शनिवार, १४ जानेवारी, २०१७

● पुसून दावा नाव (कविता)

● पुसून दावा नाव

भीमरायाच्या नावासाठी,
रक्त सांडले राव ।
असेल कोणी माईचा लाल,
तर पुसून दावा नाव ॥धृ॥

पाहून भीमाची क्रांती,
ती क्रांती सलत होती ।
ज्ञानाचे पेरले मोती,
त्याचे नावच नव्हते वरती ॥१॥

नामांतराने विद्यापीठाला,
जगात आला भाव ।
असेल कोणी माईचा लाल,
तर पुसून दावा नाव ॥२॥

गौतमने प्राण गमावला,
पोचीरामने लढा लढविला ।
सुहासिनी आणि प्रतिभाने,
जातिवाद्यांना धडा बडवला ॥३॥

बलिदानाचा महिमा गाईल,
इथले गाव अन गाव ।
असेल कोणी माईचा लाल,
तर पुसून दावा नाव ॥४॥

भीम नाव कमानी वरती,
पाहून भटोबा झुरती ।
झुरता झुरता अर्धे मरती,
दवाखान्यात होती भरती ॥५॥

नाव पुसाया येतील,
त्यांच्या वर्णी बसतील घाव ।
असेल कोणी माईचा लाल,
तर पुसून दावा नाव ॥६॥

आनंदी किशोर झाला,
त्या नामांतर दिनाला ।
आनंद भिडे गगनाला,
सांगे पटवून दिन जनाला ॥७॥

भीमरावांनी असा,
जिंकला हा नामांतर डाव ।
असेल कोणी माईचा लाल,
तर पुसून दावा नाव ॥८॥

कवी -
(सादर कवीचे नाव आठवत नाही.)

साभार -
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

डाँ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात शहीद झालेल्या सर्व भीमसैनिकांना विनम्र अभिवादन आणि डाँ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ नामांतर दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!

अभिवादक एवं शुभेच्छुक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा