंगलीत तेल ओतण्याचे काम केले ते प्रचार प्रसार माध्यामानी । अनेक वर्त्तमान पत्रातून दूर चित्र वाहिन्यांवर तोडफ़ोडीची दृश्ये सतत दाखविल्यामुळे येथे घडलेल्या दंगालिचे पडसाद सांगली , आस्था , कोल्हापुर , इचलकरंजी आदि ठिकाणी उमटले । त्याचप्रमाणे मोबाईल आणि इन्टरनेट या आधुनिक संपर्क साधनांच्या आधारे या दंगालिच्या विडियो क्लिप्स सर्वदूर पोहचावल्या । काही तासात यु ट्यूब वरील मिरज दंगलिची विडियो क्लिप पाहानार्यांची संख्या होती जवळ जवळ १७०००। म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याचा जाणीव पूर्वक प्रचार प्रसार करण्यात आला आणि त्यामुळे समाजात असंतोष पसरायला वेळ लागला नाही । मिरज दंगलिची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे । जे दोषी असतील त्या समाज कन्टकाना कठोर शिक्षा झाली पाहिजे । आणि यापुढे असे प्रकार होवू नयेत म्हणुन शिवरायांचे खरे चरित्र समाजासमोर मांडले पाहिजे। शिवरायांचा लढा कोणत्याही जाती -धर्माविरुद्ध नव्हता तर स्वराज्याशी बेइमानी करणार्या , इथल्या मातीवर अत्त्याचार करणार्या सैतानान्च्या विरुद्ध होता । सर्व धर्म सम भावानेच आयुष्यभर जगले । त्यांच्या पश्चात आम्ही त्यांच्याच आचार विचाराना काळिमा फासला तर शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार आम्हाला उरणार नाही । जय जिजाऊ , जय शिवराय , जय मूलनिवासी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा